In this Article
३८ आठवडे किंवा ९ महिन्यांच्या बाळाचा विकास होत असताना, त्यामध्ये आयुष्य बदलावणारे विकासाचे टप्पे येत असतात. ह्या टप्प्यांमध्ये बाळाचा होणारा विशिष्ट विकास, स्तनपान आणि इतरही टप्प्यांचा समावेश होतो. येथे आपण ३८ आठवड्याच्या बाळाचा विकास आणि काळजीविषयक टिप्स वर चर्चा करणार आहोत.
३८ आठवड्यांच्या बाळाचा विकास
ह्या टप्प्यावर बाळाचा विकास अगदी स्पष्ट दिसतो. परंतु, ३८–आठवड्याच्या बाळाच्या विकासाचे टप्पे प्रत्येक बाळाच्या वाढीच्या दरानुसार बदलू शकतात. ते काही बाळांमध्ये स्पष्ट दिसू शकतात आणि इतर बाळांमध्ये इतके स्पष्टपणे लक्षात येत नाहीत. बाळाचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुमचे बाळ लवकरच किंवा नंतर हे टप्पे गाठेल.
बाळाच्या ह्या वयात होणाऱ्या विकासाच्या गतीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
बाळाचा होणार विकास विविध टप्प्यांमध्ये विभागला जाऊ शकतो. आम्ही त्यापैकी सर्वात लक्षणीय टप्पे इथे दिलेले आहेत.
आणखी वाचा: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
३८ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे
अडतीस आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि वैद्यकीय गरजांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात:
१. शारीरिक आणि मानसिक विकास
- बाळ अधिक गतिशीलता दर्शवेल. बाळ काही मिनिटे बसून उभे राहण्याचा प्रयत्न करेल. रांगून बसण्याचा प्रयत्न करेल. कशाचा तरी आधार घेऊन थोडावेळ नाच करेल. बाळ कदाचित आधार सोडून देऊ शकते आणि आधाराशिवाय उभे राहण्याचा धोका पत्करू शकते. बोटांनी लहान वस्तू उचलण्याची क्षमता बाळामध्ये विकसित होईल.
- बाळाला उंची, जागा आणि जागेतील बदलांची भीती वाटू शकते उदा: जर तुम्ही बाळाला एखाद्या उंच खुर्चीवर बसवले, किंवा त्याला तुमच्या खांद्यावर बसवले तर बाळ घाबरू शकते. ह्याचे कारण म्हणजे बाळ उभे राहण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करत असताना मध्येच पडते. बाळाने उभे राहणे आणि चालणे शिकले की ही भीती निघून जाईल.
- बाळ अजून नीट बोलू शकत नसले तरी सुद्धा त्याला अनेक शब्द समजतात आणि बाळ ‘मामा‘ किंवा ‘पप्पा‘ म्हणू शकते. बाळ काही सूचनांचे पालन करू शकेल आणि सांकेतिक भाषेद्वारे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल.
- बाळाची स्मरणशक्ती वाढू लागेल आणि तुम्ही त्याचे टीदर कुठे ठेवले आहे हे त्याच्या लक्षात राहील. आठवड्यापूर्वी बाळाच्या लक्षात आलेल्या काही गोष्टींच्या नकला बाळ करून दाखवू शकेल.
- तुम्ही जर बाळाची एखादी आवडती वस्तू घेण्याचा प्रयत्न केलात तर बाळ प्रतिकार करेल.
- बाळाला खाण्याच्या नवीन सवयी लागू शकतील. बाळ पुढे मांडलेल्या अन्नासोबत खेळत असल्याचे अनेकदा तुमच्या लक्षात येईल.
- बाळाला दात येऊ लागतात. समोरचे दोन दात आधी येतात.
- बाळाच्या झोपण्याच्या सवयी देखील बदलतील आणि आम्ही खाली याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे.
२. सामाजिक विकास
- लोकांविषयी बाळाला आसक्ती आणि सहानुभूती वाटू लागेल. तसेच बाळ त्याची खेळणी, तुमचे केस इ. गोष्टी सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी धरून ठेवेल.
- भावनांची संवेदनशीलता. उदाहरणार्थ, जर तुम्ही काही कारणास्तव रडत असाल तर तुमच्यासोबत बाळही रडू शकते.
- भावंडांच्या विषयी देखील बाळाच्या भावना वाढू लागतील कारण बाळ आता इकडे तिकडे फिरत असेल आणि तो आपल्या भावंडांच्या कामामध्ये लुडबुड करू लागेल आणि दोघांमध्ये भांडणे सुद्धा होऊ लागतील.
- बाळे जे काही करतात त्याबद्दल कौतुकाची सुद्धा ते वाट पाहू लागतात.
- बाळ अन्न, खेळणी इत्यादी गोष्टी शेअर करू लागतील
- त्यांना त्यांची खेळणी, अन्न, पाळीव प्राणी इत्यादींसारख्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये जास्त रस वाटू लागेल.
- सामाजिक घडामोडींचाही त्यांच्या खेळण्यावर परिणाम होईल. बाळाला लपाछपीचा खेळ आवडेल.
३. वैद्यकीय गरजा
- डॉक्टरांकडून तपासणी
- निदान चाचण्या
- लसीकरण
वरील सर्व घडामोडी महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच कालावधीत बाळाचे स्तनपान सोडवण्याची आवश्यकता असते. बाळाच्या वाढीच्या ३८ व्या आठवड्यादरम्यान अन्न आणि झोप हे नेहमीच पालकांचे प्राधान्य असते. सर्वात आधी आहार आणि झोपण्याच्या विकासातील बदलांची चर्चा करूया.
आणखी वाचा: ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
बाळाला आहार देणे
ह्या काळात बाळ त्याच्या इवल्याश्या बोटांनी वस्तू पकडू लागेल. सुरुवातील तुम्ही बाळाला फिंगर फूड देऊ शकता. हे पदार्थ खाण्यास आणि पचायला सोपे असतात उदा: मऊ ब्रेडचे तुकडे, अंड्याचा पांढरा भाग, उकडलेले बटाट्याचे तुकडे इ.
केळी, पपई, एवोकॅडो, दात येताना द्यायची बिस्किटे आणि विरघळणारी बिस्किटे ह्यासारखे मऊ पदार्थ तसेच फळांच्या प्युरी, बाळाच्या तोंडात सहज विरघळू शकणारे अन्न सुरू करण्यासाठी देखील ही एक उत्तम वेळ आहे.
बाळांनी अन्नपदार्थ एक्स्प्लोर करण्याची ही वेळ असते. पास्ता, मासे, मांस इत्यादी अन्नपदार्थांचा परिचय करून देण्यासाठी ह्याचा उपयोग करून घ्या. अन्नपदार्थांची ऍलर्जी कमी करण्यासाठी तुम्ही दर ३–५ दिवसांनी बाळाला नवीन अन्नपदार्थ सादर करावे. परंतु, इतर अभ्यासाद्वारे दर १–३ दिवसांनी नवीन अन्न वापरून पहाणे योग्य आहे असे निदर्शनास आलेले आहे.
लहान मुलांनाही तुमच्यासोबत अन्न शेअर करायला आवडेल. बाळाला आता विशिष्ट अन्नपदार्थ आवडू लागतील आणि त्यासाठी तुम्ही तयार रहा.
या सर्व प्रयोगांसह तुम्ही अजूनही स्तनपान करत असाल. परंतु, बाळाची स्तनपानाची गरज आता बदलेल. बाळाचे झोपेचे चक्र सुद्धा आता बदलेल.
आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
बाळाची झोप
बाळ आता नवीन क्रियाकलाप करू लागेल. दिवसा आणि रात्री बाळाची झोप कमी होऊ शकते आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला चिडचिड आणि थकवा येतो. बाळाला रात्रीची भीती वाटू शकते किंवा भयानक स्वप्ने देखील पडू शकतात.
बाळाला असुरक्षिततेची भावना येऊ शकते. बाळाला आई किंवा त्याची काळजी घेणाऱ्यांशिवाय इतर कोणाही सोबत झोपायचे नसते. तुम्ही बिझी असताना तुम्हाला बेबी कॅरियर ची सुद्धा गरज भासू शकते.
एका अभ्यासानुसार, ६–१२ महिने वयोगटातील ८% बाळे अजूनही रात्री किमान एकदा तरी नियमितपणे जागी होतात आणि ६१ % बाळे रात्री किमान एकदा दूध पितात. आता बाळाला स्तनपानाची फारशी गरज नाही. पुस्तक वाचणे किंवा कथा सांगणे यामुळे झोप येऊ शकते.
हे सर्व अतिशय सामान्य आहे आणि जलद शारीरिक आणि मानसिक विकासामुळे असे होते.
३८ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी काही टिप्स
ह्या टप्प्यावर बाळाची काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे
- बाळाची हालचाल वाढलेली असल्यामुळे सर्व धोकादायक गोष्टी त्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
- बाळ पडू नये म्हणून कमी उंचीचे बेड वापरा, बाळाला बसवल्यावर पट्ट्याने बांधा, हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बेबीसिटर ठेवा. बाळ हालचाल करू लागल्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे.
- वाढत्या गतिशीलतेमुळे झालेल्या जखमांसाठी प्रथमोपचार हाताशी ठेवा.
- बाळाच्या दातांची काळजी घेणे सुरु करता येऊ शकते.
- चघळले किंवा गिळले जाऊ शकतात असे छोटे छोटे पार्ट असलेली खेळणी टाळा.
- बाळाच्या भावनांबद्दल संवेदनशील व्हा; बाळांच्या भावना वाढत आहेत आणि त्यांना स्वतःचे मत येत आहे.
- त्यांनी दिलेल्या गोष्टी स्वीकारा, ते शेअर करायला शिकत आहेत.
- अन्न आणि झोपेच्या सवयींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ह्या टप्प्यावर बाळाच्या विकासाइतकेच वैद्यकीय गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे आणि त्या खाली दिलेल्या आहेत.
चाचण्या आणि लसीकरण
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, गोवर लसीचा पहिला डोस बाळाच्या वयाच्या नऊ महिन्यांत देण्याची शिफारस करते. ही लस व्हिटॅमिन ए च्या तोंडी लशीसह १२ महिन्यांच्या आत दिली जाते. जपानी एन्सेफलायटीस लस (पहिला डोस) देखील विचाराधीन आहे.
इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, बाळाच्या वयाच्या ९ व्या महिन्यात. तोंडी पोलिओव्हायरस लस ओपीव्ही, गोवर, गालगुंड आणि रुबेला लस एमएमआर १ ह्या लशींची शिफारस करते. तसेच टायफॉईड कॉन्जुगेट वॅक्सीन ची शिफारस ९–१२ महिन्यांदरम्यान करते.
डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस (एचपीव्ही) देखील ९ व्या महिन्यापासून शक्य तितक्या लवकर द्यावी. ९–१२ महिन्यांपासून गोवर लसीसह पिवळ्या तापाची लस द्यावी. मेनिन्गोकोकल एमईएनए कॉन्जुगेट लस ९–१८ महिन्यांपासून आणि कवाड्रिव्हॅलंट लस ९–२३ महिन्यांमध्ये द्यावी.
दुसर्या शिफारशीनुसार, बाळाला ६–१८ महिन्यांच्या वयापासून तिसरी हिपॅटायटीस बी लस (एचपीव्ही) आणि तिसरी पोलिओ लस (आयपी व्ही) देखील मिळू शकते आणि फ्लूची लस दरवर्षी दिली पाहिजे.
लसीकरणाचे काही दुष्परिणाम होऊ शकतात; कृपया लसीकरण करण्यापूर्वी तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
चाचण्या आणि तपासण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे
- बाळाची लांबी, वजन, डोक्याचा घेर मोजणे
- वाढीचा तक्ता विरुद्ध वाढ मोजमाप
- पूर्ण शारीरिक तपासणी
- विकासाचे मूल्यांकन
खेळ आणि उपक्रम
बाळाला काही खेळ आणि क्रियाकलापांची ओळख करून देण्याची हीच वेळ आहे
- बाळाच्या बुद्धीला चालना मिळेल असे खेळ खेळा: वर्गीकरण, स्टॅकिंग, रोलिंग आणि शेअरिंगला प्रोत्साहन देणारी क्रियाकलाप किट बाळाला द्या.
- बाळाला सभोवतालचे ज्ञान द्या: मोठ्या बॉक्समध्ये ठेऊन बाहेर ठेवता येतील असे रंगीबेरंगी बॉक्स बाळाला द्या. बाळ गिळू शकेल इतके लहान बॉक्सेस तर नाहीत ना ह्याची खात्री करा.
- लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी: ध्वनी निर्माण करणारी खेळणी जसे की म्युझिक कार, कीबोर्ड, ड्रम आणि स्टिक्स इ.बाळाला द्या.
- खेळणी, क्रियाकलापांद्वारे हालचाल: उघडणे आणि बंद करणे (उघडता येणारे आणि बंद करता येणारे दार असणारे खेळण्यातील घर), खेळणी, रिमोट कंट्रोल कार, बॉल गेम पास करणे किंवा रोल करणे इ.खेळ बाळासोबत खेळा.
- साधे कथाकथन किंवा वाचन. प्राण्यांची चित्रे आणि आवाज असलेली पुस्तके यासारखे क्रियाकलाप.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
बाळाचे स्तनपान सोडवत असताना, तुम्ही नियमित अंतराने बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खालील गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक आहे
- मानसिक आणि शारीरिक विकास अपेक्षित पातळीवर होत आहे की नाही
- कोणत्याही आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा
- लसीकरण
- आरोग्याच्या नवीन समस्या
- आपत्कालीन आजार/दुखापत, खरं तर हे रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत झाले पाहिजे.
३८ आठवड्यांच्या बाळाचा वेगाने विकास होतो आहे. तुम्हाला बाळासोबत राहण्याची आवश्यकता आहे, म्हणून कृपया तुम्ही बाळाची काळजी घेत असताना तुमची स्वतःची पण चांगली काळजी घ्या. तुम्हाला सुद्धा खूप ऊर्जेची आणि चांगल्या आरोग्याची गरज आहे!
मागील आठवडा: तुमचे ३७ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी