Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या नवजात बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या नवजात बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या नवजात बाळाची वाढ आणि विकास

जन्मानंतरचे पहिले काही महिने आपल्या छोट्या बाळासाठी महत्त्वपूर्ण असतात. ह्याच काळात बाळाचे बहुतेक स्नायू, संज्ञानात्मक, मोटर आणि इतर कौशल्ये विकसित होण्यास सुरुवात झालेली असते. जर तुम्ही ह्या टप्प्यात तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा ठेवू इच्छित असाल तर, बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे हे दर्शवणारी चिन्हे माहिती पाहिजेत.

बाळाची वाढ

पहिल्या महिन्यात, तुमच्या नवजात बाळामध्ये शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक, भाषा, तसेच सेन्सर आणि मोटर कौशल्ये विकसित होत असतात. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पहिल्या काही दिवसांत आपल्या नवजात बाळाचे वजन कमी होणे सामान्य आहे कारण त्या कालावधीत बाळाच्या शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. नंतरच्या दोन आठवड्यांत बाळाचे वजन पुन्हा वाढेल. पहिल्या महिन्यात बाळाचे वजन दर आठवड्यात सुमारे ११३ ग्रॅम ते २२७ ग्रॅमपर्यंत वाढते.

त्याचसोबत, बाळाच्या मेंदूचा विकास सुद्धा झपाट्याने होत असतो. लवकरच बाळ विकासाचे अनेक टप्पे गाठणार आहे.

नवजात बाळाचा विकास पहिला आठवडा

तुमच्या लक्षात येईल की पहिल्या आठवड्यात तुमचे बाळ खूप झोपते आहे. हे पूर्णपणे सामान्य आहे. त्याचे हात पाय देखील आतल्या दिशेने वळलेले दिसू शकतात. गर्भाशयात बाळ असताना ते हात पाय दुमडून असते त्यामुळे असे होते. पुढील काही महिन्यांत हळूहळू ते सामान्य होतील. बाळाला आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही बाळाला लपेटून ठेवू शकता.

कर्कश आवाजाने बाळ दचकते आणि रडू लागते. त्याला इंग्रजीमध्ये मोरो रिफ्लेक्स असे म्हणतात. ज्यामुळे बाळ पाठीची कमान करते आणि हातपाय पसरवते. हे रिफ्लक्स काही महिन्यांनी कमी होतात.

१ आठवड्याच्या बाळाचा विकास

पहिल्या आठवड्यात, तुमचे बाळ फक्त ८ ते १० इंच अंतरावरचे बघू शकते. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचा चेहरा अगदी त्याच्या जवळ असेल तेव्हाच त्याला तो दिसेल आणि तो ओळखू शकेल. बाळांचा जन्म जवळ दृष्टीक्षेपाने होतो आणि त्यांची दृष्टी जन्मानंतर हळूहळू विकसित होते. जर तुमच्याकडे तुमचे बाळ तिरप्या डोळ्यांनी बघत आहे असे तुमच्यालक्षात आले तर काळजी करण्याचे काही कारण नाही. पहिल्या काही महिन्यांमध्ये हे सामान्य आहे कारण त्यांचे डोळे खूपच भटकतात.

पहिल्या काही दिवसांदरम्यान, तुमच्या बाळाच्या शौचास हिरव्या रंगाची छटा असल्याचे तुम्हाला आढळेल. हे मेकोनियम म्हणजेच गर्भाच्या मलामुळे होते. एकदा ते साफ झाल्यानंतर, तुमच्या बाळाचे शौच पिवळ्या रंगाचे झाल्याचे दिसेल.

२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे नवजात बाळ प्रामुख्याने रडण्याद्वारे संवाद साधते. ह्या काळात सुद्धा तुमच्या आवाजाशी परिचित होण्यासाठी तुम्ही त्याच्याशी बोलणे महत्वाचे आहे. कदाचित तो ऐकण्याद्वारे आपला आवाज ओळखू लागेल आणि तुम्हाला शोधू शकेल.

ही वेळ अशी आहे जेव्हा पुष्कळ मुलांना पोटशूळ होतो. एक पोटशूळ झालेले बाळ तीन तास, आठवड्यातून 3 दिवस आणि कमीतकमी 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ कुठल्याही कारणाशिवाय रडत राहते. त्यामध्ये काळजीचे काही कारण नाही आणि साधारणत: सुमारे तीन महिन्यांनंतर हे रडणे कमी होते, तरीही यासंबंधीच्या सूचनांसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

तुमच्या बाळाची नाळ सुद्धा कोरडी झालेली असते आणि दुसऱ्या आठवड्यात ती पडते आणि बाळाची बेंबी दिसू लागते. नाळ पडेपर्यंत तुमच्या बाळाला स्पंज बाथ देणे चांगले जेणेकरून तो भाग कोरडा राहील.

२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तिसऱ्या आठवड्यात, तुमच्या लक्षात येईल की बाळाला पोटावर झोपवल्यावर बाळ मान उंच करते. त्यामुळे मानेचे स्नायू विकसित होण्यासाठी बाळ जागे असताना त्याला पोटावर झोपवले पाहिजे. बाळाला पोटावर झोपवल्यावर तुम्ही बाळाच्या जवळ रहा. बाळाला पोटावर ठेवल्यावर बाळाला झोप लागू देऊ नका कारण त्यामुळे एसआयडीएस म्हणजेच सीड्स चा धोका वाढतो.

ह्या कालावधीत बाळाला चोखण्यासाठी तोंडात चोखणी दिल्यास बाळाला आरामदायक वाटते. त्याची दृष्टी आणि लक्ष देखील सुधारते आणि बाळ आपला चेहरा उत्सुकतेने पाहू लागते. ह्याच कालावधीत बाळ तुमच्याकडे बघून गोड हसू लागते. ही बाळाची प्रतिक्रिया नसून तुम्ही जसे हसता त्याची बाळ नक्कल करू लागते.

४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या ४ आठवड्यांच्या बाळाच्या विकासामध्ये बाळाचे श्रवण सुधारते. त्यामुळे बाळ गाणी ऐकू लागते आणि बाळाला आवाज समजू लागतात. मानेच्या किंचित विकसित झालेल्या स्नायूंनी, तो जास्त काळ डोके वर काढू शकतो आणि मान आजूबाजूला फिरवू लागतो. तुम्ही त्याच्या समोर उभे राहून आणि त्याला अनुसरण करण्यास प्रोत्साहित करू शकता. तुम्ही हळू हळू एका बाजूकडून दुसरीकडे जाऊन त्यास मदत करू शकता.

बाळाला हळूहळू त्याचे हात पाय ओळखू येतील आणि संवादासाठी ओरडण्याव्यतिरिक्त बडबड करण्यास सुरवात करेल. आपल्या बाळाशी बोला, ह्या कालावधीत तुम्हाला बाळाशी जितका जास्त संवाद साधता येईल तितका साधा. त्याला अधिक स्पष्ट आवाजात प्रतिसाद देण्यास प्रोत्साहित करा.

नवजात बाळांचे विकासाचे टप्पे

आपल्या बाळाच्या विकासाचे महत्त्वाचे टप्पे म्हणजे पाया आहे. ज्यामुळे त्याला नवीन कौशल्य शिकण्यास मदत होईल. तथापि, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सर्व मुले एकाच वेळी हे टप्पे साध्य करत नाहीत. अकाली बाळांना त्यांच्या गर्भातील वयाच्या अनुषंगाने हे टप्पे गाठता येतील

पहिल्या महिन्यातील बाळाचे विकासाचे टप्पे इथे आहेत

  • जेव्हा आपल्या मुलाचे पाय सपाट पृष्ठभागावर असतात तेव्हा तो पृष्ठभागाविरूद्ध त्याचे पाय दाबून चालण्याची नक्कल करेल
  • तो आठ ते दहा इंच अंतरावरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असेल
  • तुमच्या बाळाची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली आहे आणि तो मोठ्याने ओरडून आक्रोश करेल
  • त्याची वासाची भावना विकसित होत आहे आणि त्याला गोड आणि छान वास घेण्याचे आकर्षण असेल
  • आपल्या बाळाच्या हातापायांच्या हालचाली हळूहळू सुरळीत होतील
  • बाळ तुमचा आवाज ओळखू शकेल
  • बाळ आपले हात व पाय शोधू लागतो आणि आपले हात डोळ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करतो.
  • मानेच्या स्नायूंच्या विकासामुळे, तो डोके एका बाजूकडून दुसरीकडे वळवू शकतो

वागणूक

तुमच्या नवजात बाळाने नुकतेच जग कसे कार्य करते हे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेव्हा त्याला माहित आहे की जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा संवाद साधण्यासाठी रडणे हे माध्यम असते. जर तुमचे बाळ रडत असेल तर ते वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते, जसे की डायपर बदलण्याची वेळ झालेली असते, किंवा बाळाला सांत्वन देणे आवश्यक असते इत्यादी. जर तुमचे बाळ रडत असल्याचे आढळले तर त्याला घ्या आणि त्याचे सांत्वन करा. त्यामुळे त्याला सुरक्षित वाटते. जितके लवकर तुम्ही त्याला दिलासा द्याल तितके लवकर बाळ शांत होईल.

संवादासाठी बाळाकडे फक्त रडणे हे माध्यम असल्याने तुम्ही त्यास पटकन प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. नाहीतर पुन्हा बाळ रडू लागल्यावर त्याला सतत सांत्वनाची गरज भासू शकते.

तथापि, काही विशिष्ट कारणास्तव जर तुमचे बाळ बराच वेळ रडत असेल तर त्याचे कारण पोटशूळ हे असू शकते. रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही बर्‍याच पद्धती वापरुन पाहू शकता. उदा: बाळाला आरामदायक जागेत ठेवा जेणेकरून त्याच्या झोपेत अडचण येणार नाही, तसेच त्याला हलवत रहा आणि आरामदायक संगीत सुरु ठेवा.

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी

तुमचे लहान बाळ सुरक्षेसाठी तुमच्यावर अवलंबून आहे. पहिल्या महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या नवजात बाळाची काळजी घेण्याचा भाग आहेत.

  • तुमच्या बाळाचा बहुतेक विकास झोपेच्या वेळी होतो. म्हणूनच, तुमच्या बाळाला पुरेशी विश्रांती घेण्यास मदत करा
  • स्तनपान करण्याचा विचार करा. आईच्या दुधात बाळाच्या पोटाच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे असतात
  • तुमच्या बाळासाठी मऊ आणि आरामदायक डायपर वापरा. बाळाला शी किंवा शु झाल्यास लगेच डायपर बदला
  • नाळ पडेपर्यंत काळजीपूर्वक आपल्या बाळास स्पंज बाथ द्या. कोमट पाण्याने नाळ स्वच्छ करा आणि मऊ पेपर टॉवेलने कोरडे पुसून टाका. एकदा नाळ पडल्यानंतर आपण त्याला हलक्या गरम पाण्याने टब बाथ देऊ शकता. बाळाला आंघोळ घालण्यासाठी केवळ सौम्य साबणांचा वापर करा आणि सर्व आवश्यक काळजी घ्या

  • कोणत्याही संसर्गाचा धोका टाळण्यासाठी बाळाला हाताळण्यापूर्वी नेहमीच आपले हात धुवा
  • आपल्या बाळाला घेताना, त्याच्या मानेला आणि डोक्याला आधार द्या. मान आणि डोके यांना आधार न दिल्यास त्याच्या गळ्याच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो
  • बाळाला घ्या. बाळांना त्यांच्या आईच्या स्पर्शाने सांत्वन मिळते. बाळाला शांत करण्यासाठी त्याला जवळ घेणे हा एक चांगला मार्ग आहे

त्यांच्याशी संवाद साधा. जरी आपल्या बाळाला आपण काय बोलतो हे समजत नसले किंवा बाळ प्रतिसाद देऊ शकत नसले तरीही बाळाशी संवाद साधणे आणि त्याच्याशी बोलणे हा त्याच्याशी बंध जोडण्याचा एक चांगला मार्ग आहे. ह्यामुळे त्याला आवाज ओळखण्यात देखील मदत होऊ शकते.

तुमच्या नवजात बाळासोबत करण्यासारखे क्रियाकलाप

नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वत: चे मनोरंजन करण्यासाठी तुमचे बाळ तुमच्यावर अवलंबून आहे. येथे काही नवजात बाळासाठी क्रियाकलाप आहेत ज्यामुळे त्याची जगाशी ओळख होईल आणि तुमच्यासोबत त्याचा चांगला बंध निर्माण होईल.

  1. फिरायला जा: एकदा तुमचे बाळ काही आठवड्यांचे झाले की आपण त्याला पार्क किंवा बागेत फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता. बाळासाठी हा पर्यावरणाचा बदल असतो आणि त्याचा त्याला त्रास होऊ शकतो
  2. संगीत लावा: जगभरातील बाळांना शांत करण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. छानशी आणि शांत गाणी बाळासाठी लावा, ज्यामुळे बाळाला आरामदायक वाटेल आणि झोप चांगली लागेल
  3. संवाद: बाळासोबत भिन्न अ‍ॅनिमेटेड अभिव्यक्त्यांचा वापर करून संवाद साधल्यास त्याला ते ओळखता येऊ शकतात आणि तो भाषेच्या विकासाचा पाया बनू शकतो
  4. लपवा आणि शोधा: टॉवेलने आपला चेहरा झाकून घ्या आणि आपल्या बाळाशी बोला. आपला आवाज कोठून येत आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करेल. बाळासोबत बंध निर्माण होण्यासाठी हा उत्तम खेळ आहे
  5. बाळासोबत नृत्य करा: आपल्या लहान मुलासह मजा करण्यासाठी आपल्या बाळाला घ्या एखादे गाणे लावून हलके नृत्य करा
  6. बाळासाठी वाचा: आपल्या बाळासाठी गोष्टी वाचा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा आपल्या बाळाच्या पोटात गुदगुल्या करुन, तसेच त्याच्या पायाच्या बोटाना स्पर्श करून संवाद साधा आणि तो कसा प्रतिक्रिया देतो ते लक्षात घ्या

बाळाला दूध देणे

सामान्य नियम म्हणजे जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा त्याला खायला घालणे. बाळाच्या मागणीनुसार त्याला दूध द्या. स्तनपान घेणाऱ्या बाळाला २४ तासांत कमीतकमी ८ ते १२ वेळा दूध दिले पाहिजे आणि दिवसभरात सहा ते आठ डायपर ओले झाले पाहिजेत. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला देत असाल तर बाळाला कधी भूक लागते ह्याकडे लक्ष द्या आणि प्रत्येक दोन किंवा तीन तासांनी बाळाला फॉर्मुला द्या

झोपवणे

नवजात बाळे बहुतेक वेळ झोपेमध्ये घालवतात. दररोज १७ ते १८ तासांपर्यंत झोपणे त्यांच्यासाठी सामान्य आहे. तथापि, हा कालावधी दिवसभर हा विखुरलेला आहे. प्रौढांच्या तुलनेत नवजात बाळाची झोपेची पद्धत देखील वेगळी असते. त्यातील केवळ २० % झोप तीव्र आणि गाढ असते. इतर वेळेस, त्यांची झोप जागरूक असते.

नवजात बाळाची तपासणी

नवजात बाळाची केली जाणारी काही रूटीन चेक अप खाली आहेत,

  1. अपगर स्कोअर कोणत्याही विशेष हस्तक्षेपाची आवश्यकता आहे का हे ठरवण्यासाठी जन्मानंतर लगेचच बाळाची शारीरिक वैशिष्ट्ये तपासली जातात. बाळाच्या शरीराचे तापमान आणि महत्त्वपूर्ण चिन्हांचे देखील जन्मानंतर ६ तास काळजीपूर्वक परीक्षण केले जाते
  2. शारीरिक चाचण्या जन्माच्या पहिल्या २४ तासात, आपल्या बाळाचा श्वास, हृदयाचा ठोका आणि स्टूल आणि मूत्र पास करण्याची त्याची क्षमता तपासली जाते.
  3. मोजमाप आपल्या नवजात मुलाचे वजन, लांबी आणि डोके घेर मोजले जातात. जन्म कालव्याच्या जीवाणूमुळे डोळ्याला होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्याला प्रतिजैविक दिले जाऊ शकतात.
  4. स्क्रिनिंग चाचण्या श्रवणचाचणी आणि फिनाइल्केटोन्युरिया (चयापचयवर परिणाम होऊन बाळाच्या मेंदूला हानी पोहोचवते) अशा चाचण्या आयोजित केल्या जातात.
  5. इंजेक्शन्स हिपॅटायटीस बी साठी व्हिटॅमिन के इंजेक्शनसह काही विशिष्ट लसीकरण दिले जाऊ शकते.

पुढील आठवड्यात, डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळाचे वजन, लांबी आणि डोक्याच्या परिघाचे मोजमाप घेण्यास सांगू शकेल आणि त्याच्या मागील मोजमापांशी तुलना करेल. तो व्यवस्थित वाढत आहे की नाही हे त्यामुळे समजेल.

पालकांसाठी टिप्स

आपल्या नवजात मुलाची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक आपल्या लहान मुलाकडे लक्ष देण्याची तयारी करणे महत्वाचे आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा काही टिप्स येथे आहेत.

  1. आपल्या बाळाला नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे न्या
  2. आपल्या बाळासाठी तणावमुक्त वातावरण तयार करा. आपल्या बाळाच्या खोलीत प्रकाश व स्वच्छता चांगली असल्याचे सुनिश्चित करा
  3. आपल्या बाळाला प्रदूषण आणि बॅक्टेरियासारख्या हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवा
  4. स्वतःवर जास्त ताण येऊ नये म्हणून आपल्या कुटूंबाची मदत घ्या
  5. चांगली झोप घ्या. स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेण्यात झोपेचा अभाव हा एक मोठा अडथळा असू शकतो. नवीन मातांना विश्रांतीसाठी थोडासा प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपल्या नवजात बाळाची काळजी घेणे जितके समाधानकारक आहे तितकेच कष्टप्रद असू शकते. जर आपल्या बाळास नियमित आहार मिळत असेल, बाळ छान झोपत असेल आणि त्याला शौचास नीट होत असेल तर तुम्हाला तुमच्या बाळाचा विकास आणि वाढीबद्दल चिंता करण्याची गरज नाही. तथापि, तुम्हाला चिंता करण्याजोगे काही आढळल्यास आपल्या डॉक्टरांना फोन करून मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.

आणखी वाचा:

बाळांची कोरडी त्वचा
डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article