Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी

गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी

गरोदरपणातील नॉन स्ट्रेस चाचणी

गर्भधारणेनंतर, तुमचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतील तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या भेटी घ्याव्या लागतील. ह्यापैकी बहुतेक चाचण्या तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर थोडासा परिणाम करतात. परंतु एका चाचणीचा तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही. ती म्हणजे नॉन स्ट्रेस टेस्ट होय. खाली त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

नॉनस्ट्रेस टेस्ट म्हणजे काय?

उच्चजोखीम असलेल्या गर्भधारणेशी संबंधित सर्वात सामान्य चाचण्यांपैकी ही एक चाचणी आहे. ही चाचणी गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यानंतर डॉक्टर करतात. ह्या चाचणीला गर्भाची नॉनस्ट्रेस चाचणी किंवा एनएसटी असे म्हटले जाते. ही चाचणी केली जात असताना तुमच्या बाळाला त्रास होत नाही. खरं तर, ह्या चाचणीदरम्यान फक्त तुमच्या बाळाच्या नैसर्गिक क्रियाकलापांचे निरीक्षण केले जाते. गर्भाच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी तसेच त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण करण्यासाठी ह्या चाचणीचा वापर केला जातो. प्रथम, बाळ विश्रांती घेत असताना बाळाच्या हृदयाचे ठोके मोजले जातात आणि नंतर तो सक्रिय असताना पुन्हा हृदयाचे ठोके मोजले जातात. जर हृदय गती क्रियाकलाप पातळीशी जुळत असेल, तर बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा गर्भमृत्यूची उच्च शक्यता असते तेव्हा एनएसटी ही चाचणी करण्यास सांगितली जाते, कारण ही चाचणी तुम्हाला किंवा तुमच्या गर्भाला हॉस्पिटलायझेशन किंवा उपचारांची आवश्यकता आहे का हे सांगते किंवा गर्भारपणाचे दिवस भरून सुद्धा प्रसूती न झाल्यास ही चाचणी करण्यास सांगितली जाऊ शकते.

ही चाचणी कुणी करण्याची गरज असते?

गरोदरपणात एनएसटी चाचणी करून घेण्याची शिफारस सामान्यतः केली जाते. विशेषतः उच्चजोखीम गर्भारपण, प्रसूतीची तारीख उलटून जाणे, गर्भाशयाची स्थिती, मागील गर्भधारणेतील गुंतागुंत इत्यादींसाठी ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. जर अल्ट्रासाऊंडमध्ये बाळ अपेक्षेपेक्षा लहान असल्याचे किंवा बाळाच्या हालचाली अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले तरी देखील एनएसटी चाचणी करून घेण्याचे सुचवले जाते. तुम्हाला प्रीक्लॅम्पसिया किंवा गरोदरपणातील मधुमेहासारख्या समस्या असल्यास देखील हि चाचणी केली जाऊ शकते.

नॉनस्ट्रेस टेस्ट कधी केली जाते?

गरोदरपणातील नॉनस्ट्रेस टेस्ट मॉनिटरिंग चाचणी गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत, प्रसूती तारखेच्या सुमारे ४५ आठवडे आधी करण्याचे सुचवले जाते. ह्याचे कारण असे की गर्भारपणाचे २८ आठवडे झाल्यानंतरच अचूक हृदय गती मोजली जाऊ शकते.

एनएसटी चाचणी का केली जाते?

एनएसटी चाचणी ही गर्भाच्या हायपोक्सियाची शक्यता टाळण्यासाठी केली जाते. ह्या स्थितीमध्ये गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही त्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. प्रसूतीची ची तारीख उलटूब जाणे ह्या कारणाव्यतिरिक्त, नॉनस्ट्रेस चाचणी का केली जाऊ शकते याची इतर अनेक कारणे आहेत.

  • जर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि उच्च रक्तदाब यासारख्या वैद्यकीय समस्या असतील तर त्यामुळे गर्भाच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते.
  • जर तुम्हाला पॉलीहायड्रॅमनियोस (अशी स्थिती ज्यामध्ये गर्भाच्या भोवतीच्या गर्भजल पिशवीमध्ये जास्त प्रमाणात गर्भजल असते) किंवा ऑलिगोहायड्रॅमनिओस (पुरेशा अम्नीओटिक द्रवपदार्थाचा अभाव) असेल तर, गर्भारपणात गुंतागुंत होऊ शकते.
  • लेट प्रेग्नन्सी अम्नीओसेन्टेसिस किंवा एक्स्टर्नल सेफॅलिक व्हर्जन्स (बाळाला ब्रीच/ट्रान्सव्हर्स वरून व्हेर्टेक्स किंवा हेड डाऊन पोझिशन मध्ये आणण्याची प्रक्रिया) बाळावर परिणाम करू शकतात.
  • गर्भाची वाढ किंवा हालचाल कमी होणे पुढील समस्या दर्शवू शकते.
  • मागील गर्भपात किंवा बाळ मृत जन्माला आल्यामुळे गर्भाच्या मृत्यूचा धोका वाढतो.
  • गर्भामध्ये अनुवांशिक विकृती असते आणि त्यासाठी निरीक्षण आवश्यक असते.

गरोदरपणात नॉनस्ट्रेस चाचणी किती वेळा केली जाते?

गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यानंतर गरोदरपणातील गुंतागुंतीची जोखीम वाढण्याची शक्यता असते त्यामुळे गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यानंतर परिस्थितीनुसार आठवड्यातून किमान दोन वेळा एनएसटी चाचणी केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुमच्या डॉक्टरांना गर्भाच्या हायपोक्सियाच्या शक्यतेचा संशय असेल, तर ते तुम्हाला दररोज नॉनस्ट्रेस चाचण्या घेण्यास सांगतील.

गरोदरपणात नॉनस्ट्रेस चाचणी किती वेळा केली जाते?

गरोदरपणात नॉन स्ट्रेस चाचणी करण्याची प्रक्रिया

ही चाचणी करताना तुम्हाला तुमच्या डाव्या कुशीवर झोपण्यास सांगतात आणि तुमच्या पाठीला आधार दिला जातो. तुमच्या पोटाला दोन गॅझेट जोडले जातात. एक गर्भाशयाच्या आकुंचनाची नोंद करते आणि दुसरे गर्भाच्या हृदयाचे ठोके आणि हालचाल यांच्यातील समक्रमण नोंदवते. कधीकधी, बाळ झोपलेले असू शकते, म्हणून डॉक्टर त्याला उठवण्यासाठी तुम्हाला काहीतरी खाण्यास किंवा पिण्यास सांगू शकतात. काही वेळा पोटावर हळुवार दाबल्याने सुद्धा बाळ झोपेतून जागे होऊ शकते. चाचणीला एक तास लागू शकतो, म्हणून त्याआधी बाथरूमला जाऊन या. ही चाचणी तुमच्यासाठी आणि बाळासाठी पूर्णपणे वेदनारहित आहे.

तुम्हाला चाचणीचे निकाल कधी मिळतात आणि त्यांचा काय अर्थ होतो?

चाचणी केल्यानंतर लगेच त्याचे निकाल मिळू शकतात. नॉन स्ट्रेस चाचणीसाठी दोन मुख्य प्रकारचे परिणाम आहेत:

. प्रतिक्रियाशील

कमीतकमी १०१५ सेकंद हालचालीनंतर बाळाच्या हृदयाचे ठोके कमीत कमी १५ बीपीएम पर्यंत वाढल्यास परिणाम प्रतिक्रियात्मक किंवा सामान्य असतात. २० मिनिटांमध्ये ही क्रिया दोनदा करावी लागेल जेणेकरून परिणाम प्रतिक्रियात्मक मानले जातील.

. अप्रतिक्रियाशील

जर गर्भाच्या हृदयाची गती हालचालींमुळे वाढत नसेल किंवा गर्भ किमान ६०९० मिनिटांनंतर हालचाल करत नसेल, तर ही चाचणी अप्रतिक्रियाशील समजली जाते. चाचणीचा परिणाम अप्रतिक्रियाशील असणे म्हणजे गर्भाच्या हायपोक्सियाचे निदान किंवा प्लेसेंटामध्ये समस्या असू शकतात. परंतु, ह्याचा अर्थ काही समस्या असेलच असे नाही आणि डॉक्टर तुम्हाला काही तासांनंतर एनएसटी पुन्हा करण्याची किंवा निदानाची पुष्टी करण्यासाठी काही इतर चाचण्या घेण्याची शिफारस करू शकतात.

पुढील चाचणीची गरज आहे का?

चाचणी अप्रतिक्रियाशील (नॉनरिअ‍ॅक्टिव्ह) असली तरीही, ती खराब ऑक्सिजन पुरवठ्यामुळे किंवा आई घेत असलेल्या औषधांमुळे, गर्भाची झोपेची पद्धत किंवा अनुवांशिक दोष यासारख्या इतर कारणांमुळे अप्रतिक्रियाशील आहे की नाही हे डॉक्टर सांगू शकत नाहीत. नॉन रीऍक्टिव्ह चाचणी असल्यास तुम्ही दोन मुख्य चाचण्या घेऊ शकता:

. कॉन्ट्रक्शन स्ट्रेस टेस्ट

ही चाचणी प्रसुती किती तणावपूर्ण असेल ह्याचा अंदाज डॉक्टरांना देऊ शकेल. कॉन्ट्रक्शन स्ट्रेस टेस्ट गर्भाच्या हृदयाचे ठोके गर्भाशयाच्या आकुंचनांच्या तणावानुसार कसे बदलतात हे . मोजते. डॉक्टर तुम्हाला ऑक्सिटोसिन देतील त्यामुळे गर्भाशयाचे सौम्य पद्धतीने आकुंचन उत्तेजित होईल. आकुंचन होत असताना बाळाच्या बीपीएममध्ये घट झाल्यास त्याचा अर्थ असा होतो की त्याला प्रसूती तणावपूर्ण वाटू शकते.

. बायोफिजिकल प्रोफाइल

ही चाचणी अल्ट्रासोनोग्राफीच्या संयोगाने तणावरहित चाचणी आहे. ही चाचणी गर्भाच्या श्वासोच्छवासाचे प्रमाण, क्रियाकलाप, शरीराची रचना तसेच गर्भाशयातील अम्नीओटिक द्रवपदार्थ मोजते. एक असामान्य बायोफिजिकल प्रोफाइल चाचणी लवकर प्रसूती सूचित करते.

नॉन स्ट्रेस चाचणीचे काही धोके किंवा दुष्परिणाम असतात का?

नॉनस्ट्रेस टेस्ट ही सर्वात महत्त्वाची आणि जोखीममुक्त चाचण्यांपैकी एक आहे. ह्या चाचणीद्वारे तुम्ही तुमच्या बाळाचे चांगले आरोग्य सुनिश्चित करू शकता. बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा. एनएसटी चाचणीने कोणतेही धोके दर्शविल्यास, तुमचे डॉक्टर बहुधा प्रेरित प्रसूतीची शिफारस करतील.

एनएसटीचा कोणताही धोका नसतो, म्हणजेच त्यामुळे कोणत्याही शारीरिक वेदना होत नाही. एन एस टी चा फक्त एक धोका असा आहे की एनएसटी कोणतीही योग्य गुंतागुंत शोधू शकत नाही किंवा चुकीचे काही असल्यास ते सूचित करू शकत नाही, त्यामुळे अधिक चाचण्या आणि प्रक्रिया केल्या जातात.

आणखी वाचा:

गरोदर चाचणी केव्हा आणि कशी करावी?
गरोदरपणातील चाचण्या: आरएच घटक आणि प्रतिपिंड तपासणी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article