In this Article
आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजे, त्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे.
८ आठवड्यांच्या बाळाचा विकास
आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि बाळाचा विकास होत आहे. आत्तापर्यंत, तुम्हाला बाळाची मनःस्थिती आणि वर्तन समजू शकले असेल आणि बाळाला खायला घालण्याचे, अंघोळ घालण्याचे आणि खेळण्याचे रुटीन तयार झाले असेल. स्वतःची आणि आपल्या बाळाची तुलना इतर मातांशी आणि त्यांच्या मुलांशी करू नये. आपण करत असलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला स्वतःला आत्मविश्वास वाटत नसला तरीही, तुम्ही बाळाची किती चांगली काळजी घेतलेली आहे हे बाळाकडे पाहून लक्षात येईल!
बाळाला वेळेवर दूध पाजले, नीट झोप मिळाली आणि वेळेवर डायपर बदलले की बाळे शांत आणि समाधानी असते.
तुमच्या ८ आठवड्यांच्या बाळाचे वजन जन्मापासूनच ९०० ग्रॅम ते १ किलोग्रॅमच्या दरम्यान वाढले पाहिजे. बाळाची लांबी देखील सुमारे ५ सेमी वाढते आणि त्याच्या गालावर, पोटात, हातावर आणि पायांवर काही प्रमाणात मांस दिसू लागते. आपल्या बाळाला आतापर्यंत प्राप्त झालेला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हास्य (म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी त्याच्याकडे पाहून स्मित करते तेव्हा तो परत हसतो)आणि जन्माच्या वेळेपेक्षा आता बाळ मान धरू लागले आहे. आपण हे देखील लक्षात घ्याल की ८ आठवड्यांच्या बाळाची वाढ झाल्यामुळे संध्याकाळी बाळ जास्त दूध पिते आणि रात्रीचे दूध प्यायला थोडा त्रास देते.
८ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
- तुमच्या बाळाला आता सभोवतालच्या गोष्टींविषयी कुतूहल वाटू लागेल. आजूबाजूचे लोक आणि हलणाऱ्या आणि अपरिचित वस्तूंविषयी बाळाला रस आणि उत्सुकता वाटू लागते.
- हसणे मजेदार आहे हे बाळांना समजण्यास सुरवात होते. जेव्हा तुम्ही बाळाला जवळ घेता किंवा तुमचा आवाज ऐकल्यावर किंवा आवडत्या लोकांना पाहिल्यावर बाळ हसू लागते.
- बाळांना इतर खेळण्यांपेक्षा एखादे विशिष्ट खेळणे जास्त आवडेल आणि जेव्हा त्याला त्याचे आवडते खेळणे दिसेल तेव्हा बाळ हसू लागेल.
- त्याची दृष्टी सुधारली आहे आणि आता त्याच्यापासून सुमारे २० सेमी अंतरावर असलेल्या वस्तू बाळ पाहू शकते.
- बाळाला आता त्याचे हात व पाय अधिक समजू लागले आहेत, म्हणून बाळाचे खूप पाय मारणे आणि हाताने तुमच्यापर्यंत पोहोचणे ह्याची अपेक्षा करा. सुरुवातीला त्याच्या हालचाली जरा अडकल्या सारख्या असतील परंतु आपल्या लक्षात येईल की काही वेळात त्या अधिक नियंत्रित झालेल्या आहेत.
- ८ आठवड्यांच्या बाळाला दात येणे हे दुर्मिळ आहे. परंतु आपल्या बाळाच्या लाळेसंबंधी ग्रंथी जलद गतीने विकसित होत आहेत. त्यामुळे , बाळाची बरीच लाळ गळणार आहे.
दूध देणे
तुमच्या २ महिन्यांच्या बाळास अजूनही २४ तासांमध्ये किमान ६ वेळा दूध देण्याची आवश्यकता असते. या टप्प्यावर, बाळाची वाढ वेगाने होत असल्याने, बाळांची पौष्टिकतेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा संध्याकाळच्या वेळी बाळ खूप स्तनपान घेते ज्यास इंग्रजीमध्ये ‘क्लस्टर फिडींग‘ असे म्हणतात . क्लस्टर फीडिंग हे प्रथमच स्तनपान देणा–या मातांना काळ्जीदायक वाटते जेणेकरुन आपल्याला पुरेसे दूध आहे की नाही याबद्दल त्यांना शंका वाटते. बाळाला दूध पुरेसे होत आहे की नाही हे सांगण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आठवड्याला १५० ते २०० ग्रॅम्सची स्थिर वाढ आणि दररोज ६ किंवा अधिक डायपर ओले होणे हा होय. तसेच, जेव्हा आपल्या बाळाला पुरेसे दूध मिळेल, तेव्हा तो आनंदी आणि सतर्क दिसेल.
आपण जर बाळाला बाटलीने दूध देत असाल तर बाळ एक बाटली संपवून आणखी शोधायला लागेल. आपल्या डॉक्टरांशी त्याच्या वयासाठी आणि वजनासाठी आवश्यक असलेल्या दुधाच्या प्रमाणाबद्दल बोला. मिश्रणात फॉर्मुल्याचे आणि पाण्याचे गुणोत्तर बदलू नये हे देखील महत्वाचे आहे – प्रमाणानुसार त्याला दूध द्या आणि जास्तीचे दूध फेकून द्या.
बाळाची झोप
तुमच्या ८ आठवड्यांच्या बाळाची झोप दिवसाचे ११ ते १५ तासांपर्यंत असेल. पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळाची झोप १८ तासांची होती. या टप्प्यावर मध्यरात्री जरी बाळ जागे राहिले तरीही, बाळाने सलग ५–६ तास झोपायला सुरुवात करावी. काही बाळे अधिक झोपतात आणि त्यांचे झोपेचे नियमित रुटीन असते. इतर बाळे अधिक सजग असतात आणि जेव्हा त्यांचे पालक त्यांना झोपवायचा प्रयत्न करतात तेव्हा ते झोपायला नकार देतात. सर्वसाधारणपणे, आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेच्या वेळापत्रकावर नियंत्रण नसते आणि तुम्हाला प्रतिसादाची लय त्यानुसार बदलण्याची आवश्यकता आहे.
तथापि, या टप्प्यावर बाळांना त्यांच्या बिछान्यावर झोपवणे फायद्याचे आहे, कारण पुढच्या महिन्यांत ते स्वत:चे स्वतः झोपण्यास शिकू शकतात. नाहीतर बाळाला त्याच्या बिछान्यावर झोपवल्यास ते झोपी जाण्यासाठी पालकांवर अवलंबून राहते. आणि झोपेतून जाग आल्यावर पुन्हा झोपी जाण्याचे कौशल्य आत्मसात करू शकत नाही.
वागणूक
८ व्या आठवड्यात, आपल्या बाळाच्या बर्याच हालचाली अजूनही सहज असतात. लहान बाळांची अजूनही खेळण्यांवर घट्ट पकड नसते, परंतु लवकरच बाळ विकासाचा तो टप्पा गाठेल. बाळाची वस्तूंवरची पकड घट्ट होईल. आपण काय बोलत आहात हे त्याला समजत नसले तरीही आपल्या बाळाशी वारंवार बोलणे चांगले आहे. तुमच्या लक्षात येईल की बाळ लवकरच आपल्या बोलण्यावर स्मितहास्य करेल आणि वेगवेगळे आवाज काढून प्रतिक्रिया देईल. संशोधनात असे दिसून येते की बाळाची बडबड त्यांच्या सभोवतालच्या आणि विशेषतः . तुमच्या बोलण्याचे अनुसरण करते
तुम्हाला मोठी मुले असल्यास, त्यांना बाळाशी संवाद साधण्याची परवानगी द्या. साधे नाजूक खेळ आणि प्रेमळ प्रेरणा बाळाची सामाजिक कौशल्ये वाढविण्यास मदत करेल. तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की आपले बाळ वेगवेगळे चेहरे ओळखू शकते. तो कदाचित चष्मा घालणार्या लोकांकडे जास्त वेळ पहात बसेल.
बाळाचे रडणे
तुमचे बाळ अजूनही नीट रुळलेले नाही आणि ते मधून मधून सारखे रडत असेल तर आश्चर्यचकित होऊ नका. बऱ्याच काळासाठी रडणे लहान बाळांसाठी कठीण असू शकते कारण कदाचित ते थकतात आणि त्यामुळे ते इतके रडतात की त्यांना शांत करणे कठीण होते. सकाळी किंवा दुपारी उशिरा बाळाचे रडणे खूप वाढू शकते, त्यामुळे बाळ रडणारच आहे हे ध्यानात असुद्या. खबरदारी म्हणून बाळाला खाऊ घालणे व आरामदायी ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी, पालक बरेच दिवस बाळाची अस्वस्थता पाहून मूळ कारणांबद्दल काळजी करू शकतात. बऱ्याच बाळांमध्ये आढळणारी पोटशूळ ही समस्या तुमच्या बाळाला झाली आहे का अशी तुम्हाला शंका असल्यास त्याबाबत बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.
८ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स
- या अवस्थेतील बाळ अजूनही दूध पिताना किंवा पिऊन झाल्यावर ते बाहेर काढतात, कारण बाळ दुधासोबत हवासुद्धा आत घेते. त्यामुळे स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुमच्याकडे बरीच ब्लँकेट्स आहेत याची खात्री करा
- आपल्या बाळाला बघण्यासाठी आणि हाताळण्यासाठी अनेक वस्तू द्या. त्यामुळे बाळाची दृश्याविषयक आणि स्पर्शाविषयक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते
- दररोज तुमच्या बाळाला तुम्ही जवळ असताना जमिनीवर झोपवा त्यामुळे बाळाची मान, खांदा आणि छातीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते
- बाळ झोपेत बऱ्याचदा पाय मारते त्यामुळे बेडशीट विस्कळीत होते. अशा परिस्थितीत बाळासाठीची स्लीपिंग बॅग चांगले काम करू शकते.
- जर आपणास यापुढे आपल्या बाळाला बाटलीने दूध पाजायचे असल्यास, स्विच करण्यासाठी आणि हळूहळू फीडिंग बॉटलची ओळख करुन देण्याची ही चांगली वेळ आहे. तसेच, कुटूंबातील एखादा सदस्य किंवा एखादा काळजीवाहक बाळाला बाटलीच्या सहाय्याने वारंवार दूध देऊ शकतो.
चाचण्या आणि लसीकरण
आपल्याबाळाचा वाढीचा दर, वजन आणि संक्रमण तपासण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत सामान्य तपासणीची आवश्यकता असते. ८ आठवड्यांत, आपल्या बाळाला हानीकारक जंतूपासून प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रथम लसीकरण भेटीची वेळ देखील मिळेल. हे पहिल्यांदा त्रासदायक ठरू शकते, म्हणून आपल्या पतीला, कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा मैत्रिणीला सोबत घ्या.
मुलांना डिप्थीरिया, टिटॅनस, डांग्या खोकला, पोलिओ आणि एचआयबी विषाणूपासून संरक्षण देणारी फाईव्ह –इन –वन लस हा प्रथम डोस दिला जातो. बाळाला पहिली न्यूमोकोकल लस देखील दिली जाईल. हि लस मेंदुज्वर आणि सेप्टीसीमिया होणाऱ्या जीवाणूपासून संरक्षण करते. अतिसार आणि आजारपणामुळे रोटावायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तोंडावाटे रोटाव्हायरस लसीचे थेंब देखील दिले जातात.
खेळ आणि क्रियाकलाप
येथे काही सोपे खेळ आहेत ज्यांचा ह्या टप्प्यावर विचार केला जाऊ शकतो.
१. स्वेटिंग गेम
दुसऱ्या महिन्यापासून, तुमचे बाळ त्याच्या आवाक्यातल्या वस्तूंकडे झेप घ्यायला सुरुवात करेल. विशेषत: चमकदार आणि आकर्षक वस्तूंचा उपयोग त्याच्या हातातील डोळ्यांचा समन्वय विकसित करण्यासाठी आणि त्याच्या खांद्याचेसामर्थ्य वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्हाला सिलिंग हुक, तार, मऊ व नाजूक सोपी खेळणी, रॅटलर्स आणि कोट हॅन्गरची स्क्रूची आवश्यकता असेल.
तुमच्या पलंगावर किंवा बाळाची कॉट असलेल्या सिलिंग वर हुक लावा आणि एक मजबूत तार वापरुन सिलींगला कोट हँगर बांधा. कोट हॅन्गरवर आपण हलक्या आणि चमकदार खेळण्यांचा गुच्छ लावू शकता जेणेकरून ते बाळाच्या पर्यंत पोहोचू शकतात, परंतु ही खेळणी बाळ पकडू शकेल इतकी जवळ नसावीत.
२. गो फिश
आपल्या बाळाचे लक्ष वेधण्यासाठी एखाद्या चमकदार, रंगीबेरंगी वस्तूसारखे काहीही नाही. त्याला मासे पाहण्यासाठी मत्स्यालयाकडे नेणे हा एक चांगला व्यायाम आहे ज्यामुळे त्याची दृष्टी आणि वस्तू स्थिरतेची भावना निर्माण करते. तुम्हाला फक्त तुमच्या घरात किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी मत्स्यालयाची आवश्यकता आहे ज्यात भरपूर रंगीबेरंगी मासे असतात.
बरेच मासे पाहण्यासाठी तुम्ही पाळीव प्राण्यांच्या स्टोअरला देखील भेट देऊ शकता.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
खालील परिस्थितीत आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या
- जर आपल्या लक्षात आले की बाळ फक्त थोडेच दूध पिते आहे, बाळाचे डायपर कोरडे रहात आहेत आणि बाळाला वेदना होत आहेत. तर ते निर्जलीकरण आणि बद्धकोष्ठता असू शकते. अशा वेळी बाळाला त्वरित डॉक्टरांकडे नेले पाहिजे.
- बाळाचे फॉन्टॅनेल्स (डोक्यावरचे मऊ भाग ) अद्याप जुळलेले नाहीत आणि थोडा काळ ते मऊ राहतील. जेव्हा बाळ रडत असेल तेव्हा ते किंचित फुगतात किंवा निर्जलीकरण झाल्यावर आत ओढले जातात. बराच काळ ही परिस्थिती राहिल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अभिनंदन – तुम्ही तुमच्या बाळाच्या वाढीचा एक कठीण टप्पा पार केला आहे! पुढे अजूनही असे रोमांचक टप्पे येणार आहेत!
मागील आठवडा: तुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी