Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

जर तुम्ही १३ आठवड्यांच्या गरोदर असाल, तर हा काळ तुलनेने सुरक्षित असल्याने तुम्ही गरोदरपणाचा आनंद घेऊ शकता. गरोदरपणाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो (आणि जोखमीचा असू शकतो), परंतु गरोदरपणाचे पहिले १२ आठवडे पार केल्यानंतर स्त्रिया सुटकेचा नि:श्वास सोडतात, कारण गरोदर स्त्री गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचल्यावर गर्भपात होण्याची शक्यता खूपच कमी होते.

या आठवड्यापासून, तुमच्या बाळाची वाढ वेगाने होईल आणि तुमची प्रगती तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन सुचवू शकतात. १३ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगू शकते आणि ते महत्त्वाचे आहे. तर १३ व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंड स्कॅन का करावे आणि ते कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तुम्ही गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?

गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यांत अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्याने तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे तुमच्या डॉक्टरांना समजण्यास मदत होऊ शकते. १३व्या आठवड्यापर्यंत, तुमच्या बाळाची किडनी कार्य करण्यास सुरुवात करते आणि त्याची मूत्रमार्गाची प्रणाली विकसित होते. म्हणजे तुमचे लहान बाळ गर्भाशयात लघवी करण्यास सुरुवात करते. यावेळी त्याच्या बोटांचे ठसेही आकार घेऊ लागतात. या आठवड्यात केलेले स्कॅन बाळाची प्रगती कशी होत आहे हे शोधण्यात मदत करू शकते. त्याच्या डोक्याशिवाय त्याचे इतर अवयव कसे विकसित होत आहेत हे देखील ह्या स्कॅन मध्ये समजेल.

तुमच्या १३ व्या आठवड्याच्या गर्भधारणेच्या स्कॅनची तयारी कशी करावी?

गरोदरपणात केलेल्या अल्ट्रासाऊंडपैकी हा स्कॅन सर्वात लक्षणीय आहे. तुमच्या गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनची तयारी करण्यासाठी, तुम्ही स्कॅन करण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे, कारण अल्ट्रासाऊंड दरम्यान तुमचे मूत्राशय संपूर्ण भरलेले ठेवणे आवश्यक आहे. मूत्राशय भरलेले असल्यास तंत्रज्ञांना तुमच्या पोटातील गर्भाची स्पष्ट प्रतिमा मिळविण्यास मदत होईल.

अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?

१३ आठवड्यांच्या स्कॅनला सुमारे १५ ते ३० मिनिटे लागू शकतात आणि जर बाळाची गर्भाशयातील स्थिती नीट नसेल तर हा कालावधी ४५ मिनिटांपर्यंत जाऊ शकतो. परंतु स्कॅनचा कालावधी हा स्कॅन करणार्‍या तंत्रज्ञांवर आणि तुमच्या पोटातील बाळाच्या स्थितीवर अवलंबून असेल.

अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?

अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी, तंत्रज्ञ तुम्हाला परीक्षेच्या टेबलावर झोपून पोट उघडे ठेवण्यास सांगतील. तंत्रज्ञ नंतर तुमच्या पोटावर जेल लावेल आणि तुमच्या पोटावर ट्रान्सड्यूसर दाबून ठेवतील. त्वचा आणि ट्रान्सड्यूसर यंत्र यांच्यात चांगले कनेक्शन निर्माण करण्यासाठी जेल लावणे गरजेचे आहे. स्क्रीनवर दिसणार्‍या बाळाच्या प्रतिमेच्या आधारे हे यंत्र हलवले जाईल. तंत्रज्ञ बाळाला स्पष्टपणे पाहण्यासाठी तुमच्या पोटावर थोडे जास्त दाबू शकतो. परंतु काळजी करू नका, कारण या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला वेदना होणार नाहीत.

तुमच्या गरोदरपणाच्या तेराव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल?

तुमच्या गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्यावर तुमच्या बाळाबद्दल बरेच तपशील कळू शकतात. तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील आणि त्याच्या शरीराचे काही भाग विकसित झाले आहेत हे लक्षात येईल. आधीच्या स्कॅन्समध्ये, तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या बाळाचे डोके शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत थोडे अधिक मोठे होते, परंतु आता तुमच्या बाळाच्या शरीराच्या इतर भागांचा विकास जलद होईल आणि शरीराच्या प्रमाणात डोक्याचा आकार वाढताना दिसेल. स्कॅन दरम्यान बाळामध्ये कोणतीही असामान्यता (असल्यास) ती दिसून येईल आणि विकासाचे इतर तपशील देखील दिसतील. १३ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, न्यूकल थिकनेस मोजून डाऊन सिंड्रोमची शक्यता देखील पडताळून पहिली जाईल.

स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?

अल्ट्रासाऊंड दरम्यान कोणतीही समस्या आढळल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल आणि परिस्थितीबद्दल अधिक स्पष्टपणे अभिप्राय देतील. काहीवेळा डॉक्टर कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी असामान्यता किती प्रमाणात आहे हे तपासण्यासाठी आणखी काही स्कॅन आणि काही विशिष्ट चाचण्या सुचवू शकतील.

अल्ट्रासाऊंड स्कॅन मुळे तुम्हाला तुमच्या पोटातील लहान बाळाशी बंध जुळण्यास मदत होईल. हे सर्व करताना तुमच्या उदरात वाढणारा जीव तुम्हाला जाणवेल. हे तुमच्या गरोदरपणाच्या प्रवासातील महत्वाचे क्षण आहेत. जर काही असामान्यता आढळली तर तुम्ही निराश होऊ नका. तुमच्या डॉक्टरांशी सविस्तर बोला आणि त्याबद्दल काय करता येईल ते पहा.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन
पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article