Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) मुलांनी रात्री झोपेत अंथरूण ओले करणे (नॉक्टर्नल एन्युरेसिस)

मुलांनी रात्री झोपेत अंथरूण ओले करणे (नॉक्टर्नल एन्युरेसिस)

मुलांनी रात्री झोपेत अंथरूण ओले करणे (नॉक्टर्नल एन्युरेसिस)

रात्री अंथरुणात शू करणे ही समस्या लहान मुलांमध्ये आढळते. इंग्रजीमध्ये ह्यास ‘नॉक्टर्नल एन्युरेसिस’ असे म्हणतात. ही समस्या असल्यास लहान मुले झोपेत शू करतात. पालक म्हणून तुम्ही जास्त घाबरण्याची गरज नाही. ही एक सामान्य घटना आहे. योग्य काळजी घेऊन आणि प्रेमाने हाताळली जाऊ शकते.

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा बेडवेटिंग म्हणजेच अंथरुणात लघवी करणे म्हणजे काय?

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा अंथरुण ओले करणे, म्हणजेच झोपेत लघवी करणे होय. असे होण्यामागे कोणतीही भावनिक समस्या किंवा कोणताही शारीरिक आजार नसतो. ५ ते १०% अंथरूण ओले करण्याच्या समस्यांमागे विशिष्ट वैद्यकीय कारण असू शकते. परंतु, त्यामागे वैद्यकीय इतिहास असू शकतो.

ही समस्या असणाऱ्या मुलांच्या पालकांना सुद्धा त्यांच्या लहानपणी ही समस्या असल्याची शक्यता असू शकते. मूल पाच वर्षे किंवा थोडे मोठे असल्याशिवाय अनेक पालक किंवा डॉक्टर सुद्धा निदानासाठी ह्याचा विचार करत नाहीत. एन्युरेसिस ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रासदायक ठरू शकते.

मुलामध्ये नॉक्टर्नल एन्युरेसिस ही समस्या असल्यास काही वेळा ते कुठल्या तरी आजाराचे लक्षण असू शकते.

नॉक्टर्नल एन्युरेसिसची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • वारंवार अंथरुण ओलावणे
  • कपडे ओले करणे
  • अंदाजे तीन महिने आठवड्यातून किमान दोनदा अंथरुणात शू करणे

मुलांमध्ये नॉक्टर्नल एन्युरेसिस किती सामान्य आहे?

मुलांनी अंथरुणात शू करणे ही एक सामान्य समस्या आहे. सुमारे ७% मुलांमध्ये आणि ३% मुलींमध्ये ही समस्या आढळते. ही मुले साधारणतः पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाची असतात. वयाच्या १० व्या वर्षी ही संख्या पुरुषांमध्ये ३% आणि मुलींमध्ये २% पर्यंत खाली घसरते. मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांच्या किशोरवयीन वर्षांमध्ये ही समस्या वाढलेली दिसते आणि सुमारे १% मुले आणि मुलींना १८ व्या वर्षी हा विकार होतो.

अंथरूण ओले करण्याचे प्रकार

नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा बेड वेटिंगचे दोन प्रकार आहेत –

1. प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस (पीएनइ)

अंथरुण ओले करणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. जन्मल्यापासून ६ महिन्यांपर्यंत लहान मुले अंथरुणात शू करत असतात. हे वारंवार होते आणि त्याचा लहान मुलांवर परिणाम होतो. पुढे जाऊन हे प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये विभागले जाऊ शकते. प्राथमिक नॉक्टर्नल एन्युरेसिस फक्त रात्री उद्भवते आणि दैनंदिन एन्युरेसिस हे दिवसा उद्भवते. ह्यामध्ये निकड, वारंवारता किंवा दिवसा अंथरूण ओले होणे इत्यादी लक्षणे आढळतात. हा एक विकासात्मक विलंब आहे आणि तो कालानुरूप बरा होऊ शकतो. आहारामुळे मुलांमधील एन्युरेसिसवर परिणाम होऊ शकतो.

2. दुय्यम नॉक्टर्नल एन्युरेसिस (एसएनई)

आधी कमीत कमी ६ महिने कधीही झोपेत लघवी न करणाऱ्या मुलाकडून झोपेत अनैच्छिकपणे लघवी होते. मूत्राशयाच्या संसर्गामुळे असे होऊ शकते.

अंथरुण ओले होण्याची कारणे

नॉक्टर्नल एन्युरेसिसची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. प्रायमरी बेडवेटिंग

ह्यामध्ये लहान मुलाचे झोपेत मूत्राशयावर नियंत्रण नसते, त्यामागे खालील कारणे असू शकतात.

  • मुलाचे शरीर अद्याप विकसित होत आहे किंवा त्याला मूत्राशयाच्या समस्या असू शकतात.
  • मूल रात्रभर लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
  • जेव्हा त्याचे मूत्राशय भरलेले असते तेव्हा मूल जागे होत नाही.
  • संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मूल लक्षणीय प्रमाणात लघवी तयार करते.
  • मुलास शू ला जाण्याच्या चांगल्या सवयी लावलेल्या नसतात. मुलं लघवी करण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात आणि लघवीला जाण्याचे बराच काळ पुढे ढकलतात. मुलाच्या चेहऱ्यावरील ताण, अंग वेडेवाकडे करणे, उभे राहताना एका पायावर उभे राहणे इत्यादी अभिव्यक्तींद्वारे मूल मूत्र रोखण्याचा प्रयत्न करीत आहे हे पालकांना समजते.
  • कॅफिन आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ वापरल्यामुळे मूत्र उत्पादनात वाढ.
  • दीर्घकालीन बद्धकोष्ठता आणि पॅन्ट ओली असणे

अंथरुण ओले होण्याची कारणे

2. सेकेंडरी बेडवेटिंग

आधी किमान १२ महिने झोपेत शू न केलेल्या मुलाने झोपेत शू केल्यास तो सेकेंडरी बेडवेटिंगचा प्रकार असू शकतो. मुलाच्या वयाच्या वाढीसह त्याचे प्रमाण वाढते. त्यामागे खालील करणे असू शकतात.

  • मूत्रमार्गाचा संसर्ग: यामुळे जळजळ होते, लघवी करण्याची तीव्र इच्छा होते आणि वारंवार लघवी होते. काही शारीरिक विकृतीमुळे देखील संसर्ग होऊ शकतो.
  • मधुमेह: मधुमेह असलेल्या कोणामध्येही लघवीचे प्रमाण वाढलेले असते.
  • शारीरिक विकृती: अवयव, स्नायू किंवा मज्जातंतू किंवा इतर कोणत्याही मूत्र समस्या असल्यास असे होऊ शकते.
  • न्यूरोलॉजिकल समस्या: जर मज्जासंस्थेमध्ये दोष, दुखापत किंवा रोग असेल तर त्यामुळे न्यूरोलॉजिकल असंतुलन होऊ शकते आणि त्याचा लघवीवर परिणाम होतो.
  • सामाजिक किंवा मानसिक तणाव: पालकांमधील संघर्षांमुळे उद्भवलेल्या कौटुंबिक जीवनातील तणावामुळे मुले अंथरुण ओले करू शकतात. जीवनशैलीतील बदल, उदा: शाळा सुरू होणे  किंवा घर बदलणे हे अंथरूण ओले होण्याचे कारण असू शकते. शारिरीक किंवा लैंगिक शोषण झालेली मुले देखील अंथरुण ओले करू शकतात.
  • आनुवंशिकता: एन्युरेसीस अनुवांशिक असू शकते, म्हणजेच पालकांना त्यांच्या लहान वयात ही समस्या असेल तर त्यांच्या मुलांना देखील ही समस्या होऊ शकते.

नॉक्टर्नल एन्युरेसिस होण्यामागील जोखीम घटक

1. प्रायमरी बेडवेटिंग

प्रायमरी बेडवेटींग हे मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. प्रत्येक वर्षी १५% मुले ह्या समस्येतून बरी होतात.

  • सुरुवातीला अंथरुण भिजण्यामागे अनुवांशिक कारण असते.
  • काही लोक जागे असताना अपघाताने लघवी करू शकतात. हे काही शारीरिक समस्यांशी संबंधित आहे.
  • ज्या मुलांकडे लक्ष कमी आहे आणि अतिक्रियाशील आहेत त्यांची अंथरुणात शू करण्याची अधिक शक्यता असते
  • अव्यवस्थित कुटुंबात राहणारी मुले.

2. सेकेंडरी बेडवेटिंग

  • कौटुंबिक समस्या उदा: पालकांचा घटस्फोट किंवा मृत्यू
  • शारीरिक अत्याचार आणि निष्काळजीपणा
  • त्यांना ‘कंफ्युजनल आरोझल्स’ म्हणून ओळखले जाणारे विकार देखील असू शकतात, ह्यामध्ये लहान मूल गाढ झोपेत असताना जागे होते. यामुळे मुलाला विचित्र ठिकाणी लघवी होते. सेकेंडरी बेड वेटिंगची समस्या कोणत्याही वयात उद्भवते.

निदान

ह्या समस्येचे योग्य निदान होण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

  • एन्युरेसिसच्या कारणांमध्ये मणक्याची समस्या (न्यूरोजेनिक ब्लॅडर, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि मुलांमध्ये पोस्टरीअर युरेथ्रल व्हॉल्व्ह आणि मुलींमध्ये एक्टोपिक मूत्रमार्गाशी संबंधित समस्या ) यांचा समावेश असू शकतो. या व्यतिरिक्त, ज्या मुलांना दीर्घकालीन बद्धकोष्ठता आणि एन्कोप्रेसिस (चड्डीमध्ये शू करणे) ची समस्या आहे त्यांच्यामध्ये हा त्रास दिसून येतो.
  • मुलांचा कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता आणि वैद्यकीय इतिहासाबद्दल काळजीपूर्वक आणि तपशीलवार प्रश्न विचारले पाहिजेत. ह्यामुळे एन्युरेसिसचा प्रकार आणि त्याचे संभाव्य कारण निश्चित होण्यास मदत होते.
  • अनेकदा पालकांना त्यांच्या मुलाच्या झोपेत शू करण्याच्या सवयीची पूर्ण जाणीव नसते. मुलाने दिवसा आणि रात्री किती वेळा अंथरुण ओले केले याचा मागोवा ठेवण्यासाठी त्यांना एक डायरी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
  • मुलाची शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, अंथरुणात लघवी करण्याचे कारण डॉक्टरांनी शोधून काढणे आवश्यक आहे.
  • मूत्रविश्लेषण केले पाहिजे कारण त्यामुळे लघवीचा संसर्ग शोधून काढण्यास मदत होते. परिणाम काही वैद्यकीय समस्या दर्शवत असतील, तर पुढील तपासणी (सिस्टोरेथ्रोग्राम आणि रेनल अल्ट्रासाऊंडद्वारे) केली पाहिजे.
  • मुलांनी अंथरूण ओले करणे खूप तणाव वाढवणारे असू शकते. परंतु काही दिवसांनी ही समस्या आपोआप कमी होते. ह्या समस्येमुळे मुलामध्ये लाजिरवाणेपणा आणि अपराधीपणाची भावना आणि चिंता निर्माण होते. या काळात पालकांनी मुलाला भावनिक आधार दिला पाहिजे.

मूल अंथरूण ओले करणे कधी थांबवते असा विचार जर तुम्ही करत असाल, तर सात वर्षांची सुमारे ९०% मुले स्वतःच अंथरुण ओले करणे थांबवतात. बहुतेक डॉक्टर सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर नियमितपणे उपाय सुचवत नाहीत. झोपेत लघवीला लागली आहे हे मुलांना शिकवणे हा पॉटी प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा असतो. म्हणून, शिकण्याच्या प्रक्रियेत मुले झोपेच्या वेळी अंथरूण ओले करतात.

निदान

मुलांच्या अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर उपचार

1. मुलाची वाढ होत असताना त्याने अंथरुणात शू कारणे सामान्य आहे. लहान मुलांच्या ह्या समस्येवर खाली काही उपाय दिलेले आहेत ते तुम्ही वापरून पाहू शकता.

2. मुलांसाठी बेडवेटिंग अलार्म देखील आहेत आणि उपयुक्त ठरू शकतात.

3. मुलांना मूत्राशयाचा व्यायाम (स्नायू बळकट करणे आणि मूत्राशय स्ट्रेचिंग) शिकवल्याने लघवी बाहेर पडण्यावर नियंत्रण ठेवता येते आणि मूत्राशयाची क्षमता वाढू शकते. मुलांनी पेल्विक स्नायूंना सुमारे पाच-दहा सेकंद घट्ट करावे आणि नंतर पाच सेकंद आराम द्यावा. हा व्यायाम दिवसातून तीन वेळा केला पाहिजे. जेव्हा मुलांना लघवीला लागते तेव्हा तुम्ही त्यांना  वॉशरूममध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्यास मुलाला दिवसा अंथरुण ओले करणे टाळण्यास आणि रात्रीच्या वेळी वारंवारिता कमी करण्यास मदत होईल. मूत्राशयाला जास्त प्रमाणात लघवी ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

4. जर तुमच्या मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुमचे डॉक्टर स्टूल सॉफ्टनरची शिफारस करू शकतात.

5. काहीवेळा, अंथरुणात लघवी करण्याच्या समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

6. वर्तणुकीशी संबंधित उपचार जेव्हा काम करत नाहीत तेव्हा ह्या समस्येवर उपचार करण्यासाठी खालील औषधे वापरली जातात

    • डेस्मो प्रेसिन एसीटेट
    • ऑक्सिब्युटिनिन क्लोराईड
    • हयोसायमीन सल्फेट
    • इमिप्रामाइन

7. जेव्हा अंथरुण ओले जाण्याचे कारण मूत्रमार्गात संक्रमण असते तेव्हा तोंडावाटे घेता येतील अशी प्रतिजैविके लिहून दिली जातात, जसे की –

    • बॅक्ट्रीम
    • अमोक्सिसिलिन
    • मॅक्रोबिड
    • लेव्हाक्विन

मुलांच्या झोपेत अंथरूण ओले करण्याच्या समस्येसाठी जीवनशैलीतील बदल

झोपेत अंथरुणात शू कारण्याची समस्या कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालीलप्रमाणे बदल केल्यास त्याची मदत होऊ शकते:

  • मुले किती प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन (द्रव सेवन प्रतिबंधित) करत आहेत ह्याचे पालकांनी निरीक्षण केले पाहिजे. त्यांनी मुलांना दिवसा जास्त आणि रात्री कमी द्रवपदार्थ द्यावेत. द्रवपदार्थाचे सेवन मर्यादित करून, अंथरुण ओलावणे नियंत्रित केले जाऊ शकते.
  • मुलाला झोपेच्या आधी बाथरूमला जाऊन येण्यास सांगावे. रात्रीच्या वेळी वॉशरूम वापरणे ठीक आहे हे मुलांना सांगावे. रात्रीच्या दिव्यांचा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून मुलाला शौचालयाचा मार्ग सापडेल.

मुलांच्या झोपेत अंथरूण ओले करण्याच्या समस्येसाठी जीवनशैलीतील बदल

  • तातडीने लघवीला जाण्याची भावना टाळण्यासाठी मुलाला नियमित अंतराने (दोन तास) किंवा अनेकदा बाथरूमला जाण्यास प्रोत्साहित करावे.
  • जेव्हा अंथरुण ओलावण्याची घटना घडते तेव्हा पालकांनी पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मुलाला बेडशीट बदलायला लावू शकता. हे काम म्हणजे शिक्षा नाही हे त्याला समजावून सांगा. जेव्हा मूल रात्री अंथरूण ओले करणार नाही तेव्हा त्याचे कौतुक करा.
  • कॅफिन असलेले पेये आणि पदार्थ टाळा. दिवसाच्या कोणत्याही वेळी मुलांसाठी कॅफीनयुक्त पेये टाळावीत कारण कॅफिन मूत्राशय उत्तेजित करू शकते, त्यामुळे त्याची शिफारस केली जात नाही.

मुलांच्या अंथरूण ओले करण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

खाली काही असे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय दिलेले आहेत. ह्या घटकांचा मुलाच्या रोजच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो.

  • दालचिनी -शरीराला उबदार ठेवते. तुम्ही मुलाला दिवसातून एकदा दालचिनीचा तुकडा चघळण्यास सांगू शकता. बटर लावलेल्या टोस्टवर साखर आणि दालचिनीचे मिश्रण शिंपडून मुलाला नाश्त्यात दिले जाऊ शकते.
  • आवळा किंवा भारतीय गूसबेरी – अंथरूण ओले करण्याच्या समस्येवर आवळा हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. आवळा ठेचून एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून दररोज सकाळी बाळाला द्यावी.

आवळा किंवा भारतीय गूसबेरी

एक चमचा आवळ्याचा गर घेऊन त्यामध्ये चिमूटभर काळी मिरी मिसळूनही बाळाला देऊ शकता.

  • ऑलिव्ह ऑइल मसाज:कोमट ऑलिव्ह ऑइलने पोटाला  काही मिनिटे मसाज करणे हा अंथरुण ओले करण्याच्या समस्येवर उपाय आहे
  • क्रॅनबेरी ज्यूस:अंथरुणात शू करण्याची समस्या असलेल्या मुलांसाठी क्रॅनबेरी ज्यूसची शिफारस केली जाते. हा ज्यूस मूत्राशय आणि मूत्रमार्गासाठी चांगला असतो. १ कप क्रॅनबेरीचा रस काही आठवड्यांसाठी तुमच्या मुलाला द्या. जर अंथरुण ओले करणे मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला १.५ कप रस दिवसातून तीन वेळा द्या.
  • अक्रोड आणि मनुका:अक्रोड आणि मनुका मुलांना स्नॅक म्हणून देखील देऊ शकतात. दोन अक्रोड आणि पाच मनुके झोपण्यापूर्वी मुलाला द्यावे. त्यामुळे अंथरुणओले होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

वर नमूद केलेली सर्व औषधे, जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपचार हे नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा अंथरूण ओले करण्याची समस्या कमी करण्यास मदत करण्यासाठी उपयोगी ठरतात.

अंथरुण ओले करण्याच्या समस्येबद्दल काही तथ्ये

अंथरुण ओले करण्याच्या समस्येबद्दल येथे काही तथ्ये आहेत त्याची तुम्हाला मदत होऊ शकते.

  • ५ वर्षे वयाच्या १५ % मुलांमध्ये किंवा पहिल्या इयत्तेतील सुमारे ३-४ मुले दररोज रात्री अंथरुणात लघवी करतात.
  • ८५% मुले कोणत्याही उपचाराशिवाय अंथरुण ओले करतात.
  • किशोरवयीन वर्षांमध्ये, फक्त २%-५% मुलांमध्ये अंथरूण ओले करण्याची समस्या आढळते.
  • अंथरुण ओले करण्याचे मुलांचे मुलींचे गुणोत्तर ४:१ इतके आहे.

अंथरूण ओले करणाऱ्या मुलाचे पालक गोंधळलेले आणि निराश होऊ शकतात. म्हणून, आपण आपल्या बालरोगतज्ञांशी या समस्येवर चर्चा करणे आणि आपल्या मुलाला सुद्धा ह्या चर्चेत सामावून घेणे महत्वाचे आहे. आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा आहे ही भावना मुलामध्ये निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे उपचारांना त्याच्याकडून चांगला प्रतिसाद मिळण्यास मदत होते.

आणखी वाचा:

लहान मुलांना रात्रीचा घाम येणे
मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article