Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २८वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २८वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २८वा आठवडा

गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांसह पुढे सरकत असतो. हे टप्पे बाळांच्या तसेच आईच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे कारण तेव्हापासून अधिकृतपणे तिसऱ्या तिमाहीची सुरुवात होते. तुमचे डॉक्टरसुद्धा, तुमच्या बाळांच्या विविध पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करतात आणि वास्तविक जगात आल्यानंतर ही बाळे योग्य आणि सर्वोत्तम राहतील हे सुनिश्चित करतात.

बाळांची पोटातील स्थिती समजून घेण्यापासून, प्रसूती यशस्वीरीत्या कशी करता येईल इथपर्यंतचे सर्व घटक ह्या शेवटच्या महिन्यांमध्ये बाळांना होणारी कोणतीही जोखीम कमी करण्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यामुळे निरोगी बाळे जन्माला येण्याची शक्यता वाढते.

२८ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तिसऱ्या तिमाहीची सुरुवात म्हणजे तुमच्या बाळांच्या विकासाचा आणखी एक टप्पा आहे. ह्या टप्प्यावर बाळांच्या लांबीमध्ये काही फरक पडत नाही परंतु त्यांचे वजन आणि विकासामध्ये प्रगती होते. हाडांची संरचना आणखी मजबूत होऊ लागते आणि चरबीचा थर वाढू लागतो आणि तुमचे छोटेसे बाळ आता अगदी गुबगुबीत आणि गोंडस दिसू लागते.

तुमच्या बाळांच्या फुफ्फुसांचा अद्याप पूर्ण विकास झालेला नाही आणि दर आठवड्याला त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास होत जाईल. बाळाच्या वाढीसाठी ज्या नाळेद्वारे पोषण आणि अन्नपदार्थ दिले जातात ती सुद्धा आकाराने वाढते तसेच बाळाच्या मागण्या सुद्धा वाढतात. बाळ स्वतः एक किलोग्रॅम इतके वजनदार असेल.

तुमच्या लहान बाळांचे क्रियाकलाप वाढतील. डोळ्यांची हालचाल आणि डोळे मिटणे आणि उघडण्याची वारंवारिता वाढेल, कारण तुमच्या बाळांचे झोपेचे आणि जागे राहण्याचे चक्र नियमित होईल. वेगवेगळ्या उत्तेजनांच्या संवेदनशीलतेसह मेंदूचे विघटन वाढविणे पुढे सुरू राहिल. बाळांभोवतीच्या गर्भजलाचे प्रमाण आता कमी होऊ लागेल. हे असेच सुरू राहील कारण बाळ गर्भाशयाच्या आतील बहुतेक जागा व्यापेल आणि गरोदरपणाच्या अखेरीस फारच कमी गर्भजल शिल्लक राहील.

बाळांचा आकार केवढा असेल?

पुढील वेळी आपण घरासाठी काही भाज्या घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये जाल तेव्हा मोठ्या वांग्याकडे नीट लक्ष द्या! तुमच्या आत तुमची बाळं तितकीच मोठी आहेत. ह्या आठवड्यात त्यांची लांबी सहसा जास्त प्रमाणात वाढत नाही. बाळांची लांबी जेव्हा त्यांच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत मोजली जाते तेव्हा ती जवळपास ३७ सेंटीमीटरपर्यंत राहते. तथापि, त्यांचे वजन खूपच जास्त प्रमाणात वाढते, त्यामुळे प्रत्येक बाळ अंदाजे ८५०९०० ग्रॅम इतके असते.

बाळांचा आकार केवढा असेल?

सामान्य शारीरिक बदल

ह्या आठवड्यात तुमच्या बाळांचे फक्त वजन आणि चरबी वाढत राहते. तुमचे शरीर ह्या बदलांसोबत जुळवून घेत असते आणि स्वतःमध्ये बदल करत असते.

  • बाळे त्यांच्या आरामदायक घरात म्हणजेच तुमच्या पोटात जे क्रियाकलाप करतात ते तुम्हाला जाणवत राहतात. आईला बाळाच्या हालचाली आणि बाळाचे पाय मारणे जाणवू लागते.
  • जेव्हा तुमच्या बाळांना उचकी येऊ लागेल तेव्हा आणखी एक भर पडेल. श्वासोच्छवासाद्वारे बाळे गर्भजल आत घेत असल्यामुळे डायफ्रॅम वेगाने हलते त्यामुळे बाळांना उचकी येऊ शकते. तुम्ही बाळाच्या उचकीचा आवाज ऐकू शकत नाही किंवा बाहेरून ते जाणवत देखील नाही परंतु आतून तुम्हाला ते जाणवते आणि गरोदरपणातील ते सर्वात आनंददायी आणि मजेशीर क्षण असल्याचे बऱ्याच गरोदर स्त्रिया सांगतात.
  • तिसऱ्या तिमाहीपर्यंत बऱ्याच स्त्रियांना सूज येण्याची सवय झालेली असेल. जरी ते वेदनांदायक नसले तरीसुद्धा अचानक पेटके येऊ शकतात. गरोदर स्त्रियांना त्यांच्या पायात विचित्र संवेदना येऊ शकतात. विशेषतः छोट्या विश्रांतीकरिता तुम्ही थोडा वेळ झोपल्यास किंवा शांतपणे बिछान्यावर झोपल्यास पायांमध्ये पेटके येऊ शकतात, पेटके का उद्भवतात हे डॉक्टरांना अद्याप सापडलेले नाही; असे असले तरी, पाय आणि बोटांना ताणणे, तसेच थंड जमिनीवर उभे राहिल्यास पेटके नष्ट होऊ शकतात.
  • कुठल्याही वेदना होऊ न देता गर्भाशय शरीरात स्वतःसाठी जागा तयार करत असते आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. श्रोणीकडील भागात जिथे गर्भाशय असते तिथे वेदना होत असल्यास ते चिंतेचे कारण आहे. परंतु बऱ्याच वेळा तिथे दाब पडत असल्याची संवेदना असते. गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात हे अगदी स्पष्ट दिसून येते कारण लहान मुलांच्या आकारात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागते. काहीही झाले तरी सुद्धा दबाव कमी होईपर्यंत काही मिनिटे विश्रांती घेणे आवश्यक आहे.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यातील लक्षणे

आपण गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यातील विविध लक्षणे तुम्हाला आधीच्या आठवड्यांच्या तुलनेत थोडी तीव्र वाटतील.

  • ह्या काळात अचानक तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरात थोड्या वेदना होतील. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या बाळातील वाढलेल्या वजनाची बाळे, संप्रेरकांच्या बदललेल्या पातळीमुळे संवेदनशील झालेल्या शरीरातील विविध भागांमुळे तसेच गरोदरपणाच्या ताणामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात. विश्रांती आणि श्वासोच्छवास करण्याचा व्यायाम हा प्रतिकार करण्याचा उत्तम मार्ग आहे.
  • तुम्ही गर्भवती असताना ऑफिसला जात असाल, तर हे आठवडे तुम्हाला थकवणारे असू शकतात. बाळांचा आकार वाढल्याने श्वसनप्रणालीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे कमी प्रमाणात हवा आत घेतली जाते तसेच त्यामुळे शरीराला ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटणे साहजिक आहे. तसेच, तुम्हाला अचानक कळा येऊ शकतात आणि श्वास कमी पडू शातो त्यामुळे तुम्हाला काही वेळा अस्वस्थ आणि निराश वाटू शकते.
  • मागच्या आठवड्यांमध्ये तुमच्या स्तनांचा आकार खूप जास्त वाढला होता, परंतु काही वेळा अचानक दूध किंवा पिवळ्या रंगाचे कोलोस्ट्रमची गळती होईल. ही गळती काही वेळेला इतकी जास्त असते की त्यामुळे तुमची ब्रा आणि कपडे सुद्धा भिजू शकतात. हे सामान्य आहे, परंतु काळजी घेणे आवश्यक आहे.

जुळ्या बाळांसह गरोदरपण २८ वा आठवडा पोटाचा आकार

तुमच्या गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात, आधी कधीच नव्हते इतके पोट इतके मोठे होईल. गोलाकार वक्रता अधिक स्पष्टपणे दर्शविली जाईल आणि स्ट्रेच मार्क्स अगदी ठळकपणे दिसू लागतील, त्वचा किती प्रमाणात ताणली जाऊ शकते हे त्यावरून समजते. त्यामुळे त्वचेला खाज सुटू शकते.

ठराविक क्रीम, जेल किंवा तेल हे स्ट्रेच मार्क्स कमी आणि खाज कमी करण्यास मदत करते. ही क्रीम्स किंवा तेलं सामान्यत: गरोदरपणात सुरक्षित असतात आणि बाळाला इजा करीत नाहीत.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

ज्या स्त्रियांचे गरोदरपण सामान्य असते किंवा स्वतंत्र जुळी बाळे असतात त्यांचा स्कॅन केला जात नाही. गर्भावस्थेच्या आधीच्या कोणत्याही टप्प्यावर गुंतागुंत आढळल्यास किंवा एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात एकसारखे जुळे असल्यास बहुतेक डॉक्टर गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करतात. हे स्कॅनसुद्धा गरोदरपणाची आणि बाळांच्या प्रगतीवर नजर ठेवण्यासाठीच्या सामान्य दिनक्रमाचा एक भाग आहे.

या टप्प्यातील स्कॅनमध्ये बाळांच्या पापण्यांशिवाय काही दिसत नाही. बाळांच्या पापण्या ह्यापुढील आठवड्यांमध्ये अधिक स्पष्ट दिसू लागतील.

काय खावे?

बहुतेक डॉक्टर तुम्हाला निरोगी ठेवणाऱ्या आणि बाळांचे वजन वाढेल अशा विशेष आहारावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतील. आहारतज्ञांची देखील शिफारस केले जातील. हे आहारतज्ज्ञ तुम्हाला कोणते अन्नपदार्थ किती प्रमाणात खावे ह्याची शिफारस करतील. तसेच ते वारंवार खाणे चांगले. दिवसभरात ६ वेळा खावे. सकाळी शरीरात जास्तीत जास्त कॅलरी जाणे जरुरीचे आहे आणि संध्याकाळपर्यंत त्या कमी केल्या पाहिजेत. मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे ज्यामुळे सूज कमी येईल. जर गरोदर स्त्रीला मधुमेह असेल तर त्याप्रमाणे आहार समायोजित करणे आवश्यक आहे.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

काही मूलभूत सवयी आणि टिप्स पाळल्यास तुमची सुरक्षा आणि आरोग्य पातळी उच्चतम राखण्यास मदत होते.

हे करा

  • काही वैद्यकीय भेटी आवश्यक असल्यास आताच त्यांची नोंदणी करा.
  • बाळांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि त्यांची नोंद ठेवा.

काय टाळावे?

  • कॅफीनयुक्त पेय पिणे टाळा, कारण यामुळे आपल्या बाळांच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.
  • आपल्या वेळापत्रकातून व्यायाम पूर्णपणे काढून टाकू नका.

आपल्याला काय खरेदी करणे आवश्यक आहे?

तुम्ही जुळी किंवा एकाधिक बाळे होणार आहेत हे माहिती झाल्यावर तुम्ही त्यांच्यासाठीची खालीलप्रमाणे उत्पादने खरेदी करू शकता.

  • जुळ्या बाळांसाठी मॅचिंग कपडे
  • जुळ्या किंवा तिळ्या बाळांसाठी कार सीट

जुळ्या बाळांसह २८ आठवड्यांची गर्भवती स्त्री आतापर्यंत बऱ्याच बदलांमधून गेलेली असते आणि ती तिची मनःस्थिती आणि आरोग्य सर्वोत्तम सांभाळत असते. तिला तुम्ही आधार द्या आणि शक्य तितकी मदत करा त्यामुळे तिचा हा गरोदरपणाचा काळ सुकर आणि सोपा होईल!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article