Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात केसात कोंडा होणे: कारणे आणि उपाय

गरोदरपणात केसात कोंडा होणे: कारणे आणि उपाय

गरोदरपणात केसात कोंडा होणे: कारणे आणि उपाय

केसात कोंडा होणे ही काहीजणांच्या बाबतीत वेदनादायक स्थिती असू शकते आणि गरोदरपणात केसात कोंडा होण्याची समस्या म्हणजे आणखी एक पेच निर्माण होतो . गरोदरपणात डोक्यात कोंडा होण्याचे कारण आणि त्यावर उपाय शोधणे हे महत्वाचे आहे.

गरोदरपणात केसांमध्ये कोंडा होणे सामान्य आहे का?

डोक्यातील कोंडा एक टाळूसंबंधित समस्या आहे ज्याचा परिणाम म्हणजे डोक्याच्या त्वचेचे खवले निघतात आणि खाज सुटते. जरी हे अस्वच्छतेचे परिणाम नसले तरी बहुतेक लोकांना तसे वाटते. नवीन पेशी तयार करण्यासाठी मृत त्वचा गळून पडण्याची प्रक्रिया एक नैसर्गिक आहे आणि ती आपल्या आयुष्यात घडत असते. जेव्हा प्रक्रिया वेगवान होते तेव्हाच डोक्यावरच्या त्वचेचे खवले निघू लागतात आणि त्याला आपण कोंडा म्हणतो. गरोदरपणामुळे डोक्यात कोंडा होतो का? असा प्रश्न गर्भवती स्त्रिया डॉक्टरांना विचारतात. उत्तर सोपे आहे. गरोदरपणात केसात कोंडा होणे ही सामान्य गोष्ट आहे आणि गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांच्या डोक्यात कोंडा होतो. गर्भवती असताना आपल्याला डोक्यातील कोंडा होण्याची काही कारणे खाली दिली आहेत

  • मलाससेझिया नावाच्या यीस्ट (बुरशीचे) मुळे त्वचेवर तेलाचा स्राव आढळून आल्याने डोक्यात कोंडा होऊ शकतो.
  • रोगप्रतिकारक शक्तीचा अनियमित प्रतिसाद
  • पार्किन्सन रोग आणि नैराश्यासारख्या न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांमुळे डोक्यात कोंडा होऊ शकतो.
  • हार्ट अटॅकसारख्या तणावग्रस्त वैद्यकीय परिस्थितीतून बरे झाल्यानंतर
  • विशिष्ट औषधांचे सेवन

गरोदरपणात कोंडा होण्याचे कारण काय आहे?

त्वचेच्या पेशींची अत्यधिक वाढ झाल्यास कोंडा होतो. असे बऱ्याच कारणांमुळे होऊ शकते, त्यातील काहींचा तुमच्या गरोदरपणाशी संबंध नसेल. बऱ्याचदा ह्यासाठी हार्मोनल बदल जबाबदार असतात. चला याबद्दल सविस्तर चर्चा करूया.

. तेलाचे जास्त उत्पादन

गरोदरपणात, हार्मोनल बदल आपल्या त्वचेवर एकापेक्षा जास्त प्रकारे परिणाम करतात. या महिन्यांत, आपली त्वचा अधिक तेलकट होईल , त्यामुळे नवीन पेशींचे उत्पादन जास्त वेगाने होईल. तेलाचे थर वेगाने तयार होतील आणि त्यामुळे डोक्याची त्वचा खवल्यांनी झाकली जाईल.

. शाम्पू, तेल आणि कंडिशनर्सची वाढलेली संवेदनशीलता

गरोदरपणात डोक्यातील कोंडा हा हेअर ऑइल, शैम्पू आणि कंडिशनर सारख्या केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमुळे होतो. त्वचेचे खवले निघत असतात कारण तुमची त्वचा संरक्षणात्मक प्रतिसाद देत असते. जरी तुमच्या त्वचेला ह्या उत्पादनांची सवय असेल आणि तुम्ही गरोदरपणात शाम्पूचा ब्रँड बदललेला नसेल तरीसुद्धा तुमच्या डोक्याची त्वचा वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते आणि त्वचेचे खवले निघतात.

. शरीराची तीव्र प्रतिक्रिया

गरोदरपणात, एखाद्या स्त्रीचे शरीर अतिसंवेदनशील असते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे बुरशीजन्य संक्रमणाची शक्यता जास्त असते. गरोदरपणात, शरीर अतिसंवेदनशील बनते आणि स्वत: ला या सूक्ष्मजीवांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे टाळूवर खाज सुटते किंवा खवले तयार होतात.

गरोदरपणातील केसातील कोंड्यासाठी औषधी उपचार

गरोदरपणात कोंडा होण्याचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे शक्य आहे, परंतु योग्य तोडगा काढण्यापूर्वी तुम्हाला काही ट्रायल अँड एरर पद्धती सहन कराव्या लागतील. आवश्यक असल्यास आपल्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या विविध औषधांव्यतिरिक्त, जेव्हा केसात सौम्य कोंडा झालेला असतो तेव्हा नुसते शाम्पूने धुतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तथापि, औषधांचा वापरकर्त्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, म्हणून स्वत: ची स्वतः मनाने औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांना विचारून औषधे घेणे चांगले. अशी अनेक प्रकारची सामयिक क्रिम, जेल आणि स्प्रे उपलब्ध आहेत जे ह्या अवस्थेतून तुम्हाला आराम देऊ शकतात. ही औषधे केवळ वैद्यकीय देखरेखीखाली घेतले पाहिजेत आणि डोस व उपचारांच्या कालावधीकडे कडक लक्ष दिले पाहिजे.

गरोदरपणातील केसातील कोंड्यासाठी औषधी उपचार

मेडिकेटेड डँड्रफ शाम्पू वापरणे सुरक्षित आहे का?

जर ह्या समस्येवर नियमित शाम्पू कुचकामी ठरत असतील तर, मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या डॅन्डरफ शाम्पूचा पर्याय चांगला आहे. लक्षात ठेवा की सर्व डँड्रफ शाम्पू वेगवेगळे आहेत. तुमच्यासाठी कुठले शाम्पू अनुकूल आहेत हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळे शाम्पू वापरून पाहणे आवश्यक आहे. खूप खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा हा त्रास होत असल्यास त्याचा वापर थांबवा आणि त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या .

. केटोकोनाझोल शैम्पू

केटोकोनाझोल हा एक एंटीफंगल एजंट आहे. इतर शाम्पूचा उपयोग होत नाही तेव्हा हा शाम्पू लागू होतो. तुम्ही हा शाम्पू मेडिकल स्टोअर मधून विकत घेऊ शकता. परंतु तुम्ही डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यास सांगू शकता. तुम्ही वारंवार हा शाम्पू वापरल्यास तो बुरशीचा प्रतिरोधक बनतो. म्हणून डॉक्टरांनी सांगितल्यावरच तुम्ही हा शाम्पू वापरू शकता.

. पायरीथिओन झिंक शाम्पू

जस्त पिरिथिओन असलेल्या शाम्पू मध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. हा शाम्पू आपल्या टाळूवरील बुरशी कमी करू शकतो त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि सेब्रोरिक त्वचारोग होतो.

. सेलेनियम सल्फाइड शाम्पू

हे शाम्पू त्वचेच्या पेशी नष्ट होण्याची प्रक्रिया कमी करतात. हा शाम्पू बुरशीचा नाश प्रभावीपणे करतो. परंतु तुम्ही तुमचे केस शाम्पू केल्यानंतर चांगले धुतले पाहिजेत.

. टारबेस्ड शैम्पू

केस धुतल्याने तुमच्या टाळूवरच्या त्वचेच्या पेशी मरण्याची प्रक्रिया मंदावते आणि बंद पडते. कोळसा हे डांबर कोळसा उत्पादनाचे उपउत्पादन आहे आणि ते कोंडा, सेब्रोरिक डार्माटायटीस आणि सोरायसिस सारख्या परिस्थितीसाठी उपयुक्त आहे. हे शाम्पू वेगवेगळ्या टक्केवारीत उपलब्ध आहेत आणि त्या स्थितीच्या तीव्रतेनुसार ते वापरले जाऊ शकतात. आपले डॉक्टर आपल्या स्थितीच्या आधारावर औषधे लिहून देऊ शकतात.

गरोदरपणात डोक्यातील कोंड्याचा नैसर्गिकरित्या उपचार कसा करावा?

गरोदरपणात कोंडा झाल्यास खालील उपाय केल्यास त्याचा उपयोग तुमच्यासाठी होऊ शकतो. स्वत: साठी त्यांची प्रभावीता शोधून पहा.

. ऍपल सायडर व्हिनेगर

डोक्यातील कोंड्याच्या समस्येसाठी ऍपल सायडर व्हिनेगर हा एक नैसर्गिक उपाय म्हणून प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो. गरोदरपणातही पाण्याच्या समान भागामध्ये योग्य प्रमाणात मिसळल्यास ते हानिकारक ठरणार नाही. व्हिनेगरचा आंबटपणा टाळूची पीएच कमी करतो आणि कोंडा होण्यास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंना ते उपयुक्त नसते. एसीव्हीमध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे डोक्यातील कोंडा निर्माण करणारी बुरशी काढून टाकली जाते टाळू स्वच्छ होते. तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगरला दुप्पट पाण्यात मिसळून केस धुण्याआधी केसांना अर्धा तास आधी टाळूवर लावून ठेवू शकता.

ऍपल सायडर व्हिनेगर

. कोरफड

गरोदरपणात तुमची कोंड्याची समस्या कोरफडद्वारे सहजपणे सोडविली जाऊ शकते. कोरफडीमुळे खाज सुटणाऱ्या टाळूपासून प्रभावीपणे आराम मिळू शकतो. आर्द्रता प्रतिरोधक गुणधर्मांसह त्याची दाहकविरोधी क्रिया टाळूची नैसर्गिक आर्द्रता चांगली ठेवण्यास तसेच कोरडेपणा आणि कोंडा नियंत्रित करण्यात मदत करते. तिचे नैसर्गिकविरोधी बुरशीजन्य गुण कोंडा होण्यास कारणीभूत असणारे यीस्ट आणि बुरशी काढून टाकण्यास मदत करतात. कोरफड टाळूला शांत करून मॉइश्चराइझ करते, त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात. कोरफडीमध्ये डोक्यातील कोंडा आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी पुरेसे शक्तिशाली असे अनेक क्लींजिंग एन्झाईम्स असतात. कोरफड एक नैसर्गिक औषध म्हणून किंवा कोंडा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. उत्तम परिणामांसाठी शुद्ध कोरफड घेऊन थेट टाळूवर मालिश केली जाऊ शकते.

. लसूण आणि अर्गान तेल

लसणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते शाम्पू लावण्याआधी टाळूवर लावले जाऊ शकते. एका भांड्यात थोडी लसूण पेस्ट, ३ लवंगा आणि एक चमचा मध मिसळा. आणि हे थेट आपल्या टाळूवर तुम्ही चोळू शकता. हे टाळूमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यास आणि केसांमध्ये जमा होणारी धूळ आणि इतर अशुद्धी काढून टाकण्यास मदत करेल. आपण अर्गान तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण भिजवू शकता आणि एका भांड्यामध्ये ठेवू शकता. प्रभावीपणे कार्य करण्यासाठी लसणाचा चांगुलपणा आपल्या केसांपर्यंत आणि त्याच्या मुळांपर्यंत पोचण्यासाठी आठवड्यातून एकदाच याचा वापर करा.

. नारळ तेल

१०० मिली नारळाच्या तेलामध्ये १० मिली लीटर नीम तेल किंवा २ मिली टी ट्री तेल मिसळा. या दोघांचे मिश्रण टाळूवर रात्रभर सुरक्षितपणे लावा आणि सकाळी धुवून टाका. आपले केस स्वच्छ धुण्यापूर्वी तुम्ही हे २ तास तसेच ठेवू शकता. गर्भवती महिलांना डोक्यातील कोंडापासून मुक्त करण्यासाठी ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी आणि सर्वात सुरक्षित पद्धत आहे.

. समुद्री मीठ

तेलयुक्त शाम्पू मध्ये शुद्ध मीठ 2-3 चमचे घाला आणि टाळूवर लावून काढून टाका. एक्सफोलिएशन नंतर कंडिशनर वापरा. या उपचारांमुळे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यास मदत होईल आणि ते डोक्यातील कोंड्याचे कारण आहे.

समुद्री मीठ

गर्भवती असताना डोक्यातील कोंडा प्रतिबंधित करण्यासाठी टिप्स

रोग बरा करण्यापेक्षा बचाव करणे चांगले असल्याने प्रथम कोंडा टाळण्यासाठी पुरेशी पावले उचलावीत म्हणजे नंतर उपचारांचा त्रास टळेल. गरोदरपणात कोंडा होऊ नये म्हणून येथे काही उपयुक्त टिप्स आहेतः

  • तणाव व्यव्यवस्थापन करा: गरोदरपणा एक अवघड काळ आहे आणि त्यामुळे तणाव वाढू शकतो. आपल्या त्वचेवर विविध प्रकारच्या तणावाचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच, या काळात त्याचे व्यवस्थापन हे डोक्यातील कोंडामुक्त राहण्याची गुरुकिल्ली आहे.
  • आहार व्यवस्थापित करा: आहारात व्हिटॅमिन बी आणि झिंकचा समावेश करणे पूर्णपणे आवश्यक आहे कारण त्यामुळे केवळ त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण होण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि शरीरात चयापचय क्रिया कायम राहते. आपल्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठी केळी, अंड्यातील पिवळे बलक, मशरूम आणि फुलकोबीचा आहारात समावेश करा.
  • केसांची निगा राखणे: आपले केस आणि टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी शिफारस केलेले अँटीडँड्रफ शाम्पू वापरा. आपण बाहेर प्रवास करून आल्यानंतर आपले केस धुवा आणि केस धुण्यापूर्वी केसांना शाम्पू लावून ठेवा. आपले केस धुतल्यानंतर तुम्ही ते योग्यरित्या कोरडे केले आहेत हे सुनिश्चित करा, कारण ओलाव्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

केसांची निगा राखणे हा एक महत्वाचा भाग आहे आणि गरोदरपणात तर ते अगदी आवश्यक आहे. टाळू आणि केस स्वच्छ ठेवणे, योग्य आहार राखणे आणि तणाव पातळी कमीतकमी राखणे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

स्रोत अणि सन्दर्भ:
स्रोत १

आणखी वाचा:

गरोदरपणात घाम येणे
गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article