Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) अन्न आणि पोषण 24 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

24 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

24 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

तुमचे मूल आता दोन वर्षांचे झाले आहे आणि आता तो तुमच्या ताटातील जवळपास सर्व खाद्यपदार्थ खाऊ शकतो. हे चांगले वाटत असले तरी, आता तुमच्या मुलाला विशिष्ट अन्नपदार्थच आवडू लागतील  आणि चव आवडली नाही म्हणून काही खाद्यपदार्थ खाण्यास तो नकार देईल. त्यामुळे, तुम्हाला त्याच्या खाद्यपदार्थांच्या निवडीबद्दल अधिक काळजी घ्यावी लागेल. परंतु तुमच्या मुलाच्या खाण्याच्या सवयींबद्दल चिंता करण्याची गरज नाही कारण आमच्याकडे त्याच्या आहारासाठी काही छान पर्याय आणि पाककृती आहेत. ह्या पाककृती तुम्ही तुमच्या दोन वर्षांच्या मुलासाठी करून पाहू शकता.

व्हिडिओ: 2 वर्षाच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

24-महिन्याच्या मुलासाठी पोषक तत्वांची आवश्यकता

तुमचे मूल 2 वर्षांचे झाल्यावर त्याची भूक नक्कीच वाढेल आणि म्हणून त्याला समोर जे दिसेल ते तो खाऊ लागतो. तो काहीही आणि सर्व काही खात असताना, त्याच्या पोषणविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाही हे पाहण्याची पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. 24-महिन्याच्या मुलासाठी खालील पोषक तत्वांची आवश्यकता आहे:

1. कॅलरीज

1 ते 4 वर्षे वयोगटातील, मुलाची उष्मांकाची गरज तुम्हाला वाटते तितकी वाढत नाही. बहुतेक मुलांना दररोज फक्त 1200-1300 कॅलरीज लागतात.

2. प्रथिने

तुमच्या मुलाच्या शरीराची आणि स्नायूंची वाढ तो किती प्रमाणात प्रथिनांचे सेवन करतो ह्यावर अवलंबून असते. म्हणून त्याच्या आहारात फक्त प्रथिनांचा समावेश असावा असा त्याचा अर्थ होत नाही. नेहमीच्या अन्नपदार्थांमधून लहान मुलांना पुरेशी प्रथिने मिळतात.

3. कर्बोदके

या वयात मुलाच्या प्रत्येक जेवणाचा मुख्य भाग कर्बोदके असतात. एखादे लहान मूल दिवसभर योग्यरीत्या कार्यरत राहण्यासाठी सुमारे 130-150 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते.

4. आहारातील तंतुमय पदार्थ

बहुतेक जेवणांमध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ समाविष्ट असल्याने, आहारामध्ये संपूर्ण अन्नपदार्थांचाही समावेश असणे महत्त्वाचे आहे. फळे किंवा धान्ये इत्यादी स्त्रोतांद्वारे तुमच्या मुलाच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश होऊ शकतो आणि त्यांची पचनसंस्था निरोगी राहू शकते.

5. सोडियम

बहुतेक पालक मुलांना मिठापासून भरपूर सोडियम मिळते म्हणून घाबरतात. परंतु या वयात मुलांसाठी दररोज सुमारे एक ग्रॅम सोडियमचे प्रमाण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

6. लोह

सोडियम बरोबरच, लोह हा आणखी एक महत्वाचा घटक आहे. हा घटक मुलाचे रक्ताभिसरण नीट होण्यासाठी गरजेचा आहे. जेव्हा आहार संतुलित असतो, तेव्हा त्यासोबत लोह सप्लिमेंट्स देण्याची गरज नसते.

7. दूध

दुधाचे महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. हाडांच्या विकासासाठी आणि मुलाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी दूध गरजेचे आहे, म्हणून तुमचे मूल दररोज एक ग्लास दूध पिते आहे ना ह्याकडे लक्ष द्या.  तुम्ही त्याला गाईचे दूध, सोया दूध किंवा बदामाचे दूधही देऊ शकता.

8. पाणी

पौष्टिक घटकांच्या यादीमध्ये पाण्याचा समावेश आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही मुले फक्त 1.3 लिटर पाणी पितात. त्यामुळे तुमचे बाळ पुरेसे पाणी पिते आहे की नाही हे तुम्ही तपासून पहिले पाहिजे.

24-महिन्याच्या लहान मुलाला किती अन्नाची गरज आहे?

तुमच्या मुलाचे वाढीचे वय असले तरीसुद्धा तुम्ही त्याला दर एक तासाला खायला दिले पाहिजे असे नाही. त्याच्या सध्याच्या वयानुसार, त्याला दररोज 1.5 किलोकॅलरीजपेक्षा जास्त गरज नसते. आणि इतक्या कॅलरीज त्याला अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ असलेल्या आहारातून सहज मिळतात.

चोवीस महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ

वयाचे 24 महिने पूर्ण झालेले तुमचे बाळ आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर असते. बाळाचे वजन वाढून त्याच्यामध्ये ऊर्जा राखीव विकसित करणे महत्वाचे आहे. आणि हे होण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांची गरज भासू शकते.

1. अंडी

तुमच्या लहान मुलाला संपूर्ण अंडी, एकतर ऑम्लेट म्हणून किंवा उकडलेल्या स्वरूपात देणे हा त्याचे वजन वाढवण्याचा आणि त्याच्यासाठी पोटभर जेवण बनवण्याचा उत्तम मार्ग आहे. मुले कोणत्याही अडचणीशिवाय अंड्यातील पिवळा बलक आणि पांढरा भाग दोन्ही खाऊ शकतात.

अंडी

2. खिचडी

मुलांनी स्वतः संपूर्ण आहार घेणे महत्वाचे असले तरीसुद्धा बऱ्याचदा ते कठीण असते तेव्हा, खिचडी हा एक उत्तम पर्याय असतो. खिचडी वेळेत तयार करता येते आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असते, कारण त्यामध्ये तांदूळ आणि डाळ दोन्ही असतात. खिचडी खाल्ल्याने निरोगी वजन वाढण्यास मदत होते आणि चयापचय देखील उत्तेजित होते.

3. बटाटे

बटाट्याची भाजी आपण कशासोबत पण खाऊ शकतो. होय, तुम्हाला ही भाजी खाण्याचा कंटाळा आला असला तरीसुद्धा तुमच्या मुलासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. मुलाच्या आहारात बटाट्याचा समावेश असावा. पिष्टमय भाज्या या वयात अत्यंत आवश्यक असतात.

बटाटे

4. दही

लहानपणापासूनच मुलांना ऊर्जेची  गरज असते. दूध किंवा दह्याची मलई हा चरबीचा एक उत्तम स्रोत आहे. दही शरीराला ऊर्जा देखील प्रदान करते. ही ऊर्जा शरीराद्वारे सर्वोत्तम स्वरूपात वापरली जाऊ शकते आणि मुलासाठी ती फायदेशीर ठरते.

5. मिल्कशेक

तुमचे मूल रोज दूध पिण्यास त्रास देत असेल. दूध आणि फळांचा मिल्कशेक केल्यास तो स्वादिष्ट बनतो आणि बाळाला  अतिरिक्त पोषण प्रदान करतो.  हा मिल्कशेक आपल्या लहान मुलाला आवडेल.

मिल्कशेक

 

6. तूप

ह्या वयात आपल्या मुलास भाज्या देताना त्यामध्ये एक चमचा तूप घालणे ही सवय झाली पाहिजे. भाज्या तुपातच तयार केल्या पाहिजेत, परंतु स्वत:चे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा पर्याय निवडू शकता.

7. सुकामेवा

तुमच्या मुलाच्या आहारात विविध प्रकारच्या सुक्यामेव्याचा समावेश करण्यासाठी न्याहारीची वेळ उत्तम असते. सीरियलमध्ये सुकामेवा घालून बाळाला द्या. बदाम, काजू आणि बेदाणे कमी प्रमाणात दिल्यास चालू शकते.

सुकामेवा

8. जवस

वाढत्या बाळासाठी प्रथिने, चरबी आणि फायबर यांचे निरोगी संयोजन आवश्यक आहे. या पोषक गरजा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही बाळाच्या आहारात जवसाचा समावेश करू शकता. बाळाला जवस खूप आवडते. भोपळा आणि खरबूज बिया देखील बाळाला उपयुक्त ठरू शकतात.

9. पीनटबटर

होय, तुमच्या मुलासाठी हा आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे. पीनट बटर आणि जेली सँडविच विशिष्ट प्रसंगासाठी वापरणे चांगले असले तरी, तुम्ही लोणी विविध पदार्थांमध्ये वापरू शकता, कारण लोणी हे  चरबी आणि उर्जेचा एक उत्तम स्रोत आहे.

पीनटबटर

10. गूळ

बहुतेक घरात पदार्थांमध्ये साखर वापरली जाते साखरेऐवजी गूळ वापरणे हा प्रत्येकासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे मुलांनासुद्धा मिळतात.

व्हिडिओ: 2 वर्षाच्या बाळासाठी आहार योजना

24 महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना

तुमच्या 24 महिन्यांच्या बाळाला खायला काय द्यावे ह्याचा विचार करण्यात संपूर्ण दिवस जाऊ शकतो. त्यासाठी इथे दिलेल्या साध्या आहार योजनेचा वापर करा  आणि त्यानुसार तुमचा स्वतःचा तक्ता बनवा. खालील आहार योजना 2 वर्षांच्या मुलांसाठी उत्तम आहे.

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 1

न्याहारी खोबरे घालून केलेला शेवयांचा उपमा + दूध
सकाळचा नाश्ता केळी/सफरचंद/उपलब्ध असलेले कोणतेही फळ
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता फळांची स्मूदी
रात्रीचे जेवण थेपला + मसूर डाळ सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 2

न्याहारी वेगवेगळ्या धान्यांचे धिरडे + बदाम मिल्कशेक
सकाळचा नाश्ता उपलब्ध असलेले कोणतेही फळ
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता बदाम-अंजीर मिल्कशेक
रात्रीचे जेवण पनीर (कॉटेज चीज) पुलाव + रायता

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 3

न्याहारी पराठे आणि मनुके व मध घातलेले दूध
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता पनीर (कॉटेज चीज) – खाकरा चाट
रात्रीचे जेवण
बाजरी (मोती बाजरी) – बेसन ( बेसन ) – भोपळा ( बाटली लौकी ) मुठिया + टोमॅटो गाजर पुदिना डिप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 4

न्याहारी फिरनी
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता शेंगदाणा चिक्की + ½ कप कोणत्याही उपलब्ध फळाचे तुकडे
रात्रीचे जेवण पनीर पुलाव + रायता

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 5

न्याहारी ओट्स-बदामाची खीर
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता केळी/सफरचंद मिल्कशेक
रात्रीचे जेवण नाचणी डोसा, सांबार आणि चटणी

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 6

न्याहारी
टोमॅटो आणि शिमला मिरची घालून केलेले पोहे आणि चॉकलेट मिल्कशेक
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता दलिया
रात्रीचे जेवण पनीर (कॉटेज चीज) – आलू – पालक पराठा + दही

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 7

न्याहारी केळी पॅनकेक
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता पनीर (कॉटेज चीज) मध आणि बदाम सह
रात्रीचे जेवण बाजरी (मोती बाजरी) भाकरी + वांग्याचे भरीत + मसूर डाळ सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 1

न्याहारी किसलेले गाजर आणि दुध घालून केलेला दलिया उपमा
सकाळचा नाश्ता साधा खाकरा दह्यासोबत
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता साधा खाकरा दह्यासोबत
रात्रीचे जेवण पालक – मूग डाळ मुठिया

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 2

न्याहारी केळ्याचा पॅनकेक आणि चॉकलेट दूध
सकाळचा नाश्ता मॅश केलेला बटाटा किसलेले पनीर घालून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता मॅश केलेला बटाटा
रात्रीचे जेवण डाळ खिचडी आणि लोटस स्टेम सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 3

न्याहारी टोस्ट आणि स्क्रॅम्बल्ड एग आणि फळांचा ज्यूस
सकाळचा नाश्ता 2-3 घरगुती बिस्किटे + दूध
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता 2-3 घरगुती बिस्किटे + दूध
रात्रीचे जेवण पनीर पराठा आणि शेवग्याचे सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 4

न्याहारी मूग डाळ – पालक ढोकळा हिरव्या चटणीसोबत
सकाळचा नाश्ता मसाला मखना + केळी मिल्कशेक
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता मसाला मखना + केळी मिल्कशेक
रात्रीचे जेवण भाजीचे सूप/ चिकन रस्सा भाजी पराठा आणि दही/लस्सी

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 5

न्याहारी सत्तू ( बेसनाचे मिश्रण) दूध, बदाम आणि खजूर
सकाळचा नाश्ता दुधात बुडवलेली राजगिरा चिक्की
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता टोमॅटो चटणीसोबत फ्रेंच फ्राईज
रात्रीचे जेवण नाचणीची भाकरी, राजमा आणि टोमॅटो सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 6

न्याहारी इडली, चटणी किंवा सांबारसोबत
सकाळचा नाश्ता केळी/सफरचंद मिल्कशेक
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता केळीच्या मिल्कशेकसह तिळाचे लाडू
रात्रीचे जेवण पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + भात

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 7

न्याहारी चना करीसोबत पुट्टू
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता गव्हाचे लाडू आणि दूध
रात्रीचे जेवण ढोकळी चिरलेल्या गाजरांसह

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 1

न्याहारी किसलेली काकडी-ओट्स पॅनकेक
सकाळचा नाश्ता फळे कापून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता ग्रील्ड रताळ्याचे तुकडे
रात्रीचे जेवण छोले पुरी + लस्सी

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 2

न्याहारी ताक घालून केलेला उपमा
सकाळचा नाश्ता पनीर (कॉटेज चीज) – सफरचंद मॅश
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता ओट्स-ऍपल स्मूदी
रात्रीचे जेवण मक्की (कॉर्न) की रोटी + सरसों का साग

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 3

न्याहारी ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर (कॉटेज चीज) सँडविच
सकाळचा नाश्ता घरी केलेला फ्रुट जॅम आणि ब्रेड
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता पनीर (कॉटेज चीज) – खजूर लाडू
रात्रीचे जेवण भाजी-पनीर (कॉटेज चीज) पराठा टोमॅटो सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 4

न्याहारी मॅश केलेल्या मनुका घालून गव्हाचा शीरा
सकाळचा नाश्ता केळी/सफरचंद/स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले कोणतेही फळ
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता भाजलेले बटाट्याचे तुकडे आणि चीज
रात्रीचे जेवण
पनीर (कॉटेज चीज) कटलेट किंवा कोथिंबीर टोमॅटो सूपसह ग्रील्ड फिश

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 5

न्याहारी पुरी भाजी आणि दूध
सकाळचा नाश्ता मल्टीग्रेन लाडू
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता केळी/सफरचंद/स्थानिक उपलब्ध फळांसह योगर्ट
रात्रीचे जेवण टोस्ट सह भाजलेले सोयाबीन

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 6

न्याहारी शेवयांची खीर
सकाळचा नाश्ता केळी/सफरचंद/स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले कोणतेही फळ
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता केळी/सफरचंद मिल्कशेक
रात्रीचे जेवण बीसी बेले भात आणि दही

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 7

न्याहारी ताक घालून केलेला उपमा
सकाळचा नाश्ता फ्रूट कस्टर्ड
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता भाजलेले शेंगदाणे + दही
रात्रीचे जेवण भाजी +पोळी +डाळ

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 1

न्याहारी राजगिरा मिल्कशेक आणि अंजीर
सकाळचा नाश्ता दुधाच्या पावडरचे लाडू
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता साधा खाकरा आणि दही
रात्रीचे जेवण मेथी मुथ्या आणि ताक

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 2

न्याहारी उकडलेल्या अंड्यातील पिवळा बलक / घरगुती पनीर (कॉटेज चीज)
सकाळचा नाश्ता द्राक्षे – सफरचंद स्मूदी
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता किसलेले पनीर घालून मॅश केलेले बटाटे
रात्रीचे जेवण शाही पनीर (कॉटेज चीज) पराठा आणि टोमॅटो-मशरूम सूप

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 3

न्याहारी बेसन ज्वारीचे कोथिंबीर घालून केलेले धिरडे दह्यासोबत
सकाळचा नाश्ता बेसन सत्तू (जव) + खजूर लाडू + दूध घालून
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता 2-3 घरी केलेली बिस्किटे + दूध
रात्रीचे जेवण
पनीर (कॉटेज चीज) कटलेट किंवा भाजलेले बीन सूप आणि किसलेले गाजर रायता व ग्रील्ड फिश

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 4

न्याहारी फ्रूट स्मूदी
सकाळचा नाश्ता दह्यामध्ये भिजवलेले पोहे आणि केळी
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता मसाला मखना+ केळी मिल्कशेक
रात्रीचे जेवण बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, डाळ आणि रायता

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 5

न्याहारी स्कॅम्बल्ड एग
सकाळचा नाश्ता ओट्स-ऍपल स्मूदी
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता राजगिरा चिक्की दुधात बुडवून
रात्रीचे जेवण टोमॅटो सूप सह मॅकरोनी आणि चीज

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 6

न्याहारी शेवयांचा उपमा + केशर वेलची दूध
सकाळचा नाश्ता शेंगदाण्याचे लाडू
दुपारचे जेवण स्वीट कॉर्न सूपसह भात
संध्याकाळचा नाश्ता दह्यामध्ये भिजवलेले पोहे आणि केळी
रात्रीचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी

24 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 7

न्याहारी
बदामाची पावडर घालून केलेले नाचणी सत्व
सकाळचा नाश्ता
चीज घालून मॅश पोटॅटो
दुपारचे जेवण
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
संध्याकाळचा नाश्ता दही वडा (घरगुती)
रात्रीचे जेवण भाताबरोबर धनसक

 

व्हिडिओ: 2 वर्षाच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

24 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

तुमच्या लहान बाळाला नीट पोषक घटक मिळतील अश्या काही पाककृती इथे दिलेल्या आहेत –

1. पालक आणि बीटरूट कटलेट

आठवड्यात कधीतरी किंवा आठवड्याच्या शेवटी खाण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.

पालक आणि बीटरूट कटलेट

साहित्य:

  • पालक प्युरी, २ टेबलस्पून
  • बीटरूट प्युरी, २ टेबलस्पून
  • संपूर्ण गव्हाचे पीठ, 0.5कप
  • गूळ, ०.5कप
  • लोणी, 2चमचे

कृती:

  1. ओव्हन 200डिग्री इतक्या तापमानाला तापवून  सुरुवात करा.
  2. एका भांड्यात गूळ, लोणी आणि पालक प्युरी एकत्र करा.
  3. दुसऱ्या एका भांड्यात बीटरूट प्युरी, गूळ आणि बटर मिक्स करा.
  4. दोन्ही भांड्यांमध्ये थोडेसे पाणी घालून पीठ घाला आणि एकत्र करून घ्या.
  5. तुम्ही पालक आणि बीटरूट प्युरी मिक्स करून त्यांचे कटलेट बनवू शकता.
  6. ह्या पिठाचे बिस्किटाचे आकार तयार करा आणि त्यांना ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.
  7. त्यांना ओव्हनमध्ये ठेवून सुमारे 8-10मिनिटे बेक होऊ द्या.
  8. दही किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

2. नाचणी केक

हा पौष्टिक आणि स्वादिष्ट नाचणी केक तयार करून तुमच्या मुलाची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करा

नाचणी केक

साहित्य:

  • ऑलिव्ह तेल, 0.5कप
  • व्हॅनिला एसेन्स, 1टीस्पून
  • मीठ
  • दूध, 1कप
  • दही, 1 कप
  • बेकिंग सोडा, 1टीस्पून
  • तपकिरी साखर, 1कप
  • कोको पावडर, 2चमचे
  • संपूर्ण गव्हाचे पीठ, 1कप
  • नाचणीचे पीठ, ०.5कप

कृती:

  1. ओव्हन 180डिग्री पर्यंत गरम करा.
  2. एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात नाचणीचे पीठ, ब्राऊन शुगर, बेकिंग सोडा, मीठ, कोको पावडर घाला. हे सगळे घटक एकत्र करा.
  3. त्यात दही, तेल, दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा चांगले मिसळा.
  4. हे मिश्रण एका बेकिंग ट्रेमध्ये ओतून सुमारे अर्धा तास ओव्हनमध्ये ठेवा. छान चॉकलेट सिरप बरोबर सर्व्ह करा.

3. एग डोसा

जेव्हा एखाद्या साध्या डोश्याने तुमच्या मुलाचे पोट भरत नाही, तेव्हा त्याला अंड्याचा डोसा बनवून द्या आणि तो काही वेळात हा डोसा खाऊन संपवेल.

एग डोसा

साहित्य:

  • मीठ
  • मिरे
  • एक अंडं
  • डोसा पिठ

कृती:

  1. तवा गरम करून त्यावर थोडे तेल शिंपडा.
  2. डोसा पिठ तव्याच्या मध्यभागी घाला आणि ते पसरवा. आता त्यावर एक अंडे अगदी घाला.
  3. प्रत्येक बाजू व्यवस्थित शिजू द्या आणि चवीसाठी मीठ आणि मिरपूड घाला.

4. रताळे पफ्स

हे खाद्यपदार्थ संध्याकाळचा एक उत्तम नाश्ता आहे. रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ती एक प्रमुख साइड डिश देखील असू शकते.

रताळे पफ्स

साहित्य:

  • पीठ, 0.5कप
  • सीरिअल1 कप
  • सफरचंद सॉस, 1टेबलस्पून
  • पाणी, 2चमचे
  • तेल, 2चमचे
  • रताळे, मॅश केलेले, 4कप

कृती:

  1. ओव्हन 350डिग्री तापमानावर प्रीहीट करा.
  2. एका भांड्यात तेल,  मॅश केलेला बटाटा आणि सफरचंद एकत्र करा. मिश्रण पूर्णपणे एकत्र होईपर्यंत  हलक्या हाताने पाणी घाला.
  3. आवश्यकतेनुसार पीठ घाला.
  4. पिठाचा वापर करून त्याचे लहान बॉल बनवा. अडकलेली हवा बाहेर पडण्यासाठी मध्यभागी एक लहान छिद्र करा, ज्यामुळे ते छान फुगतील.
  5. बेकिंग ट्रे ला तेल लावून त्यावर हे बॉल ठेवा. सुमारे 15मिनिटे बेक करा आणि सर्व्ह करा.

6. तळलेली केळी

केळी पाहून तोंड फिरवणाऱ्या लहान मुलांना ही तळलेली केळी आवडतील

तळलेली केळी

साहित्य:

  • तेल
  • वेलची पावडर, १ टीस्पून
  • केळी, २

कृती:

  1. केळी सोलल्यानंतर त्याचे तुकडे करा.
  2. तव्यावर थोडं तूप घालून तुकडे तळून घ्या. त्यावर वेलची पावडर शिंपडा आणि आनंद घ्या.

आहारविषयक टिप्स

तुमच्या मुलाला जेवायला घालतानाच्या काही टिप्स खाली दिलेल्या आहेत. ह्या टिप्स वापरून त्याचा जेवणाचा अनुभव संस्मरणीय होऊ शकतो.

  • आपल्या मुलाच्या खाण्याच्या सवयींचा विचार केल्यास त्याला बक्षीस किंवा शिक्षा देऊ नका. पौष्टिक काय आहे आणि काय नाही हे तो वेळेत शिकेल, म्हणून त्याला काहीही खाण्यास भाग पाडू नका.
  • आयुष्याच्या सुरुवातीला मसालेदार पदार्थ खाऊ देऊ नका.
  • अत्यंत गरम किंवा थंड अशी कोणतीही वस्तू देणे टाळा.
  • जेवणाच्या टेबलावर एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेण्याची सवय लावा.
  • त्याला स्नॅक्स देताना पौष्टिक पर्याय निवडा.
  • तुमच्या मुलाला वारंवार आणि कमी प्रमाणात खायला द्या.
  • मुलांना अन्नाचा लहान घास घेऊ द्या.
  • जेवणात घाई करणे टाळा.
  • भाज्या, फळे आणि दूध यांचे मिश्रण ठेवा.
  • कोणत्याही अन्नाची ओळख करून देताना, त्यापासून त्याला ऊर्जा मिळते आहे की नाही ह्याकडे लक्ष द्या. कमी कॅलरीज असलेले पदार्थ देऊ नका.

योग्य वयात सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थ दिल्यास तुमच्या मुलाला भविष्यात सुद्धा चांगल्या सवयी लागण्यास मदत होऊ शकते.

जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र त्याचा आनंद घेत असल्याचे पाहून बहुतेक मुले नीट जेवतात आणि त्यांना चांगल्या सवयी लागण्यास मदत होते. म्हणून दररोज आपल्या कुटुंबासमवेत बाळाला सुद्धा जेवायला द्या.

अस्वीकरण:

  1. प्रत्येक मूल वेगळे असते आणि म्हणून या जेवणाच्या योजना तुमच्या विवेकबुद्धीनुसार विश्वासू मार्गदर्शक म्हणून वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/आवश्यकतेनुसार जेवणात बदल करू शकता.
  2. मुलाला सक्तीने खायला घालू नका.
  3. फॉर्म्युला तयार करताना, कृपया बॉक्सवरील सूचनांचे पालन करा आणि त्यासोबत दिलेल्या मापन चमच्यांचा वापर करा.
  4. बाळाला घन आहाराचा परिचय करून देताना, सुरुवातीला, त्याच्यासाठी पाणीदार सूप तयार करावे. मूल जसजसे मोठे होते, तसतसे त्याच्या आईला मुलाच्या गिळण्याच्या क्षमतेनुसार द्रवपदार्थांचा घट्टपणा हळू हळू वाढवावा लागतो. खूप घट्ट असलेल्या अन्नपदार्थामुळे पोट खराब होऊ शकते/पचनसंस्थेवर अनावश्यक भार पडू शकतो, तर जास्त पाणीदार अन्नामुळे मूल भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खाऊ शकतात आणि ते अगदी ठीक आहे. परंतु, जर एखाद्या मुलाने सलग 3-4दिवसांपेक्षा जास्त काळ कमी खाल्ले तर कृपया पुढील मार्गदर्शनासाठी डॉक्टरांना भेट घ्यावी.
  6. दात येण्याच्या काळात किंवा त्याला बरे वाटत नसल्यास मूल कमी खाऊ शकते. त्या दिवशी तुम्ही आईचे दूध/फॉर्म्युला फीड वाढवू शकता. मूल परत सामान्य झाल्यावर पुन्हा त्याला पदार्थांची ओळख करून द्या.
  7. जर मुलाला अतिसाराचा त्रास होत असेल तर आहार देणे थांबवू नका.
  8. जर मुलाने सुरुवातीला अन्नपदार्थ खाल्ले नाहीत तर तुम्ही दालचिनी, जिरे पावडर, लिंबाचा रस, कढीपत्ता इत्यादी पदार्थ घालून अन्नाची चव बदलू शकता.
  9. जर तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांपासून ऍलर्जी होत असेल, तर कृपया त्याला/तिला हे घटक असलेले कोणतेही पदार्थ खायला देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा: 

१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती

२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article