Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात हृदयाची गती वाढणे

गरोदरपणात हृदयाची गती वाढणे

गरोदरपणात हृदयाची गती वाढणे

गरोदरपणात स्त्रीमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. जर तुम्ही गरोदर असाल, तर शरीरात होणाऱ्या आणखी एका बदलाविषयी तुम्हाला काळजी वाटू शकते आणि तो म्हणजे तुमच्या हृदयाच्या गतीमध्ये होणारा बदल किंवा हृदयाच्या गतीमध्ये होणारी वाढ. हृदयात धडधड झाल्यास सहसा कुठला त्रास होत नाही. हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे हृदयाची धडधड होते. परंतु जर हा बदल अचानक झालेला असेल तर, हृदय किंवा शरीराच्या इतर भागांमधील समस्या दर्शवू शकतो.  गरोदरपणात हृदयाच्या गतीमध्ये अचानक वाढ झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

व्हिडिओ: गरोदरपणात हृदयाचे ठोके जलद पडणे –  कारणे, चिन्हे आणि उपचार

गरोदरपणात हृदयाची गती जास्त असणे सामान्य आहे का?

निरोगी व्यक्तीच्या हृदयाची सामान्य हृदय गती 60 ते 80 प्रति मिनिट असते. परंतु, गरोदरपणात हृदयाच्या गतीचा हा दर 100 पर्यंत जाणे अगदी सामान्य आहे. हृदय गती वाढलेली असल्यास त्यास  टाकीकार्डिया म्हणतात. गरोदरपणात असे होणे अगदी सामान्य आहे.

तुम्ही गरोदर असताना तुमचे शरीर तुमच्या वाढत्या बाळाला पोषण देण्यासाठी सतत काम करत असते.  जसजसे तुमचे गरोदरपणाचे दिवस भरतील तसे तुमच्या बाळासाठी आवश्यक असलेल्या रक्ताचे प्रमाण वाढेल. तुमच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात रक्त पंप करण्यासाठी तुमच्या हृदयाची धडधड वाढेल.

गरोदरपणात हृदयाची धडधड वाढण्याची कारणे

गरोदरपणात हृदयाची धडधड वाढण्यासाठी कारणीभूत असे बरेच घटक आहेत. हे घटक खालीलप्रमाणे आहेत.

1. चिंता

गरोदरपणात तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटणे अगदी सामान्य आहे. परंतु जर तुम्ही खूप काळजी करत असल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. गरोदरपणातील तणाव आणि चिंता ह्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.

2. गर्भाशयाच्या आकारात बदल

गरोदरपणाचे दिवस जसे पुढे सरकतील तसे वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढेल. त्यामुळे, गर्भाशयाकडे जास्त रक्तपुरवठा करण्यासाठी तुमचे हृदय जास्त प्रमाणात रक्त पंप करेल. खरं तर, गरोदरपणाच्या शेवटी, तुमच्या गर्भाशयाला 20% रक्त पुरवले जाईल. म्हणजेच तुमच्या हृदयाला जास्त काम करावे लागेल आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकेल.

3. स्तनाच्या आकारात बदल:

गरोदरपणात आणि नंतर, तुमच्या स्तन ग्रंथी तुमच्या शरीराला स्तनपानासाठी तयार करतील. जेव्हा स्तनाच्या ऊतींचा आकार वाढून स्तनांचा आकार वाढतो तेव्हा स्तन ग्रंथींमध्ये रक्त प्रवाह वाढतो. म्हणजेच तुमचे हृदय नेहमीपेक्षा जास्त रक्त पंप करेल, आणि हृदयाचे कार्य वाढेल.

4. पोषकतत्त्वांच्या पातळीत बदल

थायरॉईडची समस्या किंवा लोहाची पातळी कमी झाल्याने देखील हृदयाची गती वाढू शकते. अशक्तपणा आणि हायपरथायरॉईडीझममुळे टाकीकार्डियाची समस्या होऊ शकते.

5. हार्मोनल बदल

हार्मोनल बदल आणि वजन वाढणे ह्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात टाकीकार्डियाची समस्या उद्भवू शकते.

6. औषधोपचार

जर तुम्ही गरोदरपणात स्यूडोफेड्रिन असलेली सर्दी किंवा ऍलर्जीची औषधे घेतली तर तुमच्या हृदयाची गती वाढू शकते. हृदयाची गती वाढल्यास तुमचे शरीर औषधांवर नकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचे ते लक्षण आहे.

7. जीवनशैली

सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा जास्त प्रमाणात कॅफिन असलेले पदार्थ किंवा पेये सेवन केल्याने तुमची हृदय गती वाढू शकते.

हृदयाची धडधड वाढण्याची इतर काही कारणे:-

  • कोरोनरी हृदयरोग
  • प्रीक्लॅम्पसिया
  • अंतर्निहित हृदयाच्या समस्या
  • आधीच्या गरोदरपणातील हृदयाच्या समस्या

गरोदर असताना हृदयाचे ठोके जलद असण्याची लक्षणे

गरोदरपणात तुमच्या हृदयाचे ठोके वाढल्यास तुम्हाला खालील लक्षणे दिसू शकतात.

  • बसलेले असताना किंवा पडून असताना देखील श्वास घेण्यास त्रास होतो
  • धडधडणे आणि हृदयाचे ठोकेवगळले जाणे
  • चक्कर येणे, डोके हलके होणे किंवा बेशुद्ध पडणे
  • सततचा खोकला

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, तुम्ही ती तुमच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे चांगले आहे जेणेकरून ही लक्षणे सामान्य आहेत की नाही हे तुमचे डॉक्टर तपासून पाहू शकतील.

गरोदरपणात वाढलेल्या हृदय गतीचे निदान

तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले आहे याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर अनेक चाचण्या करतील. डॉक्टर तुमचा वैद्यकीय इतिहास सुद्धा तपासून बघतील. जर तुम्हाला याआधी ही समस्या आली असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्याबद्दल कळवावे. डॉक्टर EKG किंवा ECG द्वारे हृदय गती वाढण्याचे कारण ठरवतील. ह्या तपासण्या रक्त प्रवाह आणि हृदय गती मधील बदल मोजतात.

गरोदरपणात वाढलेल्या हृदय गतीचे निदान

चाचण्यांचे परिणाम बघून, डॉक्टर तुम्हाला पौष्टिक आहाराचे पालन करण्यास सांगतील तसेच हलके व्यायाम करण्यास सुचवतील. असे केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि हृदयावरील अतिरिक्त दबावही टाळता येईल

तिमाहीनुसार हृदयाची वाढलेली गती

गरोदरपणात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्ये अनेक उद्देश पूर्ण करतात. गर्भाच्या विकासास मदत करण्याव्यतिरिक्त, ते आईच्या शारीरिक आणि चयापचय कार्यांवर देखील परिणाम करतात. परंतु गरोदरपणाच्या टप्प्यांनुसार, तुमच्या हृदयाची कार्य करण्याची पद्धत देखील बदलते.

1.पहिली तिमाही

पहिल्या तिमाहीत, तुमच्या हृदयाची गती प्रति मिनिट 15 ते 20 ने वाढू शकते. ह्या तिमाहीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन ह्या संप्रेरकांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हृदयाची गती वाढते. वाढणाऱ्या बाळासाठी अधिक रक्तपुरवठा केला पाहिजे असा मेसेज ह्याद्वारे हृदयाला दिला जातो.

2. दुसरी तिमाही

या टप्प्यावर, रक्तप्रवाह वाढल्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात. तसेच स्नायू सुद्धा शिथिल होतात. दुस-या तिमाहीत,रक्ताचे प्रमाण वाढते त्यामुळे हेमोडायल्युशन होते. हार्मोन्सच्या प्रभावामुळे रक्तदाब सामान्य राखण्यासाठी रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळे ह्या बदलांमुळे तुमच्या रक्तदाबावर परिणाम होणार नाही – तो सामान्य राहील. परंतु तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. चौथ्या महिन्यात, तुमचे हृदय नेहमीपेक्षा 30% ते 50% जास्त रक्त पंप करेल आणि त्यामुळे, तुमच्या हृदयाची गती वाढू शकते.

3. तिसरी तिमाही

शेवटच्या तिमाहीत, तुमचे हृदय खूप जास्त प्रमाणात रक्त पंप करू लागेल. तुमच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा ते 40% ते 90% जास्त रक्त पंप करेल. वेगाने वाढणाऱ्या गर्भाला ऑक्सिजन आणि त्याला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळण्यासाठी हा रक्तप्रवाह वाढतो. तसेच तुमचे शरीर प्रसूतीसाठी देखील तयार होते. ह्यादरम्यान तुमच्या हृदयाचे ठोके आकुंचन आणि वेदनांमुळे वाढतात.

हृदय गती वाढल्याने तुमच्या गर्भारपणावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो का?

गरोदरपणात हृदयाची धडधड किंवा हृदय गती वाढणे हे सामान्यतः निरोगी गर्भधारणेचे लक्षण असते. म्हणजेच तुमच्या बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी तुमचे शरीर परिश्रम करीत असते.

जर तुमचे हृदय वेगाने धडधडत असेल परंतु इतर गंभीर लक्षणे दिसत नसतील तर काळजी करण्यासारखे काही नाही. शरीराची ती एक सामान्य प्रतिक्रिया आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.

गरोदर असताना वाढलेल्या हृदयविकाराचा सामना कसा करावा?

जरी गरोदरपणात हृदयाची गती वाढणे सामान्य असले तरीसुद्धा, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावेत असे सुचवले जाते. काही गंभीर समस्यांमुळे तुमच्या हृदयाच्या गतीमध्ये वाढ होत असल्यास, तुमचे डॉक्टर औषधांचा कोर्स लिहून देतील आणि तुम्हाला काळजी घेण्यास सांगतील. टाकीकार्डियाला मदत करू शकतील अशी बरीच औषधे उपलब्ध आहेत, परंतु गरोदरपणात त्यांचा वापर न करणे चांगले आहे कारण काही औषधे तुमच्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतात. कोणतीही औषधे घेण्यापूर्वी, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जर गरोदरपणात तुमच्या हृदयाची धडधड होत असेल तर तुम्ही मध्यम प्रमाणात कॅमोमाइल चहा पिऊ शकता किंवा लॅव्हेंडरसह अरोमाथेरपी वापरून पाहू शकता – त्यामुळे तुम्हाला शांत वाटू शकते. तुम्ही दररोज पुरेशी झोप घ्या. तुमचे झोपेचे रुटीन नीट राहील ह्याकडे लक्ष द्या. योगा आणि ध्यानाचा सराव केल्याने तुम्ही शांत होऊ शकता, परंतु काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या.

गरोदरपणात अधूनमधून हृदयाची धडधड होणे सामान्य असते. हृदयाची धडधड परत सामान्य स्थितीत परत येते. परंतु हृदय गती वाढल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वाढलेल्या हृदयाच्या गतीसाठी वैद्यकीय उपचार

गरोदरपणात वाढलेल्या गतीसाठी औषधोपचार करणे हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग नसतो. परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत आणि केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली हा पर्याय वापरला जाऊ शकतो. टाकीकार्डियावर उपचार करण्यासाठी (हृदयाचे ठोके सामान्यपेक्षा जास्त असते अशी स्थिती), अँटी-अॅरिथमिक, बीटा, किंवा कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स हे सामान्यतः डॉक्टरांकडून लिहून दिले जातात.

वाढलेल्या हृदयाच्या गतीसाठी वैद्यकीय उपचार

चेतावणी चिन्हे

जर तुमच्या गरोदरपणात हृदयगती मध्ये अचानक वाढ झाली तर ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.  कदाचित तुम्हाला माहिती नसलेली हृदयाची समस्या तुम्हाला असू शकते. हृदयाची गती वाढण्यासोबतच तुम्हाला आणखी लक्षणे दिसली तर तुम्ही लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.

गरोदरपणात हृदय गती वाढणे सामान्य आहे. तुमच्या शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे असे घडते. ह्या काळात तुम्ही पुरेशी विश्रांती घ्या. ताण घेऊ नका. तसेच, जर तुम्हाला तुमच्या गरोदरपणाबद्दल काही भीती वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी प्रामाणिक संवाद साधा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. गरोदरपणात माझ्या हृदयाची गती किती वाढू शकते?

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी (ACOG) ची मार्गदर्शक तत्त्वे गरोदरपणात वाढलेली हृदय गती दर्शवत नाहीत. परंतु, एरोबिक व्यायाम करताना ही हृदयगती 140 बीपीएम असते.

2. जलद हृदय गती लिंग दर्शवते का?

गर्भवती महिलेच्या किंवा गर्भाच्या हृदयाची गती ह्यामुळे गर्भाचे लिंग समजण्यास मदत होते ह्यास समर्थन देणारा कोणताही पुरावा नाही.

3. माझ्या हृदयाच्या वाढलेल्या गतीचा माझ्या बाळावर परिणाम होऊ शकतो का?

गरोदरपणात हृदयाची गती वाढणे सामान्य आहे आणि त्याचा पोटातील बाळावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

आणखी वाचा:

गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे
गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article