गर्भधारणेची पुष्टी होताच तुमचे डॉक्टर तुम्हाला थायरॉईडची चाचणी करून घेण्यास सांगतील. तुम्ही बाळाचा विचार करत असलात तर आधी तुम्ही थायरॉइडची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात थायरॉईड ही एक सामान्य स्थिती असली तरी, थायरॉईड आणि गरोदरपणाची नेहमीची लक्षणे ह्यामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. वजन वाढणे, थकवा जाणवणे, मूड बदलणे, विसरभोळेपणा आणि अगदी सूज येणे […]
घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल […]
जेव्हा तुम्ही आई होणार असता, तेव्हा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तुम्हाला काही पदार्थ खाणे टाळावे लागते. काही खाद्यपदार्थांचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु काही खाद्यपदार्थ अत्यंत फायदेशीर असतात. विशेषत: गरोदरपणात हे पदार्थ खाल्ल्याने मदत होते. असाच एक पदार्थ म्हणजे मखाना. त्यास इंग्रजीत फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स असे देखील म्हणतात. मखाना म्हणजे काय? […]
सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत – तुमची मुले आनंदी, मुक्त असतील आणि भरपूर दंगा मस्ती करत असतील! बाहेर कडक ऊन असल्यामुळे तुमचे मूल दिवसातील बराच वेळ टी. व्ही. पुढे घालवत असेल आणि त्याची तुम्हाला काळजी वाटत असेल. तुमच्या मुलाला वाचनाची सवय लावण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे. वाचनामुळे मुलांच्या मेंदूचा एकापेक्षा जास्त मार्गांनी विकास होऊ […]