Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात कोळंबी खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि टिप्स

गरोदरपणात कोळंबी खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि टिप्स

गरोदरपणात कोळंबी खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि टिप्स

तुम्हाला कोळंबीचे काही स्वादिष्ट पदार्थ हवे आहेत? बटर गार्लिक प्रॉन्स, प्रॉन करी, फ्राईड प्रॉन्स, प्रॉन्स  बिर्याणी, पेपर प्रॉन्स वगैरे! चला तर मग कोळंबीविषयी अधिक जाणून घेऊयात.  कोळंबी समुद्री प्राण्यांच्या क्रस्टेशियन गटात मोडतात आणि चविष्ट असतात. परंतु, कोळंबीच्या ऍलर्जीमुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गर्भावस्थेत कोळंबी खाणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो.

ह्या लेखात, आपण गरोदरपणात कोळंबी खाऊ शकतो की नाही यावर एक नजर टाकूयात, गरोदर असताना कोळंबी खाण्याविषयीच्या टिप्स आणि गरोदरपणात कोळंबी खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही चविष्ट  प्रॉन रेसिपी सुद्धा ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही कोळंबी प्रेमी असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला सुरुवात करुया!

गरोदर असताना कोळंबी खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सीफूड खाणे टाळणे आवश्यक असले तरी, कोळंबी खाणे सामान्यतः सुरक्षित असते. परंतु कोळंबी दूषित पाण्यातील नसावी आणि पूर्णपणे शिजवलेली असावी. गरोदरपणात काही पदार्थ आवडत असतील तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.. गरोदरपणात  जास्त प्रमाणात कोळंबीचे सेवन केल्यास किंवा कोळंबीचे सेवन करताना सावधगिरी बाळगली नाही तर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. शंका असल्यास, कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोळंबी खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

कोळंबी चविष्ट असते. गरोदर स्त्रीसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वे कोळंबी मध्ये भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात कोळंबी खाण्याचे फायदे पाहूया:

1. जास्त प्रमाणात प्रथिने

गरोदरपणात कोळंबी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. प्रथिनेयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने, कोळंबी खाल्ल्याने तुमचे स्नायू निरोगी राहण्यास मदत होईल.

2. भरपूर जीवनसत्त्वे

कोळंबी मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, लोह, जस्त, कोलीन, आयोडीन, तांबे आणि फॉस्फरस असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, थायरॉईडचे कार्य नीट चालू राहण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी जीवनसत्वे आवश्यक असतात. ही जीवनसत्वे हाडे आणि दातांच्या विकासासाठी देखील उपयुक्त असतात.

3. इतर पोषक तत्वे समृद्ध प्रमाणात असतात

कोळंबीमध्ये पोषक घटक असतात. हे घटक आपल्या शरीराद्वारे सहज शोषले जातात आणि आपल्या शरीराला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते आवश्यक असतात. सेलेनियम हे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते पेशींच्या नुकसान कमी करण्यास मदत करते आणि विशिष्ट कर्करोगापासून संरक्षण करते. अमीनो ऍसिड नवीन पेशी पुन्हा निर्माण करण्यास आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. अँसटॅझानथिन मध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. कोळंबीमध्ये सर्व पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात.

4. कॅलरीज कमी

गरोदरपणात, निरोगी वजन वाढणे आणि पुरेसे पोषण मिळणे आवश्यक असते. कोळंबीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे अनावश्यक चरबी नसलेला पौष्टिक आहार घेणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे असते.

5. ओमेगा 3समृद्ध

हे फॅटी ऍसिड कोळंबीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ते बाळाचे डोळे आणि मज्जातंतूंच्या विकासासाठी मदत करते.

गरोदरपणात कोळंबी खाणे टाळावे का?

आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे गरोदरपणात कोळंबीचे सेवन केल्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. परंतु कोळंबी किंवा कोणत्याही प्रकारचे समुद्री अन्न खाण्याआधी तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुम्ही साशंक असल्यास, थोडे खाऊन सुरुवात करा आणि तुमचे शरीर त्यावर कशी प्रतिक्रिया देते ते पहा. त्यानंतर तुमचा आहार त्यानुसार बदलता येईल. कोणत्याही परिस्थितीत,संयम ठेवा आणि कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. जर कोळंबी खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाला नाही तर कोळंबी तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप पौष्टिक तसेच आरोग्यदायी असू शकते.

काही गर्भवती स्त्रियांना गरोदरपणात कोळंबीच्या ऍलर्जीचा धोका असू शकतो. गरोदरपणात कोळंबी खाण्याचे धोके तसेच तुम्ही कुठली सावधानता बाळगली पाहिजे याबद्दलची माहिती येथे दिलेली आहे.

  • कोलेस्टेरॉल: कोळंबी हा कोलेस्टेरॉलचा समृद्ध स्रोत आहे. जर तुमच्याकडे कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असेल, तर कोळंबी तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगली नाही.
  • ऍलर्जी: जर ऍलर्जीची प्रतिक्रिया दिसून आली असेल, तर कोळंबीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. ओटीपोटात वेदना होणे, खाज सुटणे, पुरळ आणि जळजळ होणे अश्या प्रकारच्या ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात.
  • पाऱ्याची विषबाधा: जर तुम्ही प्रदूषित पाण्यातील कोळंबीचे सेवन केले तर पाण्यातील दूषित घटक आणि विषारी रसायनांची वाढलेली पातळी, ह्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. कोळंबीमध्ये प्रदूषित घटक शोषले जाऊ शकतात. समुद्रातील कोळंबीमध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते. ह्या पाऱ्यामुळे बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो. दूषित नदी किंवा समुद्राच्या पाण्यात पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्सची पातळी खूप जास्त असते आणि त्यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
  • संसर्ग: गरोदर असताना कोळंबी चांगली शिजवून खाण्यास सांगितली जाते. कच्ची किंवा कमी शिजलेली कोळंबी खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते आणि त्यामुळे रक्तातील विषबाधा,  अन्नाची विषबाधा होऊ शकते आणि बाळाच्या आरोग्याला धोका पोहोचतो.

गरोदरपणात कोळंबी

गर्भवती स्त्रिया किती प्रमाणात कोळंबी खाऊ शकतात?

संशोधनानुसार, दर आठवड्याला 8 ते 12 औंस शेलफिश किंवा मासे खाणे गरोदर स्त्रियांसाठी चांगले असते. पण ते नीट शिजवून खाल्ले पाहिजेत.

गरोदर असताना कोळंबी खाण्याविषयी काही टिप्स

  • कोळंबी खरेदी करताना विश्वासू दुकानातून खरेदी करा. कोळंबी जाड आणि ताजी आहे ह्याची खात्री करा. रंग उडालेली कोळंबी विकत घेऊ नका
  • गरोदरपणात सुशी सारखे कच्चे समुद्री अन्न टाळा. वाळवलेली कोळंबी चांगली स्वच्छ धुवून शिजवून खाणे गरोदरपणात चांगले असते
  • तुमच्याकडे ताजी कोळंबी नसल्यास, चांगल्या प्रतीची गोठवलेली कोळंबी निवडा आणि स्वयंपाक करण्यापूर्वी ती डीफ्रॉस्ट करून घ्या
  • स्वयंपाक करण्यापूर्वी कोळंबी नीट शिजवून घ्या. तुमच्या आवडीनुसार कोळंबी शिजवण्यापूर्वी तुम्ही बाहेरचे आवरण काढून घेऊ शकता किंवा आवारणासहीत शिजवू शकता
  • कोळंबी नीट स्वच्छ करून शिजवून घ्या. कोळंबी चांगली शिजल्यावर बाहेरचे कवच लालसर होते आणि मांस पांढरे व अपारदर्शक होते. शिजवण्यापूर्वी एका भांड्यात कोमट खारट पाणी घेऊन सुमारे 10 मिनिटे कोळंबी भिजवून ठेऊ शकता आणि नंतर धुवून घ्या
  • हॉटेल मध्ये मासे अथवा कोळंबी खाणे टाळा
  • कोळंबी पूर्ण शिजेपर्यंत वाफवून घ्या किंवा परतून घ्या. मांस चांगले शिजले असल्याची खात्री करा.

गरोदरपणात करून बघण्यासाठी कोळंबीच्या पाककृती

येथे काही कोळंबीच्या पाककृती आहेत. ह्या पाककृती तुम्ही गरोदर असताना करून खाऊ शकता.

1. गार्लिक प्रॉन्स

साहित्य

  • 1चमचा ऑलिव्ह तेल
  • लसूण (1पाकळी)
  • 300ग्रॅम कोळंबी (सोलून शिजवलेली)
  • 3चमचे लिंबाचा रस
  • 1टेस्पून चिरलेली कोथिंबीर

कसे बनवावे?

  • एका फ्राईंग पॅनमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या
  • लसूण पाकळ्या ठेचून घालून एक मिनिट परतून घ्या
  • त्यात कोळंबी, एक चांगला लिंबाचा रस आणि एक चमचा चिरलेली कोथिंबीर घाला
  • तीन मिनिटे शिजू द्या आणि सर्व्ह करा

2. प्रॉन स्टर फ्राय

साहित्य

  • 1 चिरलेला कांदा
  • 100कोवळा मटार
  • लसूण (१पाकळी), बारीक चिरून
  • 3स्प्रिंग ओनियॉन, चिरून
  • 100ग्रॅम बीन स्प्राउट्स
  • 100ग्रॅम शिजवलेले किंग प्रॉन्स
  • 2टीस्पून वनस्पती तेल
  • 6चमचे पाणी

कसे बनवावे?

  1. पॅन मध्ये तेल गरम करून घ्या आणि कांदा घालून तीन मिनिटे परतून घ्या
  2. लसूण, पाणी, मटार आणि बीन स्प्राउट्स घाला आणि आणखी तीन मिनिटे शिजवून घ्या
  3. स्प्रिंग ओनियनसह पॅनमध्ये कोळंबी घाला आणि आणखी तीन मिनिटे शिजवा
  4. भाताबरोबर सर्व्ह करा

3. प्रॉन टेंपुरा

साहित्य

  • 225ग्रॅम किंग प्रॉन्स
  • 50ग्रॅम कॉर्न फ्लोअर
  • 75ग्रॅम साधे पीठ
  • 5ग्रॅम बेकिंग पावडर
  • सोडा – पाणी
  • ऑलिव ऑइल

कसे बनवावे?

  1. बॅटर तयार करण्यासाठी एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, साधा मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
  2. पिठात एक थेंब सोडा पाणी घाला. जोपर्यंत पीठ गुळगुळीत होत नाही तोपर्यंत घटक मिक्स करताना पाणी घालत रहा
  3. एका कढईत थोडे ऑलिव्ह ऑइल घेऊन गरम करा
  4. तयार पिठात कोळंबी बुडवून गरम तेलात टाका
  5. पाच मिनिटे तळून घ्या आणि बाहेर काढा
  6. सर्व कोळंबी अशाप्रकारे तळून घ्या
  7. सर्व्ह करा

4. प्रॉन, मँगो आणि एवोकॅडो सॅलड

साहित्य

  • 2पिकलेले आवोकाडो
  • २ पिकलेले आंबे
  • 400ग्रॅम सोलून आणि शिजवून घेतलेले किंग प्रॉन्स
  • 6चमचे लाईम ड्रेसिंग
  • 2चमचे चिरलेली कोथिंबीर
  • पालक, रॉकेट आणि वॉटरक्रेसची 1 x 170ग्रॅम पिशवी

कसे बनवावे?

  1. एवोकॅडोचे तुकडे करा आणि आंबे चिरून घ्या
  2. एका भांड्यात कोळंबी आणि कोथिंबीर घालून ठेवा
  3. ड्रेसिंगचे चार चमचे हलक्या हाताने लावा
  4. सॅलडच्या पानांचे दोन प्लेट्समध्ये दोन भाग करा आणि प्रत्येकावर अॅव्होकॅडो आणि कोळंबीचे मिश्रण घाला
  5. सॅलडवर उरलेले ड्रेसिंग घाला आणि लगेच सर्व्ह करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. तुम्ही गरोदर असताना प्रॉन कॉकटेल आणि टोस्ट खाऊ शकता का?

होय, कोळंबी पूर्णपणे शिजवलेली असल्यास गरोदरपणात कोळंबी खाणे सुरक्षित आहे. गरोदरपणात खाण्यासाठी अनुकूल अश्या कोळंबीच्या अनेक रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता.

2. स्तनपान करणाऱ्या आईसाठी कोळंबी खाणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी कोळंबी खाणे सुरक्षित आहेत. आई आणि बाळ दोघांनाही त्याचे अनेक फायदे आहेत.

विश्वासू दुकानदाराकडून चांगली कोळंबी विकत घेऊन योग्य प्रमाणात खाल्ल्यास कोणतीही समस्या निर्माण होत नाहीत. तुम्हाला अस्वस्थता वाटल्यास किंवा ऍलर्जीची कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणात चिकन खाणे
गरोदरपणात मासे खाणे – सुरक्षित की असुरक्षित?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article