Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ भारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी

भारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी

भारतातील बाळे आणि मुलांसाठी वैकल्पिक आणि अनिवार्य लसी

मुलांचे लसीकरण हे किती महत्वाचे आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काही लसी ह्या भारतामध्ये अनिवार्य आहेत, तर काही वैकल्पिक समजल्या जातात, परंतु त्याचा अर्थ तुम्ही त्या टाळल्या पाहिजेत असा होत नाही कारण आजच्या काळात वैकल्पीक लसी सुद्धा गरजेच्या आहेत. आपल्याला माहिती आहे लसींचे नाव आणि त्या घेण्याची तारीख लक्षात ठेवणे कठीण असते. पालकत्व थोडे सोपे करण्यासाठी आम्ही व्हॅक्सिनेशन ट्रॅकरतयार केला आहे. ह्या साधनांमुळे तुमचे लसीकरणाचे वेळापत्रक तुमच्या जवळ असेल. तुम्ही आम्हाला फक्त तुमच्या बाळाची जन्मतारीख सांगा आम्ही बाकीचे सगळे करू!

वैकल्पीक आणि अनिवार्य लसींची माहिती

भारतातील बाळांसाठी इथे काही अनिवार्य आणि वैकल्पिक लसींची माहिती दिली आहे

. जन्माच्या वेळी

तुमच्या बाळाला खालील लसी देण्याची गरज आहे

) बीसीजी (बॅसिलस कॅलमेट ग्युएरिन)

जिथे ही लस दिली जाते तिथे थोडी सूज येते

काय प्रतिबंधित होते?

ही लस दिल्यावर क्षयरोगाला प्रतिबंध घातला जातो

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ही लस अनिवार्य आहे कारण क्षयरोग हा प्राणघातक आजार असून प्रत्येक वर्षी त्यामुळे वीस लाख मृत्यू होतात

) ओपीव्ही (ओरल पोलिओ व्हॅक्सिन)

बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात ही लस तीन डोस मध्ये दिली जाते. ओरल ड्रॉप्सच्या स्वरूपात ही दिली जाते.

काय प्रतिबंधित होते?

पोलिओमायलिटीस (पोलिओ)

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ओपीव्ही ही लस अनिवार्य आहे कारण पोलिओ ह्या रोगामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे स्नायू अशक्त होतात आणि पक्षाघात होऊ शकतो.

) हिपॅटिटिस बी

बाळाच्या जन्मानंतर ही लस बाळाला देणे जरुरीचे आहे त्यामुळे बाळ आणि तुम्ही दोघांना एकमेकांमुळे संसर्ग होत नाही

काय प्रतिबंधित होते?

हिपॅटायटिस बी विषाणू

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

अनिवार्य आहे कारण त्यामुळे यकृताला संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाला समस्या निर्माण होऊ शकतात.

. ६वा आठवडा (. ५ महिने)

बाळाला खालील लसी देणे जरुरीचे आहे

) डीपीटी १

जिथे लस दिली जाते तिथे सूज आणि वेदना होऊ शकतात तसेच थोडासा ताप येऊ शकतो

काय प्रतिबंधित होते?

ह्या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनरुवात प्रतिबंधित होतात

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का?आणि का?

ही लस अनिवार्य आहे कारण हे रोग संसर्गजन्य असून त्यामुळे मृत्यूदेखील येऊ शकतो

) एचआयबी २ (इन्फ्लुएन्झा टाईप बी)

ही लस द्रव स्वरूपात आढळते

काय प्रतिबंधित होते?

मेंदू आणि पाठीच्या कण्याचे नुकसान टळते

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ही लस वैकल्पिक आहे परंतु मेंदू आणि पाठीच्या कण्याचे नुकसान होऊ नये म्हणून ती घेण्याचा सल्ला दिला जातो.

) रोटाव्हायरस 1

ह्याच्या २ लसी असतात आणि पहिली लस सहाव्या आठवड्यात दिली जाते

काय प्रतिबंधित होते ?

रोटाव्हायरसचा संसर्ग, ज्यामुळे लहान बाळांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ही लस वैकल्पिक आहे हा विषाणू संसर्गजन्य असल्याने मुलांना लस देण्याचा सल्ला दिला जातो कारण रोटाव्हायरस खूप संसर्गजन्य आहे

) पीसीव्ही १(न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन)

बरेच न्यूमोकोकल संसर्ग बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षात होतात,त्यामुळे ही लस बाळांना आणि टॉडलर्सना दिली जाते.

काय प्रतिबंधित करते?

ही लस विषाणूंमुळे रक्त आणि कानाला संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंध करते

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु ही लस तुमच्या मुलाला देण्याचा सल्ला दिला जातो कारण हा आजार संसर्गजन्य आहे

) हिपॅटायटिस बी

तुमच्या बाळाला आता हिपॅटायटिस बी च्या दुसऱ्या डोस गरज आहे

काय प्रतिबंधित करते?

ह्यामुळे तुमच्या बाळाचे हिपॅटायटिस बी मुळे संरक्षण होते

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ह्या विषाणू मुळे तुमच्या बाळाला यकृताचा संसर्ग होतो

. १० आठवडे (.५ महिने)

तुमच्या बाळाला खालील लसी घेण्याची गरज असते

) आयपीव्ही २ (इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन)

हा दुसरा डोस असेल

काय प्रतिबंधित करते?

पोलिओ

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी देण्याचा सल्ला दिला जातो

) डीपीटी २

हा डीपीटी लसीचा दुसरा डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

अनिवार्य, कारण हा आजार संसर्गजन्य असतो

) एचआयबी २

हा दुसरा डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

मेंदू आणि पाठीच्या कण्याचे नुकसान

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक परंतु घेण्याचा सल्ला दिला जातो

) रोटाव्हारस २

दुसरा डोस

काय प्रतिबंधित करते?

रोटाव्हायरस संसर्ग

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु घेण्याचा सल्ला दिला जातो कारण खूप संसर्गजन्य आहे

) पीसीव्ही २

पीसीव्हीचा दुसरा डोस

काय प्रतिबंधित करते?

रक्त आणि कानाचा संसर्ग

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु संसर्ग खूप भयंकर असल्याने घेण्याचा सल्ला दिला जातो

. १४ आठवडे (.५ महिने)

ह्या वयात बाळाला खालील लसी घेतल्या पाहिजेत

) आयपीव्ही ३

हा लसीचा तिसरा डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

पोलिओ

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी देण्याचा सल्ला दिला जातो

) डीपीटी ३

तिसरा डोस

काय प्रतिबंधित करते?

घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

अनिवार्य, कारण हा आजार संसर्गजन्य असतो

) एचआयबी ३

हा तिसरा डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

मेंदू आणि पाठीच्या कण्याचे नुकसान

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी देण्याचा सल्ला दिला जातो

) रोटाव्हारस ३

हा तिसरा डोस गरजेचा असतो

काय प्रतिबंधित होते?

रोटाव्हायरस संसर्ग

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

वैकल्पिक, परंतु घेण्याचा सल्ला दिला जातो कारण खूप संसर्गजन्य आहे

) पीसीव्ही ३

पीसीव्ही चा तिसरा डोस

काय प्रतिबंधित होते?

रक्त आणि कानाचा संसर्ग

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

वैकल्पिक, परंतु तुम्ही तुमच्या मुलाला ही लस दिली पाहिजे कारण हा संसर्ग पसरू शकतो

. ६ व्या महिन्यात

तुमच्या बाळाला खालील लसींची गरज आहे

) हिपॅटायटीस बी ३

हिपॅटायटीस बी लसीचा शेवटचा डोस

काय प्रतिबंधित होते?

तुमच्या बाळाचे हिपॅटायटिस बी लसीपासून संरक्षण होते

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ह्या विषाणूमुळे यकृताला संसर्ग होऊ शकतो आणि तुमच्या बाळामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात

) ओपीव्ही (ओरल पोलिओ व्हॅक्सिन)

तोंडात थेम्ब घातले जातात

काय प्रतिबंधित होते?

पोलिओमायलिटीस (पोलिओ)

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ही लस अनिवार्य आहे आणि ह्या डोसमुळे तुमच्या मुलाला चांगले संरक्षण मिळते

. ९ व्या महिन्यात

तुमच्या बाळाला खालील लसींची गरज असते

) ओपीव्ही २

तोंडात थेम्ब दिले जातात

काय प्रतिबंधित होते?

पोलिओमायलिटीस (पोलिओ)

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

अनिवार्य आहे कारण ह्या डोसमुळे तुमच्या मुलाला चांगले संरक्षण मिळते

) एमएमआर १

हि लस दोन डोस मध्ये दिली जाते

काय प्रतिबंधित होते?

गोवर, गालगुंड, रुबेला

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

हि लस अनिवार्य आहे कारण हे सगळे गंभीर आजार आहेत

) टीसीव्ही १

हि लस दोन डोस मध्ये दिली जाते

काय प्रतिबंधित होते?

विषमज्वर

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

अनिवार्य कारण विषमज्वरामुळे जीवाला धोका पोहचू शकतो

. १२ व्या महिन्यात

तुमच्या बाळाला खालील लसींची गरज असते

) हिपॅटायटीस ए

हि लस दोन डोस मध्ये दिली जाते

काय प्रतिबंधित होते?

हिपॅटायटीस ए , यकृताचा आजार

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

ही लस अनिवार्य आहे कारण हा आजार संसर्गजन्य आहे

. १५ व्या महिन्यात

तुमच्या बाळाला खालील लसींची गरज असते

) एमएमआर २

लसीचा दुसरा डोस

काय प्रतिबंधित होते ?

गोवर, गालगुंड, रुबेला

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का?आणि का?

हि लस अनिवार्य आहे कारण हे सगळे गंभीर आजार आहेत

) व्हेरिसेला

ह्या लसीचे दोन डोस लागतील

काय प्रतिबंधित होते?

कांजिण्या

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

हा आजार खूप संसर्गजन्य आहे तुम्ही तुमच्या मुलाला ती देण्याचा सल्ला दिला जातो

) पीव्हीसी बुस्टर

शेवटचा पीव्हीसी बूस्टर डोस

काय प्रतिबंधित होते ?

रक्ताचा आणि कानाचा संसर्ग

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

वैकल्पिक आहे परंतु संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आहे

. १८ महिने वयासाठी (.६ वर्षे)

तुमच्या बाळासाठी खालील लसींची आवश्यकता आहे

) हिपॅटायटीस ए

ह्या लसीचा हा दुसरा डोस आहे

काय प्रतिबंधित होते?

हिपॅटायटिस ए, यकृताचा आजार

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का?आणि का?

अनिवार्य आहे कारण हा संसर्गजन्य आजार आहे

) डीपीटी बी १

हा डीपीटी लसीचा बूस्टर डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का? आणि का?

अनिवार्य आहे कारण हे आजार खूप संसर्गजन्य आहेत

१०. २ वर्षे वयासाठी

तुमच्या बाळासाठी खालील लसींची गरज आहे

) टीसीव्ही बुस्टर

लसीचा दुसरा डोस

काय प्रतिबंधित करते?

विषमज्वर

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

अनिवार्य आहे कारण त्यामुळे जीवाला धोका पोहचू शकतो

११. ४ वर्षे वयासाठी

खालील लसींची गरज असते

) एमएमआर ३

हा ह्या लसीचा तिसरा डोस आहे

काय प्रतिबंधित करते?

गोवर, गालगुंड आणि रुबेला

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

अनिवार्य कारण हा आजार गंभीर आहे

१२. ५ वर्षे वयासाठी

तुमच्या मुलाला खालील लसींची गरज आहे

) डीपीटी बी २

डीपीटी लसीचा दुसरा बूस्टर डोस

काय प्रतिबंधित करते?

घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात

ही लस वैकल्पिक/अनिवार्य आहे का आणि का?

अनिवार्य आहे कारण हा संसर्गजन्य आजार आहे

तरुण मातांनीत्यांना हव्या असलेल्या माहितीसाठी नेहमीच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि तसेच मनात गोंधळ घालणारे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत. लस देताना बाळाला होणारा त्रास आणि वेदना बघून कुठल्याही आईला खूप वाईट वाटते परंतु लक्षात ठेवा तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती, विशेषकरून आजूबाजूला जेव्हा खूप सारे विषाणू आणि संसर्ग पसरण्याची परिस्थिती असेल, तेव्हा सर्वात महत्वाची आहे.

आणखी वाचा: बाळाचे कान टोचताना काय काळजी घ्यावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article