Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २७ वा आठवडा

अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात. जुळ्या बाळांसह २७ आठवड्यांपर्यंत गर्भवती राहणे खरोखरच सोपे नाही आणि ज्या परिस्थितून तुम्ही गेलात ती परिस्थिती सगळ्यांच ठाऊक नसते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या लहान बाळांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळांची काळजी घेणे तसेच सुरु ठेवणार आहात. आतापासूनच तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे कारण हा तुमच्या गरोदरपणाचा शेवटचा टप्पा आहे. तुमच्या जीवनशैलीच्या निवडी आधीपेक्षा अधिक महत्वाच्या ठरतील आणि तुमच्या बाळांना प्रभावित करतील. शेवटच्या तिमाहीच्या सुरुवातीच्या महिन्यात तुमची जुळी किंवा एकाधिक बाळे सुरक्षित आहेत ना ह्याची खात्री करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असल्यास नेहमीपेक्षा अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

२७ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्याच्या सुरूवातीस, आधीच्या आठवड्यांप्रमाणेच तुमच्या बाळांच्या शारीरिक विकासात प्रगती होईल. शारीरिक विकास पूर्वीच्या आठवड्यात जसा होता तसा प्रगती करत असला तरीसुद्धा त्यांची जागरूकता पातळी पूर्णपणे वेगळी असेल. तुमच्या बाळांचे तुमच्या पोटात असताना शांतपणे पडून राहणे आणि अधूनमधून कधीतरीच हालचाल करणे तुम्हाला आठवते का? हो, ते आता तुम्हाला भूतकाळासारखे वाटेल! बाळाची दृष्टी सुधारेल तसेच बाळाच्या प्रकाशाविषयीच्या संवेदनेमध्ये कमालीची वाढ होईल. त्यामुळे जर बाळाला झोपण्याची इच्छा असेल आणि बाहेर सूर्यप्रकाश असेल तर बाळे पोटात हालचाल करत राहतील आणि प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला तोंड करून शांतपणे झोपण्याचा पर्याय निवडतील.

ह्या काळात बर्‍याच बाळांचे गुप्तांग विकसित होतात, तर इतर बाळांमध्ये ते अद्याप प्रगतीपथावर असू शकते. पुरुष बाळांचे अंडकोष हळूहळू खाली येऊ लागतात, स्क्रोलोटल थैलीची वाढ अंडकोष एकत्र ठेवू शकेल इतपत होते. त्याचप्रकारे, मादी बाळांच्या क्लिटोरिसची वाढ होण्यास सुरूवात होते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या मातांसाठी, त्यांच्या बाळांचा आकार नेहमीच चिंतेचा विषय असतो कारण बहुतेक संदर्भ एका बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रियांबद्दलच असतात. एकाधिक बाळांचे वजन आणि उंची सामान्यत: केवळ एका बाळाच्या तुलनेत कमी असते आणि हे एक चांगले निरीक्षण केलेले आणि मान्यताप्राप्त वैद्यकीय सत्य आहे. ही छोटी बाळे खऱ्या जगात आल्यानंतर लवकरच प्रगतीचा वेग पकडतील. योग्य आहारामुळे बाळांसाठी ते सोपे होईल. आता त्यांच्या स्तनपान करवण्याच्या प्रवृत्ती देखील मजबूत होत आहेत, अंगठा शोषणे हा बाळांचा क्रियाकलाप आहे. स्तनपान करवण्याच्या योग्य वेळेनंतर त्यांच्या वाढीस समर्थन मिळेल.

बाळांचा आकार केवढा असतो?

तुमच्या गरोदरपणाच्या २७व्या आठवड्यापर्यंत तुमची लहान बाळे फुलकोबीइतकी मोठी होतील. एकट्या बाळांचे वजन साधारणत: ९००ग्रॅम असते आणि त्यांची उंची सुमारे ३७ सेंटीमीटर असते. तथापि, एकाधिक बाळांचे वजन कमी असू शकते.

बाळांचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

गरोदरपणाचा २७ वा आठवडा म्हणजे तुमच्या गरोदरपणाचा हनिमून पिरियड संपण्याचा निर्देशक असतो तसेच शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागतात त्यामुळे तुमची तिसरी तिमाही लवकरच सुरु होणार हे तुम्हाला समजते.

 • गर्भाशयाच्या आकारात वाढ आणि शरीराचे वाढलेले वजन ह्यामुळे शरीराला होणारी वेदना इतर अनेक भागात पसरण्यास सुरूवात होते. तुमच्या मांड्या आणि पायाचे सांधे त्यापैकी बहुतेक भार सहन करतील कारण बाळांचे सर्व वजन त्यांना पेलावे लागते. अंतर्गत अवयव ढकलले जातील आणि गुरुत्वाकर्षणाचे केंद्र सुद्धा हालेल तसेच पाठीच्या आणि कंबरेच्या भागात वेदना होऊ लागतील.
 • पोट आणि आतड्यांना जागा कमी पडू लागेल. त्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊन पोट फुगल्यासारखे वाटेल तसेच ऍसिडिटी होऊन ऍसिड घशात आल्यासारख्या संवेदना होतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराचे वेळापत्रक समायोजित करावे लागेल.
 • गर्भाशयामध्ये तसेच शरीराच्या इतर भागामध्ये तुमचे हृदय विपुल प्रमाणात रक्त पंप करेल. ह्या वाढलेल्या रक्ताभिसरणामुळे तुमच्या चेहऱ्याकडील भागावर प्रचंड दुष्परिणाम होतो आणि तुमच्या हिरड्या, नाकपुड्या आणि घसा अधिक संवेदनशील बनतात. दात घासताना हिरड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो तसेच काही वेळा नाकातून सुद्धा रक्तस्त्राव होतो किंवा नाक सतत चोंदल्यासारखे वाटते आणि घसा खवखवतो.
 • ह्या आठवड्यात संप्रेरकांच्या पातळीत खूप चढउतार होतात आणि तुम्हाला झोपेची समस्या उद्भवू शकते. तसेच तुम्हाला विचित्र स्वप्ने पडू लागतात. काही स्त्रियांना गरम वाफांचा किंवा अचानक थंडी वाजण्याचा अनुभव येतो. जर हा त्रास वाढला तर डॉक्टरांकडे जाणे चांगले.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यातील लक्षणे

जेव्हा तुम्ही गरोदरपणाचे २७ आठवडे पूर्ण करता तेव्हा प्रामाणिकपणे सांगायचं झाला तर तुम्ही गरोदर आहात हे सांगण्याची आता गरज उरलेली नसते. तरीही तुमच्या शरीरात बदल होत राहतील ज्याची तुम्हाला सवय होण्यास वेळ लागू शकतो.

 • तिसरी तिमाही सुरु झाल्यास तुम्हाला प्रसुतीचे खोटे संकेत मिळतील . ब्रॅक्सटन हिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या सौम्य सराव कळा कधीही येतील आणि नाहीश्या होतील. आणि ते सामान्य आहे परंतु ह्या कळा वारंवार येऊन वेदना सुरु झाल्या आणि त्यांच्यामध्ये वाढ झाल्यास ते डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.
 • गर्भाशयाच्या दाबामुळे गॅस आणि ऍसिडिटी वारंवार होऊ लागते. आतल्या बाळांचे आतड्यांवर बरेच वजन पडत असल्याने ह्या आठवड्यात बद्धकोष्ठता वाढते. तसेच संप्रेरकांमुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि बद्धकोष्ठता वाढते. तुम्हाला जर त्यामुळे रक्तस्त्राव झाल्यास ते तुमच्यासाठी खूप कठीण होऊन बसते!
 • तुमचे शरीर बाळांसाठी पोटात जागा करण्यासाठी इतर अवयव बाजूला सारते. परिणामी, फुप्फुसे आणि डायफ्रॅम वरती सरकतात. त्यामुळे फुप्फुसांचा हवा तेवढा विस्तार होत नाही आणि श्वास पूर्ण घेतला जात नाही.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २७ वा आठवडा पोटाचा आकार

तुम्ही जर अशा स्त्रियांपैकी एक असाल ज्यांना गरोदरपणातील लक्षणांचा खूप त्रास झाला असेल तर तुमच्या पोटाच्या आकारावरून तुम्ही गरोदरपणात किती पुढे आला आहात हे समजेल. तुमच्या बाळांची वाढ होऊन त्यांच्या वजनात सुद्धा वाढ होईल. तुमचे देखील वजन वाढेल आणि ते तुमच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून लक्षात येईल. काही स्त्रियांना पोटाकडील भागात ताण किंवा ओढल्यासारखे वाटू शकते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २७ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

नियमित आणि वारंवार अल्ट्रासाऊंड सहसा येत्या आठवड्यापासून सुरू होते आणि कोणत्याही विशिष्ट स्थितीची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्यास डॉक्टर तुम्हाला गरोदरपणाच्या २७व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करण्यास सांगत नाही. अंगठा चोखत शांतपणे झोपलेल्या बाळाव्यतिरिक्त ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड मध्ये विशेष काही दिसत नाही.

काय खावे?

ह्या आठवड्यात मागच्याच आठवड्यातील आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही पोषक आहार घेतल्यास तुमचे गर्भारपण निरोगी राहणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही थोडे थोडे सारखे खात रहा त्यामुळे अपचनाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. कर्बोदकांनी समृद्ध असा नाश्ता घ्या. उर्वरित जेवणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि लोह असणे आवश्यक असते. नियमितपणे दही खाण्याचा प्रयत्न करा. भरपूर पाणी आणि घरी केलेला साखरविरहित फळांचा रस घेतल्यास त्याची तुम्हाला मदत होऊ शकेल.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

आपल्या शरीराची चांगली काळजी घ्या आणि खाली नमूद केलेल्या काही टिप्ससह स्वतःला शेवटच्या तिमाहीसाठी तयार करा.

हे करा

 • आपल्या डॉक्टरांशी अल्ट्रासाऊंडद्वारे आयोजित केलेल्या तपासण्यांविषयी चर्चा करा.
 • अकाली प्रसूतीच्या शक्यतेसाठी स्वत: ला तयार करा.

हे टाळा

 • हिरड्यांमधून रक्तस्त्राव झाल्यास दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका.
 • तुमचे पोट खाजवणे शक्य तितके टाळा.

तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

लवकरच आपली मुलं वास्तविक जगात बाहेर येतील. तुम्ही त्यांची शक्य तितक्या चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची तयारी ठेवा. तुमच्या बाळांसाठी तुम्ही खालील गोष्टी खरेदी करणे आवश्यक आहे:

 • एकाधिक बाळांसाठी बाबागाडी.
 • विविध कप्पे असलेली एक मोठी डायपर बॅग.

गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत जुळी बाळे गर्भाशयात बाळगल्यामुळे, प्रसूतीपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या उदरात सुरक्षितपणे ठेऊ शकता असा आत्मविश्वास तुम्हाला वाटत असेल. हा आत्मविश्वास तसाच राहू द्या. गरोदरपणाची तिसरी तिमाही सुरक्षित आणि आनंदी जाण्यासाठी तुम्ही तुमची शारीरिक आणि मानसिक ताकद नियमित ठेवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article