Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी तुमच्या बाळाला दात येत असताना दातांची काळजी कशी घ्यावी?

तुमच्या बाळाला दात येत असताना दातांची काळजी कशी घ्यावी?

तुमच्या बाळाला दात येत असताना दातांची काळजी कशी घ्यावी?

In this Article

तुमच्या बाळाला जेव्हा दात येण्यास सुरुवात होते तेव्हापासूनच त्याच्या तोंडाची काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. बाळाचे दात नीट घासल्यास त्याचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकते. जर तुमच्या लहान बाळाला दात येण्यास सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला बाळाच्या दातांची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बाळांच्या दातांच्या तसेच तोंडाच्या स्वच्छतेबद्दल माहिती देणार आहोत.

लहान बाळाचे दात कधी दिसू लागतात?

बाळ जेव्हा चार ते सात महिन्यांचे असते तेव्हा बहुतेक लहान बाळांमध्ये दात दिसण्यास सुरुवात होते. सर्वात आधी बाळाला खालचे दोन दात येतात तो बाळाचा पहिला दातांचा संच असतो.

बाळाचे दात घासण्यास केव्हा सुरुवात करावी?

जन्मापासून आपल्या बाळाच्या तोंडाची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. तोंडात पहिला दात येताच तुम्ही तुमच्या बाळाचे दात घासण्यास सुरुवात केली पाहिजे.

तुम्हाला विशेष टूथपेस्ट आणि टूथब्रश खरेदी करण्याची गरज आहे का?

सुरुवातीला, तुम्ही तुमच्या बाळाच्या हिरड्या थेट तुमच्या बोटाने किंवा मऊ ब्रिस्टल ब्रशने स्वच्छ करू शकता. त्यामुळे त्यांना ब्रश करण्याच्या संवेदनांची सवय होईल. जेव्हा दात येण्याची चिन्हे दिसतात तेव्हा बाळाच्या दातांच्या काळजीसाठी टूथब्रश वापरणे योग्य आहे.

तुम्हाला विशेष टूथपेस्ट आणि टूथब्रश खरेदी करण्याची गरज आहे का?

जर तुम्ही टूथब्रश वापरत असाल तर लहान डोके असलेला आणि मऊ नायलॉन ब्रिस्टल्स असलेला ब्रश वापरा. तसेच ब्रशची निवड करताना, रंगीबेरंगी किंवा कार्टून कॅरेक्टर असलेला ब्रश निवडा जेणेकरून तुमचे बाळ त्याच्या ब्रशिंग सेशनची वाट बघेल आणि दात घासणे ही प्रक्रिया तुमच्यासाठी एक चांगली स्मृती ठरेल.

टूथपेस्ट वापरण्याच्या संदर्भात, आपण बालरोग दंतवैद्याकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. दंतचिकित्सक आपल्याला ह्याविषयी अधिक चांगले सांगू शकतील. शिवाय, लहान मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या टूथपेस्टचे प्रमाण अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असावे.

तुम्हाला विशेष टूथपेस्ट आणि टूथब्रश खरेदी करण्याची गरज आहे का?

सुरुवातीला, तुम्ही तुमच्या बाळाच्या हिरड्या थेट तुमच्या बोटाने किंवा मऊ ब्रिस्टल ब्रशने स्वच्छ करू शकता जेणेकरून त्यांना ब्रश करण्याच्या संवेदनांची सवय होईल. जेव्हा दात येण्याची चिन्हे दिसतात तेव्हा बाळाच्या दातांच्या काळजीसाठी टूथब्रश वापरणे योग्य आहे.

तुमच्या बाळाचे वय तीन वर्षे किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्ही सामान्य टूथपेस्ट वापरणे सुरू करू शकता. टूथब्रशचे ब्रिस्टल्स पसरू लागताच दर एक ते तीन महिन्यांनी नियमितपणे टूथब्रश बदला.

टूथपेस्ट किती वापरायची?

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) ने ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अगदी तांदळाच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरण्याची शिफारस केलेली आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, मटारच्या आकाराएवढी टूथपेस्टची शिफारस केली जाते. वृद्धांसाठी, टूथब्रशच्या लांबीवर मावेल इतक्या टूथपेस्टचा वापर केला पाहिजे.

तुमच्या बाळाचे दात कसे घासायचे?

आपल्या लहान मुलाचे दात घासताना लक्षात ठेवल्या पाहिजेत अश्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत .

 • तुमच्या बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या ५ महिन्यांत, ओलसर वॉशक्लोथ वापरा आणि दूध पाजल्यानंतर तुमच्या बाळाचे तोंड स्वच्छ पुसून टाका. असे केल्याने बाळाच्या दातांची काळजी घेण्याची सवय लागते आणि सुरुवातीपासूनच तोंडाच्या स्वच्छतेच्या योग्य सवयी लावतात. ह्यामुळे दातांवर अन्न जमा होणार नाही आणि त्यांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होणार नाही.
 • बाळाच्या वयाच्या ६ महिन्यांनंतर, जेव्हा तुमच्या मुलाचे दात पहिल्यांदा दिसू लागतात, तेव्हा मऊ नायलॉन ब्रिस्टल्स आणि लहान डोके असलेल्या टूथब्रशने दात घासण्यास सुरुवात करा. ह्या टप्प्यावर, पाण्याने हलके ब्रश करा. तुम्ही मऊ फिंगर टूथब्रश वापरू शकता. ह्या टूथब्रशमध्ये रबराचे आवरण असते आणि त्यावर नायलॉनचे ब्रीस्टेल्स असतात.
 • खुर्चीवर किंवा सोफ्यावर तुम्ही स्वतः बसा आणि तुमच्या बाळाला खाऊ घालण्याच्या स्थितीत तुमच्या मांडीवर ठेवा. फिंगर ब्रश वापरून त्याच्या हिरड्यांवर आपले बोट फिरवा आणि प्रत्येक दाताच्या दोन्ही बाजू घासून टाका. तुमचे बाळ जर खूप चंचल असेल तर बाळाला गुंतवून ठेवण्यासाठी तुम्ही खेळण्यांचा वापर करू शकता. दात स्वच्छ करण्यासाठी त्याचे दात आणि हिरड्यांभोवती ओल्या वॉशक्लोथने पुसून घ्या.
 • गोलाकार हालचालीत ब्रश करणे सुरू करा, दाताच्या पुढच्या बाजूने मागे आणि दातांच्या तळाकडील पृष्ठभागाकडे जा. तळासाठी समान हालचाली पुन्हा करा.

तुमच्या बाळाचे दात कसे घासायचे?

 • तोंडाचा वरचा भाग, गालाच्या आतील भाग आणि जिभेवर घासून घ्या. ओल्या वॉशक्लोथने दात स्वच्छ करा.
 • तुमच्या बाळाला दात येण्याची सुरुवात झाल्यापासूनच त्यांची काळजी घ्या. दातांचा पहिला संच खूप महत्वाचा आहे कारण पुढे येणाऱ्या दातांमधील अंतर आणि व्यवस्था हे दात राखून ठेवतात . त्यांची योग्य काळजी न घेतल्यास, दात किडणे आणि कायमचे दात तयार होण्यात व्यत्यय येऊ शकतो.
 • जेव्हा तुमचे बाळ तीन वर्षांचे होईल, तेव्हा तुम्ही फ्लोराईड टूथपेस्ट वापरणे सुरू करू शकता परंतु तुम्ही वापरत असलेल्या टूथपेस्टचे प्रमाण जास्त नाही ना ह्याकडे सुद्धा लक्ष द्या. जिवाणूंचे अंश काढून टाकण्यासाठी आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दातांच्या आतील आणि बाहेरील बाजूस तसेच जिभेवर (जर बाळ करू देत असेल तर) हळूवारपणे ब्रश करा.
 • तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर फ्लोराईडचे सेवन वाढवा. फ्लोराईड दात किडणे प्रतिबंधित करते. जरी तुम्ही या टप्प्यावर टूथपेस्ट वापरत नसलात तरी, इतर स्त्रोतांद्वारे फ्लोराईडची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. नळाच्या पाण्यात फ्लोराईड असते आणि ते फ्लोराईडचा एक उत्तम स्त्रोत आहे, परंतु, काही पाणीपुरवठा कंपन्या नळाच्या पाण्यातून फ्लोराईड काढून टाकतात. तुमचे बाळ मोठे झाल्यावर फ्लोराईड सप्लिमेंट्सबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • बाळाला दूध किंवा ज्यूस देऊन झाल्यावर बाटली तशीच त्याच्या तोंडांत ठेऊ नका. असे केल्याने बाळाच्या तोंडात पोकळी निर्माण होणार नाही.

आपण जवळजवळ अर्धे झोपेत असतो तेव्हा दात घासतो. हे आपल्यापैकी बरेच जण करतात, परंतु बाळाचे दात घासण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला सुरुवातीच्या काळात मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

 • बाळाचे दात स्वच्छ करण्यापूर्वी तुम्ही ते कसे स्वच्छ केले पाहिजेत हे शिकणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या दातांसोबत त्याच्या हिरड्याही स्वच्छ करा.
 • तुमच्या बाळाला दात घासताना अस्वस्थता वाटू शकते आणि सुरुवातीला दात घासण्यास ते नाखूष असू शकतात. यासाठी एक चांगला उपाय म्हणजे मजेदार छोटे खेळ बनवणे आणि बाळाला टूथब्रश करणे कसे महत्त्वाचे आहे हे दाखवणे. बाळ चावू शकेल अशी दातांची थंड रिंग किंवा थंड वॉशक्लोथ वापरल्याने देखील मदत होऊ शकते.
 • विशेष टीदिंग जेल आणि क्रीम्स वापरण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • बाळाच्या दातांची योग्य काळजी घेण्यासाठी बाळाला दूध पाजल्यानंतर तुमच्या बाळाच्या हिरड्या, दिवसातून किमान एकदा वॉशक्लोथने स्वच्छ करा. दात घासण्याच्या संवेदनासह त्याला आराम मिळाल्यावर हळूहळू त्याचे दात फ्लॉस करण्यास सुरुवात करा.

तुमच्या बाळाला ब्रश करायला शिकवणे

तुमचे मूल सहा ते आठ वर्षांचे झाल्यावर ब्रश करायला सुरुवात करेल. तुमच्या बाळाला ब्रश करायला शिकवताना, तो अनुभव आनंददायी असणे महत्वाचे आहे. तुम्ही ब्रशिंगशी संबंधित आवडती गाणी गाऊ शकता आणि हळूवारपणे बाळाला ब्रश करण्याच्या हालचाली आणि संवेदनांची सवय लावू शकता. लहान मुलांना ब्रश केल्यानंतर टूथपेस्ट थुंकण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे आणि तुमच्या लहान मुलाला ब्रश करण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश वापरू शकता. दातांची चांगली काळजी घेण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

तुमच्या बाळाला ब्रश करायला शिकवणे

तुम्ही तुमच्या बाळाच्या हिरड्या घासल्या पाहिजेत का?

होय, तुमच्या बाळाच्या हिरड्या घासल्याने श्वासाची दुर्गंधी आणि जिवाणूंमुळे निर्माण होणारी लक्षणे दूर होतील, त्यामुळे दातांना होणारा संसर्ग टाळता येईल. बाळाच्या दातांची योग्य काळजी घेण्यासाठी बाळाला दूध दिल्यानंतर, दिवसातून किमान एकदा आपल्या बाळाच्या हिरड्या वॉशक्लोथने स्वच्छ करा.

दातात पोकळी होणे कसे टाळावे?

पहिल्या ५ महिन्यांत, ओलसर वॉशक्लोथ वापरा आणि बाळाला दूध पाजल्यानंतर तुमच्या बाळाचे तोंड स्वच्छ पुसून टाका. असे केल्याने तुमच्या बाळाला दातांची निगा राखण्याची आणि सुरुवातीपासूनच तोंडाची योग्यप्रकारे स्वच्छता कशी करावी ह्याची सवयी लागेल. ह्यामुळे दातांवर जमा झालेले अन्न स्वच्छ होईल आणि दातांवर पोकळी निर्माण होण्यापासून रोखली जाईल. फ्लोराईड सप्लिमेंट्स मुळे किंवा फ्लोराईड टूथपेस्ट वापरल्याने पोकळ्यांविरूद्ध लढण्यास मदत होते.

फ्लोराइड म्हणजे काय?

फ्लोराईड हे एक नैसर्गिक खनिज आहे आणि ते नळाच्या पाण्यामध्ये आणि टूथपेस्टमध्ये आढळते. फ्लोराईड लहान मुलांचे विकसनशील दात मजबूत करते, दातांवरील मुलामा घट्ट करते आणि डिमिनेरलायझेशन प्रक्रियेद्वारे बाळाचे दात विरघळण्यापासून रोखते.

तुमच्या बाळाला पुरेसे फ्लोराईड मिळत आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

नळाच्या पाण्यात काहीवेळा फ्लोराईड असते त्यामुळे सुरुवातीला फ्लोराईड सप्लिमेंट्सची गरज कमी होऊ शकते. परंतु जास्त फ्लोराईड सामग्रीमुळे तुमच्या बाळाच्या दातांना इजा होऊ शकते म्हणून याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या बाळाला फ्लोराईड पूरक आहार देणे सुरक्षित आहे का?

पहिल्या सहा महिन्यांत बाळांना फ्लोराईड पूरक आहार देऊ नये. सहा महिन्यांनंतर, डॉक्टरांच्या शिफारशीच्या आधारावर, बाळाला फ्लोराइड पूरक आहार दिला जाऊ शकतो, परंतु बाळाचे एकूण फ्लोराईडचे सेवन तुम्ही लक्षात घेऊ शकता.

जर तुमच्या बाळाला ब्रश करण्याची वेळ आवडत नसेल तर काय करावे?

तुमच्या बाळाला अस्वस्थता वाटू शकते आणि सुरुवातीला दात घासण्यास ते नाखूष असू शकतात. यासाठी एक चांगला उपाय म्हणजे मजेदार छोटे खेळ बनवणे आणि त्याद्वारे टूथब्रश करणे कसे महत्त्वाचे आहे हे दाखवणे. बाळ चावू शकेल अशी दातांची थंड रिंग किंवा वॉशक्लोथ ह्यामुळे बाळाला मदत होऊ शकते.

दंतवैद्याशी कधी संपर्क साधावा?

जर तुमच्या बाळाला दात येण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा दंत तज्ञांचा सल्ला घ्या. विशेष टीदिंग जेलस आणि क्रीम्स वापरण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या बाळाचे दात घासणे तुम्हाला वाटते तितके कठीण नसते. वर दिलेल्या टिप्सचे पालन केल्यास आणि फ्लोराईडचे सेवन लक्षात घेतल्यास, तुम्ही तुमच्या बाळाच्या दातांची आणि एकूणच तोंडाच्या स्वच्छतेची अगदी सहजपणे काळजी घेऊ शकाल.

आणखी वाचा:

बाळाला दात येतानाचा क्रम
तुमच्या बाळाचे दात कसे स्वच्छ करावेत: दात घासण्यास कधी सुरुवात करावी आणि ते कसे घासावेत?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article