Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

ह्या आठवड्यात पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या बाळाचे वय महिन्यांमध्ये सांगू शकता. एक महिना आधीच पूर्ण झाल्याने आपल्या बाळाचा विकास वेगात सुरू होईल आणि पुढे वेगाने प्रगती होईल. बाळाची त्याच्या शरीराशी संपूर्णतः ओळख होऊ लागेल.

तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

हा महत्वाचा काळ आहे कारण तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाची वाढ मानसिक पातळीवर सुद्धा होऊ लागते. जेव्हा तुमचे बाळ तुमच्या संवाद साधण्यास उत्सुक आहे असे तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही ठराविक वेळेला त्याच्याशी खेळण्यासाठी काही वेळ काढू शकता. तुम्ही एकतर त्याच्यासोबत खेळू शकता किंवा त्याला बाहेरील जगातील बऱ्याच गोष्टी दाखवण्यासाठी घरात किंवा बाहेर नेऊ शकता. परंतु, बाळाला घरात किंवा बाहेर खूपही जास्त फिरवू नका कारण उत्तेजित झाल्यामुळे बाळ लवकर झोपी जाणार नाही.

पाच आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

पहिल्या महिन्याचा टप्पा ओलांडल्यानंतर बाळाचे वजन वाढण्यास सुरुवात होईल आणि वाढत्या क्रियाकलापांमुळे आहार वाढेल. ५ आठवड्यांच्या बाळामध्ये दर आठवड्याला साधारणपणे १६०२०० ग्रॅम्स वाढ होते.

तसेच, सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये बाळाला पोटावर झोपवल्यास त्यांच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वाढते आणि बाळ मान धरू लागण्यास मदत होते. परंतु पोटावर झोपवल्यास बाळ फार वेळ मान धरू शकत नाही. तुमचे बाळ फक्त एक दोन क्षण त्या अवस्थेत राहू शकते. जरी हा कालावधी अगदी थोडा असला तरी सुद्धा तुम्ही बाळाला प्रोत्साहित केले पाहिजे.

ह्या काळात, आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभावांवर थोडेसे नियंत्रण येणे सुरू होते आणि त्याद्वारे बाळ आपल्या भावना व्यक्त करते. ह्या काळात कदाचित तुमचे बाळ तुमच्याकडे पाहून हसल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि प्रत्येक आई त्या क्षणाबद्दल मोठ्या आनंदाने सांगते जेव्हा पहिल्यांदा, बाळ तिच्या कडे पाहून हसते आणि आईला ओळ्खल्याचे दर्शवते.

पाच आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

दूध पाजणे

आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ स्तनपान दिल्यानंतर, तुम्ही आणि बाळाने स्तनपान देण्याची स्थिती आणि कौशल्य विकसित केले आहे. दूध ओढण्याची प्रक्रिया नैसर्गिक असू शकते परंतु स्तनपानातून ५ आठवड्यांच्या बाळाला स्तनपान देण्याची प्रक्रिया सहज होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

आपल्या बाळाला स्तनपान देण्याचा आत्मविश्वास वाढल्यामुळे आपण आता घराबाहेर फिरू शकता किंवा जवळच्या उद्यानात घेऊन जाऊ शकता. कारण तुम्ही आपल्या बाळाला यशस्वीरित्या स्तनपान देऊ शकता. ह्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त क्रियाकलाप एकत्रित करण्यास तसेच विश्रांतीसाठी अधिक वेळ मिळण्यास मदत होईल.

बाटलीचे दूध पिणाऱ्या बाळांसाठी तुम्ही आधीच फ्रिज मध्ये दूध तयार करून ठेवू शकता. आणि बाळाला हवे तेव्हा देऊ शकता. ते फक्त फॉर्म्युला बॉक्समधील सूचनांचे पालन केल्यानंतरच केले पाहिजे. तसेच, कमीतकमी दोन बाटल्या तयार ठेवणे चांगले आहे जेणेकरुन एक वापरत असताना दुसरी निर्जंतुक केली जाईल.

झोप

जरी ५ आठवड्यांच्या बाळाचे झोपेचे वेळापत्रक असू शकते तरीही असे काही प्रसंग असू शकतात जेव्हा तुमचे बाळ दूध प्यायल्यानंतर झोपत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की तो दिवसा किंवा रात्रीच्या वेळी जागा होतो.

हवामान आणि तापमानाच्या अनुषंगाने आपल्या बाळाला झोपायला अनुकूल बनवण्यासाठी गुंडाळणे चांगले. उन्हाळ्यात, एक साधी कापड पुरेसे असावे. परंतु हिवाळ्यातसुद्धा, एकापेक्षा अधिक कपड्यांमध्ये गुंडाळणे टाळले पाहिजे, कारण यामुळे आपल्या बाळासाठी ते खूप गरम होईल. बाळाच्या शरीराचे तापमान तपासण्यासाठी आपल्या बाळाच्या गळ्याला आणि बाळाला स्पर्श करा आणि त्यानुसार त्याला लपेटून ठेवा.

ज्या गोष्टी सुसंगत असतात त्या नेहमीच तशा राहू शकत नाहीत. चांगले गाढ झोपणाऱ्या बाळाच्या झोपेत अचानक बदल होऊ शकतात. त्यांचे झोपेचे चक्र बदलू शकते कारण त्यांचे शरीर बदलाची मागणी करत असते आणि दिवसेंदिवस त्यांची उत्सुकता सुद्धा वाढीस लागते.

झोप

वागणूक

या वयात एक सर्वोत्तम क्षण येतो जेव्हा तुमचे बाळ तुमच्या चेहऱ्यावर आपले लक्ष केंद्रित करते तुम्हाला ओळखण्यासाठी थोडा वेळ घेते आणि नंतर जगातील सर्वात सुंदर स्मित देते. जेव्हा बाळ नुकताच झोपेतून जागा होतो आणि तुम्हाला भेटण्याचा आनंद त्याला होतो तेव्हा सहसा हे होते. इतर वेळी, जर बाळाला स्तनपानानंतर समाधानकारक वाटले असेल तर, तो झोपी जाण्याआधी तुमच्याकडे बघून स्मितहास्य करेल.

वेगवेगळे आवाज काढून बाळाचा तुमच्याशी संवाद सुरु राहील आणि ही संभाषणे अशीच चालू ठेवली जावीत. याव्यतिरिक्त, आपल्या देखरेखीखाली बाळाला पोटावर झोपवणे पूर्वीसारखेच सुरु ठेवले पाहिजे. चमकदार रंगांचा बाळाला परिचय देणे विचित्र प्रतिक्रिया देखील उमटवू शकेल, कारण बाळ रंग ओळखू शकेल किंवा ओळखू शकणार नाही. परंतु काहीतरी वेगळे आहे हे बाळाला समजू शकते. आपल्या बाळाला भावंड असल्यास, आपण हळू हळू तिला बाळाची ओळख करून देणे सुरू करू शकता आणि आपल्या मार्गदर्शनाखाली दोघे खेळू शकतात.

बाळाचे रडणे

या वयानंतर, मुले सहसा चांगले आणि खोल श्वास घेण्यास शिकतात आणि त्यांना आपल्या रडण्याच्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल हे लक्षात येते. यामुळे नेहमीपेक्षा जास्त रडणे उद्भवू शकते. विशेषत: ५ आठवड्यांपर्यंत बाळाच्या झोपेचे प्रमाण सर्वोच्च असते आणि त्यामध्ये कोणताही अडथळा आल्यास बराच वेळ बाळ रडत राहू शकते.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की बाळाचे प्रत्येक रडणे अद्वितीय आहे आणि बहुतेक मातांना आता बाळ का रडत आहे हे समजण्यास सुरुवात होते. म्हणून कारण कळण्याचा प्रयत्न करण्याआधी बाळाच्या रडण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक काही टिप्स

  • तुम्ही तुमच्या बाळाला नियमितपणे अंघोळ घालत आहात ह्याची खात्री करा. उन्हाळ्यात, गरम हवामानातून थोडा आराम मिळवण्यासाठी बाळाला एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ घालणे योग्य ठरेल
  • जरी बाळाचा दिनक्रम ठरलेला नसला तरीही बाळ स्तनपान घेतल्यानंतर ठराविक वेळेला झोपते आहे की नाही ह्याची खात्री करा
  • जर रात्री आपल्या बाळाला झोपायला त्रास होत असेल तर, बाळाला उत्तेजन देणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू बाजूला काढा आणि दिवे बंद करा. बाळाच्या जवळ रहा. तुम्ही बाळाच्या जवळच आहात हे बाळाला समजू द्या. थोड्या वेळाने, बाळ कंटाळून झोपी जाईल
  • खेळाच्या वेळी किंवा बडबड करताना बाळाला जोरात हलवणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या मानेस नुकसान होऊ शकते. बाळाला नेहमी हळू हळू झुलवा किंवा तीव्र शारीरिक क्रियाकलापांशिवाय आसपास खेळा.

५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक काही टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

मागील सर्व लसींचे वेळापत्रक दुसर्‍या हिपॅटायटीस बीच्या लसीसमवेत पूर्ण झालेले असेल, तर या काळात कोणतीही लसी देण्याची गरज नाही. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्वाचे आहे.

खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या बाळाची उत्सुकता जसजशी वाढत जाईल तसतसे त्याला इतर इंद्रियांची आणि मागील गोष्टींच्या इतर तपशीलवार पैलूंबद्दल अधिक जाणीव होऊ लागतो. तुमचे बाळ सुगंध स्पष्टपणे ओळखू शकेल किंवा चमकदार रंगांचे महत्त्व समजू शकेल. आपल्या घराजवळ पार्क किंवा बाग असल्यास आपल्या लहान बाळाला फिरायला घेऊन जा आणि त्याला फुलझाडांच्या जवळ घेऊन जा. ताजी हवा, किंचित सुगंध आणि चमकदार फुलांचे रंग आपल्या बाळाची उत्सुकता वाढवू शकतात. त्याला सर्व काही एकाच वेळी मोठे डोळे करून पाहताना पहा. तुमच्याकडे स्वतःची बाग असल्यास, एक फुल घेऊन त्याला त्याच्या जवळ आणा. त्याला स्पर्श करु द्या. फुलाला काटा असेल किंवा त्याने तोंडात पाकळ्या घालायला सुरुवात केली असेल तर सावधगिरी बाळगा.

या वयात, तुमच्या मुलास स्वतःच्या शरीराची जाणीव होऊ शकते. आरशाचा उपयोग करून हे अधिक स्पष्ट केले जाऊ शकते. सुरुवातीला, आपल्या बाळास स्वतःला आरशात पाहून आश्चर्य वाटेल आणि आपणच ते आहोत हे बाळ ओळखू शकणार नाही. तथापि, बाळाला आरशात तुम्ही सुद्धा दिसणार आहात . म्हणून त्यांच्याशी संवाद साधा किंवा मजेदार चेहरे किंवा हालचाली करा. एकमेकांच्या हालचालींची नक्कल करा आणि प्रतिबिंबित करा कारण आपल्या बाळाला तो स्वतः करीत असलेल्या हालचालींची जाणीव आहे. म्हणून जर त्याने एक पाय हलविला तर तुम्ही देखील पाय हलवा आणि हा संपूर्ण अनुभव मजेदार असेल.

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

जर आपल्या ५ आठवड्यांच्या बाळाला बद्धकोष्ठतेची समस्या ह्या टप्प्याची सुरुवात होण्याआधीपासूनच असल्याचे दिसून येत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरकडे जाणे महत्वाचे आहे.

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

या वयातील काही बाळांना क्रॅडल कॅप असू शकते. ही त्वचेची स्थिती आहे. ह्या स्थितीमध्ये टाळूवरील त्वचा कोरडी होते किंवा त्वचेवर पिवळे फ्लेक्स तयार होतात. ही स्थिती किंवा त्वचेच्या इतर कोणत्याही समस्या तुमच्या लक्षात आल्या तर डॉक्टरांना दाखवा.

जर तुमच्या बाळाने अचानक स्वारस्य दाखवणे कमी केले, आवश्यकतेनुसार प्रतिसाद न दिल्यास किंवा बाळ जास्त झोपत असल्यास आणि सुस्त वाटत असल्यास किंवा एखाद्या गोष्टीचा त्याला त्रास देत असेल आणि डॉक्टरांच्या परिक्षणाची गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५ आठवड्यांचे बाळ तुम्हाला लवकरच एखाद्या कुटूंबाच्या सदस्यासारखे वाटायला लागेल आणि खूप काळापासून ते तुमच्यासोबत आहे असे वाटू लागेल. तुमच्या बाळासाठी वेळ काढणे किंवा बाळासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील. आपल्या इतर मुलांना किंवा जोडीदारालाही काही वेळा काही जबाबदाऱ्या स्वीकारू द्या ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल आणि बाळालाही इतरांशी ओळख होण्यास मदत होईल.

मागील आठवडा: तुमचे ४ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article