बाळाची निर्मिती होतानाच्या जादुई प्रवासासाठी लागणाऱ्या दोन अत्यावश्यक गोष्टी म्हणजे – स्त्रीबीज आणि शुक्रजंतू. स्त्रीबीज हे स्त्री किंवा मादी कडून आणि शुक्रजंतू हे पुरुष किंवा नराकडून पुरवले जाते. एक नवीन आयुष्य म्हणजे खरंच चमत्कार असतो आणि ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घेताना प्रत्येक क्षणी आश्चर्य वाटते. इथे बाळाच्या निर्मितीची प्रक्रिया दिली आहे स्त्रीबीजाच्या विकासाची प्रक्रिया […]
गरोदरपणात शारीरिक व्यायाम करणे आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. गरोदरपणात व्यायाम करण्याविषयी बरेच गैरसमज आहेत आणि ते हानिकारक असल्याचे समज आहेत. परंतु गरोदरपणातील व्यायाम आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि त्यामुळे सामान्य प्रसूतीची शक्यता वाढवते. व्यायाम योग्य स्वरुपात आणि योग्य तीव्रतेने केल्यास ते करणे खरोखर चांगले आहे. गरोदरपणात व्यायाम करण्यापूर्वी पाळावयाच्या सूचना गरोदरपणात व्यायाम करणे आवश्यक आहे […]
आपल्याला सगळ्यांना बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे हे माहित आहे. परंतु काही मातांना स्तनपान सुरु करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. स्तनपानाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये थोडा गोंधळ उडू शकतो आणि त्याविषयी काही प्रश्न सुद्धा पडू शकतात. तुम्हाला स्तनपानाविषयी माहिती मिळाल्यास, त्यादरम्यान येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जाता येईल. तसेच तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. […]
तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]