In this Article
- २५ व्या आठवड्यात बाळाची वाढ
- बाळांचा आकार केवढा आहे?
- सामान्य शारीरिक बदल
- जुळ्या बाळासह गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यातील लक्षणे
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २५ वा आठवडा – पोटाचा आकार
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २५ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यातील आहार
- गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात काळजीविषयक टिप्स
- तुम्हाला २५ व्या आठवड्यात काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुमच्या गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यापर्यंत, विशेषत: जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांची अपेक्षा करीत असता, तेव्हा तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाळांमध्ये असंख्य बदल होत असतात. ह्या बदलांमुळे केवळ तुमचे वजन व पोटच वाढत नाही तर कधीकधी थकवा देखील जाणवतो. तुमची ऊर्जेची पातळी पूर्वीसारखी नियमित करणे तुमच्यासाठी अवघड होऊ शकते. परंतु ह्या टप्प्यावर सक्रिय जीवनशैली राखणे आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि ते प्रसूतीच्या वेळेला फायदेशीर ठरू शकते. ह्या आठवड्यात आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेतल्यास तुम्हाला गोष्टी व्यवस्थापित करण्यास मदत होईल आणि तुमचा हा गरोदरपणाचा प्रवास सुकर होईल. तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असाल तर तुम्हाला माहिती असायला हव्यात अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
२५ व्या आठवड्यात बाळाची वाढ
ह्या आठवड्यात बाळांचा वाढीचा दर मागील आठवड्यांप्रमाणेच राहणार आहे. आगामी आठवड्यात बऱ्याच बदलांची अपेक्षा आहे, ह्या बदलांमुळे तुमची जुळी किंवा एकाधिक बाळे बाहेरच्या जगात जगण्यास पात्र होतील आणि हे होण्यासाठी त्यांच्या वाढीवर संपूर्णतः लक्ष केंद्रित केले जाईल.
ह्या काळात बाळाच्या फुफ्फुसांचा विकास होईल. फुफ्फुसांना कार्य करण्यास थोडा वेळ लागतो, परंतु आतापर्यंत त्यांच्या आकारात वाढ होऊ लागेल आणि ते शक्य तितक्या जास्त प्रमाणात हवा आत घेऊ लागतील. ह्या आठवड्यात, फुफ्फुसातील आकार आणि रक्तवाहिन्यांचे जाळे वाढत असताना, रक्ताभिसरण प्रणालीसह असंख्य रक्तवाहिन्यांचा विकास होतो. बाळांना जिवंत ठेवण्यासाठी ते कार्य असल्याचे सिद्ध करतात, ज्यामुळे फुफ्फुसांना श्वासाद्वारे आत घेतलेल्या हवेमधून ऑक्सिजन रक्तामध्ये शोषून घेता येतो, त्यानंतर तो शरीरात वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
ह्या टप्प्यावर बाळांची त्वचा अजूनही अर्धपारदर्शक असते. परंतु आता त्वचा चमकदार दिसण्यास सुरुवात होऊ लागते कारण त्वचेवर आता चरबीचा थर तयार होण्यास सुरुवात झालेली असते. तसेच, रक्तकेशिका त्यांच्या शाखा संपूर्ण शरीरात पसरण्यास सुरवात करतात. जेव्हा रक्त त्यांच्याद्वारे वाहू लागते, तेव्हा त्यांना लालसरपणा येतो. नवजात बाळाची त्वचा निरोगी गुलाबी रंगाची असते त्याचे कारण हेच आहे.
बाळांचा आकार केवढा आहे?
जर आपण शेतात कधीही मोठा सलगम (एक प्रकारचे कंद) पाहिले असेल तर या आठवड्यात तुमच्या बाळांचा आकार साधारणपणे तेवढा आहे. त्यांची लांबी आणि वजन दर आठवड्याला वाढत आहे. जर त्यांची उंची मोजली तर ती ३५ सेंमीच्या आसपास असते तर त्यांचे वजन ६०० –७०० ग्रॅम्सच्या आसपास असते. प्रत्येक बाळाचे वजन जुळ्या आणि तिळ्या बाळांच्या बाबतीत थोडे कमी असू शकते आणि उंचीच्या बाबतीत सुद्धा ते लागू आहे.
गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात गर्भाचे महत्वाचे विकासाचे टप्पे असतात. तसेच ह्या आठवड्यात तुमच्यामध्ये सुद्धा भरपूर बदल होतील. गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात आईमध्ये कोणते बदल होतात ह्यावर ह्या लेखामध्ये भाष्य केलेले आहे.
सामान्य शारीरिक बदल
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये २५ व्या आठवड्यात होणारे बदल हे आधीच्या लक्षणांचीच विस्तारित आवृत्ती असते.
- काही स्त्रियांना गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यापंर्यंत तीव्र लैंगिक इच्छा होते आणि ह्या आठवड्यात सुद्धा ती तशीच राहू शकते. काही स्त्रियांना मात्र कामवासना कमी होताना जाणवते. पोटाचा आकार लक्षणीय रित्या वाढल्याने कामवासना कमी होते. हे काही आठवडे तसेच सुरु राहते. काही स्त्रियांच्या भावनांचा उद्रेक होईन त्यांना विचित्र वाटून थकवा जाणवू शकतो. तुमच्या पतीने अशावेळी तुम्हाला आधार दिला पाहिजे आणि हे सगळे गरोदरपण आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे घडत आहे हे समजून घेतले पाहिजे. तथापि, तुमच्या शरीरातील बदलांमुळे तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसाल.
- तुमच्या गर्भाशयात बाळे असल्याचा अनुभव म्हणजे तुम्हाला सौम्य फडफडल्यासारखे होऊ शकते. तुमची दुसरी तिमाही संपत आलेली असतानाच तुमचे शरीर बाळांच्या वेगवेगळ्या क्रियाकलापाना खूप संवेदनशील होते. बाळे वेगवेगळे शारीरिक प्रयोग करून अधिक सक्रिय तर होतातच परंतु ताणलेल्या गर्भाशयामुळे त्यांचा तुमच्या वेगवेगळ्या अंतर्गत अवयवांशी संपर्क येतो. त्यामुळे आतून बाळाने पाय मारल्यास तुमच्या लगेच लक्षात येते. काहीच महिन्यांमध्ये, बाळे खूप सक्रिय होतात आणि त्यांच्या हालचालींमुळे थोड्या वेदना होऊ शकतात.
- दुसरी तिमाही सुरु होताना तुम्हाला चैतन्य निर्माण करणारी ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटले होते परंतु आता दुसरी तिमाही संपताना ही ऊर्जा कमी होताना तुमहाला जाणवेल. तुमच्या पोटाचा वाढत आकार आणि वाढत्या गर्भाशयामुळे तुमच्या शरीराला जास्त काम करावे लागते त्यामुळे हा थकवा जाणवू लागतो. तुमची स्वतःचे वेगवेगळी कामे जसे की नोकरीची धावपळ, घरातल्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या बाळाच्या आगमनाची तयारी ह्याचा परिणाम म्हणजे हा थकवा आहे. म्हणून आराम आणि विश्रांती घेणे खूप जरुरी आहे. जर विश्रांती घेतली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
जुळ्या बाळासह गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यातील लक्षणे
गरोदरपणामुळे वाढलेला दबाव येत्या काही आठवड्यांमध्ये स्पष्ट दिसू लागेल. त्यामुळे जुळ्या बाळांसह गर्भवती राहिल्याची लक्षणे अधिक स्पष्ट दिसू लागतात. त्यापैकी काही इथे दिलेली आहेत.
- २५ व्या आठवड्यांत, तुमचे गर्भाशय ओटीपोटाच्या भागातील सर्व अवयव ढकलण्यास सुरुवात करेल. तुमचे पोट आणि आतडे ह्यांना त्यामुळे अस्वस्थता जाणवेल. संप्रेरकांच्या बदलणाऱ्या पातळीमुळे परिस्थिती आणखी बिघडेल आणि तुमचा अपचनाचा आणि ऍसिडिटीचा त्रास ह्या आठवड्यात वाढण्याची शक्यता असते. ह्या काळात तुम्हाला पोट भरलेले असल्याचे जाणवेल आणि दिवसभर गॅसचा त्रास होत राहील. परंतु योग्य प्रमाणात पाणी आणि तंतुमय पदार्थ घेतल्यास तुम्हाला आराम पडू शकतो
- तुमचे गरोदरपणाचे दिवस जसजसे पूर्ण होत असतात तसे मुळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता वाढते. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह जर तुम्ही गर्भवती असाल तर तुमचे वजन एका बाळासह गर्भवती असणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त असेल. आणि त्यामुळे मूळव्याधीचा त्रास खूप जास्त वाढतो. गर्भाशयातील वाढत्या बाळांमुळे पोटातील सामग्री, विशेषतः आम्ल अन्ननलिकेत येऊ शकते. तुम्ही अँटासिड घेऊ शकता परंतु कुठलीही गोळी स्वतःची स्वतः घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
- तुम्हाला शौचास त्रास होऊ शकतो आणि तुम्ही बराच वेळ शौचालयात घालवाल. वारंवार लघवीसाठी तुम्हाला बाथरूमला जावे लागेल. आपले टॉयलेट बहुधा आपले दुसरे घर बनण्याची शक्यता आहे! ह्या काळात, वाढत्या गर्भाशयामुळे मूत्राशयावर प्रचंड दबाव असतो,त्यामुळे लघवीची थोडी मात्रा सुद्धा ताबडतोब शरीराबाहेर टाकली जाते.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २५ वा आठवडा – पोटाचा आकार
काही स्त्रियांचे पोट प्रसूतीपर्यंत वाढत राहते तर काही स्त्रियांचे पोट एका विशिष्ट काळापर्यंत वाढते आणि प्रसूतिपर्यंत त्यांच्या पोटाचा आकार तेवढाच राहतो. दोन्ही गोष्टी सामान्य आहेत आणि दोन्ही परिस्थितीत निरोगी बाळे जन्माला येतात. २५ व्या आठवड्यात तुमचे वजन जास्त वाढू शकते त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून येते. आता तिसऱ्या तिमाहीस सुरुवात होणार आहे आणि बाळाची वाढ होतच राहते आणि बाळ परिपकव होऊ लागते.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २५ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात सामान्यतः डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची शिफारस करत नाहीत कारण बाळाच्या अंतिम विकासाची पाहणी करण्यासाठी एक दोन आठवड्यात स्कॅन करणे आवश्यक असते. परंतु जरी गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात तुम्ही स्कॅन केलात तरी तुमची बाळे त्यांची स्तनपानाची क्षमता वाढवण्यासाठी सराव करत असताना तुम्हाला दिसतील. बाळे तोंडात अंगठा घालून चोखताना किंवा गर्भजल गिळताना तुम्हाला दिसतील. तसेच येत्या काही आठवड्यात तुमची बाळे गोंडस आणि गुबगुबीत दिसतील.
गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यातील आहार
गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर ऍनिमिया होणे सामान्य आहे. म्हणूनच, तुम्ही ओट्सचे जाडे भरडे पीठ, बीटरुट्स, कडधान्ये आणि अशा प्रकारच्या आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. प्रथिने आणि अमीनो ऍसिड्सचे सेवन देखील आवश्यक आहे. सुरक्षित प्रमाणात फळे आणि भाज्या घेणे जरुरीचे आहे.
गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात काळजीविषयक टिप्स
गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात काळजी घेण्यासाठी काही टिप्सचे पालन करणे आवश्यक आहे
हे करा
- कोणत्याही विसंगती तपासण्यासाठी नियमितपणे आपल्या वजनाचा मागोवा घ्या.
- मधुमेहाची लक्षणे तपासण्यासाठी ग्लूकोज तपासणी चाचणी करून घ्या.
- तंतुमय पदार्थांचे सेवन वाढवा आणि आपल्या शरीरातील पचन समस्यांना, विशेषत: बद्धकोष्ठतेस सामोरे जाण्यासाठी स्वत: ला हायड्रेटेड ठेवा.
- आपल्या शरीरास आवश्यक उर्जा प्रदान करण्यासाठी नियोजित, संतुलित, ताजे अन्न घ्या.
काय टाळावे?
- व्यायाम करा परंतु त्याचा ताण येणार नाही ह्याची काळजी घ्या.
- तळलेले पदार्थ किंवा कॅन केलेल्या उत्पादनांची लालसा ठेऊ नका.
तुम्हाला २५ व्या आठवड्यात काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुमच्या शरीरात बदल होत आहे आणि कदाचित आपल्याला मोठ्या आकाराच्या कपड्यांची आवश्यकता असेल. तुम्ही आतापर्यंत खरेदी केले नसतील तर कॉटनचे मऊ कपडे तुम्ही विकत घेऊ शकता. बाळाचा जन्म आता होणार आहे, जरी त्यासाठी थोडा वेळ असला तरी तुम्हाला तुमची ऊर्जा आणि वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही बाळासाठी खालील गोष्टी खरेदी करू शकता.
- खूप पुढची समाप्तीची तारीख असलेले डायपर
- खूप सारे टिशु
- आपल्या छोट्या बाळासाठी पाळणा बुक करून ठेवा
- बाळांसाठी कपडे, बूट, मिटन्स इत्यादी
- हिटर किंवा कुलर
- निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्टरलायझर
- ब्रेस्ट पंप
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २५ व्या आठवड्यात ह्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याची सुरूवात होते. जास्त प्रमाणात शारीरिक, हार्मोनल आणि भावनिक बदलांसमवेत अपेक्षा आणि चिंता देखील उद्भवते. तरीही असे अनेक आनंदी क्षण असतील जे अंतिम तिमाहीत तुमच्यासमोर असतील आणि ते तुम्हाला व्यस्त ठेवतील. तुम्ही तुमच्या बाळांच्या आई असल्याचा अभिमान बाळगाल.