Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहणे स्त्रीसाठी चिंताजनक असू शकते आणि जर तुम्ही गरोदरपणाच्या १७ आठवड्यांच्या टप्प्यावर पोहोचलात तर ते आश्चर्यचकित करणारे आणि विस्मयजनक क्षण आहेत नाही का? तुमच्या पोटातली बाळे आता पूर्वीपेक्षा मोठी झाली असतील. तुम्हाला आता गरोदरपणाच्या दिनचर्येची सवय झालेली असेल आणि तुमच्या बाळांना तुम्ही वाढवू शकाल असा आत्मविश्वास तुम्हाला येईल. तुम्ही गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात पोहोचल्यावर वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या करणे सुरु राहील त्यामुळे तुमच्या बाळांची प्रगती आणि तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवता येते.

१७ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमची बाळे त्यांच्या वाढीच्या निम्म्या टप्प्यावर पोहोचली आहेत आणि म्हणूनच यापुढे त्यांची वाढ कमी होईल असे समजू नका. उलटपक्षी त्यांची प्रगती वाढेल आणि लहान बाळे अधिक चांगला आकार घेऊ लागतील.

१७ व्या आठवड्यापर्यंत होणाऱ्या बहुतेक विकासामध्ये प्रामुख्याने बाळांच्या अवयवांचे कार्य समाविष्ट होते आणि लहान भ्रुण माणसाच्या रूपात कार्यरत असलेल्या गर्भामध्ये रूपांतरित होते. पुढे, जी मुख्य वाढ होते ती चरबीच्या स्वरूपात साठवण्यात येते. त्यांचे शरीराचे तापमान राखण्यासाठी आणि आवश्यक असलेली सर्व ऊर्जा मिळण्यासाठी ऊतकांवर चरबीचे थर साठू लागतील. हे चरबीचे थर आयुष्यात तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांना गोंडस आणि मऊ बनवतील.

चरबीचे थर आणि आपल्या बाळांमध्ये होणारी अथक वाढ ह्यामुळे त्यांच्या हृदयाची गती पूर्वीपेक्षा वाढते. त्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटास सुमारे १५० इतके जास्त पडतात जे आपल्यापेक्षा किंवा इतर कोणत्याही प्रौढ व्यक्तीपेक्षा दुप्पट आहेत. मॉनिटर्सद्वारे किंवा स्कॅन दरम्यान हे सहज ऐकू येते.

मागील काही आठवड्यांपर्यंत काही बाळे गर्भजल पिशवीत असतात आणि त्यांच्या हालचाली प्रतिबंधित असतात. साधारणपणे १७ व्या आठवड्यात हे चित्र बदलते आणि बाळ त्यांचे तळवे गर्भाशयाच्या भित्तिकांवर टेकवून त्यावर दाब देऊ लागते त्यामुळे बाळांच्या बोटावर फिंगरप्रिंट तयार होतात.

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळाचा आकार

मागील आठवड्याच्या तुलनेत, बहुतेक बाळे ह्या आठवड्यात साधारणत: १२ सेंटीमीटर लांब असतात, परंतु जुळी आणि तिळी बाळे तुलनेने लहान असू शकतात. याव्यतिरिक्त, त्यांचे वजन देखील सुमारे ६०१०० ग्रॅम्सच्या आसपास असते त्यामुळे तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवू लागते.

ह्या आठवड्यात बाळांच्या आकाराची तुलना तुम्ही डाळिंबांशी करू शकता कारण बाळे खरोखर आता तेवढी मोठी असतील.

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळाचा आकार

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

एखाद्या महिलेच्या शरीरात होणारे बहुतेक बदल हे बहुदा आंतरिक असतात कारण त्यापैकी काही बदल अजूनही आपल्या गरोदरपणात कुठल्याही वेळी अस्वस्थता आणू शकतात.

 • तुमच्या वाढत्या बाळांना योग्यरित्या पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, गर्भाशयाचा विस्तार झाला पाहिजे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा इतर अवयव ओटीपोटात जागा घेण्यास परवानगी देतात. आतडे आणि पोट ह्यांना यासाठी सर्वात जास्त समायोजित करावे लागेल. या काळात तुमचे गर्भाशय वाढतच आहे, त्यासाठी पोट आणि आतड्याना तडजोड करावी लागते. ह्या सर्व बदलांमुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि छातीत जळजळ होण्याची लक्षणे पूर्वीपेक्षा बळकट होतात. शिवाय, गर्भधारणेच्या या अवस्थेच्या आसपास प्रोजेस्टेरॉन ह्या स्रावाची पातळी सुद्धा उच्च असते त्यामुळे अन्ननलिकेची झडप शिथिल होते आणि त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
 • या अवस्थेत, रक्ताभिसरण शिगेला पोचते आणि बाळांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पोहोचवण्यासाठी रक्ताभिसरणात सतत वाढ होत जाते. हे वाढलेले रक्ताभिसरण योनिमार्गाच्या भागापर्यंत पोहोचते त्यामुळे त्या भागाचे उत्तेजन होते. पुढे इस्ट्रोजेनच्या वाढलेल्या पातळीमुळे योनीतुन जास्त स्त्राव येऊ लागतो. हा स्त्राव दुधासारखा आणि रंगहीन असतो आणि त्यास कुठलाही तीव्र वास नसतो. त्यास इंग्रजीमध्ये ल्युकोरोआ म्हणून संबोधले जाते. योनीला कुठल्याही हानिकारक जीवाणूपासून मुक्त करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. बर्‍याच वेळा, जोपर्यंत तुम्ही लैंगिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत स्त्राव कोणत्याही संसर्गापासून मुक्त असतो. जर स्रावात दुर्गंधी येत असेल किंवा तुमच्या योनीला खाज किंवा जळजळ होत असेल तर त्यामागे यीस्टचा संसर्ग हे कारण असू शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदपरणाच्या १७ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदपरणाच्या १७ व्या आठवड्यातील लक्षणे

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती स्त्रियांना ह्या आठवड्यात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. काही लक्षणे पुन्हा जाणवू शकतात आणि त्यामुळे निराशा येऊ शकते.

 • गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यात, तुम्ही कदाचित दररोज स्वतःचे वजन करीत असाल आणि आपले वजन जास्त का वाढत नाही असा विचार कराल. तुम्हाला ह्या आठवड्यात इतके काही करण्याची आवश्यकता नाही कारण आतापर्यंत तुमची वजनवाढ स्पष्ट होईल. जुळ्या किंवा एकाधिक बाळांमुळे तुमच्या वजनात झपाट्याने वाढ होऊ शकते, कारण येत्या आठवड्यात बाळांची वाढ वेगाने होईल.
 • तुमच्या पोटापासून तुमच्या स्तनापर्यंत तसेच तुमच्या नितंबांपर्यंत तुमच्या शरीराचे अवयव मोठे होतील. आणि त्यामुळे तुमची त्वचा ताणली जाईल, यामुळे कधीकधी ती अत्यंत संवेदनशील होऊन त्वचेला खाज सुटते. साधे क्रीम लावल्यास त्वचा मऊ पडेल आणि त्वचेवर ओरखडे पडणे टळेल.
 • आधी स्ट्रेच मार्क्स दिसत नसतील तर ह्या आठवड्यात ते दिसू लागतील. या खुणांचा अभिमान बाळगण्याची शिफारस केली जाते कारण या खुणा आपल्या गर्भाशयात एक जीव सुरक्षितपणे जीवन जगत असल्याची चिन्हे आहेत. स्ट्रेच मार्क्सची काळजी घेण्यासाठी हलकेच मालिश करा आणि चांगले मॉइश्चरायझर वापरा.
 • ह्या टप्प्यावर तुमचे पोट वाढल्यामुळे बॅलन्स सांभाळणे थोडे कठीण होऊ शकते. तुमचे पोट अद्यापपर्यंत मोठ्या फुटबॉलसारखे दिसत नाही परंतु आपले गुरुत्वाकर्षण केंद्र हळूहळू बदलेल. आयुष्यभर ठराविक शरीराची सवय झाल्यामुळे, समतोल राखणे कठीण वाटू शकते आणि आपण आधीसारखे चालू शकत नाही हे लक्षात येते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अनवधानाने पडू नये म्हणून तुम्ही हळू हळू चालणे आवश्यक आहे. तुमचे अस्थिबंधां तुम्हाला यशस्वीपणे समर्थन करत आहे ह्याची खात्री करा.
 • ह्या काळात तुम्हाला जास्त स्वप्ने पडू लागतात. जर तुमची जुळी बाळे किंवा तिळे रात्रीची जास्त हालचाल करत असतील तर तुमचा मेंदू त्यांचा स्वप्नात समावेश करतो किंवा तिघे काही स्वप्ने भयावह असू शकतात आणि त्या स्वप्नांचा स्वतःवर परिणाम न होऊ देणे गरजेचे आहे तसेच चिंता आणि काळजीयुक्त विचारसरणीला चालना देऊ नये.

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपण १७ वा आठवडा पोटाचा आकार

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचा अर्धा टप्पा पार केल्यानंतर तुमच्या पोटाच्या आकारात लक्षणीय बदल होईल आणि तो बाहेरून सुद्धा दिसू लागेल. आधी अगदी थोडेसे दिसणाऱ्या पोटाचा उंचावटा आता चांगलाच दिसू लागेल. आरशात अगदी पुसटसे तुम्ही स्वतःला पाहिलेत तरी तुमच्यात मातृत्वाची भावना निर्माण होईल. आणि तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांची ह्या जगात येण्यासाठी वाट बघाल.

तुमच्या जवळ कुणी आले तर ते तुम्हाला वाढलेल्या पोटाच्या आकाराची जाणीव करून देतील. तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला मिठी मारा आणि तुम्हाला तुमच्यातले अंतर त्वरित लक्षात येईल. तुमचे पोट टणक असेल आणि तुम्हाला आतील बाळांच्या हालचाली त्वरित जाणवतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा १७ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

मागील आठवड्यात केलेल्या बहुतेक जनुकीय आणि गर्भजल चाचण्यांसह, गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बहुतेक अल्ट्रासाऊंडमध्ये आणखी चाचण्या नसतात. मागील चाचण्यांद्वारे कोणतेही निर्णायक निकाल न मिळाल्यासच अतिरिक्त कॉर्डोसेन्टेसिस चाचणी किंवा नाभीसंबंधी रक्ताचा नमुना चाचणी घेण्यात येईल.

तुमच्या बाळाच्या शरीरावरचे चरबीचे थर वाढल्यामुळे अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्हाला जुळे आणि तिळे सहज शोधणे सोपे जाईल. बारकाईने निरीक्षण केल्यास, तुम्ही तुमच्या लहान बाळांच्या सांगाड्याची संरचना पाहू शकता. ही हाडे अद्यापही लवचिक आणि मऊ आहेत आणि येणाऱ्या आठवड्यात ती कठीण आणि घट्ट होऊ लागतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १७व्या आठवड्यातील आहार

ह्या आठवड्यात, तुमचे कॅल्शियमचे सेवन इष्टतम असावे. इतर पौष्टिक घटकांची मात्रा चांगल्या प्रमाणात असणे आवश्यक असले तरी कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांमध्ये तडजोड केली जाऊ नये. योग्य प्रकारे शिजवलेले मासे आणि व्हिटॅमिन ई समृध्द इतर पदार्थ हे देखील चांगले पर्याय आहेत.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १७व्या आठवड्यातील आहार

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात स्वत: ला शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी काही टिप्स आवश्यक आहेत.

हे करा

 • चालताना कशाचातरी आधार घ्या आणि आपल्या हालचाली मंद आणि तंतोतंत ठेवा.
 • तुमच्या पलंगाशेजारी एक नोटबुक ठेवा जेणेकरून तुम्ही उठल्यावर कोणतीही स्वप्ने लिहू शकाल.

काय टाळाल?

 • गोड पदार्थ आणि सोड्यापासून दूर रहा कारण त्यामुळे पोट अगदी सहज बिघडू शकते.
 • जेवणानंतर ताबडतोब झोपू नका. हलके चालत जा किंवा काही तास बसून रहा.

१७ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची गरज आहे?

प्रसूतीची प्रक्रिया समजण्यास मदत करणारी काही पुस्तके विकत घेतल्यास भीती कमी होण्यास मदत होते. मॉर्निग सिकनेसचा त्रास कमी होण्यासाठी सकाळी उठल्यावर सुवासासाठी चांगला साबण किंवा सुवासिक मेणबत्त्या खरेदी करा.

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात बाळासोबत बंध निर्माण केल्यास पालकत्वाची भावना जागृत होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही पोटावर हात ठेवता तेव्हा आयुष्यभर तुम्ही तुमच्या बाळांसाठी आहात हे त्यांना समजू द्या. ह्या भावनांचा आनंद घ्या. तुमचा हा गर्भारपणाचा काळ आनंदात जावो!

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article