Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी दुसऱ्या बाळाचे नियोजन कसे कराल?

दुसऱ्या बाळाचे नियोजन कसे कराल?

दुसऱ्या बाळाचे नियोजन कसे कराल?

पुन्हा छोट्याशा बाळाला सांभाळण्याची, त्याची काळजी घेण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? दुसऱ्या बाळाचे नियोजन करणे तसे सोपे असते कारण मूल वाढवण्याचा अनुभव तुमच्यापाशी असतो.परंतु, वय, आर्थिक बाबी आणि तुमचे आधीचे मूल ह्या गोष्टी विचारात घेणे जरुरीचे आहे. इथे आपण दुसऱ्या बाळाचे नियोजन करताना कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे पाहणार आहोत.

दुसरे बाळ होण्यासाठी सर्वोत्तम काळ कुठला?

दुसरे बाळ कधी होऊ द्यावे ह्या बाबतीत बऱ्याच जोडप्याना संभ्रम आहे. परंतु ह्या प्रश्नाला योग्य उत्तर नाही, कारण आरोग्य, आर्थिक बाबी, वैयक्तिक प्राधान्यक्रम ह्या घटकांचा निर्णय घेताना समावेश होतो. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांना चाळीशीत मूल होते, आणि अशी बरीच कुटुंबे आहेत जिथे स्रोत कमी असूनही त्यांनी यशस्वीरीत्या दोन मुले वाढवली आहेत. खाली काही घटक दिले आहेत त्यावरून तुम्हाला पुन्हा केव्हा गरोदर रहावे ह्याबाबत निर्णय घेता येईल. ह्या घटकांची पूर्तता झाल्यावर तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार करू शकता

दुसऱ्या गर्भारपणाचे नियोजन करण्याआधी लक्षात घेतल्या पाहिजेत अशा गोष्टी

इथे काही मुद्धे आहेत जे लक्षात घेतले पाहिजेत

. तुमचे शारीरिक आरोग्य

गरोदरपणात तुमच्या शरीरात मोठे बदल होत असतात आणि जर तुमची तब्येत चांगली असेल तर ते योग्य प्रकारे घडू शकतात. जरी तुमच्या पहिल्या गर्भारपणाला खूप दिवस झालेले नसतील, परंतु तुम्ही त्यातून पूर्णपणे बाहेर पडला असाल आणि तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही दुसरे बाळ होऊ देऊ शकता.

. तुमचे वय

स्त्रीचे वय जसे वाढत जाते तसे तिच्या मासिक पाळी चक्रात बदल होऊ लागतात. विशेषकरून स्त्रीबीज निर्मितीच्या संदर्भात हा बदल दिसून येतो. कारण स्त्रीमध्ये जन्मतः एक विशिष्ट मर्यादित प्रमाणात स्त्रीबीजांचा साठा असतो आणि वय वाढते तसे तो कमी होत जातो तसेच स्त्रीबीजांची गुणवत्ता सुद्धा खालावते त्यामुळे गर्भपाताची आणि बाळामध्ये जनुकीय दोषांची शक्यता वाढते.

. वडिलांचे वय

दुसऱ्या बाळाचा विचार करताना तुमच्या पतीचे वय सुद्धा विचारात घेतले पाहिजे. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की ३५ नंतर शुक्राणूंच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल होतो.

. आर्थिक बाबी

दुसऱ्या बाळाचे नियोजन करताना आर्थिक बाबींचा महत्वाचा सहभाग असतो कारण खर्च दुप्पट होणार असतो. तुम्ही आणि तुमचे पती दोघेही नोकरी करत आहात का? तुम्ही दोन्ही मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचा विचार करीत आहात का? जेव्हा तुम्ही पैशांचे नियोजन करीत असता तेव्हा ह्या प्रश्नांचा नीट आणि गांभीर्याने आधीच विचार करणे जरुरीचे आहे.

. कौटुंबिक उद्दिष्ट

दुसऱ्या मुलाला वाढवताना तुमचे आणि तुमच्या पतीचे एकमत असले पाहिजे. काही वेळा तुमची मते वेगवेगळी असू शकतात. तुमच्यापैकी एकाला दुसरे बाळ होण्यासाठी थोडा वेळ हवा असतो किंवा अजिबात मुले नको असतात. त्यामुळे तुमच्या उद्धिष्टांविषयी तुम्ही एकमेकांशी बोलले पाहिजे आणि सुवर्णमध्य साधला पाहिजे

. करियर

तुमच्या बाळाला वेळ देत असताना तुमचे करिअर मागे पडू शकते

. वयातला फरक

दुसऱ्या बाळाचा विचार करताना, तुमच्या पहिल्या मुलाचा विचार केला पाहिजे. तुम्हाला तुमची दोन्ही मुले एकत्र खेळायला हवी आहेत का? मग दोंघांमध्ये कमी अंतर असलेले चांगले कारण ते दोघे एकाच वयोगटातील असतील आणि एकमेकांशी त्यांचे छान जमेल.

. मदतीचे हात

जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळेला गरोदर राहाल तेव्हा तुम्हाला जास्तीच्या मदतीची गरज भासेल कारण तुमच्या पहिल्या मुलाची काळजी घेणे सुद्धा जरुरीचे असते. तुमच्या मोठ्या मुलाची काळजी घेणारं आणि तुमचा विश्वास असणारे कुणी तुमच्या मदतीस आहे का? तुमचे आईवडील जवळ राहतात का म्हणजे तुम्हाला मदत मिळू शकेल.?

. जागा

कुटुंबात नवीन बाळ येणार म्हटल्यावर तुम्हाला जागा जास्त लागणार आहे. बाळ मोठे होत असताना तुम्हाला मोठ्या जागेत जावे लागेल किंवा त्याच खोली मध्ये बंक बेड करून घ्यावा लागेल

१० प्रसूती

जर तुमचे आधी सी सेक्शन झालेले असेल आणि दोन प्रसूतीमधील अंतर २ वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पुन्हा सी सेक्शन ला सामोरे जावे लागेल. कारण पुढच्या गर्भारपणात तुम्हाला प्रसूतीकळांची वाट पहावी लागेल आणि त्या प्रेरित करता येणार नाही. तुमचे आधीचे सी सेक्शन झालेले असल्यास नॉर्मल प्रसूतीचा सल्ला दिला जात नाही. म्हणून तुम्ही मोठ्या रुग्णालयात नाव दाखल करा जेणेकरून आपत्कालीन स्थितीत तिथे सगळ्या सुविधा असतील.

दुसऱ्या बाळासाठी तुम्ही स्वतःला कसे तयार कराल?

दुसऱ्या गर्भारपणाचे नियोजन करण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत

. चेकअप करून घ्या

जेव्हा तुम्ही आणि तुमचे पती दुसऱ्या बाळाचा निर्णय घेता तेव्हा रक्ताची चाचणी आधी करून घ्या. तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्नांना सुरुवात केली असेल तर रक्ताची चाचणी केल्याने जर गर्भधारणा झाली असेल तर ती निश्चित होईल. ह्याव्यतिरिक्त तुमच्या शरीरातील लोहाची पातळी किती आहे हे सुद्धा समजेल. बऱ्याच स्त्रिया गर्भारपणात ऍनिमिक होतात कारण गर्भवती स्त्रीसाठी आणि बाळासाठी रक्ताची पातळी जास्त लागते. जेव्हा तुम्ही रक्ताची चाचणी करता, तेव्हा तुम्ही लोहाची मात्रा वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि ऍनिमिया मुळे होणारी गुंतागुंत टाळू शकता

. तुमच्या मासिक पाळी चक्रावर जवळून लक्ष ठेवा

जरी तुम्ही संततिनियमनाची साधने वापरत नसाल तरी सुद्धा पाळी चुकली म्हणजे तुम्ही गर्भवती आहात असे नाही. पहिल्या बाळानंतर, तुमची पाळी थोडी अनियमित होण्याची शक्यता असते. तुम्हाला ओव्यूलेशनचा काळ नीट माहिती करून घेऊन गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती हे जाणून घ्यावे लागेल. ते सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागू शकतात त्यामुळे प्रयत्न करीत रहा!

. जिमला जा

पहिल्या गर्भारपणानंतर शरीर पूर्ववत होणे हे आव्हानात्मक असते. बऱ्याच स्त्रिया पुन्हा व्यायामास सुरुवात करतात परंतु तुम्ही जर अजून सुरुवात केली नसेल तर आता करा. वजनात झालेल्या वाढीमुळे प्रजननक्षमता कमी होते आणि त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बिघडते आणि ओव्यूलेशन वर लक्ष ठेवणे अवघड होते.

. पुरुषांमधील वंध्यत्व

गरोदरपण म्हणजे काही फक्त स्त्रीचे कार्य नाही. लक्षात ठेवा की तुम्ही आणि तुमचे पती दोघांनाही पुरुषांमधील वंध्यत्वाविषयी माहिती आहे. गांजा ओढणे, दारू पिणे ह्यामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या झपाट्याने कमी होते. लठ्ठपणामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येते त्यामुळे तुम्ही आणि तुमचे पती दोघांनी एकत्र जिम ला जा.

. गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ कोणता ते शोधा

जर तुम्ही तिशीच्या सुरुवातीला असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमची प्रजनक्षमतेवर वयाचा परिणाम होऊ शकतो तर ते बरोबर आहे तुम्ही शक्य तितक्या लवकर दुसऱ्या बाळाचा विचार करू शकता. तथापि, तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाचा सुद्धा विचार केला पाहिजे. बरीच जोडपी दुसऱ्या मुलासाठी तीन वर्षे वाट पाहतात कारण तोपर्यंत पहिले मूल स्वावलंबी झालेले असते आणि गर्भधारणेस तेव्हा प्रथम प्राधान्य दिले जाते.

. इतर पर्याय शोधा

जर तुम्ही दीड वर्षांपर्यंत प्रयत्न करून सुद्धा यश आले नाही तर आय.व्ही. एफ. तज्ञांचा शोध घ्या. पहिल्या बाळानंतर वय, आरोग्याच्या तक्रारी आणि जीवनशैलीतील बदल ह्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.

इतर पर्याय शोधा

तुमच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या आधी करायच्या गोष्टी

तुमच्या नियोजनाप्रमाणे दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर त्याचे स्वागत झालेच पाहिजे. इथे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत.

 • तुमच्या पहिल्या मुलाकडे तुमच्या प्रसूतीच्या काळात दुर्लक्ष होऊ नये म्हणून बेबी सीटर शोधून ठेवा. ह्या काळात तुम्ही दोघेही दूर होणार आहात आणि तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तीने तुमच्या पहिल्या मुलाची काळजी घेतली पाहिजे. ही व्यक्ती म्हणजे तुमचे पती, पालक किंवा ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता असे जवळचे नातेवाईक ह्यापैकी कुणीही असू शकते.
 • बाळाला वाढवण्यासाठी खर्च येतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या पहिल्या गरोदरपणात वापरलेल्या गोष्टी पुन्हा वापरू शकता. गरोदरपणात घालायचे गाऊन, बाळाचे कपडे, बाटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. जुनी दुपटी सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता.
 • तुम्ही रुग्णालयात जाणार आहात आणि त्यासाठी तुमच्या पहिल्या मुलाची सुद्धा बॅग भरून ठेवणे आवश्यक आहे. ह्यामध्ये त्याचे आवडते खेळणे, एखादे पुस्तक असुद्या. ही बॅग तुमचे पहिले मूल इस्पितळात तुम्हाला भेटायला येताना सोबत आणू शकेल.
 • तुमच्या पहिल्या मुलासाठी दररोजचे वेळापत्रक तयार करून ठेवा. तुम्ही नसताना तुमचे मूल ज्यांच्यासोबत राहणार आहे त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सेशन्स ठेवा . असे केल्याने काही शंका असतील तर त्या ताबडतोब प्रत्यक्ष सोडवल्या जातील नाही तर रुग्णालयातून फोन वर सगळे सांगणे सोयीचे होत नाही.
 • जी व्यक्ती तुमच्या मुलाची काळजी घेत आहे त्यांच्यासाठी एक नोंदवही ठेवा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठीची तपशीलवार माहिती नोंद करून ठेवू शकता, जी त्यांना माहिती असणे अत्यावश्यक असते. उदा: तुमच्या मुलाला आवडणारे कार्टून, त्याला व्यस्त ठेवण्यासाठी निरनिराळे खेळ, नाश्त्यासाठी आवडणारे पदार्थ वगैरे. तुमच्या पहिल्या मुलाच्या औषधांची नोंद सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता.
 • जर तुमचे पहिले मूल अजूनही लहान असेल तर जवळ फिरायला घेऊन जाण्यासाठी स्ट्रोलर विकत आणा
 • बाळासाठी डायपर, तुमच्यासाठी नर्सिग ब्रा, ब्रेस्ट पम्प, बेबी मॉनिटर इत्यादी गोष्टी घेऊन या
 • तुमच्या जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईक ह्यांच्यासोबत डोहाळेजेवणाचा कार्यक्रम करा. तेव्हाच तुम्ही मदतीची विनंती त्यांना करू शकता.
 • तुम्ही रुग्णालयात जायच्या आधी अन्नपदार्थांची सोय करून ठेवा. त्यासाठी तुम्ही ते आधी करून ठेवू शकता किंवा त्यासाठी मित्रमैत्रिणींची मदत घेऊ शकता किंवा बाहेरून ते तयार आणू शकता. तुमच्या पहिल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही त्याच्या आवडीचे स्नॅक्स आणून ठेवा.
 • तुम्ही तुमच्या घरात बाळाला कुठे ठेवणार आहात ती जागा शोधून ठेवा आणि तुमचे घर दोन भागात विभाजित करा. घरातील पहिला भाग म्हणजे जिथे तुमचे पहिले मूल बाळापर्यंत जाऊ शकणार नाही आणि बाळावर खूप जास्त प्रेमकरणार नाही आणि दुसरा भाग म्हणजे अशी जागा जिथे तुमचे पहिले मूल बाळाजवळ येऊ शकेल परंतु तेव्हा तुमचे लक्ष त्यांच्यावर असणे जरुरीचे आहे
 • तुमच्या दुसऱ्या बाळाला घरी आणल्यावर त्याला कुठे ठेवायचे ह्याचा विचार करून ठेवा. म्हणजेच तुमच्या पहिल्या मुलासोबत, किंवा तुमच्या खोलीत तात्पुरते ठेवणे किंवा नवीन खोली तयार करणे
 • तुमचे वजन नियंत्रित ठेवून आणि नियमित व्यायाम करून तुम्ही नॉर्मल प्रसूतीसाठी स्वतःला तयार करा. श्रोणीच्या भागातील व्यायाम नियमित केल्याने तुमची प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होईल
 • गर्भवती स्त्रीसाठी घर नीट लावून ठेण्याची इच्छा होणे हे खूप नैसर्गिक आहे आणि त्यास इंग्रजीमध्ये नेस्टिंगअसे म्हणतात. त्याचा फायदा घेऊन बाळासाठी घर बेबीप्रूफ करून घ्या आणि तुमचे दुसरे बाळ घरी येण्याआधी सगळ्या गोष्टी जागेवर आहेत ना ते पहा. तुम्ही इस्पितळातून घरी आल्यावर तुम्हाला दोन्ही मुले आणि इतर सगळंच बघायचे आहे
 • बाळाचे डायपर, वाईप्स, क्रीम्स आणि इतर गोष्टी ठेवण्यासाठी जागा तयार करून ठेवा
 • जर तुम्हाला लक्षात आले की स्तनपानात खूप वेळ जातो आहे तर तुम्ही बाळाला स्तनपान देण्यासाठी वेट नर्सठेऊ शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाकडे लक्ष ठेऊ शकाल.

तुमच्या मुलास नवीन भावंडासाठी तयार करण्यासाठी काही टिप्स

 • तुमच्या पहिल्या मुलास तुम्ही गर्भवती आहात हे लगेच सांगण्याची गरज नसते. गर्भधारणा आणि बाळाचा जन्म ह्या संकल्पना त्याच्यासाठी खूप अवघड वाटू शकतात त्यामुळे त्यास नंतरच्या टप्प्यावर तुम्ही त्या सांगू शकता
 • टॉडलर ना वेळेचं गणित नक्की कळत नसते आणि काही महिन्यांचा काळ त्यांना खूप जास्त वाटू शकतो आणि मग दररोज ते बाळ केव्हा येणार म्हणून तुम्हाला भांडावून सोडू शकतील. त्याला लवकरच भावंडं येणार आहे ही बातमी सांगण्याआधी थोडी वाट बघा
 • स्तनपानासाठी अशी जागा निवडा की तुमचे पहिले मूल तुमच्या जवळ येऊन बसू शकते
 • तुमच्या पहिल्या मुलाला शेअरिंगची सवय नसते त्यामुळे त्याला तशी सवय लागण्यासाठी बाळाला त्याने काहीतरी भेट देण्याचा समारंभ करू शकता
 • तुमच्या पहिल्या मुलाला छोट्या छोट्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करायला सांगून स्वतंत्र करा. त्यामुळे त्याला मोठे झाल्यासारखे वाटेल आणि तुम्हाला नवीन बाळावर ते लक्ष देऊ देईल
 • तुमचे दुसरे बाळ जन्माला येण्याआधीपासून तुमच्या पहिल्या मुलासोबत वेळ घालवणे हळूहळू कमी करा कारण बाळ आल्यानंतर त्याच्याकडचे लक्ष अचानक कमी केल्यास त्याला मत्सर वाटू शकतो
 • तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाला बाळाची काळजी घेण्याची सवय लावण्यासाठी बाहुलीची काळजी घेण्याची सवय लावा
 • एक सिक्रेट कोड ठरवा जो फक्त तुम्हाला आणि तुमच्या पहिल्या मुलाला ठाऊक असेल . असे केल्यास जर तुमच्या पहिल्या मुलाला एकटे पडल्यासारखे वाटले तर तुम्ही तो सिक्रेट कोड त्याच्याशी शेअर करून त्याचा मूड ठीक करू शकता. नंतर तुम्ही हे दुसऱ्या मुलासाठी सुद्धा करू शकता.
 • तुम्ही स्क्रॅपबुक तयार करू शकता त्यामुळे तुमच्या मोठ्या मुलास तो लहान असताना कशी विशेष वागणूक मिळाली होती ते समजेल. असे केल्याने मत्सर भावना कमी होईल.
 • वन्स अपॉन अ टाईमहे सारा सुलिवॉन ह्यांचे पुस्तक आणि आय एम अ बिग सिस्टरजोवाना कोल यांच्या पुस्तकामुळे तुमच्या मुलाला भावंडं म्हणजे काय हे समजेल. ही पुस्तके त्याच्यासाठी वाचल्याने त्यास भावंडानी कशी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे हे समजेल. तसेच, त्यांना त्या गोष्टी इतक्या आवडू लागतील की त्यांना भावंडांविषयी प्रेम वाटू लागेल.

तुमच्या मुलास नवीन भावंडासाठी तयार करण्यासाठी काही टिप्स

दुसऱ्या बाळाचे नियोजन केल्यास, दुसऱ्या वेळेला गरोदर असताना पहिल्याची काळजी कशी घेतली पाहिजे ह्या आव्हानाची बरीचशी उत्तरे मिळतात. तसेच भविष्याविषयी सुद्धा तुम्हाला विचार करण्यास ते भाग पाडते कारण दोन मुले म्हणजे सगळं दोनदा करणे होय. परंतु,त्यानंतरचा आनंद सुद्धा खूप असतो आणि अनेक अशी कुटुंबे आहेत जी एका ऐवजी दोन मुले असताना जास्त आनंदी आहेत.

आणखी वाचा:

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?
गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article