Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) खेळ आणि क्रियाकलाप लहान मुलांसाठी मजेदार आणि युनिक रिटर्न गिफ्ट्सचे 20 पर्याय

लहान मुलांसाठी मजेदार आणि युनिक रिटर्न गिफ्ट्सचे 20 पर्याय

लहान मुलांसाठी मजेदार आणि युनिक रिटर्न गिफ्ट्सचे 20 पर्याय

तुमच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे खूप विशेष दिवस असतो. हा दिवस आनंदाने भरलेला असतो. परंतु वाढदिवस साजरा करणे काही वेळा खूप महागडे होऊ शकते. बहुतेक वाढदिवसांना, पार्टीला येणारी मुले जाताना भेटवस्तू घेऊन जातात. या भेटवस्तू अनेकदा तुमच्या मुलाच्या पुढच्या वाढदिवसांसाठी ट्रेंडसेटर असतात.

रिटर्न गिफ्ट्स निवडण्यासाठी टिप्स

तुम्ही तुमच्या मुलासाठी सर्वात योग्य रिटर्न गिफ्ट कसे निवडाल? तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी रिटर्न गिफ्ट्स निवडण्याबाबत येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

1.यादी करा

तुम्ही ज्या मुलांना वाढदिवसाला बोलावले आहे त्यांची यादी करा जेणेकरून तुम्हाला त्यांची संख्या कळेल. जर तुम्ही मुलांचा छोटा गट बोलावलेला असेल तर प्रत्येकासाठी युनिक रिटर्न देता येते, परंतु मुलांचा मोठा गट बोलावलेला असेल तर सहज उपलब्ध असलेल्या रिटर्न गिफ्ट्सची निवड करा. जेणेकरून जर शेवटच्या क्षणी गिफ्ट्स कमी पडले तर लगेच आणता येतील. टीप- परंतु आधीच जास्त रिटर्न गिफ्ट्स आणून ठेवा

2. बजेट सेट करा

तुमचे बजेट कमी असो अथवा जास्त, पार्टीला येणाऱ्या मुलांची अंदाजे संख्या कळताच ते सेट करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या बजेट मधील पर्याय निवडण्यास मदत होईल.

3. वयोगट आणि आवडी लक्षात ठेवा

वेगवेगळ्या वयोगटातील मुलांची आणि वेगवेगळ्या मित्र मंडळांची आवड वेगवेगळी असते. तुमच्या मुलाची आवड त्याच्या/तिच्या मित्रमैत्रिणीसारखी असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही त्यानुसार भेटवस्तू निवडू शकता.

मुलांसाठी 20  भेटवस्तू पर्याय

तुमच्या मुलाचा वाढदिवस वेगळा आणि लक्षात राहण्याजोगा होण्यासाठी रिटर्न गिफ्ट्सची मदत होऊ शकते. येथे 20 रिटर्न गिफ्ट्सची यादी दिलेली आहे. हे रिटर्न गिफ्ट्स तुमच्या मुलाचा वाढदिवस लक्षात राहण्यास मदत करेल.

1. क्ले किट्स

क्ले किट्स

मुलांच्या वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टचा विचार करताना वाढदिवसाची एखादी थीम ठरवा. क्रिएटिव्ह थीमसाठी तुमच्याकडे अनेक पर्याय असू शकतात, ज्यामध्ये एखाद्या कलेचा समावेश असू शकतो. अश्या परिस्थितीत, विविध रंगांचे क्ले हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

वयोगट: या प्रकारची रिटर्न गिफ्ट 3-5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे.

किंमत: रिटर्न गिफ्ट म्हणून क्ले किटची किंमत प्रति किट INR 30 – INR 100 दरम्यान असू शकते.

2. मिनिएचर बोर्ड गेम्स

मिनिएचर बोर्ड गेम्स

डिजिटल युगात, रिटर्न गिफ्ट्स म्हणून मिनिएचर बोर्ड गेम असणे ही एक चांगली कल्पना आहे, हे खेळ मुलांसाठी मनोरंजक आहेत तसेच ते पालकांना सुद्धा आवडतील.

वयोगट: या भेटवस्तू 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहेत. काही बोर्ड गेममध्ये लहान तुकडे असू शकतात जे लहान मुलांसाठी धोकादायक असू शकतील. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

किंमत: बोर्ड गेमच्या प्रकारानुसार, प्रत्येक भेटवस्तूची किंमत . 100 ते 250 रुपयां पर्यंत असू शकते.

3. टॉय रेस कार

टॉय रेस कार

रेस कारच्या थीमवर आधारित वाढदिवसाचा विचार करताना, लहान रेस कार रिटर्न गिफ्ट म्हणून देणे योग्य वाटते. या प्रकारच्या परतीच्या भेटवस्तू जगभरात, विशेषतः लहान मुलांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

वयोगट: मुलांसाठी हे रिटर्न गिफ्ट अगदी परफेक्ट आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ते देता येईल.

किंमत: किंमत लक्षात घेऊन, तुम्हाला 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत मजेदार आणि गोंडस रेस कार मिळू शकतात, परंतु मोठ्या ब्रँडच्या कारची किंमत सहसा जास्त असते.

4. स्टफ्फड ऍनिमल

स्टफ्फड ऍनिमल

लहान मुलांसाठी वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टचा विचार करताना खूप पर्याय असू शेतात. स्टफ्फड ऍनिमल हा लहान मुलांसाठी नेहमीच सुरक्षित पर्याय असू शकतो. तुम्ही वेगवेगळ्या स्टफ्फड ऍनिमलचा पर्याय निवडू शकता. तुम्ही जेव्हा रिटर्न गिफ्ट देता तेव्हा प्रत्येक पाहुण्याला सेप्शल वाटते.

वयोगट: या भेटवस्तू 2-5 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी योग्य आहेत.

किंमत: एक लहान स्टाफ्फड ऍनिमलची सुरुवात 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते, परंतु ब्रँड आणि आकारानुसार, 250 रुपयांच्या वर जाऊ शकते.

5. कोडी

कोडी

आणखी एक सर्व कुटुंबासाठी अनुकूल रिटर्न गिफ्ट म्हणजे कोडी. हे रिटर्न गिफ्ट मुले किंवा मुली दोघांना सुद्धा देता येते. पालकांप्रमाणे मुलांना सुद्धा हे रिटर्न गिफ्ट आवडेल. ही कोडी अनेक लोकांना एकत्र आणू शकतात. आपल्या मुलामध्ये विश्लेषणात्मक विचारांचा विकास वाढवू शकतात. ही कोडी मजेदार असल्याने मुलांचा उत्साह वाढतो आणि काही तास मुले व्यस्त राहतात.

वयोगट: 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी हे गिफ्ट योग्य आहे.

किंमत: तुम्ही स्थानिक स्टोअरमध्ये 100 रुपयांपासून कोडी शोधू शकता, परंतु ब्रँड, कोड्याचा आकार आणि स्टोअरवर अवलंबून किमती बदलतात.

6. पिगी बँक्स

पिगी बँक्स

हे रिटर्न गिफ्ट् मुलांना मजेदार पद्धतीने पैसे वाचवायला शिकवण्यासाठी उत्तम आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पिग्गी बँक्स शोधू शकता आणि प्रत्येक मुलाच्या वाढदिवसासाठी हे रिटर्न गिफ्ट् अद्वितीय बनवू शकता.

वयोगट: ही भेट उत्तम आहे. मुलांसोबत पालकांना सुद्धा हे गिफ्ट आवडेल. 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहे.

किंमत: तुम्हाला 150 रुपयांपासून लहान, तुमच्या बजेटनुसार पिग्गी बॅंक्स मिळू शकतात

7. ज्वेलरी किट्स

ज्वेलरी किट्स

लहान मुलींमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला ट्रेंड म्हणजे ज्वेलरी किट. मूलभूत दागिन्यांच्या किटमध्ये मणी, तार आणि चकाकी असते, परंतु तुम्हाला अधिक विस्तृत पर्याय देखील मिळू शकतात.

वयोगट: या भेटवस्तूमध्ये लहान मुलांसाठी धोकादायक असे छोटे भाग आहेत, त्यामुळे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे रिटर्न गिफ्ट देऊ नये.

किंमत: मुलांच्या दागिन्यांच्या किटची सुरुवातीची किंमत  100 रुपये  इतकी कमी असू शकते

8. जेवणाचे डबे

जेवणाचे डबे

लहान मुलांसाठी ही भेटवस्तू उत्तम आहे, विशेषत: लंच बॉक्सवर मजेदार कार्टून प्रिंट असल्यास मुलांना ते आवडू शकते. तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे सेट्स घेऊ शकता.

वयोगट: हे 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना हे रिटर्न गिफ्ट तुम्ही देऊ शकता.

किंमत: एका लंच बॉक्सची सुरुवातीची किंमत 150 रुपये असू शकते.

9. पेन्सिल बॉक्स

पेन्सिल बॉक्स

मुलांसाठी ही आणखी एक उपयुक्त आणि मनोरंजक भेट आहे. कार्टून थीम असलेले पेन्सिल बॉक्स मुले आणि मुली दोघांना सुद्धा देता येतात आणि ते व्यावहारिक देखील आहेत.

वयोगट: तुम्ही या भेटवस्तू 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना देऊ शकता.

किंमत: एका पेन्सिल बॉक्सची किंमत  75 रुपयांच्या वर असू शकते.

10. कॅलिडोस्कोप

कॅलिडोस्कोप

ही भेटवस्तू लहान मुलांना आकर्षित करेल. तसेच त्यांना आकार आणि रंगांबद्दल शिकवेल. हे गिफ्ट शैक्षणिक, मजेदार असून ते मुले तसेच मुलींना सुद्धा देता येईल.

वयोगट: या भेटवस्तू 4 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी उत्तम आहेत.

किंमत: तुम्हाला 150 रुपयांपासून कॅलिडोस्कोप मिळू शकतात.

11. फिंगर पेंट्स

फिंगर पेंट्स

या भेटवस्तू सर्जनशील, मजेदार आहेत आणि मुलांमध्ये त्वरित हिट होतील. फिंगर पेंट्स मुलांमध्ये  सर्जनशीलता वाढवतात आणि त्यामुळे ते त्यांच्या पालकांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत. रंगांमध्ये खेळताना मुले आनंदी असतात आणि मजा करतात. गैर-विषारी आणि लहान मुलांसाठीची रंग खरेदी करण्याचे लक्षात ठेवा

वयोगट: 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ही एक उत्तम भेट आहे.

किंमत: तुम्ही 100 रुपये इतक्या कमी किमतीत फिंगर पेंट्सचा संच शोधू शकता.

12. स्नो ग्लोब्स

स्नो ग्लोब्स

या भेटवस्तू छान आहेत. तुमच्या मुलाचे मित्र आनंदाने उडी मारतील. विविध स्नो ग्लोब्स मिळाल्यावर  सर्व मुलांना ते स्पेशल असल्याची भावना येईल. स्नो ग्लोब्स मनोरंजक भेटवस्तू आहेत ज्या सहसा मुलांना आवडतात.

वयोगट: स्नो ग्लोब्स सुरक्षित, मजेदार आहेत आणि 1 वर्षे वयाच्या लहान मुलांना दिले जाऊ शकतात.

किंमत: 75 रुपयांपासून सुरू होणारे, हे स्नो ग्लोब आकार, डिझाइन आणि ब्रँडवर नुसार 250 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात

13. पॉप-अप कथा पुस्तके

पॉप-अप कथा पुस्तके

ही एक मजेदार आणि सर्जनशील भेट आहे आणि ती वाचनाला प्रोत्साहन देते. तसेच ही भेट मुलांसाठी मनोरंजक आहे. कथेच्या वेळी पॉप-अप प्रतिमांमुळे मुलांमध्ये जो उत्साह निर्माण होतो त्याबद्दल पालक तुमचे आभार मानतील.

वयोगट: ही कथापुस्तके कोणत्याही वयोगटासाठी उत्तम आहेत. तुम्ही हे फक्त एक वर्षाच्या मुलांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून वापरू शकता.

किंमत: पुस्तकांचे दुकान आणि कथेनुसार, ही पुस्तके 75 रुपये इतक्या वाजवी किमतीला मिळू शकतात.

14. स्टिकर्स

स्टिकर्स

मुलांना स्टिकर्स आवडतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कार्टून स्टिकर शीट घेऊ शकता. तुमच्या मुलांच्या मित्रांसाठी ही एक उत्तम भेटवस्तू आहे.

वयोगट: 3-5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्टिकर्स उत्तम आहेत

किंमत: तुम्हाला 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्टिकर शीट मिळू शकते.

15. अंधारात चमकणारे तारे

अंधारात चमकणारे तारे

तुमच्या लहान मुलाच्या वाढदिवसाला येणार्‍या मुलांसाठी ही एक उत्तम भेटवस्तू आहे. त्यांच्या बेडच्या वरच्या बाजूला तुम्ही हे टांगून ठेवू शकता.

वयोगट: कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी ही एक उत्तम भेटवस्तू आहे.

किंमत: हे वॉल स्टिकर्स 20- 50 रुपये इतक्या वाजवी किमतीला मिळू शकतात.

16. क्रेयॉन्स

क्रेयॉन्स

लहान मुलांना क्रेयॉन्स आवडतात. क्रेयॉन कलेची प्रेरणा देतात. क्रेयॉन्स हे एक क्लासिक रिटर्न गिफ्ट मानले जाते कारण ते खूप लोकप्रिय आहे.

वयोगट: 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी क्रेयॉन उत्तम आहेत.

किंमत: क्रेयॉनच्या पॅकची मूळ किंमत 100 रुपये इतकी कमी असू शकते.

17. कॉमिक्स

कॉमिक्स

कॉमिक हे एक लोकप्रिय रिटर्न गिफ्ट आहे. ह्यामुळे वाचनाला प्रोत्साहन मिळते, तसेच ते मुलांचे मनोरंजन करते

वयोगट: हे 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहे.

किंमत: तुम्हाला 50 रुपयांपासून छान आणि मजेदार कॉमिक्स मिळू शकतात.

18. शिट्ट्या

शिट्ट्या

एक पारंपारिक रिटर्न गिफ्ट आहे. ह्यामुळे मुलांचे मनोरंजन होईल तसेच त्यांच्यात संगीत क्षमताही निर्माण होईल.

वयोगट: 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी हे एक योग्य रिटर्न गिफ्ट आहे.

किंमत: तुम्ही 50 रुपयांपर्यंत तुम्ही एक शिट्टी खरेदी करू शकता

19. रंगीत पुस्तके

रंगीत पुस्तके

पार्टीतील मुलांना सर्जनशील राहण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांना रंगीत पुस्तके देणे हा होय. चित्र काढून रंगवल्याने मुलांचा उत्साह वाढतो.

वयोगट: 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी हे रिटर्न गिफ्ट योग्य आहे.

किंमत: ब्रँड आणि डिझाईन्सच्या अनुसार, तुम्ही 75 रुपये इतक्या कमी किमतीत रंगीत पुस्तके मिळवू शकता.

20. ग्लोब्स

ग्लोब्स

तुमच्या मुलाच्या पार्टीला हे रिटर्न गिफ्ट देऊन लहान मुलांच्या साहसी भावनेला प्रोत्साहन द्या.

वयोगट: 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ग्लोबची शिफारस केली जाते.

किंमत: हे ग्लोब्स म्हणजे स्वस्त आणि मजेदार रिटर्न भेटवस्तू आहेत. त्यांची किंमत 150 रुपये इतकी कमी असू शकते.

लक्षात ठेवा, ह्या भेटवस्तू आणि पार्टी तुमच्या मुलासाठी अनुकूल अश्या मित्रमैत्रिणीसाठी आणि पालकांसाठी आहेत. खरोखरच वाढदिवसाची पार्टी एकत्र बांधू शकते. मुलांचा वयोगट आणि आवडीनुसार तुम्ही भेटवस्तूची निवड करू शकता.

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article