Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३० वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३० वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३० वा आठवडा

जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमची बाळे लवकरच ह्या जगात प्रवेश करणार आहेत हे जाणून तुम्हाला आनंद होईल. गर्भधारणा झाल्यावर लगेच जर तुम्ही एखादी नोंदवही ठेवली तर तुम्ही सुरुवातीचे अवघड आठवडे कसे पार केले तसेच आधीच्या आठवड्यांमध्ये किती मजा केली हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला आता थकवा आला असेल आणि तुम्ही तुमच्या बाळांना भेटायला आता उत्सुक असाल. सगळं वेळेवर आणि छान होणार आहे आणि तुमची बाळे आधीच ह्या जगात आली तर तुम्ही तयार असणे जरुरीचे आहे. ३० व्या आठवड्यात तुमच्या बाळांचा विकास कसा होतो आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. अजून नक्की कुठले विकास होणार आहेत हे तुम्ही जाणून घेऊ इच्छित आहात!

३० व्या आठवड्यात बाळांची वाढ

आपण एकाधिक बाळांसह गर्भवती आहात आणि तुमच्या गरोदरपणाच्या ३० व्या आठवड्यात बाळांचा जन्म होण्याची भावना तुम्हाला चांगल्या अर्थाने थोडी अस्वस्थ करू शकते. बऱ्याचदा जुळी आणि तिळी बाळे असल्यास गरोदरपणाचे संपूर्ण दिवस भरत नाहीत आणि अकाली प्रसूती होते. त्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते परंतु बाळे ३० आठवड्यांची झाल्यावर जर प्रसूती झाली तर बाळे जगण्याची आणि त्यांची नीट वाढ होण्याची शक्यता वाढते.

ह्या काळात जुळ्या बाळांची मानसिक वाढ वेगाने होते आणि बाळांच्या अवयवांचा विकास शक्य तितक्या वेगाने होतो जेणेकरून जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा बाळे ठीक असतील. जर ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडली तर बाहेरील पोषणासाठी पचनक्रिया सुद्धा विकसित होते. ह्या काळापर्यंत बाळाचा जास्तीत जास्त विकास झालेला असतो आणि शेवटच्या काही गोष्टी पुढच्या १२ आठवड्यात पूर्ण होतात.

हाडांचे ओसीफिकेशन लवकरच पूर्ण होईल. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की जन्मानंतरही तुमच्या बाळांची हाडे तुमच्याइतकी मजबूत नसतात. ती अजूनही तुलनेने मऊ आहेत, परंतु प्रभावीपणे शरीराच्या संरचनेचे समर्थन करणे पुरेसे कठीण आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाला कोणत्याही जखमा न होता बाळाचा जन्म संकुचीत जन्म कालव्याद्वारे सुलभ होतो. तसेच त्यांच्या नंतरच्या आयुष्यात बाळांना सहजपणे चालण्यास शिकण्यास मदत होते.

प्रसूतीची तारीख जवळ येते तसे फुफ्फुसांचा विकास अंतिम टप्प्यात पोहोचण्यास सुरवात होईल. या आठवड्यातच काही बाळांना फुफ्फुसाचा त्रास होतो आणि ते गर्भाशयातच श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेचा योग्यप्रकारे सराव करण्यास सुरुवात करतात. तुम्ही बाळाच्या उचकीचा अनुभव घेऊ शकत असल्यास, आपल्या मुलांचे फुफ्फुस योग्यप्रकारे कार्य करीत आहेत हे जाणून घ्या.

बाळांचा आकार केवढा असतो?

मागील आठवड्यांच्या तुलनेत लहान बाळांची लांबी वाढली असती, तरीही ती सुमारे ३८४० सेंटीमीटरच्या आसपास असेल. तथापि, त्यांचे वजन सुमारे १.३ किलोग्रॅम किंवा त्याच्या आसपास असेल आणि ते बाळांच्या अस्तित्वाबद्दल चांगल्या प्रकारे जाणीव देते. जर आपण कधीही बाजारात एखादी मोठी काकडी पाहिली असेल तर, तुमच्या पोटातील बाळांचा आकार तेवढा आहे.

बाळांचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या गरोदरपणाच्या ३० व्या आठवड्यापर्यंत तुमच्या शरीराने केलेले कोणतेही बदल ह्यापुढे तुमच्यासाठी नवीन असणार नाहीत. परंतु ह्या बदलांमुळे तुमच्या वर्तणुकीत बदल होऊ शकतात ज्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

 • तुम्ही गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत स्वत: चे कोणतेही फोटो क्लिक केल्यास तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि गुळगुळीत दिसेल. ह्या काळातील बहुतेक दिवस तुम्हाला प्रचंड घाम येईल तसेच तुम्ही तुमचा चेहरा आणि काखा सतत पुसत रहाल आणि स्वतःवर अस्वस्थ व्हाल. हे सर्व बदल संप्रेरकांमधील बदलांमुळे होतात आणि पुढे आपल्या चयापचय प्रक्रियेत बदल घडवून आणतात, ज्यामुळे वारंवार घाम येण्याची कारणे वाढतात. असे होणे सामान्य आहे परंतु पाण्याचा झालेला ऱ्हास जास्त प्रमाणात पाणी पिऊन आणि सर्व प्रकारच्या द्रवपदार्थांचे सेवन करून संतुलित करणे आवश्यक आहे.
 • तुमच्या पोटाचा आकार वाढल्यामुळे तुमची चालण्याची पद्दत तसेच उठण्या बसण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झालेला असेल. तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला आणि शेवटी ते अधिक कठीण होते कारण ह्या दरम्यान तुमचे शरीर सगळ्या बाजूने वाढते आणि बेढब दिसू लागते. मोठया पोटामुळे अगदी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीशी टक्कर होऊन ती वस्तू पडू शकते कारण तुमचे पोट कुठपर्यंत आहे ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. अशा प्रकारच्या कुठल्याही समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही हळूहळू चालणे आवश्यक आहे तसेच जिने उतरताना किंवा चढताना कुणाची तरी मदत घेऊन किंवा आधार घेऊन पायऱ्या चढल्या आणि उतरल्या पाहिजेत.
 • तिसरी तिमाही तुम्हाला किती थकवणारी होती ह्याचा तुम्ही विचार केला आहे का? तिसऱ्या तिमाहीच्या मध्यावर असताना तुम्हाला थकवा जाणवेल आणि ऊर्जा कमी आहे असे वाटेल. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुमचे वाढलेले वजन आणि आंतरिक गरजांमुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटेल. ह्या काळात काहीही करण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती राहणार नाही. तुम्ही कुठलेही छोटे काम करू शकणार नसाल तर स्वतःला जबरदस्ती करू नका. हे सामान्य आहे आणि गरोदर स्त्रीसाठी ऊर्जा साठवून ठेवणे आवश्यक आहे. दिवसभर आराम करा आणि जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयन्त करा.

जुळ्या बाळांसह गरोदर्पणच्या ३० व्या आठवड्यातील लक्षणे

ह्या कालावधीत कुठलीही नवीन लक्षणे दिसणार नाहीत. जुनीच लक्षणे ह्या आठवड्यात सुद्धा दिसतील.

 • शरीराच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला सतत वेदना जाणवतील. धैर्य आणि शांतता हे आपला मार्ग मोकळा करण्यासाठी एकमेव उपाय आहेत. बाळांचा विकास होत राहील आणि तुमच्या शरीरावरील ताण वाढेल आणि तो तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत सहन करावा लागेल. निद्रानाश आणि ऊर्जा कमी झाल्याने वेदना सहन करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. सुरक्षित घरगुती उपायांचा वापर करा तसेच स्वतःची काळजी घेण्यासाठी भरपूर विश्रांती घ्या.
 • तुमच्या शरीरात जुळी आणि एकाधिक बाळे सहजपणे राहू शकत नाहीत. प्रत्येक बाळाला स्वतःसाठी थोडी चांगली जागा बनवायची असते आणि त्यामुळे तुमच्या बाळांना जागा मिळण्यासाठी गर्भाशय सगळीकडून ताणले जाते. फुप्फुसे आणि डायफ्रॅम ह्यांच्यावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो आणि त्यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी त्यांना जागा अपुरी पडू लागते. त्यामुळे थोडेसे जिने चढल्यावर तुम्हाला दम लागल्यास काळजी करू नका. तुमचा स्टॅमिना चांगला आहे आणि तुमची बाळे श्रोणीकडे भागात सरकल्यावर तुम्ही चांगला श्वास घेऊ शकणार आहात.
 • गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे सगळे अवयव दूर ढकलले जातील आणि त्यांचे कार्य नीट होणार नाही . पोट हा अवयव संपूर्ण गोंधळलेल्या स्थिती असतो. पोटाच्या कार्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. तुमच्या आवडत्या अन्नपदार्थामुळे तुम्हाला अचानक ऍसिडिटी किंवा तुम्हाला घशात रिफ्लक्स जाणवेल. तुम्ही तुमचा आहार पुन्हा तपासून पाहू शकता. ह्या परिस्थितीची नोंद घेऊन तुम्ही तुमचा आहार नीट पुन्हा आखू शकता.

जुळ्या बाळांसह गरोदरपण ३० वा आठवडा पोटाचा आकार

पोटाचा सतत विस्तार आणि त्वचा ताणली गेल्यामुळे ह्या टप्प्यात आपल्या पोटची चांगली काळजी घेणे आवश्यक असते. उदरपोकळीतील अंतर्गत भाग खूप खेचले जातात आणि त्यामुळे ते नेहमीपेक्षा कमकुवत होतात. स्ट्रेच मार्क्ससाठी आणि ताकद टिकवण्यासाठी क्रीम्स वापरणे गरजेचे आहे. नीट काळजी घेतली नाही तर प्रसूतीनंतर पोटावरील घड्या दूर होणे कठीण होते. खुर्चीवरून उठणे किंवा झोपल्यावर उठून बसणे अशा साध्या गोष्टी विशिष्ट पद्धतीने कराव्या त्यामुळे पोटावरील ताण कमी होतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपण ३० वा आठवडा अल्ट्रासाऊंड

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांचा ३० व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जातो. काही वेळा, त्यासोबत बायोफिजिकल स्कॅन सुद्धा केला जातो त्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके आणि इतर महत्वाच्या घटकांवर लक्ष ठेवले जाते. ह्यामुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही तर ते तंत्रज्ञान फक्त अल्ट्रासाऊंडची प्रगत आवृत्ती आहे.

काय खावे?

ह्या टप्प्यावर प्रथिने आणि जटिल कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता अपवादात्मकपणे जास्त आहे. तृणधान्ये आणि मांस समृद्ध निरोगी आहार घेतल्यास ते मिळण्यास मदत होते. अन्नाची गुणवत्ता नेहमीच अत्याधिक असावी. कोणत्याही संरक्षक किंवा कच्च्या खाद्यपदार्थांना काटेकोरपणे टाळले पाहिजे.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

तुम्ही तुमचा गरोदरपणाचा प्रवास पूर्ण करण्याच्या जवळ आहात, म्हणून तुम्हाला फक्त काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे करा

 • आपल्या वजनाचे नियमितपणे परीक्षण करा आणि कोणतीही विसंगती आढळल्यास तुमच्या डॉक्टरांकडे ती नोंदवा.
 • रुग्णालयात पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहण्यासाठी एक ट्रायल घेऊन पहा.

काय टाळावे?

 • आपल्या पाठीवरील आणि पोटावरील ताण कमी करण्यासाठी उंच टाचांच्या चपला घालण्याचे टाळा.
 • ऍलर्जिक घटक असलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थापासून दूर रहा.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमचा गरोदरपणाचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने आपली काळजी घेऊ शकणार्‍या अशा काही उत्पादनांमध्ये गुंतवणूक करा जसे की:

 • सूज आणि व्हेरिकोज व्हेन्ससाठी कॉम्प्रेशन सॉक्स
 • प्रसूतीनंतर पोट पूर्ववत होण्यासाठी पोटासाठी एक पट्टा

३० व्या आठवड्यांत आपल्या जुळ्या बाळांच्या वजनाचा मागोवा घेतल्याने आणि त्यांच्या प्रगतीमध्ये कुठलीही गुंतागुंत नाही हे समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या निरोगी प्रसूतीची खात्री होऊ शकते. तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात रहा आणि एका आठवड्यात तुमच्या बाळांना भेटण्यासाठी तयार रहा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article