Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार

गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार

गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार

गरोदरपणात, स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे बदल घडून येत असतात. स्त्रीच्या स्तनांमध्ये सर्वात लक्षणीय बदल होत असतात. स्त्रीने स्तनपान देण्याची तयारी सुरु केल्यावर, शरीरात संप्रेरके तयार होण्यास सुरुवात होते त्यामुळे स्तन जास्त संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना देखील होतात. तुम्ही गर्भवती असताना तुमच्या स्तनांमध्ये कुठले बदल होतात ह्याविषयी ह्या लेखामध्ये माहिती दिलेली आहे.

गरोदरपणात स्तन दुखत असल्याचा अनुभव येणे सामान्य आहे का?

स्तनपानासाठी स्तन स्वतःला तयार करीत असल्याने स्तनांना सूज येणे किंवा ते हळुवार होणे खूप सामान्य आहे. दुखरे स्तन हे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. गरोदरपणाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर स्तनांमध्ये दुखू शकते.

गरोदरपणात स्तन दुखण्याची कारणे

 

स्तनातील वेदनांचे मुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ हे आहे. स्तनांमध्ये चरबीचा थर तयार होतो, दुधाच्या ग्रंथीमधील मालिकांची संख्या वाढते आणि या भागात रक्त प्रवाह देखील वाढतो. त्यामुळे स्तन जड आणि मोठे होतात आणि त्यामुळे स्तनांमध्ये वेदना आणि अस्वस्थता उद्भवते

गरोदरपणात स्तनांच्या वेदनांचे परिणाम

गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होतो. स्तन नाजूक आणि संवेदनशील बनतात, स्तनांवर साधे कपडे जरी घासले गेले तरी त्यामुळे स्तनांमध्ये वेदना जाणवतात. स्तनांमध्ये खालील लक्षणीय बदल जाणवतात.

. स्तनाग्रे

तुमची त्वचा जास्त ताणली जाऊन विस्तृत होते त्यामुळे, त्यामुळे तुमच्या स्तनाग्रांमध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ होते.

. स्तनाग्रांभोवतीचा भाग

स्तनाग्रांच्या सभोवतालच्या त्वचेला एरोलाचा म्हणून ओळखले जाते. त्वचेच्या ह्या भागाचा रंग आधीपेक्षा जास्त गडद होऊ शकतो. एरोलाचा आकार सुद्धा वाढलेला दिसेल. एरोलाच्या आजूबाजूला आपल्याला दिसणारे छोटे फोड ह्या घामाच्या लहान ग्रंथी आहेत (ज्याला मॉन्टगोमेरी ट्यूबरक्लल्स देखील म्हणतात) आणि संपूर्ण भागाला वंगण करतात.

. रक्तवाहिन्या

वाढती चरबी आणि दुधाच्या नलिकांना सामावून घेण्यासाठी आपल्या स्तनांभोवतीची त्वचा ताणली जाईल आणि तुम्हाला निळ्या रक्तवाहिन्यांचे विशाल जाळे दिसेल. या रक्तवाहिन्या बाळाला आवश्यक पोषक द्रव वाहून नेतात. आपल्या स्तनांमध्ये आपल्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात विलक्षण वेगवान वाढ दिसून येते किंवा गरोदरपणाच्या समाप्तीपर्यंत आकारात हळू हळू वाढ होते. जर तुमचीही पहिली गर्भधारणा असेल तर तुम्ही तुमच्या स्तनांच्या आकारात वाढीची अपेक्षा करू शकता. जर तसे नसेल तर बाळाच्या आगमनानंतर स्तनांच्या आकारात वाढ होईल.

गरोदरपणात दुखऱ्या स्तनांपासून आराम मिळण्यासाठी काय करावे

गरोदरपणात, विशेषत: पहिल्या तिमाहीत स्तनाची कोमलता किंवा त्यांना सूज येणे सामान्य आहे. गरोदरपणात स्तनांचा आकार बदलत राहतो आणि आपल्या बाळाचे पहिले जेवण म्हणजेच कोलोस्ट्रमचे उत्पादन झाल्यावर ही वाढ कमी होते. गरोदरपणात तुमच्या स्तनांच्या दुखण्यावर उपाय तर कराच परंतु त्याचसोबत, तुमच्या पतीला तुमच्या अस्वस्थतेबद्दल सांगून ठेवणे चांगले आहे जेणेकरून तो प्रणयादरम्यान दरम्यान किंवा मिठी मारतानाही पुरेशी काळजी आणि संयम साधू शकेल.

तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यावर तुमच्या स्तनांमधील कोमलता किंवा वेदना हळूहळू कमी होतील. तोपर्यंत, खालील टिप्स आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत करतील.

  • तुम्ही चालत असताना किंवा झोपेत असताना स्तनांच्या वेदनेमुळे तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते. म्हणूनच स्तनाना आरामदायक वाटण्यासाठी मॅटर्निटी ब्रा किंवा व्यायामाची ब्रा घेणे चांगले. तुम्हाला योग्य ब्रा मिळण्यासाठी जवळच्या दुकानाला भेट द्या.
  • तुमच्या स्तनांचा आकार सतत बदलत असतो त्यामुळे गरोदरपणात तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा ब्रा घेण्याची आवश्यकता असू शकते.
  • वायर असलेल्या ब्रा टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

नैसर्गिक घरगुती उपचार

  • गर्भवती स्त्रियांमध्ये स्तनांच्या वेदनांचा एक सर्वात सामान्य उपाय म्हणजे पाण्याचे प्रमाण वाढविणे. पाणी धरून ठेवले गेल्यामुळे स्तनांमध्ये तीव्र वेदना होतात हे सर्वांना माहिती असते. दिवसा पुरेसे पाणी पिण्यामुळे अतिरिक्त द्रव आणि संप्रेरक बाहेर पडण्यास मदत होईल. आपण आपल्या पाण्यात आले किंवा लिंबू देखील घालू शकता कारण यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
  • तात्पुरत्या काळासाठी आहारात सोडियमचे सेवन कमी केल्याने स्तनातील वेदना व्यवस्थापित करण्यास मदत होते. तथापि, रक्ताची मात्रा वाढविण्यासाठी मीठाचा वापर करणे आवश्यक आहे, म्हणून आहारात कोणतेही महत्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तंतुमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोत, म्हणजेच जवस, स्तनांमधील वेदना कमी करण्यासाठी ओळखले जातात. एक चमचा जवसाची पूड पाणी, फळांचा रस किंवा दह्यात मिसळून दिल्यास चांगला आराम मिळू शकतो. आपल्या आहारात व्हिटॅमिन आणि खनिज समृद्ध पदार्थ ह्याचा समावेश केल्यास गरोदरपणात स्तनांचा त्रास देखील कमी होतो.

औषधोपचार

आपण एसीटामिनोफेन आणि नॉनस्टेरॉइडल एंटीइंफ्लेमेटरी ड्रग्ज जसे कि ऍस्पिरिन, आयबुप्रोफेन आणि नेप्रोक्झेन इत्यादी औषधे वापरुन गरोदरपणात होणारा स्तनांचा त्रास कमी करू शकता. हि नॉनप्रिस्क्रिप्शन औषधे आहेत, परंतु आपण औषध खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते.

गरोदरपणात, तुमच्या शरीरात खूप बदल होतील. ताण, वेदना आणि शारीरिक श्रम टाळा आणि मदत मागण्यासाठी जराही संकोच करू नका.

आणखी वाचा:

गरोदरपणातील डोकेदुखीवर ११ परिणामकारक घरगुती उपाय
गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article