Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात ‘नायटा’ हा त्वचेचा संसर्ग होणे – लक्षणे, परिणाम आणि उपाय

गरोदरपणात ‘नायटा’ हा त्वचेचा संसर्ग होणे – लक्षणे, परिणाम आणि उपाय

गरोदरपणात ‘नायटा’ हा त्वचेचा संसर्ग होणे – लक्षणे, परिणाम आणि उपाय

बरेच लोक जंत संसर्गासाठी रिंगवर्महा शब्द वापरतात, परंतु तेचूक आहे . रिंगवर्म म्हणजे नायटा हा त्वचा किंवा टाळूवर होणारा अत्यंत संसर्गजन्य असा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा संसर्ग गरोदरपणात होणे अगदी सामान्य आहे.

वैद्यकीय भाषेत नायट्याला टिनिआ किंवा डर्माटोफिटोसिस म्हणतात. हा संसर्ग शरीरातील कोणत्या भागावर झाला आहे त्यानुसार त्याचा प्रकार अवलंबून असू शकतो. उदा: टिना कॅपिटिस (टाळू), टिना कॉर्पोरिस (शरीर), टिना पेडिस (पाय), टिना क्र्यूरिस (मांडीचा सांधा) आणि टिनेया मॅनस (हात) यांच्यावर होतो. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे आणि ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तर नायट्याबद्दल आणि त्यापासून बचाव कसा करता येईल याविषयी अधिक जाणून घ्या!

नायट्याच्या संसर्गाची लक्षणे

नायट्याच्या संसर्गाची लक्षणे एखाद्या व्यक्तीस तो कोठे संक्रमित होतो यावर अवलंबून असतात. त्वचेचा संसर्ग झाल्यास आपल्याला पुढील गोष्टींचा अनुभव येऊ शकतो.

  • गोल पॅचसह त्वचेला सूज आलेली दिसू शकते ज्याची एक वेगळी रिंग तयार होते
  • काही वेळा, रिंगच्या मध्यभागी असलेली त्वचा स्पष्ट असू शकते
  • त्वचेवर फोड किंवा खवले
  • खाज सुटणारी त्वचा
  • नायट्याच्या संसर्गाने टाळूवर परिणाम झाल्यास केस गळती होऊ शकते

गरोदरपणात नायट्याची जोखीम आणि त्याचे परिणाम काय आहेत?

नायट्याचा गरोदरपणात परिणाम होऊ शकतो का? नायट्यांचा गरोदरपणावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु, कधीकधी याचा परिणाम गरोदरपणावर होतो. तुम्ही खालील मुद्दे लक्षात ठेऊ शकता.

  • त्वचेचा संसर्ग सहजपणे प्रसारित होऊ शकतो म्हणून गर्भवती महिलेला इतर निरोगी व्यक्तींप्रमाणे नायट्याचे संक्रमण होण्याचा धोका असतो.
  • गरोदरपणात नायटा झाल्यास पोटातील बाळाला कोणतीही हानी पोहचू शकत नाही.
  • त्वचेच्या संसर्गास जबाबदार असणारी बुरशी त्वचेच्या पृष्ठभागावर असलेल्या मृत ऊतींना खायला घालते आणि त्वचेच्या खोल थरांमध्ये प्रवेश करू शकत नाही.
  • अगदी क्वचित प्रसंगी जरी बुरशीने आत प्रवेश केला तरीही ते श्लेष्मल त्वचेत टिकणार नाही.

गरोदरपणात नायट्यांवर उपचार

नायट्यांच्या संसर्गावर उपचार करणे इतके अवघड नाही. डॉक्टर या संसर्गाच्या उपचारांसाठी सामान्यत: काही औषधे आणि जीवनशैली मध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. परंतु जेव्हा एखादी महिला गर्भवती असते, तेव्हा तिने तिच्या स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच औषधे घ्यावीत कारण काही औषधे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. म्हणूनच जेव्हा आपल्याला गरोदरपणात ह्या त्वचा रोगाचा संसर्ग झाल्यास नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. संसर्ग बरा करण्यासाठी डॉक्टर ट्रायमॅसिनोलोन आणि नायस्टाटिन असलेल्या क्रीमची शिफारस करू शकतात. दररोज दोनदा किंवा डॉक्टरांनी सांगितल्यानुसार क्रीम वापरल्याने या संसर्गापासून सुटका होऊ शकते.

नायट्यावर घरगुती उपचार

नायट्यासाठी काही घरगुती उपचार देखील आहेत. हे घरगुती उपचार तुम्ही वैद्यकीय उपचारांसह वापरण्याच्या प्रयत्न केल्यास त्यांना आराम मिळू शकेल. तथापि, हे उपाय नेहमीच प्रभावी सिद्ध होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक माहिती नसल्याने डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच या उपायांचा वापर केला पाहिजे.

  • हळद वापरा

हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे निसर्गात अँटीफंगल आणि दाहकविरोधी आहे. संक्रमित त्वचेवर हळद लावल्यास नायट्यांच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत होते आणि बरे होण्याची प्रक्रिया देखील वेगवान होते. हळदीची पेस्ट त्यात थोडे पाणी मिसळून तयार केल्यास आराम मिळतो.

हळद वापरा

  • आल्याचा चहा प्या

आल्याच्या चहामध्ये अँटीफंगल गुणधर्म देखील असतात. आल्याचा चहा पिण्यामुळे आपल्याला लवकर बरे होण्यास मदत होते. आल्याच्या चहामध्ये कपड्याचा तुकडा बुडवून, ते कापड पिळून बाधित भागावर ठेवल्यास संभाव्य अस्वस्थतेपासून मुक्तता मिळते.

आल्याचा चहा प्या

  • लसूण

लसूण त्याच्या उपचारात्मक चांगुलपणासाठी ओळखला जातो कारण त्यात अजोइन आहे. संसर्ग झालेल्या त्वचेवर लसणाच्या काही ठेचलेल्या पाकळ्या ठेवल्यास बरे होण्याची प्रक्रिया लवकर होऊ शकते. आपण लसूण तेल देखील वापरू शकता.

लसूण

  • नारळ तेल वापरा

नारळ तेलाचा वापर देखील बाधित भागावर होऊ शकतो. नारळ तेल प्रतिजैविक आणि प्रतिजीवाणू असल्याने, नायट्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते

नारळ तेल वापरा

  • काही बटाट्याचे काप वापरा

आपण बटाट्याचे तुकडे बाधित भागावर देखील ठेवू शकता. ह्यामुळे नायट्याचा संसर्ग बरा होण्यास मदत होते.

काही बटाट्याचे काप वापरा

  • कोरफड

कोरफड हा बुरशीजन्य संसर्गावर एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे. संक्रमित त्वचेवर दररोज दोन वेळा कोरफड गर लावल्याने जळजळ आणि खाज सुटण्यापासून सुटका मिळते.

कोरफड

गर्भवती असताना नायटा हा त्वचेचा संसर्ग कसा रोखायचा?

गरोदरपणात चांगली स्वच्छता राखल्यास हा त्वचेचा संसर्ग टाळण्यास मदत होते. स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशके वापरून संक्रमित त्वचा धुण्यामुळे संसर्गाचा प्रसार मर्यादित होऊ शकतो. बाधित भाग पाण्याने धुतल्यानंतर, तो भाग टॉवेलने घासू नका, हळू हळू त्वचा त्वचा कोरडी करा. कपडे, टॉवेल्स, कंगवा आणि इतर वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका असा सल्ला दिला जातो. गर्भवती महिलेने देखील संसर्ग झालेल्या व्यक्तीशी शारीरिक संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नायटा होणे हे एक बुरशीजन्य संक्रमण आहे आणि ते आपोआप बरे होते. तथापि, जर हा संसर्ग गरोदरपणात झाला तर आपण लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. ह्या संसर्गामुळे चिडचिड होऊन अस्वस्थता निर्माण होते. ह्यांव्यतिरकीत गरोदरपणावर ह्याचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही. म्हणून तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. योग्य स्वच्छता राखा, पोषक आहार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला पाळा. तुम्ही आणि तुमचे बाळ नक्कीच स्वस्थ रहाल!

आणखी वाचा:

गरोदरपणात खाज सुटण्यावर १० घरगुती उपचार
गरोदरपणात घाम येणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article