Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य आंतरराष्ट्रीय महिला दिवस २०२३ – इतिहास, तथ्ये आणि तो कसा साजरा करतात?

आंतरराष्ट्रीय महिला दिवस २०२३ – इतिहास, तथ्ये आणि तो कसा साजरा करतात?

आंतरराष्ट्रीय महिला दिवस २०२३ – इतिहास, तथ्ये आणि तो कसा साजरा करतात?

दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि महिला सबलीकरणाचे महत्व पुन्हा स्थापित होते. गेल्या काही वर्षांमध्ये, ह्या दिवसाचे सामाजिकराजकीय महत्त्व कमी झाले आहे. ह्या दिवशी महिलांनी जागतिक समुदायासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास समजून घेतल्यास, त्याचे महत्व समजते.

१०० वर्षांहून अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाऊ लागला. ह्या दिवशी स्त्रीचे स्त्रीत्व साजरे केले जाते तसेच स्त्रियांचा आदर केला जातो. महिलांचे बलिदान आणि संघर्ष ह्यांचा आंतरराष्ट्रीय महिलादिनामध्ये नक्कीच वाटा आहे. महिला दिनाचा इतिहास जाणून घेतल्यास त्याचे महत्व समजू शकेल. महिला दिनाच्या इतिहासाची आठवण करून या दिवसाचा अर्थ पूर्णपणे समजून घेतला जाऊ शकतो आणि संपूर्ण उत्साहाने हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागील इतिहास

सन १९०८ मध्ये, वस्त्र उद्योगातील महिला कामगार न्यूयॉर्कमध्ये संपावर गेले होते. त्यांच्या मागण्या म्हणजे कमी कामकाजाचे तास, चांगले वेतन आणि कामाच्या सुधारित अटी ह्या होत्या. परंतु संपाचा काही उपयोग झाला नाही. परिणामी, १९०९ मध्ये दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा केला गेला.

१९१० मध्ये, कोपेनहेगन येथे, सोशलिस्ट इंटरनॅशनलने आंतरराष्ट्रीय महिला दिन स्थापित केला. त्यानंतर १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड ह्या देशांनी मेळावे आयोजित केले होते त्यामध्ये दशलक्षाहूनही अधिक पुरुष व स्त्रिया उपस्थित होते.

स्त्रियांसाठी पुढील हक्कांची मागणी मतदानाचा हक्क, सार्वजनिक पदावर काम करण्याचा हक्क, व्यावसायिक हक्क, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शेवटी नोकरीतील भेदभाव इत्यादी हक्कांची मागणी केली. १९१७ मध्ये रशियातील महिला अन्न आणि शांतताह्यासाठी संपावर गेले, परिणामी तात्पुरत्या सरकारने महिलांना मतदानाचा हक्क दिला.

त्यानंतर वर्षानुवर्षे ८ मार्च हा अनेक देश आणि मतदारसंघात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस सोव्हिएत युनियनमध्ये अधिकृत सुट्टी म्हणून साजरा केला जातो आणि चीनमध्ये महिला दिन साजरा करण्यासाठी महिलांना कामावर अर्धा दिवस सुट्टी दिली जाते.

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

महिलांचा हक्क साजरा करण्यासाठी आणि लैंगिक समानतेसाठी सुरू असलेल्या लढाईत लोकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रत्येक वर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. ह्यावर्षी ८ मार्च रोजी बुधवार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी लोगो

आंतरराष्ट्रीय महिला दिन लोगो म्हणजे एक बाण असलेल्या वर्तुळाकारात स्त्रीत्व दर्शवणारे चिन्ह असते.

संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका

संयुक्त राष्ट्र संघ ही जगातील सर्वात सक्रिय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त संस्था आहे. ही संस्था महिला दिनाला सामाजिकदृष्ट्या संबंधित विषयांशी जोडत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने बर्‍याच वर्षांमध्ये महिलांच्या सबलीकरणाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक मान्यताप्राप्त आणि प्रभावी वक्ते तसेच कार्यकर्ते आणले आहेत. दरवर्षी, महिला दिन, महिला सप्ताह आणि महिला सशक्तीकरण महिना साजरा करण्यासाठी एक विषय (थीम) निवडली जाते. १९९० च्या दशकात, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शांतता आणि महिलादिन अशी थिम निवडली होती.

महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्र संघाने बर्‍याच वर्षांत कमी विकसित झालेल्या देशांमधील महिलांवरील हिंसाचार, एड्सविषयी जागरूकता, शिक्षण व कामातील महिलांचा हक्क, ग्रामीण स्त्रियांपासून मुक्तता, महिलांची तस्करी, दारिद्र्य, उपासमार आणि महिलांच्या परिस्थिती यासारख्या अनेक ज्वलंत बाबी विचारात घेतल्या आहेत.

महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम

२०२३ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी यूएन ची थीम पुढीलप्रमाणे आहे: “Gender equality today for a sustainable tomorrow”. ज्या स्त्रिया त्यांच्या समुदायांमध्ये हवामान बदल अनुकूलन, शमन आणि प्रतिसाद याला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होतात आणि समुदाय अधिक टिकाऊ तयार करण्यासाठी प्रयत्न करतात आहे अश्या जगभरातील स्त्रिया आणि मुलींच्या योगदानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ह्या थीमद्वारे केलेला आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आणि त्यांचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय स्तरावर जांभळा रंग महिला दिनाचे प्रतीक मानला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या, जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचे प्रतीक होता आणि आता तो महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जातो. आशेचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाचा देखील वापर केला जातो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी ट्रेंडिंग हॅशटॅग

ट्रेंडिंग हॅशटॅग # वुमेन्सडे ट्विटर आणि इंस्टाग्रामवर वापरले जाऊ शकतात. इंस्टाग्रामवर या हॅशटॅगच्या सध्या जवळपास तीन दशलक्ष पोस्ट्स आहेत.

२०२३ च्या हॅशटॅगमध्ये #EmbraceEquity, #IWD2023 ह्या हॅशटॅगचा समावेश होतो. तर ह्या आधीचे हॅशटॅग्ज पुढील प्रमाणे आहेत #InternationalWomensDay, and #SeeHer. इत्यादी

महिला दिनाच्या दिवशी त्यांचे समर्थन कोण वाढवू शकते?

आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणताही देश, संघटना किंवा गटापुरता मर्यादित नाही. ह्या विशेष दिवसासाठी कोणतेही सरकार, धर्मादाय संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेशन, मीडिया हब किंवा महिलांचे नेटवर्क पूर्णपणे जबाबदार नाही. हा दिवस एकत्रितपणे सर्वत्र साजरा केला जातो. ग्लोरिया स्टीनेम, जगप्रसिद्ध पत्रकार, कार्यकर्ते आणि स्त्रीवादी, यांनी एकदा स्पष्ट केले की, “महिलांच्या समानतेसाठी संघर्षाची कहाणी कोणत्याही स्त्रीवादी संघटनेची किंवा कोणत्याही एका संस्थेची नाही, तर मानवी हक्कांची काळजी घेणाऱ्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आहे.” म्हणून तुम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिन आपला दिवस बनवू शकता आणि सर्वत्र महिलांसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकता.

महिलादिन जगभर कसा साजरा केला जातो?

हा दिवस जगभरात महिला सक्षमीकरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. काही संस्था महिलांना कामावर अर्धा दिवस सुट्टी देतात तर काहींजण हा दिवस एकमेकांना फुले देऊन हा दिवस साजरा करतात. चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा केला जातो ते पाहूया.

संयुक्त राष्ट्र

यूएस मध्ये, संपूर्ण मार्च महिना हा वूमन्स हिस्ट्री मंथम्हणून साजरा केला जातो. हा कार्यक्रम फेब्रुवारी १९८० मध्ये सुरू झाला होता तेव्हा अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ८ मार्चच्या आठवड्याला राष्ट्रीय महिला सप्ताह म्हणून घोषित केले होते. पुढील काही वर्षांत, देशातील अनेक शाळांनी वर्गात समानता मिळवण्यासाठी हा आठवडा ठरवून घेतला. ह्या कल्पनेचे राष्ट्रीय महिला इतिहास आघाडीने नेतृत्व केले. ह्यास राज्यपाल आणि नगरपरिषदांचे देखील समर्थन प्राप्त झाले. त्यांनी महिला सबलीकरणाच्या वकिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले.

इटली

इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन ला फे फेला डेला डोना म्हणून ओळखला जातो. पिवळी फुले वाटून हा दिवस साजरा केला जातो. ह्या खास दिवशी ह्या फुलांचे पुष्पगुच्छ इटलीमधील बर्‍याच रस्त्यांच्या कोपयावर विकले जातात. ह्यामागचा विचार असा आहे की लोकांनी आयुष्यातील सर्व महिलांना ही फुले भेट देऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे. हे स्त्री शक्ती आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.

चीन

चीनमध्ये १९४९ पासून ८ मार्च हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. बर्‍याच संस्था आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी हा दिवस साजरा करण्यासाठी अर्धा दिवस सुटीच्या देतात. १९८६ पर्यंत, चीनमधील १४ राज्यांनी पूर्ण मार्च महिना आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी राखून ठेवला होता.

यूके

यूकेमध्ये, महिलांना प्रभावित करणाऱ्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांविषयी जागरूकता वाढविण्यावर भर देताना आंतरराष्ट्रीय महिला दिन हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. देशभरात आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यायामाचे वर्ग आणि तज्ञांची भाषणे यांचा समावेश आहे. त्यापैकी बरेच महिलांच्या हक्कांसाठी समर्पित खास धर्मादाय संस्थांसाठी निधी जमा करण्याचा प्रयत्न करतात.

अधिक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये, महिला दिवस आता मातृदिनाप्रमाणेच साजरा केला जातो. प्रत्येक देशामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आहेत. त्यांचे कौतुक करण्याची संधी म्हणून महिलादिनाकडे बघितले जाते.

महिला दिनाचा इतिहास, महिलांनी विविध व्यावसायिक आणि सामाजिक परिस्थितीत जो संघर्ष केला आहे त्याने भारलेला आहे. आजही त्या लिंगभेदाचा सामना करीत आहेत आणि ह्या सामाजिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महिला दिनाच्या इतिहासातून एक गोष्ट लक्षात येते की तत्कालीन परिस्थितीच्या तुलनेत महिला बऱ्यापैकी पुढे आल्या आहेत. शतकांपूर्वी नसलेल्या स्वातंत्र्याचा बर्‍याच स्त्रिया आज आनंद घेत आहेत. तरीही, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. स्त्रीत्वाचे भावविश्व जपून त्यांचा आदर करण्यासाठी अजून अनेक गोष्टी करणे आवश्यक आहेत.

आणखी वाचा: महिलादिनासाठी सर्वोत्तम कोट्स, शुभेच्छा आणि मेसेजेस

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article