Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय

गरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय

गरोदरपणात उच्चरक्तदाबाचे नियमन करण्यासाठी १० नैसर्गिक उपाय

गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होणे सामान्य आहे, परंतु उच्चरक्तदाब कसा नियंत्रित करावा ही महिलांसाठी एक समस्या बनते. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमध्ये रसायने आणि विषारी घटक असतात, ज्याबद्दल आपण कधीच ऐकलेले नसते, म्हणूनच ह्या सारख्या सामान्य समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि त्या व्यवस्थापित करण्यासाठी नैसर्गिक उपाय निवडणे सुरक्षित आहे. काही नैसर्गिक उपचारांमध्ये आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचा समावेश आहे तसेच इतर वैकल्पिक औषध पद्धती असू शकतात जसे की चीनी वैद्यकशास्त्र किंवा तिबेटी वैद्यकशास्त्र इत्यादी. बहुतेक वैकल्पिक किंवा नैसर्गिक उपचारांमध्ये नियामक समिती नसते, त्यामुळे ही तंत्रे आणि उपचार वास्तविक आहेत की नाही हे जाणून घेणे कठिण आहे. म्हणूनच विशेषकरून तुम्ही गर्भवती असताना कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी सखोल संशोधन आवश्यक आहे. येथे तुम्ही गर्भवती असताना उच्चरक्तदाब व्यवस्थापित करण्यासाठी घरगुती उपचारांची यादी दिलेली आहे.

गरोदरपणात उच्च रक्तदाब (बीपी) साठी घरगुती उपचार

गरोदरपणात उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नैसर्गिक उत्पादने निवडताना तुम्ही आधी तुमचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणतेही पाऊल न उचलता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही गर्भवती असताना रक्तदाब कमी करण्याच्या काही पद्धती धोकादायक असू शकतात. परंतु तुम्ही गर्भवती नसाल तर हे उपचार सुरक्षित मानले जाऊ शकतात. आपल्या शरीरास मदत करण्याऐवजी आपल्या शरीरास हानी पोहोचवू नये यासाठी आपण या पद्धतींविषयी आपल्या डॉक्टरांशी संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, आम्ही शिफारस करतो की कोणतेही घरगुती उपचार, तुम्ही तुमची नेहमीची औषधे सुरु ठेवून करावेत.

. व्यायाम

घरी रक्तदाब व्यवस्थापित करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग म्हणजे व्यायाम. हा व्यायाम अत्यंत तीव्र नसावा आणि तो सुमारे ३० मिनिटांचा असावा. व्यायाम आपल्या शरीरास निरोगी राहण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत करतो. याव्यतिरिक्त, व्यायामामुळे स्नायू शिथिल होतात, आपल्या शरीरास आकार प्राप्त होतो आणि रक्त प्रवाह नियमित होतो. रक्तदाब नियमित राहण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. जीवनशैलीची आवश्यकता म्हणून हा उपाय केल्यास रक्तदाब पातळी स्थिर राखण्यास मदत होते. गरोदरपणात हे व्यायाम केल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते. वेदना आणि गरोदरपणात येणारा थकवा अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित होतो.

. मिठाचे सेवन नियंत्रित करा

रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुम्हाला बरे वाटण्यास मदत करण्यासाठी एक सर्वात नैसर्गिक मार्ग म्हणजे आपल्या आहारातून मीठ काढून टाकणे. तुम्ही गर्भवती असताना, तुमचे हार्मोन्स अत्यंत असंतुलित असतात, त्यामुळे रोगप्रतिकार प्रणालीस त्रास होतो आणि यामुळे आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्याची कार्यक्षमता देखील कमी होते. याचा अर्थ मीठ किंवा खारट पदार्थांवर प्रक्रिया करणे आणि पचन करणे अधिक अवघड होते. जर मीठ योग्य प्रकारे पचत नसेल किंवा आपल्या आहारात त्याचे प्रमाण जास्त होत असेल तर यामुळे रक्तदाब वाढू शकतो. मीठ कमी केल्याने गरोदरपणात आपल्या शरीराच्या उर्जा पातळीत वाढ होते आणि रोग प्रतिकारशक्ती चांगले कार्य करते. जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला आहारातून मीठ काढून टाकण्यास सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कमी प्रमाणात मिठाचे सेवन करण्याचं शिफारस करतो कारण मिठामध्ये अनेक नैसर्गिक खनिजे असतात आणि त्यामुळे मीठ योग्य प्रमाणात घेतल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते.

. केळी खा

केळी खा

गरोदरपणात दिवसातून एक किंवा दोन केळी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. केळी केवळ पचनास साहाय्य करत नाही तर ती पोटॅशियमने देखील समृद्ध असतात. ह्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या प्रत्येकासाठी ते अत्यंत निरोगी असते.

. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर किंवा एसीव्ही हे आरोग्यासाठी उपयुक्त घटकांपैकी एक आहे आणि कोलेस्टेरॉलची संतुलित पातळी राखण्यास मदत करते. हे रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते. पाश्चराईझ न केलेले एसीव्ही सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत चांगले मानले जाते. तरीही सावधगिरी बाळगा. तीव्र एसीव्ही अत्यंत ऍसिडिक असू शकते आणि त्यामुळे अन्ननलिकेला आणि पोटाला धोका पोहचू शकतो. त्याऐवजी तुम्ही दररोज एक चमचा एसीव्ही गरम पाण्यात आणि मधामध्ये घेतले पाहिजे.

. मॅग्नेशियम

२०११ मध्ये जर्नल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार, मॅग्नेशियम रक्तदाबाच्या समस्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. खरं तर, अलीकडे बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांनी सल्ला दिला आहे की गर्भवती महिलांनी मॅग्नेशियमयुक्त टोफू, अवोकाडो, केळी, बदाम आणि सोया दुधासारखे पदार्थ खावेत कारण मॅग्नेशियम केवळ रक्तदाब योग्य पातळीवरच राखण्यास मदत करत नाही तर त्याही पेक्षा मोठी भूमिका निभावते आणि ती म्हणजे गरोदरपणात गर्भाशय अकाली संकुचित होण्यापासून प्रतिबंधित करते.

. तणाव

आपण गर्भवती असता तेव्हा चिंता, नैराश्य आणि तणाव सामान्य असतात, हे देखील उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. तुम्हाला आराम करण्यास मदत करणार्‍या क्रियाकलापांचा सराव करा. गर्भवती महिलांनी दिवसातून कमीतकमी ३ वेळा ३० मिनिटांसाठी संगीत ऐकावे, गर्भपूर्व योगाभ्यास करावा आणि तणाव व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी मालिश करावी असे सांगितले जाते. हळुवार आणि लय असलेल्या संगीताची निवड करा. उदा: जाझ किंवा शास्त्रीय संगीत.

. अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा

अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा

गरोदरपंत अल्कोहोलची गुंतागुंत इतकी अफाट आहे की डॉक्टर तुम्हाला संपूर्ण कालावधीसाठी कोणतेही मादक पेये वगळण्याची शिफारस करतात, उच्च रक्तदाब यामागील अनेक कारणांपैकी एक आहे. मद्यपान केल्यामुळे गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते, जर तुम्हाला मद्यपान करायचे असेल तर आम्ही महिन्यात १० मिली वाइनची शिफारस करतो.

. धुम्रपान करू नका

मद्यपानाप्रमाणेच धुम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा आपल्या शरीरावर तीव्र दुष्परिणाम होत असतो, आपण गर्भवती नसतानाही कर्करोग, वजनवाढ, चिंता, नैराश्य आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. जेव्हा आपण गर्भवती असता, तेव्हा हे चौपट जास्त धोकादायक असते. म्हणूनच, आपण गर्भवती असताना धूम्रपान करणे चांगले नाही.

. कॅफिन टाळा

उच्च रक्तदाब होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅफिन होय, आम्ही अशी शिफारस करतो की निरोगी बीपी पातळी राखण्यासाठी आपण आपल्या गरोदरपणात कॅफिन मर्यादित ठेवा किंवा ते घेणे बंद करा.

१०. जंक फूड टाळा

जंक फूड सामान्यत: संरक्षकांनी भरलेले असते आणि आरोग्यासाठी अत्यंत वाईट असते. जंक फूड आपल्या लालसा तृप्त करते, परंतु पोषणाचा तो चांगला स्रोत नाही. तर, निरोगी राहण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी गरोदरपणात जंक फूड टाळा.

उच्च रक्तदाबावर हे १० घरगुती उपचार जनुकीय बीपीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी योग्य नाहीत, जर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला रक्तदाबाच्या औषधाची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर आम्ही औषधांना पूरक म्हणून या तंत्रांचा वापर करण्याची शिफारस करतो. आपल्या गरोदरपणात कोणताही नित्यक्रम जोडण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधोपचार सोडण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य रक्तदाब नियंत्रणासाठीही या पद्धती उत्तम आहेत. आम्ही जोरदारपणे शिफारस करतो की आपण रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या उपचारांशिवाय कोणताही उपाय करण्याआधी त्याची नीट माहिती घ्या कारण काही अनियमित तंत्रे आणि आहार आपल्यासाठी धोकादायक असू शकतात.

आणखी वाचा:

गरोदर असताना छातीत दुखणे – कारणे आणि उपचार
गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article