Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता अधिकृतपणे ३४ आठवड्यांचे आहे आणि तिची वाढ आता अगदी छान होत असेल. आता ती खेळणी पकडण्यासाठी तिच्या हातांचा वापर करीत आहे, तिच्या शरीराचे निरक्षण करताना सुद्धा ती हातांचा वापर करत असल्याचे तुम्ही बघत असाल. या आठवड्यापासून, तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला बर्‍याच वेळा हसताना आणि जेवणाच्या वेळी त्याच्या प्लेटवरील अन्नपदार्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पहाल. ती दररोज नवीन गोष्टी शिकत जाईल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. ३४ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास कसा होईल हे तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का? तर मग हा लेख वाचा!

३४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या कालावधीत प्रत्येक आठवड्यागणिक बाळाची खूप वाढ होईल. तो रांगणे, ऐकणे, स्पर्श करणे आणि एक्सप्लोर कसे करावे हे शिकेल. तुमच्या मुलास त्याचा आसपासचा परिसर आणि खेळण्यांसह वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची ओळख करुन देण्यासाठी हा आठवडा हा उत्कृष्ट काळ आहे.

३४ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाच्या वयाच्या ३४ व्या आठवड्यात तुम्हाला खालील विकासाचे टप्पे दिसतील

  • द्विगुणितपणा तुमचा छोटा बाळ कदाचित त्याचे दोन्ही हात वापरण्यास प्राधान्य दर्शवू शकेल
  • बडबड आपले बाळ खूप बडबड करेल आणि खळखळून हसेल/नुसते स्माईल देखील देईल. तो तुमच्या आवाजाला प्रतिसाद देईल आणि तुम्ही गायलेले सूर ऐकण्यास त्याला आवडेल.
  • उत्सुकता तुमच्या बाळास त्याच्या खाजगी भागाबद्दल उत्सुकता असेल आणि डायपर टाईम असताना बाळ ते शोधू शकतात. ही लैंगिकतेची एक सामान्य प्रक्रिया आहे आणि बाळ इतरांसमोर असे करत नाही ना ह्याची तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे
  • रांगणे तुमचे बाळ रांगण्याचा खूप प्रयत्न करेल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणि आठवड्यांमध्ये रांगण्यात निष्णात होईल.

बाळाचा आहार

बाळाच्या आहाराविषयी बोलायचे झाले तर, तुमचे बाळ हळू हळू प्युरी आणि मॅश केलेल्या पदार्थांपासून घन पदार्थांपर्यंत संक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या छोट्या बाळाला जे हवे ते खाऊ देण्याची ही चांगली वेळ आहे परंतु बाळाचे स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध बंद करू नका. शेवटी बाळाला पोषणाची आवश्यकता आहे. तुमचे बाळ दिवसात तीनदा जेवण आणि तीनदा स्नॅक्स खात असेल.

तुमच्या बाळाच्या शरीराची पुढील बाजू आणि संपूर्ण बाह्यांना झाकणारी एक स्मोक ऑन बेबी वाईप विकत घ्या. तो थुंकला किंवा ओकला तर त्यासाठी काहीवाईप्स जवळ बाजूला ठेवा. तुमच्या बाळाला नवीन कटलरीची ओळख करुन घेण्यास आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये भरपूर पर्याय सापडतील. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी प्लेट्स आणि कंटेनर खरेदी करीत असाल, तेव्हा त्याला सक्शन कप आहेत का पहा आणि ते पृष्ठभागावर व्यवस्थित चिकटल्याचे सुनिश्चित करा. तुमचे बाळ खूप हुशार आहे आणि सावधगिरी न बाळगल्यास भांडी व प्लेट्समधून सर्व काही सांडवून ठेवू शकेल.

घरी पदार्थ, दही आणि लहान स्नॅक्स साठवण्यासाठी लहान सीलेबल कंटेनरचा एक सेट ठेवा. तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सील केलेले लंच बॉक्स घेऊ शकता आणि त्याचा चांगला उपयोग होतो. जाता जाता स्नॅक्स आणि पदार्थ खाण्यासाठी, काही रिफिलिंग पाउच खरेदी करा. जेव्हा तुम्हाला घाईत अन्न पॅक करण्याची आवश्यकता असेल तेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता भासू शकेल.

तुमचे बाळ स्वत: खाण्याचा प्रयत्न करेल आणि प्लेटमधील खाद्यपदार्थांपर्यंत स्वतः पोहोचण्यात रस दर्शवेल. तुम्ही बाळाला फिंगर फूड देऊ शकता पण बाळ ते खात असताना बाळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे नाहीतर ते घशात अडकण्याची शक्यता असते. बाळाला देण्याआधी पदार्थ मऊ करण्यासाठी ते वाफवून आणि मॅश करून घ्या. सुरुवातीला बाळाला सीपी कप मधून द्रवपदार्थ घेणे अवघड जाईल आणि बाळ ते सांडवून ठेवेल. त्याची तयारी ठेवा आणि शांत रहा. तुम्ही तुमच्या बाळाला एक तिरकस, झाकण नसलेला सीपी कप देऊ शकता. जी बाळे खूप सांडवतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

बाळाची झोप

३४ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची झोपेची पध्दत सहसा विस्कळीत स्वरूपाची असते कारण या वयात तो रांगायला शिकत असेल आणि बाळाला दात येण्यास सुद्धा सुरुवात झालेली असेल. बाळ छोटी झोप घेईल आणि बराच काळ जागे राहील. बाळ पूर्वीप्रमाणे कधी झोपेल असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की रांगण्यास सुरुवात केल्यापासून त्यास तीन महिने लागतील. आम्ही शिफारस करतो की तुम्ही अगदी घड्याळाला चिकटून राहू नका. बाळाला झोप केव्हा येते ह्याकडे लक्ष द्या. बाळाच्या झोपेच्या नमुन्याप्रमाणे तुमचे काम आणि जीवनशैली ह्यांचे नियोजन करा.कारण ही संक्रमण अवस्था आहे.

३४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

काही बाळांचा विकास कमी गतीने होतो तर काही,बाळे विकासाच्या बाबतीत वेगवान असतात. काही सरासरी दराने विकसित होऊ शकतात. अनपेक्षित काळासाठी आणि वेगाने विकास होत असताना बाळावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. पालकांसाठी ३४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

  • बेबीप्रूफ औषधांची कपाटे बाळ आता चांगले सराईतपणे रांगत असल्याने ते उंचावरील गोष्टी घेण्याचा प्रयत्न करेल, जरी तुम्ही कमी उंचीवर कपाटात औषधे ठेवलीत तरी सुद्धा धोकादायक औषधे तुम्ही लेबल करून ठेवली पाहिजेत आणि कपाटांना कुलूप लावले पाहिजे. औषधे उघड्यावर ठेऊ नका कारण तुम्ही जितकी ती बाळांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कराल तितकी बाळाची उत्सुकता वाढीस लागेल.
  • बोलते व्हा तुमच्या आवाजाचे मॉड्युलेशन करा आणि तुमच्या बाळाला नवीन शब्द शिकवण्यासाठी गाणी गा आणि त्यालाही तोंडी संभाषण न करण्याची सवय लावा. आपणास सर्जनशील वाटत असल्यास, तुम्ही काही खेळणी आणू शकता आणि त्यांच्याकडे बोट दाखवू शकता आणि मोठ्याने त्या खेळण्याचे नाव उच्चारू शकता. तुम्ही तुमच्या छोट्या बाळास खेळण्यांचा ट्रक आणण्यास सांगू शकता.
  • वेळ काढा बाळाशी गप्पा मारणे चांगले असले तरी त्यामध्ये ब्रेक घ्या. पुनःपुन्हा त्याच शब्दांची पुनरावृत्ती करा जेणेकरून त्यांच्या ते लक्षात राहतील. आणि अपरिचित शब्दोच्चारांचे आकलन वाढेल
  • बाळाला आहार देण्यासाठीची उपकरणे खरेदी करा आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला त्यांची आवश्यकता आहे कारण खाताना बाळ अन्नपदार्थ सगळीकडे सांडवेल, चमच्याचे निरीक्षण करेल आणि काही वेळा चमचे आपटेल सुद्धा
  • तुमचे घर बेबीप्रूफ करा धोकादायक गोष्टी दूर ठेवा, धुण्यायोग्य चटई बसवा आणि वाईप्स जवळ ठेवा आणि जेव्हा बाळ भुकेले असेल किंवा अन्नपदार्थ सांडवण्याच्या मूड मध्ये असेल तर अन्नपदार्थ जवळ ठेवा. तीक्ष्ण वस्तू बाजूला ठेवा आणि योग्य स्वच्छता ठेवा जेणेकरून बाळ जमिनीवरील हानिकारक कणांचे सेवन करणार नाही. जेव्हा तो सभोवताली रांगत असेल तर थोडीशी घाण किंवा धूळ असेल तर ठीक आहे परंतु काहीही गंभीर नाही ह्याची खात्री करा
  • खेळणी खरेदी करा तुमचे बाळ वस्तू पकडण्यासाठी, हस्तांतरित करण्यासाठी, फेकण्यासाठी हातांचा वापर करीत आहे. म्हणून नवीन खेळणी खरेदी करणे आणि त्यांना एक्सप्लोर करू देणे ही चांगली कल्पना आहे. हे त्यांच्या शारीरिक आणि स्थूल मोटर विकासास मदत करेल आणि ते पालक म्हणून तुम्हाला हवे आहे

चाचण्या आणि लसीकरण

बाळाच्या विकासाच्या टप्प्याना उशीर झाल्यास किंवा काही इतर वैद्यकीय समस्या उद्भवल्यास खालील चाचण्या आणि लसीकरण करणे आवश्यक आहे.

  • श्रवण आणि दृष्टी परीक्षा
  • रक्तगट ओळखण्यासाठी रक्त तपासणी
  • वेगवेगळ्या सामान्य आणि दुर्मिळ आजारांसाठी चाचण्या
  • फुफ्फुसांच्या चाचण्या
  • ग्लूकोज, लवण, कॅल्शियम आणि इतर तत्सम जीवनसत्त्वे / खनिज चाचण्या
  • मूत्र चाचण्या
  • कावीळ तपासण्यासाठी बिलीरुबिन पातळीची चाचणी
  • आपल्या बाळाच्या अवयवांचे, मेंदू आणि हृदयाच्या विकासाचे परीक्षण करण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग चाचण्या.
  • आरएसव्ही आणि हिपॅटायटीस बी लसीकरण लसीकरण करण्याचे हे महत्वाचे रुटीन आहे आपल्या मुलाचा जन्म मुदतीपूर्वी / वेळेपूर्वी झाला असेल तर हे पळाले पाहिजे

टीप: ३४ व्व्या आठवड्यात कोणतीही लस दिली जात नाही. जर एखादी लस चुकून द्यायची राहिली असेल तर ह्या आठवड्यात ती दिली जाऊ शकते. एमएमआर लस आठवडा पूर्ण झाल्यानंतर दिली जाते.

खेळ आणि क्रियाकलाप

खेळ आणि क्रियाकलाप

या वयोगटातील मुलांसाठी आम्ही खालील खेळ आणि क्रियाकलापांची शिफारस करतो

  • खेळण्यांचा बॉक्स एक खेळण्यांचा बॉक्स घ्या आणि वेगवेगळ्या वस्तूंनी भरा (जसे की प्लास्टिक, लाकूड आणि अस्पष्ट पोत). आपले बाळ लवकरच पुरेसे अन्वेषण करण्यास प्रारंभ करेल.
  • प्लेमॅट प्लेमॅट किंवा एक्स्प्लोरेशन शीट तयार करण्यासाठी भिन्न फॅब्रिक वापरा. त्यांच्या संवेदनाक्षम विकासासाठी हे उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या स्पर्श आणि पोत ह्या संवेदना विकसित करते
  • इतरांमध्ये मिसळणे तुमच्या लहान बाळाशी खेळण्यासाठी येणाऱ्या इतर माता आणि मित्रमैत्रिणींसोबत तुमचाही बंध जुळत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या बाळाची त्यांना ओळख करून द्या आणि तुमच्या बाळाला त्याच्या वयाच्या मुलांशी खेळू द्या
  • लपवा आणि शोधा काही खेळणी आणि वस्तू लपवा आणि आपल्या मुलाला ते शोधण्यास सांगा. त्यामुळे त्यांचे रांगण्याचे आणि दृश्य कौशल्य विकसित होण्यास मदत होईल
  • कारण आणि प्रभाव कारण आणि परिणाम दर्शविण्यासाठी काही खेळणी आणि बिल्डिंग ब्लॉक्स मिळवा. आपल्या मुलास सभोवताली वस्तू टाकू द्या आणि फेकल्यावर कसा आवाज होतो हे त्यांना समजू द्या

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • स्तनपान करताना तुमचे बाळ स्तनपान घेत नसेल किंवा चिडचिड करत असेल तर
  • तो खेळण्यांशी खेळण्यात रस दाखवत नसेल तर
  • तो रांगण्याचा प्रयत्न करत नसेल किंवा बरेच तास शांत बसून राहत असेल तर
  • या वयात तुम्हाला बाळाची अनपेक्षित किंवा असामान्य वागण्याची लक्षणे दिसत असतील तर
  • तुम्ही बाळाच्या विकासाला होणाऱ्या विलंबामुळे काळजीत असाल आणि ते होत असलेल्या चिन्हे लक्षात आली तर

प्रत्येक बाळ त्याच्या वेगाने वाढते. म्हणूनच तुमच्या बाळास त्याच्या वेगाने विकसित होऊ द्या. पालक म्हणून, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे धीर धरा आणि तुमच्या छोट्या बाळावर प्रेमाचा वर्षाव करा तसेच बाळाला अन्वेषण आणि विकासासाठी वेळ द्या. ह्या काळात संपूर्णपणे पालकत्वाचा आनंद लुटा.

मागील आठवडा: तुमचे ३३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article