Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता २७ आठवड्यांचे आहे आणि वेगाने वाढत आहे. रात्रीच्या वेळी भूक लागल्यामुळे बाळ रडत जागे होते आणि त्याचे दुधाच्या मागणीचे प्रमाण वाढते. तुमच्या बाळाने २७ व्या आठवड्यात काय केले पाहिजे त्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

तुमच्या २७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

हा टप्पा तुमच्या बाळासाठी एक व्यस्त काळ आहे. बाळ शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक दृष्ट्या विकसित होत आहे. त्यांना काय हवे ह्याबद्दल त्यांना जाणीव होऊ लागेल आणि त्यांच्या मनाप्रमाणे झाले नाही तर ते राग दर्शवू शकतात. हालचाल कौशल्यावर त्यांचे शरीर दिवसरात्र काम करीत असते.

सत्तावीस आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

बाळांचा वाढीचा वेग वेगवेगळा असतो आणि सर्व बाळे एकाच वेळी त्यांच्या विकासाच्या टप्प्यावर पोहोचत नाहीत आणि बर्‍याचदा तुम्हाला अपेक्षा सुद्दा करत नाही तेव्हा बाळ विकासाची लक्षणे दाखवण्यास सुरुवात करते. २७ व्या आठवड्यात काही बाळे बसू लागतात आणि काही रांगायला सुरुवात करतात. जर तुमच्या बाळामध्ये विकासाचे टप्पे उशिरा दिसत असतील तर काळजीचे काहीही कारण नाही कारण बाळाचा विकास बराच काळ होत राहतो. परंतु तुमच्या लक्षात काही समस्या आल्या तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा. इथे तुम्ही बाळाच्या कुठल्या विकासाची अपेक्षा करू शकता ते दिलेले आहे.

 • तुमच्या लक्षात येईल की पोटावर झोपवल्यावर बाळ खूप आनंदी असते किंवा उठण्याचा प्रयत्न करते. ह्यामुळे बाळाला ताठ बसण्यास मदत होते. बाळ खेळत असताना त्याला आधार देऊन बसावा त्यामुळे त्यांचे महत्वाचे मोटार कौशल्य विकसित होतात.
 • यावेळी काही बाळांना दात येऊ लागतील आणि आपण थंड पदार्थ आणि टिथर टॉईजद्वारे दातदुखी कमी करण्यास मदत करू शकता. त्यांची मनःस्थिती आणि वर्तनांकडे लक्ष द्या आणि जर तुम्हाला असे दिसून आले की त्यांचे हिरड्या लाल किंवा सुजलेल्या आहेत तर दात येतानासाठी वापरतात त्या थंड रिंगच्या साहाय्याने वेदना कमी करण्याचा प्रयत्न करा.
 • आत्तापर्यंत बाळ आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि संबंधित भावना समजण्यास प्रारंभ करतात. बाळाच्या कृतींबद्दल तुम्ही कधी कौतुक करीत आहात आणि कधी नाराज आहात हे ते सांगू शकतात. बाळ आश्चर्य, आनंद, भीती आणि दु: खी चेहरे आणि त्यांच्याशी संबंधित बोलक्या स्वरांमध्ये फरक करू शकतात.

बाळाचा आहार

तुम्ही तुमच्या बाळाला, संकोच न करता घन पदार्थांचा परिचय देऊ शकता. पूर्वी ऍलर्जिक पदार्थाना उशीर केल्यास ऍलर्जीचा धोका कमी होतो असा विश्वास होता परंतु आताचे नवीन संशोधन अगदी उलट आहे. घन पदार्थ देण्यास सुरुवात होताच सामान्य ऍलर्जिक पदार्थ जसे की अंडी, शेंगदाणे, गहू, सोया, दुग्धजन्य पदार्थ, समुद्री अन्न इत्यादींची ओळख बाळाला करून दिली पाहिजे. शंगदाण्यांची ओळख नटबटर च्या माध्यमातृन सुरक्षितपणे केली जाऊ शकते तथापि मध, फास्ट फूड, गोड पदार्थ किंवा जंक फूड टाळले पाहिजे.

तुमच्या बाळास तुमच्या कुटुंबात सामान्यत: वापरले जाणारे मसाले, औषधी वनस्पती आणि पदार्थांचा परिचय द्या आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र जेवण बनवण्याऐवजी बाळाच्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही स्वतःहून काय जुळवून घेऊ शकता ते पहा.

बाळाची झोप

२७ आठवड्यांच्या बाळाला दिवसाची सुमारे १४१५ तास झोप असणे आवश्यक आहे. संपूर्ण दिवसभर भावनिक निचरा किंवा थकवा आणि वेदनांमुळे बाळ रात्री झोपण्यास त्रास देते. दिवसभर त्यांची संवेदनाक्षम माहिती देखील जबरदस्त असू शकते आणि दिवस संपल्यानंतर त्यांना शांतता व आराम मिळण्याची आवश्यकता असते त्यामुळे बाळे चिडचिड करतात. दिवसभर त्यांच्या वर लक्ष ठेवत असताना, बाळ जास्त वेळ खेळले आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. संशोधनात असे दिसून आले आहे की कोणत्याही नवीन कार्यानंतर ३० मिनिटांची झोप घेतल्यास त्यांना पुढच्या वेळी नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि लागू करण्यास मदत होऊ शकते.

२७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

 • आपल्या घराच्या बेबीप्रूफिंगसाठी आता नक्कीच चांगली वेळ आहे. बाळ रांगणे शिकत आहे त्यामुळे त्यांच्या हाताला येणाऱ्या कपाटातील सर्व गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे कपाटे नीट बंद करणे आणि पायऱ्या तसेच बाल्कनी, स्वयंपाकघर आणि स्नानगृह आणि इतर धोकादायक भागात सील करणारे दरवाजे खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. इलेक्ट्रिकल सॉकेट्स प्लग ओपन करणे देखील महत्वाचे आहे.
 • जेव्हा तुम्ही बाळांना सरळ उभे करता तेव्हा त्यांच्या पायांवर वजन घेण्यास त्यांना आवडेल. त्यांना ते करण्याची परवानगी द्या. त्यांच्या पायावरील वजन स्नायूंना सामर्थ्यवान बनवण्यास आणि एकूण मोटर नियंत्रण विकसित करण्यास उत्तेजित करते. बाळाच्या पायांना बाक पडेल ह्या जुन्या बायकांच्या कथाह ऐकू नका. जर ते त्याचा आनंद घेत असतील तर त्यांना तसे करू द्या. दुसरीकडे, बाळ नाराजीची चिन्हे दर्शवित असल्यास त्यांना ते करण्यास भाग पाडू नका.
 • त्यांना उचलून घ्या आणि बरेचदा त्यांना सांत्वन द्या. तज्ञांच्या मते पहिल्या वर्षाच्या आतच मुलांना खूप प्रेम दिल्यास त्यांचे नुकसान करणे अशक्य आहे. बाळ रडू लागल्यावर त्याला लगेच उचलून घेतल्यास बाळाला तशी सवय लागून त्याचे नुकसान होईल अशी तुम्हाला भीती वाटत असल्यास बाळाचे रडण्याचे कारण प्रथमतः शोधून काढा.
 • तुमचे बाळ आता त्यांचे पहिले आवडते खेळणे किंवा लवीनिवडू शकतात एक टेडी, मऊ ब्लँकेट किंवा एखादे खेळणे ह्यापैकी जे त्यांना आवडेल त्याचा समावेश ह्यामध्ये असू शकतो आणि पुढील काही वर्षे बाळ त्यास चिकटून राहील. यामुळेच तज्ञ त्यास संक्रमणकालीन वस्तूम्हणतात कारण हे बाळांना अवलंबित्व आणि स्वावलंबन ह्यातील अंतर कमी करण्यास मदत करते. आपण जवळपास नसता तेव्हा ते बाळाला आराम आणि धीर देतात. म्हणूनच ते जे काही निवडतात ते वापरून पहा आणि इतर आणखी खेळणी खरेदी करा.
 • विभक्ततेच्या चिंतेवर (separation anxiety) कार्य करण्यासाठी देखील हा एक चांगला काळ आहे. हे बाळ आणि पालक दोघांसाठी कठीण असू शकते. दररोज कुटुंबातील एखाद्या सदस्याने किंवा काळजीवाहूंनी काळजी घेत असताना थोडा वेळ त्याच्यापासून दूर राहून पहा आणि प्रयत्न करा. एका विधीसह प्रारंभ करा: आपल्या मुलाला मिठी मारून चुंबन द्या आणि बाळाला त्याच्या प्रिय व्यक्तीच्या स्वाधीन करा आणि निघून जा. जरी बाळ रडत असेल तरी निघून जा तुम्ही दाराबाहेर गेल्यानंतर दोन मिनिटांनी बाळ शांत होईल.

चाचण्या आणि लसीकरण

शारीरिक चाचण्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • बाळाचे वजन करा आणि वाढीच्या तक्त्यावर त्याची नोंद करा. त्यामुळे बाळाच्या वाढीच्या दराची कल्पना देते
 • हृदय आणि फुप्फुसांचा असामान्य ताल किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी तपासणी केली जाते
 • जन्मजात परिस्थिती आणि अवरोधित नलिकांसाठी डोळे तपासले जातात
 • संसर्गाच्या चिन्हे आणि तुमच्या बाळाला आवाज कसा ऐकू येतो याबद्दल कानांची तपासणी केली जाते
 • यीस्टच्या संसर्गाची चिन्हे जसे की खोकला आणि नवीन दात येणे ह्यासाठी तोंडाची तपासणी केली जाते
 • डोक्याचा मऊ भाग (फॉन्टॅनेल्स) आणि त्याच्या आकारासाठी डोक्याची तपासणी केली जाते
 • रिफ्लक्स, स्नायूंचा पोत आणि त्वचेवरील पुरळ ह्यासाठी शरीराची तपासणी केली जाते. बसताना, वस्तू पकडताना आणि इतर क्रियांच्या वेळेला स्नायूंच्या नियंत्रणाचे देखील मूल्यांकन केले जाते. सांध्यातील समस्या शोधण्यासाठी बाळाचे हात व पाय तपासले जातात.

आपल्या बाळाच्या लसींमध्ये डीटीपी, पोलिओ, हिपॅटायटीस बी, न्यूमोकोकल आणि एचआयबी समाविष्ट आहेत आणि ते दोन किंवा तीन शॉट्समध्ये एकत्रितपणे दिले जातात. बाळांना रोटावायरस लसदेखील तोंडी दिली जाते.

खेळ आणि क्रियाकलाप

तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकता असे दोन मजेदार खेळ इथे दिलेले आहेत

. लपवा आणि खा

हा खेळ त्यांच्या उत्कृष्ट मोटर कौशल्यांचा विकास करतो आणि वस्तू स्थिरतेची भावना निर्माण करण्यास हा खेळ मदत करतो. या क्रियेसाठी तुम्हाला स्वच्छ टॉवेल, काही फिंगर फूड्स आणि काही अपारदर्शक कप आवश्यक आहे. तुमच्या बाळाला नाश्ता दाखवण्यापासून आणि टॉवेलने ते झाकून खेळास सुरुवात होते. नाश्ता शोधण्यासाठी बाळाला नाश्त्यावरील झाकण काढू द्या आणि थोड्या वेळापूर्वी ते पाहू शकले नाहीत ते स्नॅक्स अजूनही तिथेच आहे हे त्यांच्या लक्षात येऊ द्या.

तुम्ही थोडा जादूगारासारखा खेळ सुद्धा करू शकता. स्नॅक्सला एका अपारदर्शक कपने झाकून ठेवा आणि त्याच्या पुढे दोन कप ठेवा. आता ते कप बदलत रहा आणि कप उचलून खाली त्यांना त्यांचा नाश्ता शोधू द्या.

. दि ग्रेट फॉल

बाळांना आश्चर्यकारक शेवट असलेले आणि हालचाल असलेले खेळ आवडतात. हा खेळ एकूण मोटर कौशल्ये विकसित करतो. कारण आणि परिणामाची भावना निर्माण करतो. घराच्या आत किंवा घराबाहेर किंवा लॉनवर मऊ रगवर, आपल्या गुडघे वर उचलून आपल्या पाठीवर झोपा. तुमचे बाळ तुमच्या पोटावर बसलेले असते आणि तुमच्या गुडघ्यांवर टेकते. त्यांना आपल्या हातांनी स्थिर ठेवा आणि हम्प्टी डम्प्टी सारखी गाणी म्हणताना एका बाजूने दुसर्‍या बाजूस डोलू द्या. प्रत्येक वेळी फॉलहा शब्द येतो तेव्हा एका बाजूला झुकून पुन्हा वर या. आवश्यक असल्यास सुरक्षिततेसाठी बाजूला काही उशा वापरा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

आपल्याला पुढीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास

 • आपले बाळ ध्वनीकडे वळून आवाज उत्तेजनास प्रतिसाद न दिल्यास
 • त्यांचे डोळे तुमचा किंवा हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेत नसेल आणि कधीकधी क्रॉसडोळे दिसल्यास
 • बाळ रांगताना काही तरी चुकीचे म्हणजेच एक पाय एका बाजूने जास्त झुकत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास
 • तुम्ही त्यांना खाऊ घालत असलेल्या नवीन अन्नपदार्थांना ते ऍलर्जिक प्रतिक्रिया दर्शवितात तेव्हा
 • त्यांना शौचास कोरडी आणि घट्ट होत असेल तर

प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वतःच्या वेगाने विकास होत असतो आणि अखेरीस बाळ विकासाच्या टप्प्यावर पोहोचतो. तुमचे बाळ तिथपर्यंत पोहोचलेले नसल्यास संयमाने त्याची प्रतीक्षा करा. यादरम्यान, पालकत्वाच्या प्रवासाचा आनंद घ्या.

मागील आठवडा: तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article