Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव

योनीतून येणाऱ्या जाडसर, पांढऱ्या किंवा पिवळट रंगाच्या स्रावाचे वर्णन करण्यासाठी ल्युकोरिया हा शब्द वापरला जातो. काही स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीऐवजी हा स्त्राव अनुभवतात आणि सामान्यतः हा स्त्राव निरुपद्रवी असतो. या पांढर्‍या स्रावाची कारणे कोणती आहेत, कोणती कारणे सामान्य आणि कोणती असामान्य ह्याविषयी सर्वकाही इथे आम्ही सांगितलेले आहे

योनीस्त्राव म्हणजे काय?

जवळजवळ प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर योनीतुन होणारा स्त्राव सहन करावा लागतो. या स्रावाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मासिक पाळी दरम्यान हार्मोनल पातळीत होणारे बदल हे आहे. त्याची सुसंगतता प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असते.

उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या स्त्रीचे ओव्यूलेशन सुरु असते, तेव्हा स्त्रावाची सुसंगतता पातळ आणि ताणली जाईल अशी असते. जेव्हा ओव्यूलेशन नसते तेव्हा सुसंगतता घट्ट आणि चिकट असते. स्रावाची सुसंगतता मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रक्रियांना मदत करते. बऱ्याच वेळा, योनीमार्गातील स्त्रावाविषयी काळजी करण्यासारखे काहीही नसते आणि जोपर्यंत चिडचिड, अस्वस्थता, विचित्र वास आणि खाज सुटत नाही तोपर्यंत तो सामान्य मानला जातो.

गरोदरपणात योनिमार्गाच्या सामान्य स्त्रावास ल्युकोरिया म्हणतात. हा स्त्राव आपल्या गर्भाशयातून म्हणजेच गर्भाशयाच्या मुखातून येतो.

गरोदरपणात पांढरे स्त्राव येणे सामान्य आहे का?

गर्भवती असताना योनीतून जास्त स्त्राव बाहेर पडणे सामान्य गोष्ट आहे. गंधहीन किंवा सौम्यवास असणारा , जाड, दुधाळ पांढरा स्त्राव सामान्य मानला जातो. परंतु , जेव्हा त्याचा रंग बदलतो, तेव्हा ते चिंतेचे कारण असू शकते.

गरोदरपणात योनीतून स्त्राव हा तुम्ही मासिक पाळी दरम्यान अनुभवता तसाच असू शकतो फक्त थोडा जाडसर आणि घट्ट असतो. हे कदाचित गर्भारपणाचे सुखद लक्षण नाही, परंतु तुमचे गरोदरपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसे ह्या स्त्रावात वाढ होईल.

गरोदरपणात होणारा योनिस्त्राव

बहुतेक स्त्रिया ज्या गर्भवती नसतात त्यांना मासिक पाळी चक्राच्या मध्यावर काही प्रमाणात स्त्राव होतो परंतु गरोदरपणात हा स्त्राव वाढू शकतो. हे गरोदरपणाचे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे जे कदाचित सुमारे १३ व्या आठवड्यात सुरू होते, म्हणजेच जवळजवळ तुमच्या दुसऱ्या तिमाहीची तेव्हा सुरूवात होते. तुमचे गरोदरपणाचे दिवस जसजसे पुढे सरकतात तसतसे स्त्राव वाढत जातो. तुमच्या गर्भाशयाचे मुख निरोगी राहण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी तुमची योनी सतत कार्यरत असते आणि त्याचा हा दुष्परिणाम आहे.

या स्त्रावचा हेतू म्हणजे जन्म नलिका संक्रमणापासून वाचविणे आणि योनीमध्ये चांगल्या बॅक्टेरिया आणि स्क्ष्मजीवांचे निरोगी संतुलन राखणे हा असतो. कधीकधी, स्त्राव थोडा तपकिरी किंवा गुलाबी असू शकतो जोपर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत हे सामान्य आहे.

खाली गर्भावस्थेच्या विविध टप्प्यात योनीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाची लक्षणे दिलेली आहेत

. पहिली तिमाही

नेहमीसारखाच किंवा कमी प्रमाणात योनीमार्गातून स्त्राव होईल. काही वेळा अजिबात स्त्राव होणार नाही

. द्वितीय तिमाही

गर्भधारणेशी संबंधित योनीतून स्त्राव किंवा ल्युकोरिया सामान्यत: दुसर्‍या तिमाहीत गर्भावस्थेच्या १३ व्या आठवड्यापासून सुरू होतो. तुम्हाला नेहमी होणाऱ्या स्त्रावाच्या प्रमाणापेक्षा ह्याचे प्रमाण जास्त असू शकते.

. तिसरी तिमाही

योनीतून खूप जास्त स्त्राव होऊन त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते आणि जसजसे तुम्ही प्रसूतीच्या जवळ जाल तसे त्यात वाढ होऊ शकेल. गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये, जाड श्लेष्मा दिसू शकेल आणि त्यामध्ये काही प्रमाणात रक्ताचे अंश देखील असतील त्यास इंग्रजीमध्ये ‘शो’असे म्हणतात आणि ते प्रसुतीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. परंतु काळजी करण्याची गरज नाही!

योनीतून स्त्राव येण्याची कारणे

योनिमार्गाच्या स्त्रावाशी संबंधित काही सामान्य कारणे येथे आहेतः

. संप्रेरकांमधील बदल

मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या संप्रेरक पातळीमध्ये खूप बदल होतात. मासिक पाळी चक्राच्या पहिल्या अर्ध्या भागात, इस्ट्रोजेनच्या पातळीमध्ये वाढ होते आणि ओव्यूलेशनच्या काळात ती सर्वात जास्त असते. हे संप्रेरक रक्ताच्या जास्त पुरवठ्यास जबाबदार असते, तसेच रक्तहीन आणि वास नसलेला स्त्राव योनीमार्गातून येण्यास हे संप्रेरक कारणीभूत असते. हा स्रावापासून कुठल्या प्रकारचा धोका नसतो.

 • लक्षणे: ओव्हुलेशननंतर स्त्राव होण्याचे प्रमाण वाढते. मासिक पाळी चक्र जसे पुढे सरकते तसे बदलते.
 • हे सामान्य आहे ?: पूर्णपणे सामान्य, जोपर्यंत स्त्राव रंगीत नसतो किंवा त्यास वाईट वास येत नाही तो पर्यंत हे संपूर्ण सामान्य आहे .
 • कसा सामना करावा?: ती जागा कोरडी ठेवा, पँटी लाइनर वापरा आणि तुमची पँटी नियमित बदला

. गर्भधारणा

गर्भधारणेमुळे योनिस्रावासारखा नकोसा वाटणारा दुष्परिणाम होतो. इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ होते ज्यामुळे श्लेष्माचे उत्पादन वाढते, परिणामी ल्युकोरिया होतो. हे तुम्ही मासिकपाळी दरम्यान अनुभवलेल्यासारखेच आहे परंतु त्याची उपस्थिती भिन्न असू शकते. शिवाय, हा गर्भारपणाच्या संपूर्ण कालावधीत देखील असू शकतो कारण तो बर्थ कॅनालचे कोणत्याही संसर्गापासून संरक्षण करतो आणि त्या भागात निरोगी जीवाणू राखतो.

 • लक्षणे: पहिल्या तिमाहीत स्त्राव वाढत नाही, परंतु दुसऱ्या तिमाहीत वाढ होण्यास सुरवात होते आणि प्रसूतीच्या जवळ पोहचेपर्यंत सुरू राहते.
 • हे सामान्य आहे का ?: गर्भवती असताना योनीतून स्त्राव होण्याचे प्रमाण वाढणे सामान्य आहे.
 • कसा सामना करावा?: स्वच्छता राखून योनीजवळचा भाग कोरडा ठेवा. सर्वोत्तम शंका निरसन होण्यासाठी डॉक्टरांशी बोला आणि स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका

3. यीस्टचा संसर्ग

यीस्टचा संसर्ग ओंगळ असू शकतो आणि तो झाला आहे हे ओळखणे सोपे असते. हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो योनिमार्गाच्या जवळील भागात सामान्यतः उद्भवतो. हा संसर्ग झाल्यास योनिमार्गामध्ये यीस्ट पेशींची वाढ होते ज्यामुळे पीएच संतुलन बिघडते आणि अस्वस्थता जाणवते.

 • लक्षणे: योनीतून होणारा स्त्राव पांढरा किंवा पिवळसर असतो आणि तो कॉटेज चीज सारखा असू शकतो. त्यास कदाचित ओंगळ वास येऊ शकतो आणि त्या जागेला तीव्र खाज सुटू शकते.
 • हे सामान्य आहे ?:सामान्यपणे आढळते परंतु सामान्य नाही
 • कसा सामना करावा?: तुमचा योनीकडील भाग कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा. साखरेचे सेवन कमी करा आणि तोंडावाटे किंवा त्या जागेवर लावण्यासाठी काही औषधांसाठी आपल्या डॉक्टरांशी बोला

. ऍलर्जिक प्रतिक्रिया

तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा ह्या प्रतिक्रिया अधिक सामान्य आहेत! फॅब्रिक किंवा साबणाच्या ऍलर्जीमुळे असे होऊ शकते.

 • लक्षणे: योनीच्या भागात जळजळ होण्यासह खाज सुटू शकते. त्या भागाला सूज येऊन लाल होतो आणि स्त्राव घट्ट असतो आणि त्यास उग्र वास येतो
 • हे सामान्य आहे काय ?: सामान्य नाही, परंतु कारण ओळखणे महत्वाचे आहे
 • कसा सामना करावा?: कारण ओळखा आणि कुठल्याही परिस्थितीत ऍलर्जिक गोष्टी योनी पासून दूर ठेवा. योग्य औषधासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला

. लैंगिक आजार

योनीमार्गातील स्त्राव वाढणे हे बऱ्याच लैंगिक आजारांचे लक्षण आहे

 • लक्षणे: घट्ट, पिवळसर योनीतून स्राव आणि तीव्र खाज सुटणे आणि शक्यतो पुरळ उठणे.
 • हे सामान्य आहे काय ?: ते सामान्य नाही आणि आणखी संसर्ग वाढण्या आधी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असते.
 • कसा सामना करावा?: तुम्हाला ह्यासाठी केवळ तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागेल ते कदाचित काही चाचण्या करतील आणि उपचारपद्धती ठरवतील.

. औषधांचे दुष्परिणाम

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तसेच, गर्भनिरोधकासाठी वापरले जाणारे मलम आणि जेलीचा आतील आवरणाला त्रास देऊ शकतो,त्यामुळे स्त्राव होऊ शकतो.

 • लक्षणे: घट्ट स्राव ज्यास दुर्गंधीयुक्त वास असू शकतो
 • हे सामान्य आहे ?: जोपर्यंत स्रावास जास्त प्रमाणात वास येत नाही तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही. विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम म्हणून वास येणे अगदी सामान्य गोष्ट आहे.
 • कसा सामना करावा?: योनीजवळील भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवा. जास्त स्त्राव होत असल्यास पॅंटी लायनर वापरा जेणेकरून जास्तीचा स्त्राव त्यामध्ये शोषला जाईल.

. ट्रायकोमोनियासिस

हे ट्रायकोमोनास योनिलिसिस नावाच्या परजीवी सूक्ष्मजंतूंमुळे होते आणि त्यामुळे एचआयव्ही / एड्स होण्याचा धोका वाढू शकतो.

 • लक्षणे: पातळ, वाईट वास असलेल्या स्राव होतो आणि योनीमार्गास खाज सुटते. लघवी आणि लैंगिकतेमुळे वेदना होऊ शकतात आणि जळजळ वाढू शकते.
 • हे सामान्य आहे ?: ते सामान्य नाही आणि त्वरित उपचार केले जाणे आवश्यक आहे.
 • कसा सामना करावा?: हे त्वरित आपल्या डॉक्टरांच्या लक्षात आणून द्या कदाचित डॉक्टर काही चाचण्या करायला सांगतील आणि समस्येचे निदान करतील.

असामान्य योनि स्त्रावाचे प्रकार आणि त्यांची लक्षणे

वास असलेला घट्ट, चीज सारखा पिवळ्या रंगाचा स्राव योनिमार्गाच्या संसर्गाचे सूचक असू शकते. खाज सुटणे किंवा पांढरा स्त्राव देखील काहीतरी गडबड असल्याचे सूचित करतात. अशा परिस्थितीत, आपल्याला कदाचित उपचारांची आवश्यकता असू शकेल आणि डॉक्टरांच्या लक्षात हे आणून दिले पाहिजे

गर्भवती असताना सामान्य स्त्राव म्हणजे काय आणि काय असामान्य आहे हे समजण्यासाठी येथे एक टेबल दिले आहे

योनीतून स्त्रावचा प्रकार सामान्य / असामान्य संकेत
स्वच्छ सामान्य निरोगी
दुधाचा पांढरा सामान्य निरोगी
गंधहीन सामान्य निरोगी
तपकिरी / लालसर किंवा गुलाबी रंगाचा सामान्य निरोगी, अगदी कमी प्रमाणात
पिवळसर असामान्य संभाव्य योनी संसर्ग किंवा गोनोरोहिया सारखा लैंगिक संक्रमणामुळे होणारा रोग
हिरवट असामान्य संभाव्य योनीसंसर्ग, बहुधा ट्रायकोमोनिसिस
घट्ट चिकट असामान्य संभाव्य योनी संसर्ग, मुख्यतः यीस्टचा संसर्ग
उग्र वास असामान्य संभाव्य योनी संसर्ग, बहुतेक बॅक्टेरियल व्हजायनोसिस
फेसाळ असामान्य संभाव्य योनीसंसर्ग
खाज सुटणे असामान्य संभाव्य योनीसंसर्ग
जळजळ असामान्य संभाव्य योनी संसर्ग
वेगवान वाढ, पाणीदार असामान्य संभाव्य गर्भजल गळती

गरोदरपणात योनिमार्गाच्या स्रावामध्ये झालेली वाढ आणि गर्भजल गळती ह्यामधील फरक समजणे ही आणखी एक महत्त्वाची चिंता आहे. जर तुमचे ३७ आठवडे पूर्ण झालेले नसल्यास आणि स्रावामध्ये वाढ झालेली असल्यास ते प्रसुतीपूर्व लक्षण असण्याची शक्यता आहे आणि तात्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.

गरोदरपणात ल्युकोरियाचा उपचार कसा केला जातो?

गरोदरपणात असामान्य योनी स्त्राव लवकरात लवकर ओळखला जावा आणि शक्य तितक्या लवकर त्यावर उपचार केला पाहिजे कारण काही योनिमार्गाच्या संसर्गांमुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते.

यीस्टच्या संसर्गामुळे गरोदरपणात कुठलीही जोखीम उद्भवत नाही परंतु त्यामुळे अत्यंत अस्वस्थ वाटू शकते.

असामान्य योनिस्रावासाठीचे उपचार त्यामागच्या कारणावर अवलंबून असतील. उदाहरणार्थ यीस्टचा संसर्ग सामान्यतः बुरशीविरोधी औषधे, क्रीम किंवा जेलद्वारे केला जातो. बॅक्टेरियल वजयनोसिस वर प्रतिजैविक गोळ्या किंवा क्रिमद्वारे उपचार केला जातो. मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल नावाचे औषध सहसा ट्रायकोमोनिसिसच्या उपचारांसाठी दिले जाते. परंतु, योनीतून संसर्ग झाल्यामुळे होणारा असामान्य स्रावाकडे दुर्लक्ष करू नका किंवा स्वतःचे स्वतः औषोपचार करू नका, कारण हे गर्भासाठी धोकादायक ठरू शकते.

योनिमार्गातून स्त्राव होणे म्हणजे काहीतरी असामान्य असल्याचे लक्षण असू शकते , परंतु समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही योग्य ते औषधोपचार घेऊ शकता आणि आरामदायक स्थितीमध्ये राहू शकता.

गरोदरपणात योनीतून होणारा स्त्राव हाताळण्यासाठी आणि उग्र वास येणाऱ्या स्त्रावपासून मुक्त कसे व्हावे यासाठी येथे मार्गदर्शिका आहे

 • तुमचे बाह्य जननेंद्रिय स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
 • जर ओलेपणामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डिस्चार्ज शोषण्यासाठी हलके पॅड किंवा पॅन्टी लाइनर घाला. पॅंटी लायनर किंवा पॅडला कुठलाही सुगंधी द्रव्यांचा वास नाही ना ह्याची खात्री करून घ्या.
 • सूती पॅंटी घाला ज्यामुळे तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेता येईल.
 • दिवसातून कमीत कमी 2-3 वेळा पॅंटी बदला.
 • तुमच्या जननेंद्रियांची जागा धुताना वास नसलेला साबण आणि पाण्याचा वापर करा.
 • योनीला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात व्यवस्थित धुवा.
 • संभोग करण्यापूर्वी आपली योनी चांगली वंगणयुक्त आहे हे सुनिश्चित करा.
 • विशेषत: संभोगानंतर.पुढून मागच्या बाजूस पुसून योनि स्वच्छ करा.

गरोदरपणात योनीस्राव होत असल्यास जंतुसंसर्ग टाळण्यासाठी करू नये अशा गोष्टी:

 • स्त्राव शोषण्यासाठी गरोदरपणात टॅम्पन घालू नका. गर्भवती महिलांसाठी याची शिफारस केलेली नाही.
 • जास्त काळ ओली किंवा डागाळलेली पॅंटी घालू नका कारण सतत ओलेपणामुळे संसर्ग वाढू शकतो.
 • योनी स्रावापासून सुटका होण्यासाठी गरोदरपणात डचिंग (आतून योनीतून स्वच्छ धुणे ) टाळा. गरोदरपणात डचिंग केल्याने चांगल्या बॅक्टेरियांचा नाजूक समतोल बिघडू शकतो आणि योनिमार्गामध्ये संसर्ग होऊ शकतो. ह्यादरम्यान योनीमध्ये हवा सुद्धा जाऊ शकते आणि तुम्ही गरोदर असताना ते धोकादायक आहे
 • योनीसाठी कोणतेही वाइप्स किंवा वॉश वापरू नका. त्यांचा वास चांगला असतो पण त्यामुळे योनीजवळील भागाची पीएच वाढू शकते आणि त्यामुळे योनीमार्गातील संसर्गाची शक्यता वाढते.
 • गरोदरपणात परफ्यूम किंवा योनि डिओडोरंट्स वापरू नका

योनीस्रावाचे निदान कसे करावे?

लक्षणांवर आधारित,तुमचे डॉक्टर तुम्हाला स्त्रावाविषयी बरेच प्रश्न विचारू शकतात त्यापैकी काही कॉमन प्रश्न खालीलप्रमाणे:

 • असामान्य स्त्राव कधी सुरू झाला?
 • स्त्रावाचा रंग काय आहे?
 • वास कसा आहे?
 • स्त्रावासोबत खाज सुटली आहे का ?
 • स्त्राव होताना जळजळ होते आहे का ?
 • तुमचा लैंगिक इतिहास

तुमच्या उत्तरांवर आधारित , तुमचे डॉक्टर स्त्रावचा नमुना घेऊ शकतात किंवा पॅप स्मीयर टेस्ट करू शकतात, ज्यामध्ये पुढील तपासणीसाठी गर्भाशयाच्या मुखाजवळील पेशी गोळा करणे समाविष्ट असते.

गरोदरपणात किंवाइतर वेळी सुद्धा योनिस्रावाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे योनी संसर्ग होय. बॅक्टेरियल व्हजायनोसिस किंवा ट्रायकोमोनिआसिस ही त्यामागील कारणे असू शकतात.

योनीमार्गास खाज सुटू नये म्हणून प्रतिकार शक्ती वाढविण्याचे उपाय

ल्युकोरियावर उपचार करण्यासाठी अनेक ओव्हरकाउंटर तसेच विहित औषधे देखील आहेत, परंतु काही सोप्या घरगुती उपायांनी सुद्धा घरच्या घरी त्याचा सामना केला जाऊ शकतो. परंतु तुम्ही गर्भवती असताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. मेथी दाणे

मेथी दाण्यांमुळे शरीराची आणि योनीची नैसर्गिक पीएच नियंत्रित रहाते. याचा प्रभाव शरीरातील इस्ट्रोजेन पातळीवर देखील होतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. मेथी दाणे कसे वापरावे ते येथे दिले आहेः

एक चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवावे, आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी गाळून घ्या. त्यात अर्धा चमचा मध घालून रिकाम्या पोटी प्या.

तुम्ही दोन चमचे मेथीचे दाणे चार कप पाण्यात ३० मिनिटे उकळवावे. पाणी गाळून थंड होऊ द्या. हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा योनीमार्ग धुण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते

. केळी

केळी पचनास मदत करतेच शिवाय योनि स्राव नियंत्रित करण्यासही मदत करते. ते कसे वापरावे ते येथे दिले आहेः

दररोज दोन लहान, जास्त प्रमाणात पिकलेली केळी खाल्ल्यास स्त्राव नियंत्रणास मदत होते. आपण केळीच्या फुलांचा रस दोन चमचे आणि पॉलमिरा कँडी पावडर दोन चमचे मिसळू शकता. दिवसातून एकदा हे सेवन करा.

. क्रॅनबेरी

मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे ग्रस्त असणाऱ्यांसाठी क्रॅनबेरी चांगली आहेत कारण त्यामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुणधर्म आहेत. ते कसे वापरावे ते येथे आहेः

दररोज एक ग्लास गोड नसलेला क्रॅनबेरी रस प्यायल्याने योनीतून स्त्राव कमी होतो.

क्रॅनबेरीच्या गोळ्या खाल्ल्यास जिवाणू योनिमार्गाच्या भिंतीला चिकटण्यापासून रोखण्यास मदत होते आणि ल्युकोरियाच्या समस्येस विरोध करतात. परंतु या गोळ्या घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

. आवळा

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असलेले आवळा (भारतीय हिरवी फळे येणारे एक फुलझाड) हे योनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असे आणखी एक फळ आहे. ते कसे वापरावे ते येथे आहेः

एक चमचा आवळा पावडर घ्या त्यामध्ये मध घालून घट्ट पेस्ट बनवा. सुमारे एका आठवड्यासाठी दररोज हे वापरा.

एक कप पाण्यामध्ये आवळ्याच्या झाडांच्या मुळाची पावडर एक चमचा घालून चांगले उकळून घ्या. थोडी साखर घाला आणि रिकाम्या पोटी सकाळी ते घ्या.

. अंजीर

अंजीर शरीरावर एक शक्तिशाली रेचक आहे आणि जास्त होणाऱ्या योनिस्रावावर देखील त्याची मदत होते. ते कसे वापरावे ते येथे दिले आहेः

वाळले ले अंजीर दोन कप पाण्यात रात्रभर भिजवा. भिजवलेल्या अंजिराला मिक्सर मधून काढा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण प्या.

अंजीराच्या झाडाची साल आणि केशरच्या झाडाची साल ह्यांची बारीक पूड करून घ्यावी. या चूर्णचा एक चमचा दोन कप पाण्यात मिसळा आणि दोन दिवस योनी धुण्यासाठी वापरा.

गरोदरपणादरम्यान जर तुम्हाला असामान्य स्त्राव आढळला तर नेहमीच वैद्यकीय मदत घ्या. स्वतःचे स्वतः निदान करू नका. त्यावर खात्रीशीर उपाय करणे आणि पुढील गुंतागुंत टाळणे नेहमीच चांगले आहे. स्वच्छ रहा. योनीमार्ग आणि त्याजवळील भाग कोरडा असल्याची खात्री करा. लक्षात ठेवा की हा ९ महिन्यांचा आणि नंतर आयुष्यभराचा प्रवास आहे! वरील सर्व आवश्यक माहिती तुम्ही आनंदी आणि निरोगी गर्भारपणासाठी वापरू शकता!

आणखी वाचा : गरोदरपणात स्तन आणि स्तनाग्रांमध्ये होणारे बदल

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article