Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदर असताना हिरव्या रंगाचे शौचास होणे सामान्य आहे का?

गरोदर असताना हिरव्या रंगाचे शौचास होणे सामान्य आहे का?

गरोदर असताना हिरव्या रंगाचे शौचास होणे सामान्य आहे का?

गरोदरपणात शरीरात असंख्य बदल घडत असतात. काही बदल तुम्हाला माहिती असतात  आणि काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. सामान्यतः शौच हलक्या तपकिरी रंगाचे असते.तुम्ही आदल्या दिवशी काय खाल्ले आहे ह्यानुसार तुमच्या शौचाच्या रंगाच्या छटा बदलू शकतात. परंतु काही स्त्रियांना हिरव्या रंगाचे शौचास होते. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या  पहिल्या गरोदरपणात त्यांच्या शौचाचा रंग हिरवा झाला असल्याचे आढळून येतो. शौचाचा रंग हिरवा कसा होतो आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा.

निरोगी गर्भारपणामध्ये शौचाचा रंग  कसा असतो?

साधारणपणे, तुम्ही गरोदर नसताना जसा तुमच्या शौचाचा रंग असतो तसाच गरोदर असताना असतो.तुमच्या लक्षात आलेले बदल हे संप्रेरकांमध्ये होणारे चढउतार आणि गरोदरपणात तुम्ही घेत असलेल्या आहारातील बदलांमुळे घडतात. सामान्य शौच तपकिरी रंगाचे असते  कारण त्यात पित्त नावाचा पाचक रस असतो आणि तो  यकृताद्वारे तयार होतो. पित्ताचा रस हिरवट-पिवळ्या रंगाचा असतो आणि अन्नातील चरबीचे विघटन करण्यास  हा रस मदत करतो. हा रस तुमच्या  आतड्यातून फिरत असताना, संप्रेरके आणि जिवाणूंचा त्यावर परिणाम होतो आणि शेवटी शौचाचा रंग तपकिरी होतो. अगदी साध्या जुलाबामुळे सुद्धा शौचाचा  रंग बदलू शकतो.

हलक्या पिवळ्यापासून गडद तपकिरी किंवा काळ्या रंगापर्यंत शौचाच्या  रंगांची श्रेणी सामान्य मानली जाते.इतर लक्षणांशिवाय गरोदरपणात गडद हिरव्या रंगाचे शौच होणे सामान्य मानले जाते. निरोगी शौचाचे  मूल्यांकन करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे शौचाचा पोत मऊ असला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ नये.

गरोदरपणात हिरव्या रंगाचे शौच होणे  सामान्य आहे का?

तुमचे मल अनेक गोघटकांनी  बनलेले असते, उदा:  पाणी, पचायला जड असलेले अन्नातील घटक उदा:  फायबर, चरबी, कोलेस्टेरॉल, प्रथिने, मृत बॅक्टेरिया आणि आतड्यांतील श्लेष्मा इत्यादी.तुम्ही जे अन्नपदार्थ खात आहात त्याचा रंग सुद्धा शौचास येऊ शकतो  त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या रंगाचे शौच  असणे सामान्य आहे. त्यामुळे गरोदर स्त्रियांना हिरव्या रंगाचे शौचास होणे अगदी सामान्य आहे. खरं तर, गर्भवती महिलांमध्ये ही एक तुलनेने सामान्य तक्रार आहे.

गरोदरपणात हिरव्या रंगाचे शौच होण्याची कारणे काय आहेत?

शौचाला नेहमीचा तपकिरी रंग हा पित्त  रसावर जिवाणूंची प्रक्रिया झाल्यामुळे येतो.सामान्य आतड्याची हालचाल सूक्ष्मजंतूंना चमकदार पिवळ्या-हिरव्या पित्ताचा रस गडद तपकिरी रंगात बदलण्यासाठी पुरेसा वेळ देते. तुमच्या शौचाचा रंग हिरवा असण्यामागचे एक कारण म्हणजे पित्त योग्य प्रकारे विघटित होण्याआधी ते पचनमार्गातून खूप लवकर पुढे जाते. यास कारणीभूत असलेले अनेक घटक पुढीलप्रमाणे आहेत:

1. तुमचा आहार

तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या शौचाच्या रंगावर परिणाम होतो.  बीटरूट खाल्ल्यानंतर हे तुमच्या लक्षात आले असेल.अनेक गरोदर स्त्रिया, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या आणि पालक अश्या भरपूर हिरव्या भाज्या खातात. ह्यामधून त्यांना आवश्यक ते पौष्टिक घटक मिळतात. क्लोरोफिलच्या ह्या अतिसेवनामुळे  (पानांमधील रंगद्रव्य ज्यामुळे त्यांना हिरवे बनवते) त्यांचे मल हिरवे होऊ शकते. म्हणून, हिरव्या भाज्या मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ह्या  समस्येचे निराकरण होऊ शकते.

2. आतड्यामध्ये अन्न राहण्याचा कालावधी अनियमित असणे

हा कालावधी  आपण खाल्लेले अन्न शरीराबाहेर टाकण्यापूर्वी  मोठ्या आतड्यात किती काळ टिकते ह्याचा संदर्भ देतो. हिरवे पित्त आतड्यांमधून  पचत नसलेल्या अन्नासोबत त्वरीत बाहेर पडते म्हणून शौचास हिरवा रंग येतो.

3. जन्मपूर्व जीवनसत्त्वे

काहीवेळा, निरोगी आहार देखील तुम्हाला योग्य प्रमाणात आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे देऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत, तुमचे डॉक्टर तुम्हाला जन्मपूर्व जीवनसत्त्वे लिहून देतात. काही खनिजे, जसे की लोह,जीवनसत्त्वे इत्यादींमुळे शौचाचा रंग हिरवा होऊ शकतो, कारण शरीर काहीवेळा ही जीवनसत्वे  शोषण्यात अपयशी ठरते.

4. औषधे

संसर्ग झाल्यास काहीवेळा तुम्हाला औषधे लिहून दिली जाऊ शकतात. ह्या प्रतिजैविकांमुळे शौचाचा रंग हिरवा होऊ शकतो.हा बदल तात्पुरता आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.  प्रतिजैविकांचा कोर्स थांबवल्यास हा रंग अखेरीस सामान्य होईल.

5. जुलाब

जर तुम्ही रेचक घेत असाल, तर त्यामुळे हिरव्या रंगाचे शौचास होऊ शकते. आतड्यांमध्ये अन्न कमी काळ राहिल्यामुळे  पित्त रस पूर्णपणे नष्ट होऊ  शकत नाही. त्यामुळे शौचाचा रंग हिरवा होतो.

6. संप्रेरकांमधील बदल

गरोदरपणात बाहेर पडणारी अनेक संप्रेरके  जलद पचन होण्याचे कारण असू शकतात.पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता ह्यामुळे देखील शौचाचा रंग हिरवा होऊ शकतो कारण शरीराला योग्यरित्या मल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशाप्रकारे, जेव्हा योग्य जिवाणूंद्वारे (जे मल तपकिरी करतात) अन्नाचे नीट विघटन होत नाही, तेव्हा हिरव्या रंगाचे मल तयार होते.

सामान्य कारणे आणि हार्मोनल बदल वगळता,काही आरोग्यविषयक घटकांमुळे देखील हिरव्या रंगाचे शौचास होऊ शकते .हिरव्या रंगाचे शौचाला होण्यामागे काही आजार असू शकतात. त्या आजारांची यादी इथे दिलेली आहे.

हिरव्या रंगाचे शौचास होण्यामागील संसर्ग किंवा कारणे

1. सेलिआक डिसीज

ही  एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे आणि हा आजार आनुवंशिक आहे.  बार्ली,गहू आणि राई यांसारख्या धान्यांमध्ये असलेल्या ग्लूटेन नावाच्या प्रोटीनचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक प्रतिक्रिया होऊ शकतात. यामुळे लहान आतड्याच्या आवरणामध्ये जळजळ होते, आणि त्यामुळे  विशिष्ट पोषक तत्वांचे शोषण रोखले जाते आणि गुंतागुंत निर्माण होते.

2. जिआर्डिया

हा आतड्याचा परजीवी संसर्ग आहे.  दूषित अन्न खाल्ल्याने किंवा पाणी प्यायल्याने हा संसर्ग होतो.बहुतेक वेळा  ही समस्या आपोआप बरी होते तर गंभीर प्रकरणांवर प्रतिजैविकांनी उपचार करणे आवश्यक आहे.

3. स्यूडोमेम्ब्रेनस कोलायटिस

विशिष्ट प्रकारचे जिवाणू जास्त प्रमाणात वाढल्याने तुमच्या आतड्याला होणारा  हा दाहक रोग आहे.बहुतेकदा  ह्या प्रतिजैविकांमुळे आतड्यांमधील निरोगी जिवाणू नष्ट होतात आणि समतोल ढासळतो.

4. गरोदरपणातील  कोलेस्टेसिस

गरोदरपणातील कोलेस्टेसिस हे हिरव्या रंगाचे शौच होण्यामागचे कारण आहे. ही यकृताची समस्या आहे.ही समस्या उद्भवल्यास एखाद्या व्यक्तीच्या रक्तात आम्ल पित्त  तयार होते आणि विशेषतः हातापायांवर खूप  खाज सुटते . गरोदरपणातील  कोलेस्टेसिस सामान्यतः दुस-या तिमाहीत किंवा गरोदरपणाच्या  शेवटच्या तिमाहीत उशीरा होतो.

गरोदरपणातील  कोलेस्टेसिस

5. इरिटेबल बोवेल सिंड्रोम

ह्या सिंड्रोम मुळे मोठ्या आतड्यावर परिणाम होतो.ही समस्या असल्यास  मोठ्या आतड्यांमधून अन्न पुढे सरकावण्यास मदत करणारे स्नायू अनियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात आकुंचन पावतात. त्यामुळे आतड्यांना सूज येऊन अतिसार होतो.

6. अल्सरेटिव्ह कोलायटिस

हा आतड्याचा रोग आहे . ह्यामुळे आतडे आणि गुदाशयाच्या सर्वात आतील अस्तरांवर परिणाम होतो.यामुळे पचनसंस्थेचा अल्सर होतो  आणि जळजळ निर्माण होते. तसेच  पोटात पेटके येऊन अपचन होते. ह्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आतड्याचा  कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा  जास्त असतो.

7. आतड्यांचा कर्करोग

आतड्यातील कर्करोगामुळे पचनावर मोठा परिणाम होतो.

8. क्रोहन रोग

क्रोहन रोगामुळे आतड्यांच्या  काही भागांवर परिणाम होतो. हा आजार  कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. तो बरा होऊ शकत नाही. परंतु आजार वाढू नये म्हणून विविध औषधे वापरली जाऊ शकतात.

9. साल्मोनेला  मुळे होणारी अन्नाची विषबाधा

साल्मोनेला हा एक जिवाणूंमुळे होणारा संसर्ग आहे. दूषित अन्न खाल्ल्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. मुख्यतः दूषित,कमी शिजवलेल्या अन्नामुळे हा संसर्ग होऊ शकतो.

10. ई. कोली

ई. कोली  हा एक सामान्यतः आढळणारा जीवाणू आहे. ह्या जिवाणूमुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. हा जिवाणू  दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. कमी शिजलेले मांस हे देखील ई. कोली च्या प्रसाराचे प्रमुख कारण आहे.

11. व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस

व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस, म्हणजेच स्टमक फ्लू हा दूषित अन्न, पाणी किंवा संक्रमित व्यक्तीसोबत भांडी किंवा टॉवेल शेअर केल्याने पसरतो.

त्याचा सामना कसा करायचा?

सामान्यतः, गरोदरपणातील  हिरव्या शौचाबद्दल  काळजी करण्याची गरज नाही. हजारो स्त्रियांना ह्याचा अनुभव येत असतो. जर तुम्ही पहिल्यांदा आई होत असाल तर तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.म्हणून तुमच्या डॉक्टरांशी बोलून शंका दूर करणे ही पहिली पायरी आहे. जर हिरव्या रंगाच्या शौचामुळे तुम्हाला त्रास होत असेल आणि आहारातील हिरव्या किंवा जांभळ्या रंगाच्या पदार्थांमुळे शौचाचा रंग बदलत असेल तर आहारात बदल करा.  लोहाच्या गोळ्यांमुळे शौचाचा रंग बदलत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर लोहाचे कमी प्रमाण असलेली प्रसुतीपूर्व औषधे घ्या.

जर तुम्ही एखाद्या संसर्गासाठी औषधोपचार घेत असाल,तर ते तुमच्या डॉक्टरांना सांगा  जेणेकरून डॉक्टर डोस कमी करू शकतात किंवा तो बदलू शकतात.

डॉक्टर से कब मिलना है

आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी कुठलाही संसर्ग टाळणे आवश्यक आहे .हे केवळ तुमच्या शौचाच्या रंगासाठी नाही तर तुमच्या सर्वसाधारण आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. सर्व पदार्थ नीट धुवून शिजवून घ्या. विशेषतः मांसाहारी पदार्थ करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार धुवा आणि जेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा भरपूर प्रमाणात सॅनिटायझर वापरा. तुमची पचनसंस्था सुरळीत चालण्यासाठी वेळेवर खा आणि संतुलित आहार पाळा.

डॉक्टरांना कधी फोन करावा?

दुसरी कुठलीही लक्षणे नसतील तर तुम्ही तुमच्या शौचाच्या रंगात झालेल्या बदलाकडे दुर्लक्ष करू शकता.जर तुम्हाला सतत हिरव्या रंगाचे शौचास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या भेटीची वेळ निश्चित करा. तुम्ही गरोदर राहिल्यानंतर तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात केलेल्या बदलांबद्दल तुम्हाला विचारले जाईल. शौचास हिरवा रंग येण्यामागे काही गंभीर आरोग्यविषयक समस्या असण्याची प्रकरणे खूप दुर्मिळ आहेत. खालील लक्षणे आढळल्यास  त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

  • शौचामध्ये  रक्त किंवा हिरवा श्लेष्मा.
  • अतिसार आणि शौचास पातळ होणे. त्यामध्ये पेटके येणे आणि ओटीपोटात दुखणे अशी लक्षणे दिसत असल्यास
  • ·शौचास हिरव्या रंगाचे होणे, गुदाशय दुखणे, ताप येणे आणि भूक न लागणे यासारखी शारीरिक लक्षणे
  • अधूनमधून बद्धकोष्ठता होणे

गरोदरपणात हिरव्या रंगाच्या शौचाबद्दल  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. हिरव्या रंगाचे शौचास होत असल्यास ते गर्भधारणेचे लक्षण आहे का?

गर्भधारणेमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार झाल्यामुळे हिरवा-पिवळा स्त्राव होऊ शकतो, हुतेकदा हिरवट पिवळ्या रंगाचे शौच हे हिरव्या रंगाचे समजले जाते. तुम्हाला हिरव्या रंगाचे शौच होत असल्याचे लक्षात आल्यास डॉक्टरांना भेटा. कारण एकतर तुम्ही गर्भवती असल्याचे सूचित होते किंवा अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील संसर्गाचे निदान होते.

2.  हिरव्या रंगाचे शौचास होत असल्यास मला काळजी वाटली पाहिजे का?

पूरक औषधांमुळे किंवा तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांमुळे हिरव्या रंगाचे शौचास होत असल्यास काळजी करू नये. परंतु जर पेटके येणे, रक्तस्त्राव होणे किंवा तापासारखी संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. गरोदरपणात माझ्या शौचाचा रंग कसा असला पाहिजे?

खरं तर गरोदर नसताना जसा तुमच्या शौचाचा रंग असतो तसाच गरोदर नसताना सुद्धा असला पाहिजे.तरी सुद्धा तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. हिरव्या रंगाचे शौचास होणे किंवा ओटीपोटात दुखणे ह्यासारख्या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गरोदरपणात हिरव्या रंगाचे शौचास होणे सामान्य आहे. बहुतेक वेळा त्याविषयी चिंता करण्याचे काहीच कारण नसते. त्यामुळे दीर्घ श्वास घ्या आणि कोणत्याही गंभीर समस्यांविषयी शंका काढून टाकण्यासाठी  किंवा त्यांचे निदान करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

गरोदरपणातील बद्धकोष्ठता
गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article