Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात मध खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात मध खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

गरोदरपणात मध खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

साखरेसाठी मध एक उत्तम पर्याय आहे आणि ते चवदार सुद्धा आहे. मध हे अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड्सचा चांगला स्रोत आहे आणि औषध म्हणून देखील याचा वापर केला जातो. परंतु मधामध्ये एक विशिष्ट प्रकारचा जिवाणू देखील असतो आणि त्यामुळे बोटुलिझम होऊ शकतो. कच्च्या मधातील जिवाणूंचा सामना करण्यासाठी बाळाची पचनसंस्था इतकी विकसित नसल्यामुळे, डॉक्टर १ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देऊ नये अशी शिफारस करतात. हे तुम्हाला आधीच माहिती असते पण तुम्ही गरोदर असताना मध घेऊ शकता की नाही हा प्रश्न तुमच्या मनात असतो. सत्य काय आहे? माहिती करून घेऊयात!

गरोदरपणात मध खाणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात मध खाणे सुरक्षित आहे आणि जर डॉक्टरांनी इतर सूचना दिल्या नाहीत तर आपण गरोदरपणातील आहारात मधाचा समावेश करू शकता. तुम्ही गर्भवती असल्यास, मध तुमच्यासाठी सुरक्षित आहे कारण मधातील जिवाणू तुमचे आतडे हाताळू शकते. गरोदरपणात मध घेण्याच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता म्हणजे बोटुलिझम” – हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो क्लोस्ट्रिडियम स्पॉरज नावाचे हानिकारक बॅक्टेरिया असलेल्या दूषित मधामुळे होतो. परंतु त्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते कारण आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाशी लढा देऊ शकते. गरोदरपणात, नाळेद्वारे हे जीवाणू थांबविल्यामुळे गर्भासाठी ह्या बीजाणूंचा किंवा विषारी द्रव्यांचा कोणताही धोका नसतो. ही हानिकारक प्रतिजैविके नाळेद्वारे थांबवली जातात आणि बाळापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे कोणत्याही संसर्गापासून बाळाचा बचाव होतो.

साखरेचा पर्याय म्हणून मधाची शिफारस केली जाते आणि म्हणून योग्य प्रकारे सेवन केल्यास एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची चिंता करण्याची गरज नाही.

गरोदरपणात मध खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात मधाचे फायदे

मधाच्या विविध औषधी गुणधर्मांमुळे त्याचे असंख्य आरोग्यविषयक फायदे आहेत. त्याचे महत्व आणि फायदे प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये लिहिले गेले आहेत. मधाचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही खाली दिले आहेत

. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

गरोदरपणाच्या नाजूक टप्प्यात कोणत्याही रोगास कारणीभूत असणाऱ्या घटकांपासून दूर राहण्यासाठी आपल्याकडे एक मजबूत रोगप्रतिकारक यंत्रणा असणे आवश्यक आहे कारण कोणत्याही मोठ्या गुंतागुंतीचा आपल्या बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मधातील अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. प्रतिकार प्रणाली कार्यरत राहण्यासाठी आपण आपल्या आहारात मध समाविष्ट करू शकता.

. घसा खवखवणे आणि खोकला कमी करण्यास मदत करते.

मध, आले किंवा लिंबाचा चहा घेतला तर त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांमुळे घशाला आराम पडतो. पूर्वीपासून मध हे खोकल्यापासून आणि घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी औषध म्हणून घेतले जाते.

. सर्दीशी लढा देण्यास मदत करते.

अँटीव्हायरल गुणधर्म आणि मधाचे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणारे गुणधर्म, सर्दी आणि फ्लूपासून त्वरीत आराम देतात. गर्भवती स्त्रिया त्यांना फ्लू होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारात (जसे की चहा किंवा कोमट पाण्यासोबत ) मध घेऊ शकतात.

. अल्सर बरे करण्यास मदत करू शकते.

मधाचे नियमित सेवन केल्यास रूग्णांच्या पोटातील अल्सर लवकर बरा होतो. एच.पायलोरीच्या संसर्गामुळे होणारा ड्युओडेनल अल्सर, हा एक पेप्टिक अल्सरचा प्रकार आहे. त्याविरूद्ध मध विशेषतः प्रभावी आहे. अल्सर हे अत्यंत धोकादायक असू शकते कारण ते पोटातील अस्तरांवर परिणाम करते जे गर्भाशयाच्या अगदी जवळ असते. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही मध सेवन केले पाहिजे.

. निद्रानाशातून आराम मिळू शकेल.

झोपेची गुणवत्ता सुधारण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे मध खाणे. झोपण्यापूर्वी दुधातून मध घेतल्यास ताण कमी होतो आणि कोणताही ताणतणाव नसणे म्हणजे चांगले झोप. म्हणूनच जर गरोदरपणात तुम्हाला झोप येण्यास त्रास होत असेल तर झोपायच्या आधी तुम्ही मध घालून कोमट दूध घेऊ शकता. ह्यामुळे तुम्हाला गरोदरपणात तणाव आणि निद्रानाश कमी होण्यास मदत होईल.

. ऍलर्जी टाळण्यास मदत होई शकेल.

मधांच्या काही स्थानिक जातींमध्ये असलेल्या परागकणांमुळे हंगामी ऍलर्जीचा प्रतिकार सुधारण्यासाठी मदत होते. नियमितपणे मध घेतल्यास शरीरास प्रतिजैणूंविरूद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास मदत होते जे गरोदरपणात कार्य करू शकतात. तथापि, जर तुम्हाला पराग कणांची ऍलर्जी असेल तर मध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. निरोगी टाळूला प्रोत्साहन देते.

अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे, मधाचा विशिष्ट वापर हा कापणे, जखमा आणि टाळूच्या समस्येवर उपचार करण्यास मदत करतो. कोमट पाण्याने पातळ केलेले मध डोक्याला लावल्यास कोंडा आणि खाज कमी होऊ शकते.

गर्भवती महिलांनी किती मध घ्यावे?

कोणत्याही अन्नाप्रमाणेच, नियंत्रण ही मुख्य गोष्ट आहे. तुम्ही गर्भवती असताना मध खाण्याचा सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही दररोज किती चमचे मध खाता ह्याची नोंद ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसासाठी तीन ते पाच चमचे पुरेसे असतात म्हणजेच कॅलरीची संख्या सुमारे १८० ते २०० कॅलरी राहील.

मधात फ्रुक्टोज, ग्लूकोज आणि माल्टोज सारख्या साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, एका चमच्यामध्ये अंदाजे ६० कॅलरीज असतात. आणि गरोदरपणात साध्या साखरेमधून घेतलेल्या कॅलरीचे प्रमाण प्रति दिन एकूण कॅलरीच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. गरोदरपणात एका दिवसाला घेतलेल्या कॅलरीज १८०० ते २४०० असतात. म्हणून चार चमचे मध घ्यायला हरकत नाही.

गर्भवती महिलांनी किती मध घ्यावे?

गरोदरपणात मध घेतल्यास त्याचे दुष्परिणाम

जरी मुख्यतः सेवनासाठी सुरक्षित असले तरी अशी काही अपवादात्मक प्रकरणे आहेत जिथे मधाचे दुष्परिणाम होऊ शकतात. ज्यांना गर्भवती असताना मध खाण्याची चिंता असते त्यांनी स्वत: गरोदरपणातील मधुमेहाची तपासणी करावी. काही महिलांना गरोदरपणात मधुमेह होतो त्यांना त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत नजर ठेवावी लागते. मधात ग्लूकोज असल्याने ते कार्बोहायड्रेट आणि शुगरच्या यादीमध्ये येते जे अशा परिस्थितीत टाळले पाहिजे. हाच नियम टाइप २ मधुमेह किंवा इन्शुलिन रेसिस्टन्स असलेल्या स्त्रियांसाठी लागू आहे.

जरी मधामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता कमीच असली तरीही मध सेवन केल्याने पोटात गोळा येणे, अतिसार, सूज येणे आणि काही स्त्रियांमध्ये पोटाची समस्या उद्भवू शकते. आपण वापरत असलेले मध शुद्ध आणि विश्वासू ब्रँडचे असल्याची खात्री करा.

मूळ किंवा शुद्ध मध कसे निवडावे?

प्रक्रिया केलेले आणि कच्चे मध यांच्या दरम्यान गर्भवतीमहिलांचा गोधळ उडू शकतो. बऱ्याच स्त्रियांना त्या कच्चा मध खाऊ शकतात का असा प्रश्न पडतो.

कच्चा मध पाश्चराइझ केलेला नसल्याने, त्यामध्ये सर्व आवश्यक एंझाइम्स, अँटिऑक्सिडेंट्स, खनिजे आणि उपयुक्त संयुगे अबाधित राहतात. आणि तो मध चांगला दर्शवले जाते. तथापि, परागकण, अशुद्धी आणि संभाव्य हानिकारक सूक्ष्मजंतूंच्या अस्तित्वामुळे ते धोकादायक सुद्धा असते, म्हणूनच आपण तो मध एखाद्या चांगल्या स्रोताकडून मिळवला पाहिजे. शुद्ध मध मिळविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे थेट तो बी फार्म मधून खरेदी केला पाहिजे. शक्य असल्यास, मनुका मध मिळवण्याचा प्रयत्न करा कारण तो चवदार असतो आणि त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे आपल्यासाठी चमत्कार घडवू शकतात.

दुसरीकडे, भेसळयुक्त मधात कॉर्न सिरप, स्टार्च, पीठ, साखर सरबत आणि इतर पदार्थ असू शकतात ज्यामुळे ते शुद्ध असलेल्यासारखेच दिसतात परंतु परीक्षणाद्वारे ते ओळखता येतात. जर तुम्हाला मधाच्या गुणवत्तेबद्दल अनिश्चितता असेल तर, शुद्ध आणि भेसळयुक्त मधातील फरक समजण्यासाठी हा तक्ता पहा.

शुद्ध मध भेसळमिश्रित मध
बोटाने चोळताना ते चिकट नसते घातलेले स्वीटनर आणि iऍडिटिव्हजमुळे बऱ्यापैकी चिकट
हे चिकट आहे आणि ओतल्यावर, भांड्यात फिरण्यासाठी वेळ घेते. हे हलके असते आणि भांड्यात ओतल्यावर मुक्तपणे फिरते.
पाण्यात विरघळण्यास वेळ लागतो आणि थोडावेळ ढवळत असताना एक ढेकूळ बनून तळाशी स्थिर होते. पाण्यात सहजतेने विरघळते.
परागकण आणि इतर निलंबित कण ह्यासारखे अशुद्ध घटक उपस्थित असतात. अशुद्धतेची कोणतीही चिन्हे नाहीत आणि स्पष्ट दिसत नाहीत.
ब्लॉटिंग पेपरवर काही थेंब ओतल्यावर सहजपणे शोषून घेत नाही. ब्लॉटिंग पेपरवर शोषले जाते.

चांगल्या ब्रँडचे मध जवळजवळ नेहमीच पाश्चरायझ केलेले असतात आणि सर्वांसाठीच ते सुरक्षित असतात. सेंद्रिय मध कमीतकमी प्रक्रिया केलेला असतोआणि त्यामुळे बहुतेक पौष्टिक पदार्थ टिकवून ठेवले जातात.

मध घेताना आपण घ्यावयाच्या खबरदारी

जरी गरोदरपणात मध खाण्यासाठी सुरक्षित असला तरीही तुम्ही त्याचा आहारात कशा पद्धतीने समावेश करता ह्यावर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे की नाही ते ठरेल. म्हणून, जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी, आपण अनुसरण करावे अशा काही टिप्स इथे दिलेल्या आहेत.

  • मध गरम पाण्यात घालून घेऊ नका कारण यामुळे कदाचित काही उपयुक्त एंझाइम्स आणि पोषक द्रव्ये नष्ट होऊ शकतात.
  • व्हिटॅमिन सी आणि डी समृध्द असलेले अन्न मध सह घेतल्यास त्यांचे पौष्टिक मूल्य नष्ट होते कारण मधात असलेली काही खनिजे ह्या जीवनसत्त्वांचे फायदे निरर्थक ठरवतात.
  • दह्यामध्ये मध मिसळल्यास अपचन आणि पोट खराब होऊ शकते आणि म्हणून एकत्र घेऊ नये.

सामान्य प्रश्न

. प्रतिकार प्रणालीला बळकट करण्यासाठी मधाची कशी मदत होते?

मधाचे शेल्फ लाइफ कमी असते परंतु सीलबंद कंटेनरमध्ये साठवल्यास ते बरीच वर्षे टिकू शकते कारण बहुतेक सूक्ष्मजीव त्यात वाढू शकत नाहीत. त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म इतर हायड्रोजन पेरोक्साईडमधून येतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणांपासून संरक्षण सुनिश्चित करतात. म्हणून एखादी व्यक्ती गरोदरपणात मध्यम प्रमाणात मध खाऊ शकते.

. गरोदरपणात मध खाणे कुणी टाळले पाहिजे?

मध घेणे सुरक्षित असले तरी जठरोगविषयक समस्या म्हणजेच दाहक आतड्यांसंबंधी रोग (आयबीडी) आहे अशा गर्भवती महिलांनी टाळले पाहिजे. त्यांच्या गर्भावस्थेच्या आहारात मधाचा समावेश करण्यापूर्वी त्यांनी प्रथम त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्ही तुमच्या आहारात मध समाविष्ट करू शकता कारण त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या पोटातील बाळाच्या आरोग्यास कोणताही धोका नाही. तुम्ही तुमच्या चहाच्या कपात किंवा कोमट पाण्यात एक चमचा मध घालू शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. ते नामांकित स्त्रोतांकडून मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाने खा. तुम्हाला निरोगी गरोदरपणाची शुभेच्छा!

स्रोत अणि सन्दर्भ:
स्रोत १

आणखी वाचा:

गरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे
गरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article