Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी तिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

तिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

तिसऱ्या तिमाहीत मळमळ होण्याची कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय

गरोदरपणात शरीरात खूप बदल होत असतात. त्यापैकीच एक बदल म्हणजे मळमळ होणे. सहसा दुसऱ्या तिमाहीमध्ये हा त्रास होणे बंद होते. परंतु काही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत, बाळाचा जन्म होईपर्यंत हा त्रास सुरूच राहतो. जर तुम्हाला तिसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर हा लेख पुढे वाचा.

तिसऱ्या तिमाही मध्ये मळमळ होणे सामान्य आहे का?

जेव्हा तुम्ही तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करता तेव्हा बाळाची वाढ वेगाने होत असते. तुम्हाला गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर अधूनमधून मळमळ होते आहे असे जाणवू शकते. परंतु जर तुम्हाला सतत उलट्या होत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. ह्यामागचे कारण काहीही असू शकते म्हणजे जास्त प्रमाणात खाणे ह्यासारखे साधे किंवा जठरासंबंधी समस्या ह्यासारखे गंभीरसुद्धा. त्यामुळे लवकरात लवकर तपासणी करून घेतली पाहिजे.

तिसऱ्या तिमाहीमध्ये मळमळ होण्याची कारणे काय आहेत?

खालील कारणांमुळे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये मळमळ होऊ शकते.

. संप्रेरकांमध्ये बदल

पहिल्या तिमाहीत, शरीरातील एचसीजीच्या उच्च पातळीमुळे मळमळ होते. तथापि, काहीवेळा

एचसीजीची पातळी संपूर्ण गरोदरपणात जास्त राहू शकते आणि त्यामुळे तिसऱ्या तिमाहीमध्ये मळमळ होऊ शकते.

. वाढणारे बाळ

होय, तुमच्या बाळामुळे तुम्हाला मळमळ होऊ शकते. जसजसे तुमचे बाळ वाढू लागते तसे तुमच्या पोटावरचा दाब वाढतो आणि अन्न पुन्हा अन्ननलिकेत येते. ह्या समस्येला इंग्रजीमध्ये ऍसिड रिफ्लक्स असे म्हणतात. आणि ते मळमळ होण्याचे कारण असू शकते.

वाढणारे बाळ

तिसऱ्या तिमाही मध्ये मळमळ होऊ नये म्हणून उपाय

उलटी होते आहे असे वाटणे खूप त्रासदायक असू शकते. तिसर्‍या तिमाहीत मळमळ होऊ नये म्हणून खाली दिलेले उपाय करण्याचे आम्ही सुचवतो.

. विश्रांती घ्या

चांगली झोप आणि विश्रांती घेणे महत्वाचे आहे.

. कॅफेन टाळा

चहा आणि कॉफीसारखी कॅफिनेटेड पेये मळमळ वाढवू शकतात. तर, अशा प्रकारची पेये टाळा किंवा त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

. नियमित अंतराने खा

खाण्याच्या वेळांमध्ये खूप जास्त अंतर ठेवू नका. दिवसभरात ५६ वेळा थोडे थोडे खात रहा.

. भरपूर पाणी प्या

गरोदरपणात स्वत: ला हायड्रेटेड ठेवा.

. व्यायाम करा

गरोदरपणात व्यायाम केल्याने तुम्ही निरोगी तर राहताच परंतु मळमळ होण्यासारख्या विविध आजारांवर मात करण्यासाठी शरीर सज्ज होते.

. जेवणानंतर लगेच झोपू नका

रात्री उशिरा किंवा अगदी झोपेच्या आधी खाल्ल्याने छातीत जळजळ होते आणि तुम्हाला मळमळ होऊ शकते. झोपेच्या आधी किमान २ ते ३ तास आधी रात्रीचे जेवण करा.

. मळमळ होण्यास कारणीभूत अन्नपदार्थ टाळा

मसालेदार, तेलकट आणि चवदार पदार्थ मळमळ होण्यास कारणीभूत असतात. गरोदरपणात अशा खाद्यपदार्थांच्या सेवन मर्यादित करा.

तुम्ही डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

बहुतेक वेळा, मळमळ होण्याचा काही गंभीर त्रास होत नाही. परंतु तिसऱ्या तिमाहीत जर तीव्र मळमळ होत असेल तर ती वैद्यकीय गुंतागुंत दर्शविणारी असू शकते. म्हणूनच, जर तुम्हाला मळमळ होण्यासह खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना भेट द्या.

  • तीव्र उलट्या होणे
  • गर्भाची हालचाल कमी
  • चक्कर येणे
  • वजन कमी होणे
  • भूक न लागणे

सामान्य प्रश्न

गर्भधारणेच्या तिसर्‍या तिमाहीत मळमळ होण्याबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न खालीलप्रमाणे

. तिसर्‍या तिमाहीत मी मळमळ थांबण्यासाठी औषधोपचार घेऊ शकते का?

जर गरोदरपणाच्या ८व्या आणि ९व्या महिन्यात सुद्धा तुम्हाला मळमळ होत असेल तर तुम्ही औषधे घेऊ शकता. परंतु, गरोदरपणात कोणतीही औषधे घेण्यापूर्वी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गरोदरपणात मळमळ होणे खूप सामान्य आहे आणि गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात बऱ्याच स्त्रियांना ह्याचा त्रास होऊ शकतो. परंतु, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती काळजी घेतल्यास, ही समस्या तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित आणि नियंत्रित करू शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणातील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपाय
गरोदरपणातील पचनसंस्थेशी संबंधित समस्येवर १२ घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article