Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

गॅस्ट्रोफेजियल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) ह्या समस्येला अपचन किंवा ऍसिड रिफ्लक्स म्हणून देखील संबोधले जाते. ही एक अतिशय सामान्य आणि पुनःपुन्हा उद्भवणारी स्थिती आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने लोअर ओसोफॅगियल स्फिंटर किंवा एलईएस नावाच्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू पोटाच्या जवळ, अन्ननलिकेच्या खालच्या भागात आढळतो. गरोदरपणात ही स्थिती अत्यंत सामान्य आहे. जरी ह्यामुळे काही धोका नसला तरी सुद्धा त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.

गर्भवती असताना छातीत जळजळ होते तेव्हा कसे वाटते?

छातीत जळजळ होणे ही समस्या संपूर्ण गरोदरपणात कधीही उद्भवू शकते. हा आजार बर्‍याच स्त्रियांना संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत त्रास देत असतो. तिसर्‍या तिमाहीत छातीत जळजळ आणि अपचन अधिक सामान्य होते कारण वाढत्या गर्भाशयामुळे आतडे आणि पोटावर दबाव येतो. पोटावर दबाव आल्याने अन्न पुन्हा अन्ननलिकेत परत येऊ शकते. अपेक्षेपेक्षा जास्त वजन वाढल्यास गर्भधारणेनंतर एक वर्षापर्यंत याचा अनुभव घेऊ शकता. गरोदरपणात जळजळ होण्याची लक्षणे खालीलप्रमाणे:

 • गिळताना तुम्हाला खूप त्रास होतो
 • तुम्हाला वारंवार तीव्र खोकला येतो
 • जेथे पोट आहे तेथे आपल्या उदरच्या वरच्या डाव्या बाजूला सतत वेदना होते
 • नाकातून द्रवपदार्थ बाहेर येतात (याला इंग्रजीत रेगर्गेटीशन म्हणतात)
 • तुमचा सतत घसा खवखवतो
 • तुमचा आवाज नेहमीच कर्कश येतो

टीपः गरोदरपणात छातीत जळजळ होण्यामुळे तुमच्या मुलाला इजा होणार नाही किंवा तुमच्या प्रसूतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

गरोदरपणात डिस्पेप्सियाची कारणे

आपल्या शरीरात एक झडप असते ज्यामुळे आपण नुकतेच खाल्लेले अन्न आणि पचनासाठी जबाबदार असणारे आम्ल राखण्यात मदत करते. जेव्हा ह्या झडपेची समस्या निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे छातीत जळजळ होते. आपल्या छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत. गरोदरपणात याचा आपल्यावर परिणाम होण्याची काही मुख्य कारणे आहेतः

 • प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक झडपांना शिथिल करू शकते यामुळे अंशतः पचलेले अन्न आणि पोटातील ऍसिड पुन्हा अन्ननलिकेत येते. त्यामुळे छाती आणि ओटीपोटात जळजळ होऊ शकते.
 • अपचन
 • मॉर्निंग सिकनेस
 • मॅक्रोसोमिया नावाची स्थिती (बाळाचा आकार खूप मोठा असेल तेव्हा पोटावर दाब पडून अन्न पुन्हा अन्ननलिकेत ढकलले जाते)
 • जर आपण एकापेक्षा जास्त बाळासह गर्भवती असाल तर (एका बाळामुळे पोटावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे अन्न आणि पोटातील आम्ल अन्ननलिकेत सोडले जाते)
 • उशीरा गर्भधारणा झाल्यास, आणि जर तुमचे बाळ पायाळू असेल तर छातीत जळजळ होऊ शकते (ह्यामुळे डायफ्रॅमवर अधिक दबाव येऊ शकतो आणि छातीत जळजळ होते).

गरोदरपणात डिस्पेप्सियाची कारणे

छातीत जळजळ अत्यंत दीर्घ कालावधीसाठी होत राहिल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला. हे प्रीएक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते. ही स्थिती उच्च रक्तदाब आणि लघवीतील प्रथिनांद्वारे दर्शविले जाते. आई आणि बाळ दोघांसाठीही हे खूप धोकादायक असू शकते.

गरोदरपणात छातीत जळजळ झाल्यामुळे काही गुंतागुंत निर्माण होते का?

ह्या स्थितीमुळे अन्ननलिकेस तात्पुरती सूज येऊ शकते ज्यामुळे ओईसोफॅगिटिस नावाची स्थिती उद्भवू शकते. आधी सांगितल्याप्रमाणे ऍसिड रिफ्लक्स हे प्रीएक्लेम्पसिया नावाच्या उशीरा गर्भधारणेच्या आजाराचे लक्षण असू शकते.

गर्भवती असताना ऍसिडिटीवर उपचार

छातीत जळजळ होण्याची प्रक्रिया अनेक तंत्रे आणि औषधे वापरून केली जाऊ शकते. या स्थितीचा उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेतः

 • होमिओपॅथीः औषधोपचार आणि थेरपीचा हा एक प्रकार आहे ज्यामध्ये छातीत जळजळ होण्यावर उपचार करण्यासाठी काही उपाय आहेत. कृपया लक्षात घ्या की ह्या उपायांमध्ये वैज्ञानिक पाठबळ नसते. आपण ही उपचारपद्धती वापरू इच्छित असल्यास, हि पद्धत वापरुन योग्य उपचारांची खात्री करण्यासाठी आपण पात्र आणि परवानाधारक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • अँटासिड्स: छातीत जळजळ होत असताना उपचार करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग म्हणजेच अँटासिड्स आहे. त्यामध्ये मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम असते, हे दोन्ही घटक जळजळ कमी करण्यास कारणीभूत असतात.
 • औषधे: काउंटरवर विकत घेता येणारी पॅंटोप्राझोल सारख्या औषधामुळे छातीत जळजळ होण्याच्या उपचारात प्रतिबंधक आणि व्यवस्थापकीय भूमिका दोन्ही निभावण्यास मदत होते.
 • फळांचे क्षार: आपण छातीत जळजळ होण्याकरिता फळांचे क्षार विकत घेऊ शकता जे जवळजवळ कोणत्याही फार्मसीमध्ये उपलब्ध आहे.

आपल्या बाळाला इजा होऊ शकेल कोणत्याही प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या.

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याचे घरगुती उपचार

जरी छातीत जळजळ होण्यावर औषधोपचार केले जाऊ शकतात, तरीसुद्धा घरीच विविध तंत्राचा वापर करून त्याचे व्यवस्थापन आणि उपचार देखील केले जाऊ शकतात. गरोदरपणात छातीत जळजळ होण्याचे काही लोकप्रिय नैसर्गिक उपाय येथे आहेतः

 • बबलगम लाळेच्या ग्रंथींना उत्तेजन देऊन बबलगम आपल्या शरीरात लाळ वाढविण्यास मदत करते. त्यामुळे पोटातील आम्ल नष्ट होते.
 • आल्याचा चहा आल्याचा कोमट काढा घशाला आराम पडण्यासाठी चांगला आहे. ह्यामुळे पचन, पोटातील आम्ल आणि घशाची खवखव कमी होते, तसेच हा काढा साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकते. जर रक्तस्त्राव होत असेल तर सावधगिरी बाळगा कारण ह्या काढ्यामुळे गोठण्याची क्रिया मंदावते.
 • डॅनडेलियन चहा हा आणखी एक नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे पोटातील ऍसिड नियंत्रित राहते. तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल तर हे वापरू नका कारण ह्यामध्ये बीपी औषधांमध्ये व्यत्यय आणू शकतील असे नैसर्गिक घटक आहेत.
 • कॅमोमाइल चहा ह्यामुळे पचनक्रिया सुधारते, तसेच हा काढा चिंता कमी करतो आणि पोटातील ऍसिडचा फैलाव नियंत्रितकरतो. तथापि, कॅमोमाइल चहा झोप येण्यास मदत करण्याऐवजी जागे राहण्यासाठी ओळखला जातो आणि आपल्याला निद्रानाश असल्यास हा चहा घेणे टाळावे
 • इसेन्शिअल ऑईल्स द्राक्ष, संत्री, लिंबू, लैव्हेंडर, रोझमेरी आणि नेरोलीह्यासारख्या आवश्यक तेलांचा शरीरावर शांत परिणाम होतो. शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी आणि शरीराच्या असंख्य समस्या, आणि त्यापैकीच एक छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
 • योगर्ट: योगर्ट खा किंवा एक ग्लास दूध घ्या

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याचे घरगुती उपचार

छातीत जळजळ होण्यावर इतर घरगुती उपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला, त्यांच्याबरोबर उपचारांच्या पर्यायांवर चर्चा करा आणि डॉक्टरी सल्ल्याशिवाय गर्भवती असताना कधीही उपचार सुरु करु नका

प्रतिबंध

छातीत जळजळ होणे धोकादायक नाही आणि त्यावर उपचार आहेत आणि ही समस्या व्यवस्थापित करता येते. पण तरीही ही समस्या होऊ नये म्हणून काळजी घेता येते. गरोदरपणात ऍसिडिटी कशी टाळता येईल ह्याविषयी महत्वाच्या टिप्स खाली देत आहोत.

 • धूम्रपान करू नका गरोदरपणात धूम्रपान केल्याने मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. धूम्रपान करणे हे छातीत जळजळ होण्याचे सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणून देखील ओळखले जाते कारण निकोटिनमुळे पोटात जास्त आम्ल होऊ शकते.
 • आहार बदलावा वारंवार थोडे थोडे खा आणि ते पौष्टिक असल्याची खात्री करुन घ्या आणि त्यात बरीच फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करा. तेलकट अन्न आणि पोटात त्रास होऊ शकणारे पदार्थ, जसे की कार्बोनेटेड पेये, मसालेदार पदार्थ आणि प्रक्रिया केलेले मांस टाळा. आपला आहार छातीत जळजळ होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते. आहाराचे नीट नियोजन केल्यास गरोदरपणात छातीत होणारी जळजळ टाळण्यास मदत होते.
 • कपडे आरामदायक कपडे घाला. कोणतीही गोष्ट खूप घट्ट झाल्याने पोटावर दबाव आणू शकते आणि पोटात आम्ल वाढू शकते. त्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होते.
 • सजलीत रहा चांगले हायड्रेटेड राहिल्यास आपल्या शरीरातील पाचन नियंत्रित करण्यात मदत होते आणि अन्न पुन्हा अन्ननलिकेत येत नाही आणि त्यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते.

छातीत होणारी जळजळ आणि त्याविषयी जाणून घेतल्याने ती नियंत्रित करणे, प्रतिबंधित करणे आणि त्यावर उपचार करणे सोपे जाते. तुमच्या पतीशी, काळजी घेणाऱ्या व्यक्तींशी आणि डॉक्टरांशी, असलेल्या स्थितीबद्दल बोलणे लक्षात ठेवा. ही स्थिती हानिकारक नाही आणि प्रतिबंधात्मक आहे. तुमच्यासाठी योग्य उपाय सापडेपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धती, उपाय करून पहा.

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते धोकादायक नाही आणि बाळाच्या जन्माच्या वेळी आणि बाळाच्या आरोग्यास त्याचा कुठलाही त्रास नाही.

आणखी वाचा:

गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार
गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article