Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची कोरडी त्वचा

बाळांची कोरडी त्वचा

बाळांची कोरडी त्वचा

पालकांसाठी, त्यांच्या बाळाचे आरोग्य अत्यंत महत्त्व असते. वेगवेगळ्या मार्गांनी त्याची काळजी घेणे आवश्यक असते. म्हणजेच बाळाला योग्य प्रकारे पोषण देऊन त्याच्या अंतर्गत आरोग्याची काळजी घेणे आणि बाळासाठी आरामदायक उत्पादनांची निवड करणे होय. डायपरपासून त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांपर्यंत सर्व काही निवडण्याबाबत पालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे जरुरी आहे. त्वचेची योग्य काळजी घेणारी उत्पादने निवडण्यासाठी, बाळाच्या त्वचेचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे कारण पुढे जाऊन बाळासाठी ते समस्या बनू शकतात. कोरडी त्वचा ही बाळांमधील त्वचेची समस्या आहे त्यास पालकांना सामोरे जावे लागते.

कोरडी त्वचा म्हणजे काय?

बाळाची त्वचा आपल्या त्वचेपेक्षा पातळ आणि अधिक नाजूक असते. तसेच बाळाची त्वचा पर्यावरणास अधिक संवेदनशील असते. कडक हिवाळा आणि उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये बाळाच्या त्वचेवर कोरड्या त्वचेचे चट्टे आढळणे सामान्य असते.

कोरड्या त्वचेची कारणे काय आहेत?

बाळांना पोटात असताना व्हर्निक्स नावाच्या जाड आवरणाने संरक्षित केले जाते. हे आवरण बाळाच्या त्वचेचे गर्भजलापासून संरक्षण करते. बाळाच्या जन्मानंतर, नर्स त्या आवारणास पुसून टाकतात . एकदा ते काढल्यानंतर त्वचेची साल किंवा पातळ तुकडे तसेच राहतात. हे सहसा हात, तळवे आणि पावलाच्या त्वचेवर दिसून येतात.

तुमच्या बाळाची त्वचा कोरडी राहण्याची इतर कारणे:

  • ज्या वातावरणात बाळ असते ते वातावरण खूप थंड, खूप गरम किंवा कोरडे असल्यास बाळाची त्वचा कोरडी राहू शकते. आपल्यापेक्षा बाळाच्या त्वचेवर वातावरणाचा जास्त परिणाम होतो. अशा वातावरणामुळे बाळाच्या त्वचेतील मौल्यवान ओलावा काढून घेतला जातो. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये हीटर वापरल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या महिन्यांत एअर कंडिशनर वापरल्यामुळे असे वातावरण उद्भवू शकते.
  • आपल्या बाळाला खूप वेळा आंघोळ घातल्याने बाळाच्या त्वचेतील तेल आणि ओलावा काढून घेतला जातो आणि तो त्वचा सजलीत राहण्यासाठी आवश्यक असतो.

तुमच्या बाळाच्या कोरड्या त्वचेचा कसा उपचार कराल?

बाळाची त्वचा सजलीत राहण्यासाठी तुम्ही अनेक पावले उचलू शकता.बाळाच्या कोरड्या त्वचेसाठी घरीच उपाय सापडतील त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही.

बाळाच्या कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार

मॉइश्चरायझर वापरा: तुमच्या बाळाच्या त्वचेवर कोरडे चट्टे आढळल्यास तुम्ही बाळासाठी दिवसातून कमीतकमी दोनदा मॉइश्चरायझर वापरणे सुरू केले पाहिजे. बाजारामध्ये बाळांच्या त्वचेसाठी बरेच मॉइश्चरायझर्स आहेत. बाळासाठी नक्की कोणत्या क्रीम्स वापरायच्या याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रौढांसाठी बनविलेले मॉइश्चरायझर्स कधीही वापरु नका कारण त्यामध्ये बाळाच्या संवेदनशील त्वचेला हानिकारक रसायने असतात. बेबी मॉइश्चरायझर वापरण्याव्यतिरिक्त, तुम्ही बाळाची कोरडी त्वचा सुधारण्यासाठी बेबी सोप वापरू शकता.

ह्युमिडिफायर वापरा: ज्या वातावरणात आपले बाळ असते त्या वातावरणाचा बाळाच्या त्वचेवर परिणाम होत असतो. जर वातावरण खूपच कोरडे असेल तर ते बाळाच्या त्वचेमधील तेल आणि ओलावा काढून घेईल . हे दुरुस्त करण्यासाठी तुम्ही बाळाच्या खोलीत एक ह्युमिडिफायर ठेवू शकता. त्यामुळे आर्द्रता सुधारेल आणि हवेतील कोरडेपणा कमी होईल.

तेलाची मालिश: दररोज मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा बेबी ऑईलचा वापर करावा आणि कोरड्या चट्ट्यांवर ते प्रामुख्याने लावल्याने बाळाच्या त्वचेला प्रभावीपणे ओलावा मिळतो. त्यामुळे कोरड्या त्वचेपासून बचाव होण्यास मदत होते.

पेट्रोलियम जेली वापरा: जाड आणि संरक्षणात्मक, पेट्रोलियम जेली त्वचेच्या ओलावा राखून कोरडेपणाचा सामना करण्यास मदत करते. तुम्ही त्वचेच्या कोरड्या चट्ट्यांवर पातळ थर लावू शकता.

कॅलेंडुला वापराः कॅलेंडुला, ही एक त्वचेसाठी अनुकूल औषधी वनस्पती आहे, हे तेल जेव्हा नारळ तेलात मिसळून लावले जाते , तेव्हा कोरड्या त्वचेसाठी एक प्रभावी उपाय बनतो. याचा उपयोग आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करू शकता, खासकरून जर मुलाला इसबचा त्रास होत असेल तर हा उपाय चांगला आहे.

बाळाची त्वचा कोरडी होण्यापासून कसे रोखावे?

बाळांमधील कोरडी त्वचा सहजपणे सुधारली जाते. ह्या कोरड्या त्वचेमुळे बाळास अस्वस्थ वाटू शकते. तुम्ही तुमच्या बाळाची त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करू शकता असे काही मार्ग येथे आहेत.

  • बाळास वारंवार अंघोळ घालू नका: तुम्ही जसा विचार करता त्याच्या अगदी उलट म्हणजे , बाळाला आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा अंघोळीची आवश्यकता नसते. आपले बाळ पाण्यात किती वेळ घालवते त्याचे प्रमाण देखील कमी केले पाहिजे.
  • तेलाने मालिश करणे: तेलाची मालिश, केवळ तुमच्या बाळाच्या वाढीस मदत करत नाही तर, मालिश मुळे त्वचेचा ओलसरपणा आणि आर्द्रता टिकून राहते.
  • कोमट पाणी: गरम पाण्याचा वापर केल्याने बाळाच्या त्वचेला आवश्यक तेल काढून टाकले जाते. त्याऐवजी कोमट पाणी वापरा.
  • योग्य साबण वापरा: बाळांसाठीच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात शिफारस केली जाते. ती बाळासाठी सर्वात योग्य आहेत आणि ती तयार करताना बाळाच्या त्वचेची संवेदनशीलता आणि नाजूक स्वरूपाचा विचार केलेला असतो. प्रौढांसाठी तयार केलेल्या साबणापेक्षा ते कमी कठोर असतात.
  • पाण्यात खेळूद्या: जर तुमच्या मुलास पाण्यात खेळणे आवडत असेल तर,साबणाच्या पाण्याऐवजी स्वच्छ पाण्यात बाळाला खेळूद्या. त्यामुळे बाळाच्या त्वचेला त्रास होणार नाही.
  • टिपून कोरडे करा: तुमच्या बाळाची त्वचा पुसताना टॉवेलची होणारी त्वचेवरील हालचाल बाळाच्या नाजूक त्वचेसाठी खूप विकृतीकारक असू शकते. तुम्ही बाळाच्या त्वचेवर जास्त आर्द्रता राखायची खात्री करा.

  • तुमच्या बाळाला कपड्यांनी झाकून ठेवा: कपड्यांमुळे त्वचेला संरक्षण मिळते आणि त्वचेची आर्द्रता राखण्यास मदत होते. आपण आपल्या मुलाला बाहेर घेऊन जात असाल तर हे विशेषतः लागू होते. सूर्य आणि वाऱ्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांना १५ पेक्षा जास्त एसपीएफ असलेले बेबी सनस्क्रीन लावू शकता.
  • बेबी लाँड्री डिटर्जंट: जर बाळाचे कपडे बाळासाठी अनुकूल असलेल्या डिटर्जंटने धुतले नाहीत तर त्याचा बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

बाळाची कोरडी त्वचा हे कुठल्या समस्येचे लक्षण असू शकते का?

काहीवेळा हो, आपल्या बाळाच्या त्वचेवरील कोरडे चट्टे लालसर होऊ शकतात. याचा अर्थ असा होऊ शकतो की बाळाला एक्झिमा किंवा आटोपीक डरम्याटिटिस असू शकतो. नियमितपणे त्वचेला मॉइश्चरायझ केले तर बाळाच्या कोरड्या त्वचेमुळे झालेला एक्झिमा कमी होईल. मॉइश्चरायझिंग असूनही काही दिवसांनी किंवा खाज सुटल्यावर लालसरपणा कायम राहिल्यास आपण आपल्या डॉक्टरांना भेट दिली पाहिजे

इचिथायओसिस ही एक दुर्मिळ अनुवंशिक स्थिती आहे ह्यामध्ये त्वचा कोरडी आणि लालसर होते. हात आणि तळव्यांवर सुद्धा त्वचा लाल होते. या स्थितीसाठी त्वचातज्ञांचे मूल्यांकन आवश्यक आहे.

तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी कोणतीही नवीन उत्पादने वापरण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाच्या कोरड्या त्वचेसाठी प्रतिबंधात्मक उपायांबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला. बाळासाठी नवीन उत्पादनांची चाचणी घेताना, बाळाच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया होणार नाही ह्याची खात्री करण्यासाठी तुम्ही बाळाची त्वचा आणि वर्तनावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. जर पुरळ, फोड, खरुज किंवा इतर कोणतेही दुष्परिणाम दिसले तर ते उत्पादन बंद करा आणि दुसऱ्या आरोग्यपूर्ण पर्यायासाठी त्वरित त्वचातज्ञांशी बोला

आणखी वाचा: डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article