Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे

गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे

गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे

गरोदरपणात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे बाळाच्या आई बाबांसाठी एक रोमांचक अनुभव असू शकतो. ह्या क्षणाची ते आतुरतेने वाट पहात असतात. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही देखील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी उत्सुक असाल ह्यात काही शंका नाही. गर्भाच्या हृदयाचा ठोका योग्य असणे म्हणजे बाळाचा विकास योग्य होत आहे असे समजावे. तुम्हाला तुमच्या बाळाचा हृदयाचा ठोका कधी ऐकायला मिळेल हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके कधी ऐकू शकता?

गर्भवती असताना, तुमच्या पहिल्या स्कॅन दरम्यान, तुमच्या बाळाच्या हृदयाचा ठोका तुम्हाला ६व्या आठवड्यात ऐकायला मिळेल. ट्रान्सव्हॅजाइनल स्कॅन (टीव्हीएस) करून आपल्या बाळाचे हृदय ओळखले जाऊ शकते. बाळाच्या हृदयाचा ठोका शोधण्यासाठी डॉक्टर डॉपलर स्कॅन सुचवू शकतात. परंतु काहीवेळा, आपण बाळाच्या हृदयाचे थोडे ६ आठवड्यांच्या आसपास ऐकू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला१० किंवा १२ आठवड्यांपर्यंत थांबावे लागेल.

बाळाच्या हार्ट रेटची गणना कशी केली जाते?

बाळाच्या हृदयाचा ठोका मोजण्याची पद्धत सोपी आहे. तुम्ही १५ सेकंद हृदयाचे ठोके मोजण्याची गरज आहे आणि त्या संख्येला ४ ने गुणावे. त्यामुळे तुम्हाला एका मिनिटात किंवा ६० सेकंदात हृदयाचे किती ठोके पडले हे समजेल. तुम्ही १० किंवा २० सेकंदांपर्यंत सुद्धा हृदयाचे ठोके मोजू शकता आणि ६० सेकंदातील एकूण गणना समजण्यासाठी अनुक्रमे ६ किंवा ३ ने गुणाकार करू शकता.

गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यांचा सामान्य दर काय आहे?

गर्भाच्या हृदय गतीचा दर प्रति मिनिट साधारणपणे १२० ते १६० बीट्स दरम्यान असतो (बीपीएम). परंतु गर्भाच्या हालचालीनुसार तो बदलू शकतो. तुमच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये दिवसभर चढउतार होऊ शकतात आणि ते १८० किंवा १९० पर्यंत वाढतात. हे बाळांसाठी सामान्य आहे. तथापि, तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदय गतीबद्दल काही चिंता असल्यास त्याबाबतच्या स्ष्टीकरणासाठी तुम्ही डॉक्टरांकडे संपर्क साधू शकता.

बाळाच्या हृदयाचे ठोके कशासारखे असतात?

बहुतेक स्त्रिया म्हणतात की गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज घोड्यांच्या टापांसारखा येतो. गर्भाच्या हृदयाचे ठोके खूप वेगवान असतात आणि जर कुणी स्वत: चा मॉनिटर वापरत असेल तर शोधणे थोडे अवघड आहे. आपण घरी निरीक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, चर्रर्र आवाज देखील ऐकू येईल. तथापि, गर्भाशयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणार्‍या रक्ताचा हा आवाज आहे

निरोगी हृदयाचा ठोका म्हणजे काय?

तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित ऐकू येत असल्यास आणि त्यांची गती सामान्य असल्यास, बाळाचा विकास नीट होत आहे असे समजावे. जर ७व्या किंवा ८ व्या आठवड्यात हृदयाचा ठोका ऐकला तर बाळ वेळापत्रकानुसार वाढत आहे आणि त्याची तब्येत चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. हृदयाचे ठोके नीट पडत असतील तर गर्भपाताची शक्यता देखील कमी असते.

गरोदरपणात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचे वेगवेगळे मार्ग

बाळाच्या हृदयाचा ठोका विविध उपकरणे आणि अ‍ॅप्सच्या मदतीने ऐकू येतो. काही सामान्य पद्धती खाली देत आहोत.

. स्टेथोस्कोप

आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्टेथोस्कोप वापरणे. एक चांगला स्टेथोस्कोप १८ ते २० आठवड्यांच्या आसपास गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकवण्यास आपल्याला मदत करेल. ह्या कालावधीत स्टेथोस्कोपने ऐकण्याइतपत आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके मजबूत असतील.

तुम्ही फक्त पोटावर स्टेथोस्कोप ठेवायचा आहे आणि तुम्हाला हृदयाचे ठोके तीव्र ऐकू येईपर्यंत तो हलवायचा आहे. ही पद्धत वापरून पाहताना आपल्याला धीर धरण्याची आवश्यकता असेल. तुमच्या बाळाच्या हदयाचे ठोके पुरेसे मजबूत नसल्यास ही पद्धत अचूक असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही.

स्टेथोस्कोप

. ऍप्स

पालकांनी आपल्या मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याची अपेक्षा करणे तंत्रज्ञानामुळे सुलभ झाले आहे. आता आपल्या स्मार्टफोनवर तुम्ही डाउनलोड करू शकता अशी शेकडो ऍप्स उपलब्ध आहेत जी आपल्याला आपल्या बाळाच्या हृदयाचा ठोका ऐकण्यास सक्षम करतील. काही अ‍ॅप्समध्ये हृदयाचे ठोके रेकॉर्ड करण्याचा पर्याय देखील असतो. तुम्ही तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके नोंदवू शकता आणि आपल्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी परत प्ले करू शकता. जेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके अधिक बळकट होतात तेव्हा गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात ऍप्स अधिक विश्वासार्ह असतात. तथापि, हे तंत्र सर्वाधिक टाळले गेले आहे कारण सेल फोनचे रेडिएशन आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

. फिटल मॉनिटर

तुम्ही घरी तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी फिटल हार्ट मॉनिटर देखील खरेदी करू शकता. तुम्ही एक स्वस्त मॉनिटर निवडू शकता जेणेकरून आपल्या डॉक्टरांच्या भेटी दरम्यान हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी तुमच्याकडे पर्याय असेल. परंतु, आपल्या गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यापर्यंत हे मॉनिटर्स वापरून तुम्ही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकणार नाही कारण हे मॉनिटर्स डॉक्टरांद्वारे वापरल्या जाणार्‍या मॉनिटर्स इतके मजबूत नसतात. तुम्ही घरी वापरण्यासाठी फिटल हार्ट रेट मॉनिटर खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकदा एखादी वस्तू खरेदी केल्यावर, अचूक परिणामांसाठी सूचनांचे काळजीपूर्वक अनुसरण करा

. फिटल डॉपलर

आपल्या नियमित तपासणी दरम्यान हृदयाचे ठोके शोधण्यासाठी डॉक्टर फिटल डॉपलरचा वापर करू शकतात. ह्या डिव्हाइसवर एक छोटा प्रोब असतो तो डॉक्टर आपल्या पोटावर फिरवतात आणि एकदा हृदयाचे ठोके ऐकू आले की ते ध्वनी लहरींचा वापर करून वाढवले जातील. ही प्रक्रिया पूर्णपणे वेदनारहित आहे. डॉप्लर नऊ किंवा दहा आठवड्यांपर्यंत गर्भाशयातल्या बाळाच्या हृदयाचा ठोका शोधू शकतो. तथापि, काही बाबतीत त्यास १२ आठवडे लागू शकतात.

. अल्ट्रासाऊंड

तुमचे डॉक्टर लवकर अल्ट्रासाऊंड स्कॅन देखील करू शकतात ज्यामुळे गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचा ठोका ऐकण्यास मदत होऊ शकते. हाय रिस्क प्रेग्नन्सीच्या बाबतीत गुंतागुंत लवकर ओळखण्यासाठी आणि त्यानुसार उपचार करण्यासाठी सहसा असे केले जाते.

तणावाचा तुमच्या गर्भाच्या हृदय गतीवर परिणाम होतो का?

अभ्यासांनी असे सूचित केले आहे की तणाव आणि चिंता यामुळे एखाद्या महिलेच्या हृदय गती आणि रक्तदाबात बदल होऊ शकतो, ज्याचा परिणाम गर्भाच्या हृदय गतीवर होतो. अभ्यासानुसार असेही आढळले आहे की ताणतणावामुळे बाळाचे जन्मतः वजन कमी भरते तसेच बाळाचा अकाली जन्म होण्याची सुद्धा शक्यता असते. गरोदरपणातील तणावाचा परिणाम नंतरच्या आयुष्यात बाळाच्या कार्य आणि संज्ञानात्मक विकासावर देखील होतो.

अनेक गर्भवती महिला गरोदरपणात ताणतणावातून जात असतात. त्यांना प्रगती आणि गर्भावस्थेच्या परिणामाची सतत भीती वाटते ह्यामुळे चिंता आणि तणाव वाढतो. बहुतेकदा, ह्या माता फिटल डोपलर्सचा वापर करून आपल्या बाळाची हदय गती आणि आरोग्यावर लक्ष ठेवून ह्या तणावावर मात करतात.

तुम्ही एखादा फिटल डॉपलर भाड्याने किंवा विकत घेऊ शकता?

होय, आपण घरी वापरासाठी फिटल डोप्लेर्स खरेदी किंवा भाड्याने घेऊ शकता. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यांच्यापैकी काहींमध्ये बाळाच्या हृदयाचा ठोका रेकॉर्ड करण्याचा पर्याय देखील आहे. तथापि, तुम्ही खरेदी करत असलेल्या किंवा भाड्याने देत असलेल्या फिटल डॉपलरला एफडीएने मान्यता दिली असल्याचे सुनिश्चित करा. खरेदी किंवा भाड्याने घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट डिव्हाइसबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

पहिल्यांदा आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे आपल्यासाठी आनंददायक अनुभव असू शकतो. बाळाच्या हृदयाचे ठोके नीट पडणे हा बाळाचा विकास नीट होत असल्याचा संकेत आहे. तुमच्या डॉक्टरांच्या भेटी नियमित ठेवा आणि वेळोवेळी आपल्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचे निरीक्षण करा. असे केल्यास आपल्याला वेळेआधी कोणतीही विसंगती ओळखण्यास मदत होऊ शकते. तुम्ही फिटल हार्ट रेट मॉनिटर स्वतःसोबत ठेवू शकता आणि डॉक्टरांच्या भेटीच्या दरम्यानच्या काळात ते नोंदवू शकता आणि काहीच न आढळल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणात स्तन आणि स्तनाग्रांमध्ये होणारे बदल
गरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article