Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी ४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत – तुम्ही काळजी करावी का?

४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत – तुम्ही काळजी करावी का?

४० आठवड्यांच्या गर्भवती आहात आणि प्रसूतीची लक्षणे नाहीत – तुम्ही काळजी करावी का?

जेव्हा एखाद्या स्त्रीला आपण गर्भवती असल्याचे समजते तेव्हा ती उत्सुकतेने आपल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असते आणि गरोदरपणातील सर्व गुंतागुंत देखील सहन करण्यास तयार असते. जर तुम्ही ४० आठवड्यांच्या गर्भवती असाल तर तुम्ही ह्या जगात तुमच्या लहान बाळाचे स्वागत करण्यास तयार असणे आवश्यक आहे. परंतु, ४० व्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला प्रसूतीची लक्षणे जाणवली नाहीत तर काय करावे? ते सामान्य आहे का? गरोदरपणाच्या ४०व्या आठवड्याबद्दल आणि प्रसूतीची चिन्हे दिसत नसतील तर काय करावे? ह्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

४० आठवड्यांचे गरोदर असताना प्रसूतीची चिन्हे नसणे हे सामान्य आहे का?

तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर बाळाचा जन्म केव्हाही होऊ शकतो हे तुम्हाला समजते. त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ होणे सामान्य आहे परंतु तुम्ही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. ४० आठवड्यांनंतर सुद्धा प्रसूतीची लक्षणे नसणे हे तुमच्या बाबतीत होत नाही, कारण फक्त १० टक्के बाळांचा जन्म ठरलेल्या प्रसूती तारखेला होतो.

बहुतेक बाळांचा जन्म गरोदरपणाच्या ३७ आणि ४१ व्या आठवड्यांच्या दरम्यान होतो. तथापि, जुळ्या किंवा एकाधिक बाळांचा जन्म सहसा ३७ व्या आठवड्यांपूर्वी होतो. तसेच, डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची तारीख ही अंदाजे तारीख असते आणि बाळाची वाढ आणि विकासानुसार ती बदलू शकते. काही बाळांचा जन्म ४२ आठवड्यांनंतरही होतो आणि त्याची शक्यता फारच कमी असते. म्हणूनच, जरी तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात असाल आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसत नसतील तर ती अगदी सामान्य गोष्ट आहे.

तुम्ही ह्याबद्दल काय करू शकता?

तुम्ही जर गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्याच्या टप्प्यावर पोहोचला असाल आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसत नसतील तर ताण घेऊ नका त्याने प्रसूती आणखी पुढे ढकलली जाईल. त्याऐवजी खालील गोष्टी करा.

. आराम करा

होय, तुम्ही बराच काळ वाट पहिली आहे आणि हे २ आठवडे तुम्हाला अस्वस्थ करीत आहेत परंतु घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. आराम करणे आणि संयम राखणे हे सर्वात चांगले उपाय तुम्ही करू शकता. आपल्या मित्रमैत्रिणीसह किंवा कुटुंबातील सदस्यांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोला आणि कौटुंबिक काळाचा आनंद घ्या. प्रसूतीबद्दल विचार करून तुम्ही फक्त ताणात वाढ करीत आहात आणि ते चांगले नाही. प्रसूतीसाठी सज्ज होण्यासाठी तुम्ही शांत स्थितीत असणे जरुरीचे आहे कारण तुमची प्रसूती आता केव्हाही होऊ शकते.

. ध्यान करा

ध्यान करणे हा आपले मन आणि शरीर शांत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. ध्यान केल्याने आपणास तणाव व्यवस्थापित करण्यात मदत होते. मोकळ्या जागेत किंवा सभोवताली निसर्ग असेल अशा जागेत बसा, डोळे बंद करा, मनातील सर्व विचार सोडून द्या आणि ध्यान करा. ध्यानामुळे तुम्हाला शांत वाटेल आणि तुमच्या बाळावरील ताण कमी होईल.

3. विश्रांती आणि झोप

आपल्या चिंता दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे झोप आणि विश्रांती. चांगली ८ तासांची झोप घेतल्याने तुम्हाला विश्रांती मिळेल आणि तुम्हाला पुन्हा उत्साही वाटेल. जेव्हा तुमच्या बाळाचे आगमन होईल, तेव्हा तुम्हाला विश्रांती किंवा झोपेसाठी वेळ मिळणार नाही म्हणून आता शक्य तितकी विश्रांती घेणे चांगले.

विश्रांती आणि झोप

. तुमच्या छंदात गुंतून रहा

आता तुम्ही तुमच्या आवडत्या छंदात वेळ घालवू शकता कारण एकदा बाळाचे आगमन झाल्यावर आपल्याला त्याकरिता काहीच वेळ मिळणार नाही. छंदात मन गुंतवल्यामुळे नकारात्मक विचार आणि भावना ह्यापासून तुमचे लक्ष विचलित होईल. म्हणूनच, आपल्या आवडत्या छंदात गुंतण्याची ही एक चांगली वेळ चांगली असू शकते. म्हणून आपले आवडते संगीत, चित्रकला, गाणी ऐकणे ह्या छंदांची जोपासना करा.

. पायर्‍या चढा

हे जरासे विचित्र वाटेल, परंतु गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात पायऱ्या चढल्याने प्रसूतीस मदत होऊ शकते. पायऱ्या चढण्यामुळे ओटीपोटावर थोडा दबाव येऊ शकतो आणि प्रसूतीस मदत होऊ शकते.

. एक्यूप्रेशर वापरुन पहा

ऍक्युप्रेशर ही एक जुनी थेरपी आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीरावर असलेले वेगवेगळे प्रेशर पॉईंट्स दाबून एखादी व्यक्ती उपचार करू शकते. काही प्रकरणांमध्ये, एक्यूप्रेशर प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करू शकते. एक्यूप्रेशर तज्ञांच्या मते, शरीरावर सहा मोठे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट आहेत जे प्रसूतीस मदत करतात. योग्यरित्या दाबल्यास, एक्यूप्रेशरच्या मालिशच्या १ ते ४ दिवसांच्या आत प्रसूती चिन्हे दिसणे सुरु होते.

एक्यूप्रेशर वापरुन पहा

. लैंगिक संबंध ठेवा

होय हे खरे आहे! आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवा आणि लवकरच आपले बाळ आगमन करण्यास तयार होईल. तुम्ही अनुभवलेल्या भावनोत्कटतेमुळे आकुंचन वाढण्यास मदत होते आणि वीर्यामध्ये मध्ये उपस्थित प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे देखील गरोदरपणाच्या नंतरच्या काळात प्रसूती होण्यास मदत होऊ शकते.

. स्तनाग्रे उत्तेजित करून पहा

जरी हे थोडेसे अस्वस्थ करणारे असले तरी, स्तनाग्रांना उत्तेजन देणे हा प्रसूतीची लक्षणे निर्माण करण्याचा एक मार्ग असू शकतो. तुम्हाला वेदनादायक किंवा अस्वस्थ वाटत असल्यास, तुम्ही ब्रेस्ट पंप वापरू शकता. स्तनाग्रांना उत्तेजन देणे ऑक्सिटोसिन सोडण्यास मदत करते, हे संप्रेरक आकुंचनास मदत करते आणि म्हणूनच तुमची प्रसूती लवकर होऊ शकते.

आपल्या सर्वांना माहित आहे की सीसेक्शन हा गरोदरपणाच्या अनेक समस्यांवर उपाय आहे. गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात सुद्धा प्रसूतीची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत तर तुम्हाला सीसेक्शनची आवश्यकता भासू शकते का? चला तर मग आपण शोधून काढूया.

४० आठवडे आणि प्रसूतीची कोणतीही चिन्हे नसणे हे सी सेक्शनची गरज असल्याचे दर्शवते का?

जर तुम्ही गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात असाल आणि तुम्हाला गरोदरपणाची कुठलीही लक्षणे दिसत नसतील तर काळजी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु गरोदरपणाच्या इतर समस्या आणि गुंतागुंतीच्या वेळी सुद्धा सीसेक्शन करण्याची गरज भासू शकते. जर तुम्ही ४१ आठवड्यांच्या गर्भवती असाल आणि कळा येणे किंवा गर्भाशयाचे मुख उघडणे ह्यासारखी प्रसूतीची कुठलीही लक्षणे दिसत नसतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सीसेक्शन करण्यास सांगू शकतात.

गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गरोदरपणाच्या ४० व्या आठवड्यात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात

  • उशिरा प्रसूतीमुळे बाळाच्या आकारात वाढ होते त्यामुळे जन्म कालव्यातून बाळ जाताना समस्या निर्माण होऊ शकते. या स्थितीस मॅक्रोसोमिया देखील म्हणतात.
  • गर्भाला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे होणारा त्रास, गर्भजलामध्ये मेकॅनियम असणे इत्यादीमुळे गर्भाच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो.
  • बाळाला पोषणमूल्यांचा आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा.
  • गर्भजलाच्या प्रमाणात घट.

आपली अपेक्षित प्रसूतीची तारीख (ईडीडी) फक्त एक अनुमान आहे आणि प्रसूती कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणूनच, गरोदरपणाच्या ४० आठवड्यांनंतर तुम्हाला प्रसूतीची कोणतीही चिन्हे न दिसल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या. तुम्हाला असलेल्या कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्यांविषयी चर्चा करा आणि बाळाचे ह्या जगात आगमन होईपर्यंत थांबा.

आणखी वाचा: गर्भारपणाचा ४०वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article