Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात योनीमध्ये होणारे बदल

गरोदरपणात योनीमध्ये होणारे बदल

गरोदरपणात योनीमध्ये होणारे बदल

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होतात. तुम्ही गरोदर असल्यास, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला लक्षात आले असेल. ह्या काळात तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असावेत. तुमचे वाढलेले वजन, स्तनाची कोमलता, चमकदार केस आणि त्वचा इत्यादी काही बदल तुमच्या लक्षात आले असतील. पण गरोदरपणात असे बरेच काही घडते जे तुम्हाला अजून लक्षात आले नसेल.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात योनीतील बदल लक्षात घेणे कठीण असते. पहिल्या तिमाहीत अक्षरशः कोणताही बदल होत नाही. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत तुम्हाला काही बदल दिसून येतील. हार्मोनल बदलांमुळे स्त्रीचे अवयव बदलतात. अगदी बाह्य स्वरूपात सुद्धा हे बदल दिसू लागतात.  शरीरातील हार्मोनल पातळीतील बदलांमुळे व्हेरीकोस व्हेन्स दिसू शकतात. त्याचा परिणाम सुमारे दहा टक्के गर्भवती स्त्रियांवर होतो. प्रसूतीपूर्वी सुमारे सहा आठवडे व्हेरीकोस व्हेन्स नाहीशा होतात, म्हणून तुम्हाला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. गरोदरपणामुळे तुमच्या योनीमध्ये कोणते बदल होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात तुमच्या योनीमध्ये होणारे बदल

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात योनिमार्गातील काही बदल खाली नमूद केले आहेत.

1. तुमच्या योनीची pH पातळी बदलेल

गरोदरपणात, तुमच्या शरीराच्या ओटीपोटाकडील भागात जास्त रक्त प्रवाह होईल. यामध्ये तुमचे गर्भाशय आणि योनी यांचा समावेश होतो. वाढलेल्या रक्तपुरवठ्यामुळे तेथील रसायनांचे पी.एच संतुलन बदलेल. त्यामुळे योनीला चिकट सुगंध येईल. होय, तुमच्या योनीतून वेगळा वास येईल आणि तुमच्या वाढलेल्या घाणेंद्रियामुळे तुम्हाला तो जाणवण्याची शक्यता आहे. परंतु हा वास जास्त तीव्र आहे किंवा दुर्गंधी येते आहे असे तुम्हाला वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ते संसर्गाचे लक्षण असू शकते.

2. योनीची चव वेगळी असेल

तुमच्या योनीच्या चवीतील बदल लक्षात न येण्यासारखा असू शकतो. चवीतील हा बदल योनीमध्ये वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे होतो. त्यामुळे जननेंद्रियातील रसायनांचे संतुलन बिघडते. गरोदरपणात चव अधिक खारट आणि मेटॅलिक असेल.

3. तुमच्या योनीतून जास्त स्त्राव होईल

बहुतेक स्त्रियांना असे वाटते की फक्त प्रसूतीच्या वेळीच गरोदरपणात योनीतून स्त्राव होतो, परंतु ते खरे नाही. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात भरपूर प्रमाणात हार्मोनल बदल होतात, आणि त्यामुळे गरोदरपणात लॅबियामध्ये बदल होऊ शकतात. तुमच्या योनीच्या भित्तिकांना ल्युकोरिया नावाचा दुधाचा स्त्राव निर्माण करण्यासाठी उत्तेजित केले जाईल, आणि त्यामुळे स्त्रीचे अवयव कोणत्याही संसर्गापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे, योनीतून नेहमीपेक्षा जास्त स्त्राव होत असल्यास घाबरू नका.

4. तुम्हाला मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो

गरोदरपणात तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTIs) होण्याचा धोका असेल. तुमचे गरोदरपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसे तुमच्या वाढलेल्या गर्भाशयाचा मूत्राशयावर दाब पडेल आणि त्यामुळे मुत्राशयातून लघवीचा पूर्णपणे निचरा होत नाही.  त्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो.

5. तुमची योनी अत्यंत संवेदनशील होऊ शकते

गरोदरपणात व्हल्व्हामध्ये रक्तप्रवाह वाढल्याने ते गुळगुळीत आणि संवेदनशील बनू शकतात. योनीच्या त्या भागाला सूज येऊन तो संवेदनशील होऊ शकतो.

6. तुम्हाला तेथे व्हेरीकोस व्हेन्सचा त्रास होऊ शकतो

योनिमार्गात रक्तप्रवाह वाढल्यामुळे झालेला आणखी एक बदल म्हणजे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होणे. रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांवर दाब पडतो, कारण त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात रक्त हळूहळू पुढे सरकत असते. गर्भवती स्त्रियांच्या अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी हे नसा दिसण्याचे कारण आहे.

7. तुमच्या योनीला व्हेरीकोस व्हेन्सचा त्रास होऊ शकतो

एखादी स्त्री गरोदर असो अथवा नसो, स्त्रियांमध्ये यीस्ट इन्फेक्शन होणे सामान्य आहे. सुमारे 75% स्त्रियांना यीस्ट इन्फेक्शन होते. परंतु, इस्ट्रोजेन पातळी वाढल्यामुळे आणि पीएच पातळीत बदल झाल्यामुळे गर्भवती स्त्रियांना यीस्ट संसर्ग होण्याची शक्यता असते.

8. तुमच्या योनीचा रंग बदलू शकतो

योनीचा रंग सामान्यतः गुलाबी असतो, परंतु गरोदरपणात तो बदलू शकतो. तेथे रक्त प्रवाह वाढल्याने हा बदल होऊ शकतो. याला चॅडविकचे चिन्ह असेही म्हणतात. रंगद्रव्यांवर काम करणाऱ्या संप्रेरकांमुळे गरोदरपणात लॅबिया आणि व्हल्व्हाचा रंग गडद निळा होऊ शकतो. हा बदल गरोदरपणानंतर चार आठवड्यांमध्ये होऊ शकतो आणि हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक देखील असू शकते. पण काळजी करण्यासारखे काही नाही. तुम्ही तुमच्या बाळाला जन्म दिल्यानंतर हा निळा किंवा जांभळा रंग नाहीसा झाला पाहिजे.

9. तुम्हाला जास्त वाढलेले केस दिसू शकतात

रक्तप्रवाहात एस्ट्रोजेनच्या मोठ्या प्रमाणामुळे जननेंद्रियांवरील केसांची जलद वाढ होऊ शकते.

10. तुमच्या योनीला खाज सुटू शकते

होय, तुम्हाला तेथे खाज सुटू शकते. योनीतून स्त्राव वाढणे, pH पातळीतील बदल आणि इतर बदल तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. खाज सुटणे हे गर्भधारणेचे एक सामान्य लक्षण आहे. परंतु जर ते जास्त काळ टिकून राहिल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात स्त्रीची योनी महत्त्वाची भूमिका बजावते. गरोदरपणात, तुमच्या योनीमध्ये काही बदल घडणे बंधनकारक आहेत – ते विचित्र वाटू शकतात परंतु ते पूर्णपणे सामान्य आहेत. यातील कोणताही बदल जास्त काळ टिकत नाही आणि त्याचा तुमच्या गरोदरपणावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. शिवाय, तुमचे बाळ ह्या जगात आल्यानंतर तुमच्या स्त्रीचे अवयव त्वरीत सामान्य होतील. परंतु, जर हे बदल तुमच्या दैनंदिन जीवनात होत असतील तर त्याबद्दल तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोला.

आणखी वाचा:

गरोदरपणात योनीमार्गात होणाऱ्या वेदना
गर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article