Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी बाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का?

बाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का?

बाळाला पोटात असताना उचकी लागणे – हे सामान्य आहे का?

गरोदर स्त्रीच्या पोटात बाळाचा विकास होत असताना तिच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमचे पोटातील बाळ मोठे होत असताना तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या हालचाली जाणवतील. जसजसे तुमचे गर्भारपणाचे दिवस सरतील तसे ह्या हालचाली अधिक तीव्र होतील. बाळाचे पाय मारणे तुम्हाला जाणवू शकते तसेच त्यासोबत तुम्हाला पोटात पेटके सुद्धा जाणवतील. बाळ आतून पाय मारत आहे असे तुम्हाला वाटू शकते परंतु बाळाला तेव्हा उचक्या लागत असतात. गरोदरपणात पोटात छोट्या आणि तालबद्ध हालचाली (किंवा बाळाची उचकी) अनुभवणे सामान्य आहे, परंतु ह्या बाळाच्या हालचाली आहेत किंवा उचकी हे ओळखणे कठीण आहे. तर, गर्भाशयातील बाळाला उचकी का लागते आणि बाळ पाय मारत आहे कि त्याला उचकी लागत आहे ह्यामधील फरक कसा ओळखायचा ते ह्या लेखामध्ये दिलेले आहे.

पोटातील बाळाला उचकी का लागते?

पोटातील बाळाला उचकी का लागते ह्याचे अचूक कारण डॉक्टरांना माहिती नाही. सर्व बाळांना गर्भाशयात असताना उचकी लागत नाही. गर्भाशयात असणाऱ्या बाळाला उचकी लागणे हे फुप्फुसाच्या विकाराशी संबंधित आहे असे मानले जाते परंतु ते अद्याप सिद्ध झालेले नाही. गर्भाशयातील सर्व नवीन गोष्टींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळाला उचकी लागू शकते. बाळ गर्भाशयात असताना जेव्हा त्याला उचकी लागते तेव्हा बाळ विकासाचे टप्पे वेळेवर पूर्ण करत असल्याचे ते लक्षण असते तसेच बाळाची प्रगती नीट होत आहे हे सुद्धा त्यावरून समजते. गरोदर असताना, तुम्हाला बाळाची उचकी जाणवत असल्यास तुम्हाला काळजी वाटू शकते, परंतु गर्भाशयात असताना बाळाला उचकी का येऊ शकते याची कारणे डॉक्टरांनी शोधली आहेत आणि ती कारणे खालीलप्रमाणे

. संकुचित डायफ्राम

लहान मुले आणि मोठ्या माणसांना जशी उचकी लागते तशीच गर्भाशयातील बाळाला लागते. गर्भामध्ये, डायफ्रामचे तीव्र आकुंचन किंवा पेटक्यांमुळे अचानक उचकीला सुरुवात होते डायफ्राम म्हणजे फुफ्फुस आणि ओटीपोट ह्यांच्या मधील पडदा होय. गर्भाशयातील बाळ गर्भपिशवीमधील गर्भजल आत घेते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून उचकी लागते. मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासानंतर, गर्भजल बाळाच्या फुफ्फुसातून आत आणि बाहेर वाहते त्यामुळे डायफ्रॅम आकुंचन पावतो.

. नाळ दाबली जाणे

एक चिंताजनक आणि अत्यंत गंभीर वैद्यकीय स्थिती आहे आणि ह्या स्थितीमध्ये बाळाला उचकी लागण्याची शक्यता असते. ह्या स्थिती मध्ये बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळली जाते. असे सहसा गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत होते.

गरोदरपणात, तुम्हाला उचकीचे वेगवेगळे नमुने समजू शकतात. जर तुम्हाला अनियमितता किंवा उचकीच्या कालावधीत बदल दिसला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या घटनेतील उचकी सामान्यतः तुमच्या बाळाला पुरेशी किंवा अजिबात हवा उपलब्ध नसल्यामुळे येते. बाळाला उचकी येण्याच्या नमुन्यामध्ये तुम्हाला तीव्र बदल जाणवला किंवा बाळ गर्भाशयात आतून पाय मारत असल्याचे तुम्हाला जाणवल्यास तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

पोटातील बाळाला उचकी का लागते?

गर्भाशयातील बाळाला उचकी लागणे सामान्य आहे का?

गर्भाशयातील बाळाला नियमितपणे आणि बराच काळ उचकी लागू शकते. तथापि, तुम्ही फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीपासून त्याचा अनुभव घेण्यास सुरुवात करू शकता. परंतु निश्चितपणे काहीही सांगता येत नाही, सर्व स्त्रियांना वेगवेगळ्या वेळी गर्भाच्या हालचाली आणि बाळाची उचकी जाणवते.

काही बाळांना खूप वेळा उचकी लागते किंवा काही बाळांना अजिबात उचकी लागत नाही. डॉक्टरांच्या मते, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासूनच बाळांना उचकी लागण्यास सुरुवात होते परंतु बाळांचा आकार लहान असल्यामुळे गर्भवती महिलांना ह्या हालचाली लक्षात येत नाहीत. तुम्हाला गर्भाशयात बाळाची हालचाल जाणवत असेल किंवा बाळाला उचकी येत असल्याचा अनुभव तुम्ही घेत असाल तर तुमच्या बाळाचा विकास चांगला होत असल्याचे ते लक्षण आहे. परंतु, जर गरोदरपणाच्या ३२ आठवड्यांनंतर तुम्हाला बाळाची उचकी जाणवली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण ते कुठल्यातरी समस्येचे लक्षण असू शकते.

बाळाला साधारणपणे उचकी लागण्यास केव्हा सुरुवात होते?

तुमच्या बाळाला गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीपासूनच उचकी लागण्यास सुरवात होते परंतु ते तुमच्या लक्षात येणार नाही कारण तेव्हा तुमचे बाळ खूप लहान असेल. परंतु गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत बाळाला उचकी लागत आहे हे स्पष्टपणे तुमच्या लक्षात येईल.

बाळाची उचकी आणि बाळाचे पाय मारणे ह्या दोन्ही मधील फरक कसा ओळखाल?

सुरुवातीला,बाळाला उचकी लागल्यास, बाळ पाय मारत आहे कि बाळाला उचकी लागत आहे हे तुम्हाला समजत नाही. परंतु तुम्ही बाळांच्या हालचालींचा एकदा अभ्यास केल्यावर तुम्हाला बाळाची उचकी आणि पाय मारणे ह्या दोन्ही मधील फरक समजू शकेल. आणि ह्या दोन्हींमधील फरक समजण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे थोडी हालचाल करणे.

तुम्हाला पोटात बाळाच्या हालचाली जाणवतील आणि तुम्ही स्थिती बदलल्यास त्या थांबतील. जर तुम्ही पूर्णपणे शांत बसलात आणि तुमच्या पोटाच्या एका भागातून धडधड किंवा लयबद्ध हालचाल जाणवत असेल तर ते तुमच्या बाळाला उचकी लागल्याचे लक्षण असू शकते. या हालचालींची सवय होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, परंतु ह्या हालचाली तुम्ही लवकर ओळखू शकाल.

बाळाची उचकी आणि बाळाचे पाय मारणे ह्या दोन्ही मधील फरक कसा ओळखाल?

गर्भाशयातील बाळाला येणारी उचकी कशी थांबवावी?

काही आठवड्यांनंतर, तुम्ही तुमच्या बाळाची उचकी ओळखण्यास शिकाल. जरी बाळासाठी ही उचकी वेदनादायक नसली तरी सुद्धा त्या विचलित करणाऱ्या असू शकतात. गर्भाशयातील बाळाला १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ उचकी लागू नये परंतु बाळाची उचकी जास्त काळ टिकली तर तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. तुमच्या बाळाच्या उचकीमुळे तुम्हाला शांत बसणे आणि आराम करणे कठीण होऊ शकते. बाळाला लागणारी उचकी कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, परंतु गर्भाशयात बाळाला उचकीपासून रोखण्यासाठी कोणताही मार्ग नाही. डॉक्टर त्यासाठी सहसा खालील गोष्टी सुचवतात.

  • झोपताना डाव्या कुशीवर झोपा
  • पौष्टिक अन्न खा. तुमच्या आहारात प्रथिनांनी युक्त अश्या अन्नाचा समावेश करा कारण त्यामुळे तुमच्या बाळाला बरे वाटण्यास आणि गर्भाशयातील उचकी कमी होण्यास मदत होऊ शकते
  • भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. काहीवेळा, शरीरात द्रव नसल्यामुळे बाळाला उचकी लागू शकते
  • पुरेशी झोप घ्या
  • गरोदरपणात बाळ किती वेळा पाय मारते तसेच त्याचा कालावधी मोजल्यावर तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली आणि त्याच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्यास मदत होऊ शकते.

तुम्ही काळजी केव्हा केली पाहिजे?

बाळाच्या उचकीमध्ये आणि हालचालींमध्ये अचानक वाढ झाली आहे असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या बाळाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तुमचे डॉक्टर बहुधा अल्ट्रासाऊंड करून घेण्याचे सुचवतील. जितक्या लवकर तुमच्या लक्षात ही लक्षणे येतील तितके चांगले.

गरोदरपणात बाळ पाय मारते आहे का किंवा बाळाला उचकी लागत आहे का किंवा आणखी काही समस्या आहे का हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचालींची योग्य कल्पना असेल तर तुमची चिंता कमी होईल. तुमचे गर्भारपण निरोगी असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही नियमितपणे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नऊ महिन्यांत स्वतःची चांगली काळजी घ्या. तुमचे बाळ निरोगी आणि आनंदी होईल!

आणखी वाचा:

गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय
गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article