Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात गर्भजल पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी अथवा कमी करावी?

गरोदरपणात गर्भजल पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी अथवा कमी करावी?

गरोदरपणात गर्भजल पातळी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी अथवा कमी करावी?

तुमचे बाळ गर्भाशयात, गर्भजलाने भरलेल्या पिशवीमध्ये विसावलेले असते. ह्या गर्भाशयातील पिशवीतील द्रव, गर्भजल म्हणून ओळखले जाते. तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी हे गर्भजल महत्त्वाचे आहे. परंतु, काही वेळा, ह्या गर्भजलाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसते. त्यामुळे तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. या लेखात, आम्ही गर्भजलाची कार्ये, गर्भजलाचे प्रमाण बदलांची संभाव्य कारणे आणि ते प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा टिप्सबद्दल चर्चा करणार आहोत. गरोदरपणात नैसर्गिकरित्या गर्भजल कसे वाढवायचे आणि कसे कमी करायचे ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गर्भजल काय करते?

गर्भजल खालील गोष्टींसाठी मदत करते:

  • जेव्हा तुमचे बाळ गर्भाशयाच्या भित्तिकांवर आदळते तेव्हा बाळाला हानी होत नाही
  • तुमच्या बाळाची पचन संस्था आणि फुफ्फुस विकसित होण्यास मदत होते
  • तुमच्या बाळाला कोणत्याही संसर्गापासून वाचवण्यासाठी मदत होते

तुमच्या शरीरात अम्नीओटिक द्रवपदार्थ खूप जास्त किंवा खूप कमी असल्यास, त्यामुळे  गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्लॅसेंटाला भेगा पडणे, अकाली प्रसूती होणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. सामान्यतः, सामान्य गरोदरपणामध्ये अम्नीओटिक फ्लुइड इंडेक्स 8 – 18 इतका असावा.

सामान्य प्रसूतीसाठी किती गर्भजलाची गरज असते?

जर तुमच्या शरीरात गर्भजलाचे प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी असेल, तर त्यामुळे गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्लॅसेंटाच्या समस्या निर्मण होऊ शकतात किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. सामान्य गरोदरपणात अम्नीओटिक फ्लुइड इंडेक्स 8-18 असावा. गरोदरपणात, गर्भजल पिशवी हळू हळू गर्भजलाने भरते. हे गर्भजल बाळाभोवती असते आणि त्यामुळे बाळ सुरक्षित राहते.

प्रसूतीदरम्यान, बाळ सुरक्षित राहण्यासाठी तसेच प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पुरेसे गर्भजल असणे गरजेचे असते. सामान्य प्रसूतीसाठी आवश्यक असणाऱ्या गर्भजलाचे प्रमाण विविध घटकांवर अवलंबून असते आणि हे प्रमाण बदलू शकते. हे घटक म्हणजे बाळाचा आकार आणि स्थिती, आईच्या ओटीपोटाचा आकार आणि प्रसव कळांची ताकद इत्यादी.

सर्वसाधारणपणे, प्रसूतीदरम्यान गर्भजलाची सामान्य श्रेणी 500 ते 1000 मिली दरम्यान असते. परंतु, गर्भजलाची 800-1200 मिली ही श्रेणी देखील सामान्य मानली जाते. प्रसूतीदरम्यान गर्भजल लक्षणीयरीत्या कमी झाल्यास ऑलिगोहायड्रॅमनिओस नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. ह्या स्थितीमुळे प्रसूतीदरम्यान नाळ दाबली जाऊन गर्भाला त्रास होतो आणि गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.

गर्भजल कमी होण्याची कारणे काय आहेत?

जेव्हा तुमचा अम्नीओटिक फ्लुइड इंडेक्स 5 किंवा 6 पेक्षा कमी असतो, तेव्हा गर्भजलाची पातळी कमी असते आणि त्याला ऑलिगोहायड्रॅमनिओस असे म्हणतात. अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे तुमच्या मुलाचे हात, पाय, फुफ्फुसे, आणि क्वचितच,  चेहऱ्यावरही परिणाम होऊ शकतो. गर्भजलाची पातळी खालील कारणांमुळे कमी होऊ शकते.

  • गर्भजल पिशवी फुटणे
  • तुम्हाला दीर्घकाळ उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर
  • तुमची प्लेसेंटा प्रसूतीपूर्वी गर्भाशयाच्या आतील भित्तिकांपासून दूर राहिल्यामुळे, तुमच्या बाळाला पोषक घटक आणि ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नसेल तर
  • तुम्ही अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम (ACE) इनहिबिटर सारखी औषधे घेत असाल तर
  • तुमच्या बाळाला मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गात समस्या असतील तर
  • गर्भाची वाढ नीट होत नसेल तर

गर्भजल कमी असण्याचा धोका

गर्भजलाचे प्रमाण कमी असणे किंवा ऑलिगोहायड्रॅमनिओस म्हणजे गर्भजल पिशवीमध्ये अपुरे गर्भजल असण्याची स्थिती होय. ही स्थिती विविध कारणांमुळे निर्माण होऊ शकते. गरोदरपणात आणि प्रसूतीदरम्यान त्यामुळे अनेक गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. गर्भजलाचे प्रमाण कमी असल्यास त्यामुळे खालील पाच धोके निर्माण होऊ शकतात.

1. मुदतपूर्व प्रसूती

गर्भजलाची पातळी कमी असल्यास अकालीकळा सुरु होऊ शकतात. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते.

2. गर्भाची वाढ नीट होत नाही

बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी गर्भजलाची मदत होते. गर्भजलाची पातळी  खूप कमी झाल्यास बाळाची नीट हालचाल होत नाही आणि वाढ सुद्धा खुंटते.

3. नाळ दाबली जाते

जेव्हा पुरेसे गर्भजल नसते, तेव्हा बाळाची नाळ दाबली जाण्याचा धोका असू शकतो. बाळाची नाळ दाबली गेल्यास बाळाला ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा कमी होतो.

4. बाळाला त्रास होतो

गर्भजल पातळी कमी असल्यास प्रसूतीदरम्यान बाळाला त्रास होऊ शकतो.

5. मेकोनियम एस्पिरेशन

गर्भजल पातळी कमी असल्यास काही वेळा बाळाची विष्ठा गर्भजलामध्ये जाऊ शकते आणि बाळाला मेकोनियम एस्पिरेशन सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. अशी समस्या निर्माण झाल्यास बाळाला श्वसनाचा त्रास जाणवतो.

गर्भजल वाढवण्यासाठी काही टिप्स

गरोदरपणात गर्भजलाची पातळी वाढवण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत –

  1. दिवसभर भरपूर पाणी प्या. गर्भजल वाढवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवली तर गर्भजलाची पातळी देखील वाढते.
  2. ज्या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे ते पदार्थ तुमच्या ताटात असावेत. गरोदरपणात गर्भजलाची पातळी वाढवणारे काही पदार्थ येथे दिलेले आहेत:
    • काकडी, लेट्युस, पालक, मुळा, ब्रोकोली आणि फुलकोबी सारख्या भाज्या
    • स्ट्रॉबेरी, टरबूज, टोमॅटो, कॅनटालूप/कस्तुरी, द्राक्ष यांसारखी फळे
  3. गरोदरपणात अल्कोहोल टाळा कारण ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अल्कोहोलमुळे निर्जलीकरण देखील होते आणि तुमच्या शरीरातील गर्भजलाची पातळी कमी होते
  4.  लघवीचे प्रमाण वाढवणारी हर्बल सप्लिमेंट्स टाळा. जास्त लघवीमुळे निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून, गर्भजलाची पातळी कायम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे
  5. नियमितपणे हलका व्यायाम करा. तुम्ही दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे.चालल्याने देखील मदत होते. गरोदरपणात नियमित व्यायाम केल्याने प्लेसेंटा आणि गर्भाशयातील रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. त्यामुळे गर्भजल पातळी वाढण्यास मदत होते

टीप: जर तुमच्या स्त्रीरोगतज्ञानी तुम्हाला संपूर्ण बेड रेस्ट सांगितली नसेल तरच तुम्ही व्यायाम करावा.

गर्भधारणेदरम्यान अम्नीओटिक द्रवपदार्थ

गर्भजलाच्या उच्च पातळीची कारणे काय आहेत?

जेव्हा तुमचा अम्नीओटिक फ्लुइड इंडेक्स 20 – 24 च्या श्रेणीत असतो, तेव्हा त्याला अम्नीओटिक द्रवपदार्थांची उच्च पातळी किंवा पॉलीहायड्रॅमनिओस असे म्हणतात. गर्भजलाच्या उच्च पातळीमुळे प्लॅसेंटा मध्ये अडथळे निर्माण होतात तसेच अकाली प्रसूती होण्याचा धोका असतो. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होऊन सिझेरियन प्रसूती सुद्धा होऊ शकते. पॉलीहायड्रॅमनिओसची कारणे खालीलप्रमाणे आहेत

  • आईला असणारा मधुमेह
  • बाळाच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये जन्मजात दोष असणे
  • समान जुळी गर्भधारणा झाल्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. एका बाळाला खूप जास्त रक्त मिळते आणि तर दुसऱ्याला खूप कमी रक्ताचा पुरवठा होतो
  • बाळामध्ये लाल रक्तपेशींची कमतरता आढळते
  • गरोदरपणात आईला संक्रमण होते
  • आई आणि बाळामध्ये रक्ताची विसंगती

उच्च गर्भजल पातळीमुळे कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात

गर्भजलाच्या उच्च पातळीमुळे पुढील गुंतागुंत निर्माण होऊ शकते:

  • वार तुटणे
  • सी-सेक्शन प्रसूती
  • अकाली प्रसूती
  • भित्तिका अकाली फाटणे
  • अंबिलिकल कॉर्ड प्रोलॅप्स
  • बाळाचा गर्भाशयात मृत्यू होणे

गर्भजल कमी करण्यासाठी टिप्स

गरोदरपणात गर्भजल कमी करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

  1. काहीवेळा, रोगामुळे गर्भजल पातळी वाढू शकते. रोगांवर उपचार केल्यास गर्भजल पातळी कमी होण्यास मदत होईल.
  2. अम्नीओसेन्टेसिस ही एक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेद्वारे तुमच्या शरीरातील अतिरिक्त गर्भजल काढून टाकलेजाते. हा शेवटचा उपाय असावा कारण यामुळे मुदतपूर्व प्रसूतीहोऊ शकते.
  3. डॉक्टर तुम्हाला इंडोमेथेसिन लावू शकतात. हे अम्नीओटिक द्रवपदार्थाची पातळी कमी करण्यास मदत करते. सामान्यतः प्रसूतीच्या 31आठवड्यांपूर्वी ही प्रक्रिया केली जाते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुम्हाला तुमच्या गर्भजलाच्या पातळीबद्दल चिंता असल्यास किंवा गर्भजल पातळी कमी झाल्याची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गर्भजल कमी होण्याच्या काही लक्षणांमध्ये गर्भाची हालचाल कमी होणे, गर्भाशयाचा आकार कमी होणे आणि असामान्य अल्ट्रासाऊंड इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.

तुम्हाला गर्भजल पातळी कमी झाल्याची शंका असल्यास किंवा अकाली प्रसूती, गर्भाला त्रास होणे किंवा गर्भाची विष्ठा गर्भजलात मिसळत असल्यास तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला गरोदरपणातील मधुमेह किंवा प्रीक्लेम्पसिया असेल तर त्याचा तुमच्या गर्भजल पातळीवर परिणाम होऊ शकतो. अश्या परिस्थितीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. तुमची गर्भजल पातळी सामान्य राहण्यासाठी त्यावर नियमित लक्ष ठेवले पाहिजे.

एकंदरीत, जर तुम्हाला गरोदरपणात गर्भजल नैसर्गिकरित्या कसे वाढवायचे आणि कमी कसे करावे याबद्दल काही शंका किंवा प्रश्न असेल तर शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. कॅफिनमुळे गर्भजल पातळी कमी होते का?

गर्भजल पातळीवर कॅफेनचा काय प्रभाव होतो ह्यावर मर्यादित संशोधन आहे. परंतु, काही अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भजल पातळी कमी होऊ शकते. प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कॅफिनचे सेवन मर्यादित ठेवावे. गरोदरपणात गर्भजल पातळी कमी करण्यासाठी कॅफेन कारणीभूत आहे.

2. तुम्ही अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भजल पातळी कशी तपासू शकता?

अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भजल पातळी समजू शकते. अल्ट्रासाऊंड करताना, तंत्रज्ञ द्रवपदार्थाचा सर्वात मोठा उभा कप्पा म्हणजेच अम्नीओटिक फ्लुइड इंडेक्स (AFI) मोजत. गर्भाच्या गर्भावस्थेतील वयानुसार, सामान्य AFI 5 ते 25 सेंटीमीटर दरम्यान असते. जर AFI सामान्य श्रेणीपेक्षा कमी असेल तर त्याचा अर्थ गर्भजल पातळी कमी झाली आहे असा होऊ शकतो.

3. चालण्यामुळे गर्भजल पातळी कमी होण्यास मदत होते का?

चालण्यामुळे गर्भजल पातळी कमी होते असे दिसून आले नाही. परंतु, सक्रिय आणि सजलीत राहणे  गरोदरपणात उपयुक्त ठरू शकते. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी त्याची मदत होते. तुम्हाला तुमच्या गर्भजल पातळीबद्दल चिंता वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे महत्वाचे आहे.

आणखी वाचा:

गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी कशी वाढवावी
गरोदरपणात हिमोग्लोबिनची उच्च आणि कमी पातळी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article