Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील मूळव्याधीवर २१ सर्वोत्तम घरगुती उपाय

गरोदरपणातील मूळव्याधीवर २१ सर्वोत्तम घरगुती उपाय

गरोदरपणातील मूळव्याधीवर २१ सर्वोत्तम घरगुती उपाय

मूळव्याध हा गरोदरपणाच्या अनेक दुष्परिणामांपैकी एक दुष्परिणाम आहे. गुदद्वाराच्या आसपासच्या भागातील शिरांना जेव्हा सूज येते तेव्हा मूळव्याध होतो. ह्या शिरा गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील भागात असू शकतात. गरोदरपणात मूळव्याध झाल्यास त्यामुळे खूप वेदना होऊन अस्वस्थता येऊ शकते. परंतु मूळव्याधीवर नैसर्गिक उपाय वापरून घरी उपचार केले जाऊ शकतात.

गरोदरपणातील मूळव्याधीवर २१ परिणामकारक नैसर्गिक उपचार

गरोदरपणात मुळव्याध कोणत्याही वेळी होऊ शकतो, परंतु बहुतेक स्त्रियांना मुळव्याधीचा त्रास होण्यास तिसऱ्या महिन्यापासून सुरुवात होते. गरोदरपणातील मूळव्याधासाठी काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ शकते.

. सफरचंद खा

सफरचंद हा तंतुमय पदार्थांचा एक चांगला स्त्रोत आहे आणि सफरचंदातील तंतुमय पदार्थ कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. सफरचंद सालीसहित खाल्ल्याने त्याचा खूप फायदा होतो. .गरोदरपणात मूळव्याध दूर ठेवण्यासाठी तुम्ही सफरचंद खावे तसेच त्याचा ज्यूस प्यावा अशी शिफारस केली जाते.

सफरचंद खा

. नियमित केळ्याचे सेवन करा

गरोदरपणात केळी खाल्ल्यास त्याचे खूप फायदे आहेत. केळी फक्त फॉलिक ऍसिड, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ चा समृद्ध स्त्रोत नाही तर गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. केळ्यामध्ये तंतुमय पदार्थ आणि पेक्टिन भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे पचन सुलभ होते. गरोदरपणात मूळव्याधीचा त्रास होऊ नये म्हणून केळ्याचे नियमितपणे सेवन केले पाहिजे.

. ब्रोकोली खा

ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड आणि बीटाकॅरोटीन ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ब्रोकोली जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत देखील आहे. ब्रोकोलीचे सूप करून किंवा तळून किंवा भाजून खाल्ल्यास गरोदरपणात मूळव्याध दूर ठेवण्यास मदत होते.

. संत्री खा

हे लिंबूवर्गीय फळ खूप पौष्टिक आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि फायबरची चांगली मात्रा असते. हे फळ म्हणजे गर्भवती स्त्रीच्या मूळव्याधीच्या त्रासावर एक चांगला नैसर्गिक उपाय आहे. जर तुम्हाला गरोदरपणात मधुमेह असेल तर संत्रे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.

. नारळ तेल लावा

नारळाच्या तेलामध्ये सूक्ष्मजीवविरोधी आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि मूळव्याधीचा त्रास असणाऱ्या स्त्रियांना ह्यामुळे बरे वाटू शकते. मऊ कापसाचा बोळा तेलात भिजवून तो प्रभावित भागात हळुवारपणे लावा. शौचास जाऊन आल्यावर लगेच नारळाचे तेल प्रभावित भागावर लावणे चांगले. तुम्ही दिवसातून २३ वेळा असे करू शकता.

. कोमट पाण्याने अंघोळ

कोमट पाण्याने आंघोळ केल्यास मूळव्याधीच्या भागातील जळजळ, खाज आणि वेदनांपासून आराम देतात. दोन वेळा बाथटब मध्ये अंघोळ करा किंवा प्रभावित भाग दिवसातून दोन वेळा १५२० मिनिटे बाथटब मध्ये ठेवा. असे केल्यास गुदाशयाजवळील भाग स्वच्छ राहण्यासही मदत होईल. भिजल्यानंतर मऊ वॉशक्लॉथ किंवा टॉवेलने कोरडे करा, कारण ओलसरपणामुळे जळजळ होऊ शकते किंवा खाज येऊ शकते. तुम्ही मूळव्याधीची सौम्य अँटिसेप्टिक क्रीम देखील लागू करू शकता ज्यामुळे तुम्हाला आणखी बरे वाटेल.

कोमट पाण्याने अंघोळ

. भोपळ्याचा आपल्या आहारात समावेश करा

भोपळा हा बीटाकॅरोटीन, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा उत्तम स्त्रोत आहे आणि गरोदरपणातील मूळव्याध बरा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. भोपळा ही एक अष्टपैलू भाजी आहे आणि तुम्ही विविध पदार्थांमध्ये तो अनेकप्रकारे वापरू शकता. तुम्हाला आवडेल त्याप्रकारे तुम्ही अन्नपदार्थांमध्ये भोपळ्याचा समावेश करू शकता.

. पेअर खा

गर्भवती स्त्रियांनी पेअर खाल्ल्यास त्यांना तंतुमय पदार्थ, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचा चांगला डोस मिळू शकतो. गरोदरपणात पेअर खाल्ल्याने केवळ मूळव्याधची लक्षणे कमी होणार नाहीत, तर गरोदरपणातील उच्च रक्तदाब, हातापायांची आणि चेहऱ्याची सूज कमी होण्यास सुद्धा मदत होईल. पेअर हा एक उत्तम नाश्ता सुद्धा आहे.

. आपल्या आहारात बीन्सचा समावेश करा

आपल्या आहारात बीन्सचा समावेश करून गरोदरपणातील मूळव्याध नियंत्रित ठेवा. गरोदरपणात मूळव्याध हाताळण्यासाठी सर्व प्रकारची बीन्स प्रभावी आहेत. बीन्स नैसर्गिक तंतुमय पदार्थानी समृद्ध आहेत त्यामुळे गरोदरपणातील मूळव्याधीवर तो एक नैसर्गिक उपचार आहे. बीन्स मधील तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत होते आणि ते गरोदरपणातील मधुमेहासाठी चांगले आहे.

१०. आपल्या आहारात रताळ्याचा समावेश करा

रताळे त्याच्या रेचक गुणधर्मांसाठी ओळखले जातात. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी प्रमाणात असते मूळव्याध टाळण्यासाठी उपाय शोधात असणाऱ्या स्त्रियांसाठी हा एक चांगला मार्ग आहे. जर तुम्हाला मधुमेह नसेल तर व्हिटॅमिन सी आणि अमिनो ऍसिडचा चांगला डोस मिळवण्यासाठी दररोज काही रताळे खा. रताळे पचनास मदत करू शकते परंतु एक लक्षात ठेवा की, दररोज १०० ग्रॅमपेक्षा जास्त रताळे खाल्ल्याने पोट फुगणे, लठ्ठपणा वाढून शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.

आपल्या आहारात रताळ्याचा समावेश करा

११. आपल्या आहारात बायोफ्लेव्होनॉईड्सने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा

गरोदरपणात मूळव्याधातून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बायोफ्लेव्होनॉईड्स समृध्द अन्नपदार्थांचा समावेश करू शकता. लिंबू, संत्री, पिकलेले पपई, ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरी, असे काही खाद्यपदार्थ आहेत जे बायोफ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहेत. मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी औषधे देखील प्रभावी ठरू शकतात, परंतु गरोदरपणात नैसर्गिक उपाय करणे हा चांगला मार्ग असतो. कारण तसे करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी सुरक्षित असते.

१२. आईस पॅक वापरा

मूळव्याधांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त नैसर्गिक उपाय म्हणजे आईस पॅक वापरणे. एक मऊ, स्वच्छ कापड घ्या, त्यात काही बर्फाचे तुकडे ठेवा आणि हळूवारपणे प्रभावित भागावर ठेवा. खाज, वेदना आणि दाह कमी करण्यासाठी बर्फ खूप प्रभावी आहे. मूळव्याधांशी संबंधित कोणत्याही अस्वस्थतेपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हा सोपा पण प्रभावी उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा.

१३. सक्रिय रहा आणि नियमित व्यायाम करा

चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे सक्रिय असणे आणि नियमितपणे व्यायाम करणे. गरोदरपणात हेच लागू होते. केगेल व्यायाम आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम गरोदरपणात मूळव्याधातून आराम देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. तथापि, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामाचा सराव करण्यापूर्वी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१४. ताज्या कोरफडीचा वापर करा

कोरफडीचे खूप चांगले उपचारात्मक गुणधर्म आहेत, आणि जर तुम्ही गरोदरपणात मुळव्याधाने ग्रस्त असाल तर बरे वाटण्यासाठी खूप मदत होते. मूळव्याधीवर कोरफड खूप चांगले कार्य करते. ताज्या कोरफडीचा वापर करा, बहुतेक सुपरमार्केटमध्ये कोरफडीचा गर उपलब्ध असतो किंवा सर्वात चांगले म्हणजे तुम्ही स्वतः घरी कोरफड लावा. कोरफडीच्या पानाची त्वचा सोलून घ्या, काळजीपूर्वक गर बाहेर काढा आणि दिवसातून दोनदा प्रभावित भागात लावा. बाजारात उपलब्ध असलेली सुगंधी कोरफड जेल आणि क्रीम वापरणे टाळा

१५. बटाटा वापरा

मूळव्याधामुळे होणारी कोणतीही जळजळ कमी करण्यासाठी बटाट्याचा छान उपयोग होतो. बटाटा धुवून सोलून घ्या आणि आणि थोडे पाणी लिंबाचा रस घालून किसून घ्या. बटाट्याच्या मिश्रणातून रस पिळून घ्या आणि त्यात कापसाचा बोळा भिजवा. हा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्रभावित भागात लावा. आपल्या आहारात बटाट्याचा समावेश केल्याने बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या देखील कमी होतील.

१६. तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा

लसणीमध्ये अनेक औषधी आणि उपचार गुणधर्म आहेत. लसणीमध्ये असलेले ऍलिसीन विविध संसर्गजन्य सूक्ष्मजीवांविरूद्ध लढण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. गरोदरपणात मूळव्याधांवर नैसर्गिक उपाय म्हणून, लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या सोलून ठेचून घ्या. नंतर हा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ४५ कप पाण्यात ठेवा आणि दोन मिनिटे उकळा. थंड झाल्यावर, हे मिश्रण गाळून घ्या आणि ते पाणी लावण्याआधी तो भाग कोरडा आहे ना ह्याची खात्री करा.

१७. मुळा खा

मुळा सूक्ष्मजीवांविरूद्ध लढण्यासाठी उपयुक्त आहे. मुळ्याची पेस्ट थोड्या दुधात बारीक करून घ्या. ही पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा प्रभावित भागात लावा. तुम्ही तुमच्या आहारात मुळा देखील समाविष्ट करू शकता कारण तो आहारातील तंतुमय पदार्थांचा समृद्ध स्त्रोत आहे. मुळा पचन सुलभ होण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतो.

१८. काळे जिरे वापरा

गरोदरपणात मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी काळे जिरे खूप प्रभावी आहे. काळ्या जिऱ्यामध्ये थायमोक्विनोनमध्ये दाहकविरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. काही चमचे किंवा मुठभर काळे जिरे घ्या आणि पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. ही पेस्ट गदूद्वाराच्या भागात लावा आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. कोमट पाण्याने तो भाग धुवा आणि कोरडा करा. मूळव्याधीच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून दोनदा पेस्ट लावा.

१९. ताजी फळे आणि भाज्या

मूळव्याधात आराम मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चांगला आहार घेणे. भरपूर ताजी फळे आणि भाज्या असणारा आहार घ्या. ताजी फळे आणि भाज्या केवळ तुमचे आणि बाळाचे पोषण करत नाहीत तर मुळव्याधीचा सामना करण्यास मदत करतात. मुळव्याधीपासून मुक्तीसाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात काही फळे आणि भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत आणि त्या म्हणजे द्राक्षे, संत्री, लिंबू, क्रॅनबेरी इत्यादी.

ताजी फळे आणि भाज्या

२०. तुमच्या दैनंदिन आहारात अधिक प्रोबायोटिक पदार्थ जोडा

गरोदरपणात मुळव्याधांशी लढण्यासाठी प्रोबायोटिक्स समृद्ध असलेले पदार्थ खाणे हा एक उत्तम मार्ग आहे. हे प्रोबायोटिक पदार्थ शरीरात अधिक चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. तसेच पोट चांगले राहण्यासाठी ते उत्तम आहेत. किमची, दही, चीज आणि कोंबुचा चहा हे काही खाद्य पदार्थ आहेत ह्यामध्ये प्रोबायोटिक्स चांगल्या प्रमाणात असतात.

२१. सुरक्षित रेचक वापरा

घरच्या घरी नैसर्गिक उपाय वापरून मूळव्याधीवर उपचार करता येतात. परंतु मूळव्याध किंवा मूळव्याधाशी संबंधित कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय मदत घ्या. वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास मूळव्याधीचे व्यवस्थापन करण्यास आणि पुढील गुंतागुंत टाळण्यास त्याची मदत होऊ शकते.

बद्धकोष्ठता हे मुळव्याधीचे मुख्य कारण आहे. तंतुमय पदार्थानी युक्त आहार नसल्यास मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. गरोदरपणात मूळव्याध पूर्णपणे टाळण्यासाठी, तसेच पोट साफ होण्यासाठी आणि पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी नियमितपणे इस्फागुला किंवा लैक्टुलोज सिरप वापरू शकता.

वर सोपे घरगुती उपाय नमूद केलेले आहेत आणि ते गरोदरपणातील मूळव्याध दूर करण्यास मदत करू शकतात. तसेच आरामदायक सुती कपडे घालणे, भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हे सुद्धा उपाय केल्यास मुळव्याधीपासून आराम मिळण्यास मदत होते

आणखी वाचा:

गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांसाठी १५ सर्वोत्तम घरगुती उपाय

गरोदरपणातील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article