In this Article
जुळ्या मुलांसह सात आठवडे गर्भवती राहणे ही एका स्त्रीची सर्वोच्च भावना आहे आणि पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांसाठी हा संपूर्णपणे वेगळा अनुभव आहे. तुम्हाला तुमच्या गर्भारपणाच्या सुरूवातीस अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी या काळात ठळकपणे दिसू लागतील. तुमचे कपडे घट्ट होण्यापासून तुमच्या आत एक जीव वाढण्यापर्यंतच्या भावना निर्माण होण्यापासून त्या नियंत्रित होण्यापर्यंत सर्व काही गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात होते. बाळे त्यांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेत आणि आधीच्या आठवड्यापेक्षा त्यांच्या आकारात दुप्पट वाढ झालेली आहे.
सामान्यपणे शरीरात होणारे बदल
बाळाची वाढ ह्या काळात सर्वोच्च गतीने होत असते, आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीला जाणवणारे शारीरिक बदल सुद्धा लक्षणीय असतात.
- तुम्हाला कदाचित इतर लोकांपेक्षा जास्त उबदारअथवा गरम वाटू शकेल आणि बहुतेक वेळा तुम्हाला फॅन किंवा एसी सुरु करावासा वाटू शकतो. शरीरातील वाढत्या रक्ताभिसरणाचा हा परिणाम आहे
- बर्याच स्त्रियांना त्वचा काळी होण्याचा अनुभव असतो. पोटावर गडद रेषा तयार होणे हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. शरीराच्या इतर भागात रंगद्रव्याचे लहान ठिपके असू शकतात, जे प्रसूतीनंतर नष्ट होतात. आपल्या हाताच्या तळव्यांना देखील गडद छटा येते
- स्तनांची सूज आणि भरीवपणा त्यांना कोमल बनवते. स्तनाजवळील भागात काही रक्तवाहिन्या सुद्धा दिसू शकतात. स्तनाग्रे जास्त गडद आणि आकाराने वाढू लागल्याने स्तनाग्रांजवळील भाग अधिक गडद होतो. स्तनाग्रांभोवती अगदी छोटे फोड दिसू लागतील
- गर्भाशयामध्ये लक्षणीय बदल होतात. गर्भाशय आकाराने वाढते आणि पेअरच्या आकाराचे होते. काही वेळा ते हळूहळू ओटीपोटाकडे सरकण्यास सुरुवात होते. अशा हालचाली आतील अस्थिबंधनांना नेहमीपेक्षा घट्ट बनवतात आणि जर तुम्ही त्वरित तुमचे शरीर एकीकडून दुसरीकडे वळवले तर ते वेदनादायी होऊ शकते
- ह्या टप्प्यावर ओव्यूलेशन पूर्णपणे थांबते आणि नवीन अंड्यांचे उत्पादन पूर्णपणे बंद होते. अंडाशयाद्वारे तयार होणारी सिस्ट संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करते आणि गर्भधारणा टिकवून ठेवण्यास मदत होते
- रक्तवाहिन्या वेगाने वाढल्यामुळे योनिमार्गात स्त्राव देखील वाढू शकतो. तसेच, प्रसुतीची तयारी करताना योनीतून वंगण घालण्यासाठी स्त्राव वाढतो. योनि नेहमीपेक्षा किंचित आम्लीय झाल्याने ते स्राव जाडसर आणि पांढर्या रंगाचे असतील
- गर्भाशयाला अतिरिक्त रक्त प्रवाह देण्यासाठी रक्ताचे प्रमाण वाढेल. रक्ताच्या वाढीव प्रमाणांमुळे गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीत हृदयाचे ठोके वाढू शकतात
- दुसऱ्या तिमाहीत, तुमची बाळे तुमच्या शरीरात अधिक जागा व्यापू लागतात तेव्हा तुमचे अवयव त्यांना सामावून घेण्यासाठी थोडे सरकतात. तुमचे हृदय थोडे डावीकडे हलते. दुसरीकडे, फुफ्फुसे वरच्या दिशेने सरकतात, ज्यामुळे आपली छाती थोडी वाढते. यामुळे फुफ्फुसांचा पूर्वीपेक्षा जास्त विस्तार होतो त्यामुळे ते जास्त प्रमाणात हवा आत घेतात आणि सोडतात
- शरीरात पोषणमूल्यांची जास्त देवाण घेवाण होते आणि खूप काम केल्यामुळे मूत्रपिंड सुजते. विषारी पदार्थ जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर टाकले जातात, त्यामुळे लघवी होण्याची भावना तीव्र होते
- जरी आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागत असली तरीसुद्धा बहुधा थोडे खाल्ल्यानंतरच तुम्हाला समाधान वाटेल, कारण पोट आधीच्यापेक्षा कमी वेगाने रिकामे होते. यामुळे गर्भवती महिलांमध्ये अॅसिड रिफ्लक्सचे प्रमाण वाढू शकते. तंतुमय खाद्यपदार्थाच्या अभावामुळे बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील लक्षणे
७व्या आठवड्यांत जुळ्या गर्भधारणेची चिन्हे तीव्रपणे दिसू लागतात
- मळमळ आणि मॉर्निग सिकनेसची तीव्रता वाढेल, विशेषत: एकाधिक बाळांच्या बाबतीत हार्मोन्स पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात स्रवतील
- विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा वाढेल आणि जे दिसेल त्यावर ताव मारण्याचा तुम्हाला मोह होईल. नेहमीपेक्षा जास्त खाणे सामान्य आहे परंतु ते अन्न पोषक असावे. याउलट, काही स्त्रियांना विशिष्ट खाद्यपदार्थांचा तीव्र तिटकारा वाटू शकतो. विशिष्ट अन्नपदार्थांच्या वासामुळे तुमचा मॉर्निग सिकनेस वाढेल आणि तुम्हाला उलटीची भावना होऊ शकते. संप्रेरकांमधील बदलांमुळे असे होऊ शकते आणि ते सामान्य आहे. परंतु आईला दुसऱ्या स्रोतांमधून पोषणमूल्येमिळाली पाहिजेत. दही किंवा बिस्किटे ह्यासारख्या हलकी चव असलेल्या पदार्थांद्वारे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते
- गरोदरपणात, काही स्त्रियांना मुरुमांचा त्रास होऊ शकतो. तथापि, कोणत्याही उपचारांचा पर्याय निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
- वारंवार उलटी होत असल्यामुळे लाळेचे प्रमाण वाढते. झोपेत सुद्धा लाळ गळू शकते
- गर्भाशयाचा आकार वाढतो परिणामी स्त्रिया किरकोळ पेटके अनुभवू शकतात. जोपर्यंत पेटके फार तीव्र नसतात आणि वारंवार पुनरावृत्ती होत नाहीत तोपर्यंत आपण सुरक्षित आहात
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात पोटाचा आकार
तुमच्या पोटाच्या वाढलेल्या आकारावरून बाळांची झालेली वाढ दिसून येते आणि त्यामुळे त्याची उपस्थिती पूर्वीपेक्षा जास्त जाणवते. काही स्त्रियांच्या त्वचेवर काही हलक्या रंगांच्या रेषा देखील दिसू शकतात, ज्याचा रंग किंचित लालसर असू शकतो. ह्या रेषा स्तन आणि मांडीवर देखील दिसतात. आपल्या वाढत्या बाळांना सामावून घेण्यासाठी शरीर तयार होत असल्यामुळे त्वचा ताणली जाते आणि स्ट्रेच मार्क्स दिसण्यास सुरुवात होते.
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड
बहुतेक डॉक्टर ह्या टप्प्यावर जुळे किंवा एकाधिक बाळे अपेक्षित आहेत का हे पालकांना सांगू शकतात. दोन आठवडे अगोदरही ठराविक पुरावे मिळू शकतात, परंतु या टप्प्यामुळे पालकांना देखील या तथ्याशी सहमत होणे सोपे होते, म्हणूनच बहुतेक डॉक्टर सातव्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करतात. सातव्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये दोन (किंवा अधिक) वेगळ्या थैल्यांची उपस्थिती सहजपणे आढळू शकते. जरी तुम्हाला बाळाच्या आकारात जास्त विकास दिसू शकत नसला, तरीसुद्धा जोपर्यंत तुमच्या प्रत्येक बाळामध्ये महत्वाचे अवयव आणि शारीरिक अंग विकसित होत आहेत तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स राहू शकता.
काय खावे?
गरोदरपणाच्या सातव्या आठवड्यात सहसा अशी वेळ येते जेव्हा बहुतेक स्त्रियांना त्यांनी आतापर्यंत ऐकलेल्या पदार्थांची लालसा निर्माण होण्याचा अनुभव येण्यास प्रारंभ होतो! काही प्रकरणांमध्ये, कदाचित यापूर्वी फारसे आवडत नसलेले खाद्यपदार्थ अचानक सर्वात स्वादिष्ट वाटू शकतील! काही जण म्हणतात की लालसा वाटणे हे शरीरातील पोषक तत्वांच्या भरपाईची आवश्यकता आहे हे तुम्हाला सांगण्याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, आईस्क्रीमची इच्छा असणे हे कॅल्शियम कमतरता असल्याचे लक्षण असू शकते किंवा मांस खावेसे वाटल्यास प्रथिनांची आवश्यकता असू शकते.
आपली अन्नपदार्थांची लालसा तीव्र किंवा कमीतकमी असली तरीही, तुम्हाला आवश्यक असलेले सर्व घटक आणि पोषक द्रव्यांची संतुलित तरतूद करण्यासाठी काही खाद्यपदार्थ आपल्या आहाराचा एक भाग असावेत. सुरुवातीला, मॉर्निंग सिकनेस कुठल्या अन्नपदार्थांमुळे होतो हे समजणे कठीण आहे. तीव्र गंध नसलेली विशिष्ट फळे किंवा पर्याय निवडल्यास आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.
गरोदरपणात काळजी घेण्यासाठी काही टिप्स
निरोगी खाणे आणि आपल्या शरीराची काळजी घेण्यापलीकडे सुद्धा गरोदरपणात तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत.
हे करा
- शक्य तितके लवकर आपली वैद्यकीय तपासणी करा. तुम्ही प्रश्नांची आणि आपल्या मनात असलेल्या शंकांची यादी तयार केली पाहिजे जेणेकरुन आपल्याला सर्व उत्तरे मिळतील याची खात्री करा
- दररोज किंवा आठवड्यातून किमान दोनदा किंवा तीन वेळा आपल्या पोटाचे फोटो घ्या. असे केल्याने आपल्याला मागील महिन्यांपेक्ष ह्या आठवड्यात तुमच्या गरोदरपणात कशी प्रगती झाली आहे हे समजेल
हे टाळावे
- कितीही खावेसे वाटले तरी सुद्धा कच्चे मांस आणि मासे खाणे टाळा. कोणत्याही संक्रमणांपासून सुरक्षित रहा
- वजन कमी करण्याच्या कार्यक्रमाची निवड करू नका किंवा वजन कमी ठेवण्यासाठी आपल्या आहारावर मर्यादा घालू नका. हे अपरिवर्तनीय मार्गाने आपल्या बाळाचे नुकसान करू शकते
आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
तुमची मॉर्निंग सिकनेसची लक्षणे येत्या आठवड्यांत अधिक मजबूत झाल्याने काही सुवासिक उदबत्त्यांमध्ये किंवा चहामध्ये गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपली त्वचा गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यासाठी सौम्य स्क्रब आणि मॉइश्चरायझर घ्या. गर्भधारणेच्या आणि बाळाच्या विकासाच्या आसपासची पुस्तके किंवा लेख वाचण्यास प्रारंभ करा
मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ६ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा