Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात योनीमार्गात होणाऱ्या वेदना

गरोदरपणात योनीमार्गात होणाऱ्या वेदना

गरोदरपणात योनीमार्गात होणाऱ्या वेदना

स्त्री गरोदर राहिल्यावर तिच्या शरीरात अनेक बदल होतात. वाढत्या गर्भासाठी अंतर्गत अवयव जागा तयार करतात. संप्रेरकांमध्ये बदल होतात, त्यामुळे अस्वस्थता येते . सर्कॅडियन लयीमध्ये सुद्धा बदल होतो. मूलतः, विशिष्ट प्रमाणात वेदना झाल्याशिवाय गर्भधारणा होत नाही.

गर्भवती स्त्रीच्या शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना होतात. तिच्या पाठीच्या खालच्या भागात, पोटात, स्तनांमध्ये आणि पोटाकडील भागात वेदना होतात. काही गर्भवती स्त्रियांना योनीमार्गात देखील वेदना होऊ शकतात. वेदना एकतर दुसया तिमाहीपासून सुरू होतात किंवा काही अगदी संपूर्ण गरोदरपणात तशाच राहतात. गरोदरपणात योनीमार्गात वेदना होण्याची कारणे आणि उपचारांवर एक नजर टाकूया.

गरोदरपणातील योनिमार्गात होणाऱ्या वेदनांचे प्रकार

स्त्रियांना अनुभवलेल्या योनिमार्गाच्या वेदनांचे प्रकार तीन प्रकारात विभागले जाऊ शकतात.

1. काटेरी वेदना

गर्भवती महिलांमध्ये अश्या वेदना होणे ही एक सामान्य घटना आहे, काटेरी वेदना देखील या श्रेणीत येतात. सामान्यतः गरोदरपणाच्या 5 व्या ते 8 व्या आठवड्यात गर्भाशयाच्या स्नायूंच्या ताणामुळे अश्या प्रकारच्या वेदना होतात. या वेदनेचे आणखी एक कारण म्हणजे गर्भवती आईच्या आतड्यांमध्ये वायूचे प्रमाण वाढणे हे होय. जर अश्या वेदना ३७ व्या आठवड्याच्या आसपास सुरू होत असतील तर ते सहसा बाळाच्या जन्माच्या पुढील घटनेमुळे होते.

2. वार केल्यासारख्या वेदना

वार केल्यासारख्या वेदना ह्या फक्त गरोदर स्त्रियाच नव्हे तर इतर स्त्रियांमध्ये सुद्धा एक व्यापक समस्या आहे. असे सहसा फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भाशय ग्रीवामध्ये होणाऱ्या दाहक प्रक्रियेमुळे होते. उपचारानंतर वेदना लवकर कमी झाल्यास, काळजी करण्याचे कारण नाही. तथापि, ते वाढतच राहिल्यास, तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांना भेट द्यावी.

3. कापल्यासारख्या वेदना

गरोदरपणात किरकोळ कापल्यासारखे दुखणे ही एक सामान्य घटना आहे आणि बहुधा गर्भाला सामावून घेण्यासाठी गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे असे घडते. परंतु, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते सिस्टिटिसचे लक्षण देखील असू शकते. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात वेदना झाल्यास, आपण ताबडतोब रुग्णवाहिका बोलवावी नाळ सरकल्यामुळे असे होऊ शकते. दिवसाच्या शेवटी, वेदना वाढत आहेत असे तुम्हाला वाटले , तर तुम्ही नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योनिमार्गात वेदना कशामुळे निर्माण होतात?

गरोदरपणात योनिमार्गात वेदना होण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे वेळ आणि तीव्रतेनुसार क्षुल्लक किंवा गंभीर असू शकतात. काही कारणे खाली दिली आहेत.

1. गर्भाशयाचा आकार वाढणे

गरोदरपणात योनिमार्गात वेदना होण्याचे हे एक सामान्य कारण आहे. गर्भाला सामावून घेण्यासाठी गर्भाशयाचा आकार वाढतो. त्यामुळे योनी आणि आसपासच्या स्नायूंवर दबाव निर्माण होतो.

2. संप्रेरकांमधील बदल

गर्भधारणा हा अनेक संप्रेरक बदलांचा काळ असतो आणि त्यामुळे योनीमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. ह्या कोरडेपणामुळे विशेषतः लैंगिक संभोगादरम्यान योनिमार्गात वेदना होऊ शकतात.

3. गर्भाची वाढ

गर्भाशयातील गर्भाचा आकार जसजसा वाढत जातो, तसतसे पेल्विक क्षेत्रातील अस्थिबंधन देखील या वाढीला सामावून घेण्यासाठी ताणले जातात. त्यामुळे योनीच्या सभोवतालचे अस्थिबंधन आणि स्नायूंचा ताण वाढू शकतो, परिणामी तीक्ष्ण, तीव्र वेदना जाणवू शकतात. बाळाच्या वजनामुळे ओटीपोटावर दाब येऊ शकतो, आणि म्हणूनच योनीमध्ये वेदना होऊ शकतात.

4. संसर्ग

जर तुम्ही अनुभवत असलेली वेदना बाह्य जननेंद्रियाच्या क्षेत्राकडील भागात आणि योनीमध्ये असेल, तर त्याचे कारण त्या भागातील संसर्ग हे असू शकते. जर तुम्हाला शंका असेल की तुमच्या योनीला संसर्ग झाला आहे, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निदानाची पुष्टी करा. सर्वात सामान्य प्रकारच्या संसर्गास कॅंडिडा म्हणतात आणि त्याचा गर्भवती महिलांवर सहज परिणाम होतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते. कॅंडिडा संसर्गातून बरे होणे ही देखील एक खूप मोठी प्रक्रिया आहे, कारण गरोदरपणात कोर्टिसोन औषधे क्वचितच लिहून दिली जातात.

5. गर्भाशयाचे मुख उघडणे

गर्भाशयाचे मुख उघडल्यामुळे योनीमध्ये तीक्ष्ण आणि तीव्र वेदना होऊ शकतात. प्रसरण गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात होते, प्रसूती होण्यापूर्वी काही आठवडे असे होते. आणि ते चिंतेचे कारण नाही. तथापि, जर वेदना ओटीपोटाच्या खालच्या भागात असतील किंवा त्या वाढल्या असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6. पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स (पीओपी)

पीओपी ही गरोदरपणातील एक स्थिती आहे आणि त्यामुळे ओटीपोटातील किंवा त्याच्या जवळील अवयव कधी कधी योनी आणि गुदाशयाकडील भागाकडे सरकतात. जर योनीभोवतीचा दाब खरोखरच मजबूत असेल तर ते पीओपीचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला तीव्र दाब जाणवत असेल, तसेच तुमच्या आतड्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल किंवा तुमच्या योनीमार्गावर कशाचा तरी दाब आहे असे वाटत असेल, तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पीओपी उपचार करण्यायोग्य आहे, परंतु त्यामुळे गुंतागुंत आणि तीव्र वेदना होऊ शकतात.

गरोदरपणातील योनिमार्गाच्या वेदनांचा उपचार कसा करावा?

प्रत्येक गर्भवती स्त्रीला योनिमार्गातील वेदना कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर नक्कीच होतात, त्यामुळे गरोदरपणात योनिमार्गातील वेदना कमी कशा कराव्यात हे जाणून घेणे उपयुक्त ठरते. वेदना कमी करणारी औषधे तात्पुरती आराम देऊ शकतात, म्हणून नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

  • तुमच्या डाव्या कुशीवर झोपल्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारू शकते त्यामुळे योनिमार्गातील दाब कमी होतो.
  • तसेच, पाय उंच करून बसल्याने गरोदरपणात योनिमार्गावरील दाब मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि म्हणून, योनिमार्गात वेदना होतात.
  • काही स्त्रियांमध्ये, गरोदरपणात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो फक्त झोपून आणि नितंब उंच ठेवून स्त्रीला बरे वाटू शकते.
  • उबदार पाण्याने आंघोळ करणे हे योनिमार्गातील वेदनांवर एक उत्तम उपाय म्हणून काम करते.
  • पोहणे आणि योगासने यांसारख्या साध्या व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू बळकट होतात. ते योनिमार्गातील वेदना कमी करण्यासाठी बरेच काही करतील.
  • पेल्विक मसाज, जर वैद्यकीय सल्ल्यानंतर आणि प्रशिक्षित व्यावसायिकांच्या मदतीने केले तर, योनिमार्गातील वेदना कमी करण्यात आणि तुमच्या श्रोणीला आधार देण्यास मदत होऊ शकते.
  • केगल व्यायाम नियमित केल्याने योनिमार्गातील दाब आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
  • व्यायामामुळे नेहमी गरोदरपणात सक्रिय राहण्यास मदत होते. दररोज किमान ३० मिनिटे हलका व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील विविध प्रक्रियांचे नियमन तर होईलच, पण स्नायूंना बळकट करून योनीमार्गातील वेदना कमी होण्यास मदत होईल.
  • जर तुमचे पोट मोठे असेल, तर बाळाच्या डोक्यामुळे योनीवर दबाव येतो. प्रेग्नेंसी सपोर्ट बेल्ट घातल्याने तो दबाव कमी होतो.

गरोदरपणात योनिमार्गातील वेदना ही स्त्रियांमध्ये एक सामान्य समस्या असली तरीही त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते. जीवनशैलीतील काही बदल योनिमार्गातील वेदना कमी करण्यास मदत करू शकतात, परंतु जर तुम्हाला होणाऱ्या वेदना खूप तीव्र असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

आणखी वाचा:

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव
गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article