Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे २३ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २३ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २३ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

पालकांची एक सर्वोत्कृष्ट भावना म्हणजे त्यांचा लहान देवदूत, त्यांच्या डोळ्यांसमोर वाढत आणि विकसित होताना दिसतो! तुमचे गोंडस लहान बाळ बर्‍याच नवीन गोष्टी शिकत आहे आणि शोधत आहे आणि त्याच्या छोट्या डोळ्यांमधील आश्चर्य पाहून तसेच तो आपल्या सभोवताली पाहून नवीन संकल्पना शिकू लागतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

आपल्या बाळाच्या आयुष्याचा २३ वा आठवडा उत्साहवर्धक आहे कारण तो त्याच्या स्वत: च्या क्षमता आणि आजूबाजूच्या लोकांना ओळखण्याची चिन्हे दाखवू लागतो, अशा प्रकारे स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे मनोरंजन करतो आणि विकासाची चिन्हे दर्शवतो.

पालकांनी आपल्या बाळामध्ये दिसणारी ही चिन्हे समजून घेणे आणि ओळखणे महत्वाचे आहे आणि बाळांची वाढ होताना त्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. चला तर मग ही चिन्हे काय आहेत ते पाहूया.

२३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

२३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

२३ आठवड्यात, बाळे अधिक सेटल होतात आणि पुढच्या टप्प्यात जाण्यास तयार असतात. २३ वा आठवडा हा बाळाच्या वाढीचा असा एक टप्पा आहे ज्यामध्ये पुढच्या काही महिन्यांत बाळे शारीरिक आणि मानसिक बदलांसाठी स्वतःला तयार करतात.

बरीच बाळे आता पालथे पडण्यास आणि रांगण्याच्या तयारीची कौशल्ये आत्मसात करण्यास सुरुवात करतात. बाळे त्यांच्या पोटावर पुढे किंवा मागे सरकण्यास सुरुवात करतात, आणि ह्यामुळे बाळाला रांगण्यासाठी सामर्थ्य तयार होते. लहान बाळे सरळ बसू शकतात आणि जेव्हा त्यांना त्यांच्या खुर्चीमध्ये बसवले जाते तेव्हा जेवणाची वेळ झाली आहे हे त्यांना समजते.

तुमच्या लक्षात येईल की बाळाला आपल्या बोटाने विविध वस्तू, विशेषत: अन्न, घट्ट पकडायला आवडते आणि यापुढे त्यांचे लाळेचे उत्पादन देखील वाढते, कारण आता बाळांना या वयात घनपदार्थांची ओळख करून दिली जाते. बाळांना हसतमुखाने अन्न बाहेर टाकणे देखील आवडते कारण ते अद्यापही घन पदार्थ खाण्यास शिकत आहेत.

डॉक्टरांच्या भेटीमध्ये २३ आठवड्यांच्या बाळाचे वजन मोजले जाऊ शकते. त्यानंतर डॉक्टर तुम्हाला त्याच्या वयोगटातील मुलांच्या तुलनेत बाळाचे वजन कसे वाढते आहे हे सांगू शकतील आणि बाळाचे वजन वाढविण्यासाठी बाळाला जास्त आहार देण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा डॉक्टर तुम्हाला सांगतील.

२३ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

२३ व्या आठवड्यात,बाळे विकासाची चिन्हे दर्शवू लागतील आणि त्यामध्ये प्रगतिशील आकलनात्मक कौशल्यांचा समावेश होतो. खालीलपैकी काहींचा त्यामध्ये समावेश आहे:

  • कारण आणि परिणामाचे मूलभूत ज्ञान बाळाला येऊ शकते. उदा: त्यांच्या खेळण्यातील कार ढकलणे, ह्या खेळामुळे बाळ तासनतास मोहित होऊ शकते. बाळ बटणे दाबून गाणे किंवा सूर प्ले करू शकेल किंवा वस्तू पुढे व मागे ढकलू शकेल
  • वस्तू कायमस्वरुपी असतात ही संकल्पना त्यांना समजू लागेल. आपली खेळणी कुठेही जात नाहीत हे त्यांना समजते त्यामुळे बाळ कपडे, टॉवेल्स आणि ब्लॅंकेटखाली वस्तू शोधू लागतात
  • आरशात त्यांचे प्रतिबिंब पाहताना बाळ आनंदी होते
  • आवाक्याबाहेरच्या गोष्टी हस्तगत करणे.

या वयात लहान मुले काही अतिशय मनोरंजक विलोम आणि क्रिया दर्शवितात, त्यावरून ते त्यांच्या आजूबाजूच्या जगाचे आकलन करत आहेत हे सिद्ध होते. त्यांचे लहान क्रियाकलाप साध्य करण्यासाठी त्यांचे निरीक्षण करा आणि त्यांना मदत करा, परंतु त्याच वेळी तुम्ही त्यांच्या कृती ते स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची त्यांना परवानगी देणे आवश्यक आहे.

२३ आठवड्यांच्या बाळाचा आहार

या वयात, बाळे सामान्यत: घन पदार्थांचे सेवन करण्यास तयार असतात, म्हणून पालक त्यांना अर्धघन पदार्थांचा परिचय देऊ शकतात. तुम्ही बाळाचे स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न करीत असल्यास, तुमचे बाळ २३ आठवड्यांनंतर अन्न घेण्यास उत्सुक असेल आणि तोंडात घालू शकेल. प्युरीज किंवा फिंगर फूड खायला दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाळाचा उत्साह किंवा उत्सुकता दिसू शकेल

तथापि, जरी तुम्ही बाळाच्या आहारात घनपदार्थांचा समावेश करणार असला तरीही, दूध त्याच्या जेवणाचा एक मुख्य भाग राहिला पाहिजे. मग ते दूध स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या स्वरूपात असले तरीही चालेल. काही महिन्यांनंतरच बाळांना त्यांच्या आहारातून संपूर्ण पोषण मिळणे सुरू होईल. जेवणापूर्वी त्यांना दूध दिल्यास त्यांची भूक भागविली जाईल याची खात्री होते आणि त्यांच्या शौचामध्ये बदल होणे सुद्धा सामान्य आहे.

तोंडात अन्न घेणे, चघळणे, चावणे, गिळणे यासारख्या प्रक्रिया ही सर्व कौशल्ये बाळे सरावाने आत्मसात करतील. जेव्हा बाळ खरोखर काहीतरी न चावता नुसते गिळून टाकते तेव्हा ते त्याच्या नॅपीमध्ये दिसून येते. काळानुसार त्यांच्या हिरड्या मजबूत होतील आणि बाळ अन्नाचे बारीक तुकडे करू शकेल आणि पचन चांगले होईल. प्युरी मुळे खरोखर अन्नाचे पचन होते आहे की नाही हे समजत नाही कारण त्यामध्ये चावण्याचा प्रश्न येत नाही.

२३ आठवड्यांच्या बाळाची झोप

बाळाच्या झोपेच्या नमुन्यात थोडा बदल होऊ शकतो आणि मध्यरात्री बाळ जागे असलेले आढळणे सामान्य नाही.

२३ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेच्या चक्रात तुम्हाला माहिती असाव्यात अशा काही गोष्टी येथे आहेतः

  • बर्‍याच डॉक्टरांचे म्हणणे आहे की ६ महिन्यांच्या बाळाला रात्री कसे झोपावे हे शिकण्याची आवश्यकता आहे, परंतु बर्‍याच बाळांना झोपण्यास जास्त वेळ लागतो. काळजी करू नका, कारण ६१२ महिन्यांमधील कमीतकमी ७८% बाळे रात्री एकदा तरी जागे होतात
  • सुमारे ६०% मुले अद्याप रात्रीच्या वेळी दूध पिण्यासाठी उठतात
  • बाळ एका झोपेच्या चक्रा नंतर (४० मिनिटे) जागे होऊ शकतात आणि पुन्हा झोपी जात नाही हे निराशाजनक वाटू शकते
  • काही बाळांना ३ ते ४ तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो, तर काही लहान बाळे डुलकीनंतर समाधानी असतात. जोपर्यंत बाळ समाधानी आहे आणि झोपेनंतर चिडचिड करीत नाही, तोपर्यंत काळजी करण्याची काहीच गरज नाही

झोपेच्या पद्धतीची सवय लागण्यासाठी मुले स्वतःचा वेळ घेतील आणि त्यासाठी पालकांनी मानसिक दृष्ट्या तयार असले पाहिजे. यास कदाचित काही महिने लागू शकतात, परंतु हळूहळू ते होईल आणि सर्व गोष्टी सुरळीत होतील.

२३ आठवड्यांच्या बाळासाठी काळजीविषयक टिप्स

आपल्या मुलाची देखभाल चांगल्या प्रकारे होण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

  • तुमच्या बाळासाठी मोठ्याने वाचा आणि त्यांना खेळण्यासाठी अधिक रंग आणि वस्तू द्या, कारण त्याने आपली पकड दृढ करणे शिकले आहे
  • अंघोळीच्या वेळेला बाळाला रबराची खेळणी, मग आणि साबणाचे बुडबुडे इत्यादींचा वापर करून तुम्ही बाळाची अंघोळीची वेळ आनंददायी करू शकता. तसेच बाळाला पाणी उडवण्यास आवडते त्यामुळे ते आश्चर्यचकित होते
  • प्लेटाइम खेळांची ओळख देण्याची ही चांगली वेळ आहे ज्यामुळे त्यांचे संज्ञानात्मक आणि शारीरिक गुणधर्म विकसित होतील

चाचणी आणि लसीकरण

या वयात, मुलांना त्यांच्या लसीसाठी तयार करणे आवश्यक असते, म्हणून पालकांनी डॉक्टरांच्या भेटीचे वेळापत्रक तयार करणे महत्वाचे आहे. लसीकरणानंतर बाळे थोडी चिडचिड करू शकतात म्हणून लसीकरणाच्या दिवशी आणि नंतर आपल्या लहान बाळाबरोबर बराच वेळ घालविण्याची खात्री करा. लसीकरणाचे दुष्परिणाम क्वचितच आढळतात परंतु काही वेळा बाळाला लसीकरणांनंतर त्रास होतो.

६ महिन्यांच्या बाळाला पहिल्यांदा सर्दी होऊ शकते, आणि पहिल्यांदा पालक झालेल्या मंडळींसाठी बाळ आजारी पडते तेव्हा तो एक भीतीदायक अनुभव असू शकतो. जर तुमच्या बाळाला बरे वाटत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सूचित करणारे संकेत म्हणजे पुरळ येणे, उलट्या होणे, शरीराचे तापमान वाढणे, अतिसार आणि वर्तनातील बदल इत्यादी होय.

२३ आठवड्यांच्या बाळासाठी खेळ आणि क्रियाकलाप

या वयात तुम्ही बाळाला ओळख करून देऊ शकता असे काही खेळ येथे आहेत:

. घोडेस्वारीचे धडे

ह्या खेळात तुम्ही खुर्चीवर बसून आपले गुडघे एकत्र ठेवू शकता आणि आपल्या बाळाला आपल्या गुडघ्यावर ठेवू शकता. बाळाचे तोंड तुमच्याकडे करून दोन्ही पाय दोन्ही बाजूला करून बाळाला तुमच्या गुडघ्यांवर बसवा. बाळाच्या कंबरेभोवती तुमचे हात ठेवा आणि गाणे गाऊन बाळाला तुमच्या गुडघ्यावर बाउन्स करा, आणि थिस इज द वे लेडी राइड्स, ट्री ट्री ट्रीहे गाणे म्हणून शेवटच्या ट्री ह्या शब्दावर थांबू शकता. बाऊन्सिंग ची क्रिया बाळाला आवडेल आणि ह्या क्रियेमुळे बाळाला कारण आणि परिणाम समजून घेण्यास मदत होईल.

. गुदगुल्या आणि मजा

या गेममध्ये तुम्ही बाळाच्या आंघोळीच्या वेळी खूप मजा करू शकता आणि आपल्या बाळाची शाब्दिक आणि बारीक मोटार कौशल्ये सुधारण्यास मदत करू शकता. तुम्ही तुमच्या बाळास आंघोळ घालत असताना, स्पंज पाण्याने आणि थोड्या साबणाने भिजवा आणि म्हणा, “आय एम गोइंग तो टिकल युअर टोजआणि त्यांना पफने हळूवारपणे गुदगुल्या करा! तुम्ही त्याच्या गुडघ्यांना सुद्धा असेच करणार आहात असे म्हणा आणि तुम्ही बाळाच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी असे करत रहा. आपण त्याला स्पंज देऊन, आणि तोच खेळ खेळण्यास आणि स्वत: ला गुदगुल्या करण्यास सांगू शकता. तुमचे बोट पाण्याखाली ठेवा आणि त्याला तुमच्या बोटांना गुदगुल्या करण्यास सांगून खेळ समाप्त करू शकता.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

जर तुमच्या बाळाला वारंवार आजाराची लक्षणे दिसत असतील, बर्‍याचदा सर्दी होत असेल, सतत खोकला असेल किंवा शिंका येत असेल किंवा काही गोष्टींची ऍलर्जी असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला असे वाटले की बाळ अन्न योग्य प्रकारे पचवू शकत नाही किंवा सतत अस्वस्थ आहे, तर काही अंतर्गत वेदनांमुळे असे होऊ शकते ज्यामुळे तो इतर कोणत्याही प्रकारे व्यक्त करू शकत नाही. डॉक्टर त्याचे निदान करण्यास मदत करू शकतात आणि तुमच्या बाळाची तंदुरुस्ती आणि त्याची खेळकर मनस्थिती रत मिळवून देतात.

२३ आठवड्यांची मुले त्यांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यातून जात असतात. मुलांना व्यस्त आणि तंदुरुस्त कसे ठेवता येईल हे पालकांनी शोधणे महत्वाचे आहे. पालकांनी त्यांना व्यस्त आणि निरोगी कसे ठेवू हे शकतो शोधणे आवश्यक आहे. कालांतराने, जेव्हा मुले स्वतःचे स्वतः सगळे करू लागतील आणि त्यांच्या स्नायूंमध्ये सामर्थ्य येईल तेव्हा तुमच्या प्रयत्नांना यश आलेले तुम्हाला दिसेल.

मागील आठवडा: तुमचे २२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article