Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २६ वा आठवडा

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यापर्यंत आल्यावर काही स्त्रियांना हे वळण खूप वेगळे वाटू शकते. केवळ गर्भाशयात आणि आपल्या शरीरात होत असलेल्या शारीरिक बदलांमुळेच नव्हे तर संप्रेरकांमध्ये होणारे बदल सुद्धा खूप आश्चर्यकारक ठरणार आहेत. हे सर्व आपल्या मूडवर परिणाम करतात आणि ह्या काळात जबरदस्त भावनिक उलथापालथ करतात. तिसऱ्या तिमाहीस लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे २६व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या नैसर्गिक पायऱ्या जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचे आणि बाळाचे आरोग्य योग्य राखण्यासाठी काही काळजी घेण्यासाठी पावले उचलणे सुद्धा गरजेचे आहे.

२६ व्या आठवड्यात बाळांची वाढ

२६ व्या आठवड्यात सुद्धा बाळांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत राहतील. जरी बाळांना ते कुठे आहेत आणि काय बघत आहेत हे समजत नसले तरीसुद्धा बहुतेक बाळे ह्या काळात डोळे उघडण्यास सुरुवात करतात. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात डोळ्यांच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पापण्या मिटल्या जात होत्या. एकदा डोळयातील पडदा योग्यरित्या तयार झाल्यावर, डोळे आता प्रकाशाची उपस्थिती किंवा अनुपस्थिती समजू शकतात आणि कोणतीही अडचण न येता आजूबाजूला पाहण्यास सुरवात करतात.

बाळांमध्येही बरेच मोठे बदल होत आहेत. हे बदल तुमच्या लहान बाळांना विशिष्ट व्यक्तींमध्ये बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मेंदूचा विकास गरोदरपणाच्या चक्रात अगदी लवकर सुरू होत असताना, त्यांचा पुढील विकास अद्याप प्रगतीपथावर आहे आणि या आठवड्यात तो वेगाने होत असतो. तुमच्या बाळाच्या मेंदूवर वळ्या आणि सुरकुत्या आता दिसू लागतात आणि तुमच्या बाळाचे रूपांतर एका कार्यशील मनुष्यामध्ये होण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे पडते. त्वचेच्या विकासास बराच वेळ लागतो, त्वचेचा थर अद्यापही हवा तितका जाड नसतो. चरबीचा साठा वेगाने होत राहतो आणि बाळांच्या त्वचेचे अस्तर पूर्वीइतके जाड नसले तरी आधीसारखे खूप पारदर्शक सुद्धा रहात नाही.

भुवया आणि केसांची रेषा आतापर्यंत दिसू लागते. बाळांना आच्छादित करणाऱ्या व्हर्निक्स ह्या आवारणावरील केस आता गळू लागतात. परंतु काही बाळांमध्ये जन्मानंतर सुद्धा ते केस तसेच राहतात. परंतु त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही कारण बाळाने बाहेरच्या जगात प्रवेश केल्यानंतर सुद्धा ते केस तसेच राहतात.

२६ व्या आठवड्यात बाळांचा आकार

आपल्या लहान बाळांचे वजन आश्चर्यकारक गतीने वाढत आहे. एकट्या बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रियांच्या गर्भाशयातील बाळांचे वजन जवळजवळ ७५० ग्रॅम्स इतके असते ज्याची लांबी अंदाजे ३६ सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. याचा एक बेंचमार्क म्हणून वापर करून, तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वजन आणि उंचीचा अंदाज लावू शकता. तथापि, त्यांचा आकार आता साधारणपणे कांद्याच्या पातीइतका असेल आणि लवकरच तुमच्या गर्भाशयात जागा करण्यासाठी बाळे धडपड करू लागतील.

२६ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यात होणारे सामान्य शारीरिक बदल

गरोदरपणाच्या या विशिष्ट आठवड्यात शरीरात होणारे बदल तीव्रपणे शारीरिक आहेत कारण बाळे आता तुमच्यामध्ये स्वतंत्र माणूस म्हणून वाढत आहेत.

 • तुमच्या शरीरात होत असलेल्या वेगवान बदलांशी जुळवून घेण्यासाठी तुमच्या शरीराने कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा काही बदलांशी सामना करण्यास तुमचे शरीर तयार नसते. कधीकधी, काही विशिष्ट क्रियाकलापांमुळे विविध समस्या देखील उद्भवू शकतात. एक सामान्यपणे आढळणारी गोष्ट म्हणजे आपल्या सांध्याची शक्ती कमी होणे. हे संप्रेरकांमुळेच होते. खासकरून रिलसीन नावाचे एक अतिशय सामर्थ्यवान संप्रेरक असते जे थेट सांधे सैल करण्यावर काम करते जेणेकरून शरीराचा लवकरात लवकर विस्तार होऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हाडांची संरचना बिघडल्यासारखी वाटू लागेल काही वेळेला काही सांधे हलल्यासारखे तुम्हाला जाणवतील आणि त्यामुळे शरीराची संरचना बिघडू शकेल.
 • जर तुमची हाडे आणि सांधे त्यांची व्यवस्था जशी आहे तशी ठेवण्यासाठी धडपडत असतील तर गर्भाशय एक वेगळी समस्या निर्माण करत आहे. आपल्यात बाळांची झपाट्याने वाढ होत असताना, गर्भाशय शरीरात स्वतःस समायोजित करण्यास सुरुवात करते. ह्यामुळे काही वेळा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागात अतिरिक्त वजन किंवा दबाव आणू शकते. बाळाचे पाय मारणे आणि फडफडल्यासारखे होणे ह्यापेक्षा हा दाब वेगळा असतो. जर तुमच्या बाळाचे कुल्ले किंवा डोक्याच्या भागामुळे एखाद्या भागावर दाब पडत असेल तर त्यामुळे मज्जातंतू त्याखाली अडकतो आणि त्यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. (ह्यास मुख्यतः सायटिका असे म्हणतात). त्यामुळे तो भाग बधिर होतो आणि त्या संवेदनांमुळे अस्वस्थता येते. गरोदरपणात तुम्ही जेव्हा पाठीच्या दुखण्याने त्रस्त असता तेव्हा असे झाल्यास आणखी अस्वस्थता वाढते.
 • गर्भवती महिलांना सध्याच्या घट्ट बसणाऱ्या कपड्यांपेक्षा आकाराने मोठ्या असणार्‍या कपड्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जाण्याचे हे एक कारण आहे. पोटाची वाढ वेगाने होत असल्याने तुम्हाला एखाद्या सकाळी उठल्यावर अचानक तुम्ही आधी सारखे चालू शकत नाही असे वाटेल. तुमच्या शरीरातील गुरुत्वाकर्षणाच्या सतत बदलणाऱ्या केंद्रामुळे तुम्हाला गरोदरपणात संतुलन साधण्यासाठी वारंवार शिकावे लागेल. तुम्ही आजूबाजूला वावरत असताना तुम्ही कशाचातरी आधार घेणे आवश्यक आहे.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यात होणारे सामान्य शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यातील लक्षणे

दुसर्‍या तिमाहीच्या आधीच्या आठवड्यांमध्ये उद्भवलेली सर्वात त्रासदायक लक्षणे आठवतात? बरं, वेगळ्या तीव्रतेने ती पुन्हा परत येतील.

 • अचानक होणाऱ्या वेदना किंवा कळा आल्यास तुमची अकाली प्रसूती होणार आहे अशी समजूत करून घेऊ नका. सहसा, तुम्ही हालचाल करीत असताना ह्या सराव कळा सौम्य असतात. तुमचे शरीर त्यांच्या माध्यमाने प्रसूतीची तयारी करत असते. ह्या कळा एका मिनिटापेक्षा जास्त काळ जोपर्यंत रहात नाहीत आणि वारंवार येत नाहीत तोपर्यंत सर्व ठीक आहे.
 • द्रव धारणा आणि वाढलेल्या रक्ताभिसरणामुळे तुमच्या शरीरातील क्वचितच कुठला भाग सूज आल्याशिवाय राहिला असेल. हाताची बोटे, हात, पाय, पावले, स्तन आणि अगदी आपला चेहरा नेहमीपेक्षा मोठा दिसू शकेल,ज्यामुळे तुम्हाला ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. ह्या वास्तविकतेचा स्वीकार करा. जोपर्यंत ह्या सूज येण्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही तोपर्यंत काळजी करू नका.
 • तुमच्या शरीरात दर सेकंदागणिक होणाऱ्या बदलांमुळे आणि मूत्राशय सतत भरलेले असल्यामुळे वारंवार बाथरूमला जावे लागल्याने तुमचे रात्रीचे जागरण वाढेल. बऱ्याच स्त्रियांना एक कुशीवर झोपायला त्रास होतो तसेच संप्रेरकांच्या पातळीचा सुद्धा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांना रात्रीची झोप लागत नाही.
 • २६ व्या आठवड्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्ही घराबाहेर काहीतरी आणण्यासाठी जाता आणि काय आणायचे होते तेच विसरता. ह्या विसरण्याच्या घटना आता पुन्हा घडू लागतात कारण तुमचे शरीर त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा घेण्यात व्यस्त असते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा २६ वा आठवडा पोटाचा आकार

तुमच्या पोटाच्या वाढत्या आकारामुळे तुम्ही आता टिपिकल गरोदर स्त्रीसारख्या दिसू लागल्या आहात जे तुम्हाला हवे होते. परंतु त्यासोबतच पाठदुखी सुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्ही त्याविषयी तक्रार करू नका.

तुम्हाला यासाठी मदत करू शकणाऱ्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे उदरपोकळीचे मजबूत स्नायू जे तुमचे पोट योग्य ठिकाणी ठेवू शकतात. हे स्नायू आता दोन भागांमध्ये विभाजित होतात त्यामुळे ते शरीराला पूर्वीसारखा आधार देत नाहीत. ह्या स्नायूंची ताकद खूप जास्त असते त्यामुळे तुम्हाला पाठदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा २६ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

तुमचे डॉक्टर तुम्हाला ह्या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सांगत नाहीत, कारण तिसऱ्या तिमाहीला प्रारंभ होण्याची आवश्यकता असेल. त्यानंतर स्कॅन अधिक वारंवार होतील.

असं असलं तरी, तुमची बाळे ह्या काळात गर्भजल गिळत आहेत, त्यास लघवीद्वारे परत बाहेर सोडत आहेत आणि पुन्हा गिळून आत घेत आहेत. हे इतके घृणास्पद वाटत असले तरीसुद्धा त्यांच्या शरीरास योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी ते आवश्यक असते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६व्या आठवड्यातील आहार

या क्षणी पूर्णपणे संतुलित आहार घ्यायचे तुम्ही मनावर घेणे आवश्यक आहे. फूड ऍलर्जी निर्माण करणारे कोणतेही खाद्यपदार्थ दूर ठेवा. द्रवपदार्थ घेऊन शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखल्याने इतर समस्या सुद्धा दूर राहतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६व्या आठवड्यातील आहार

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

प्रभावीपणे स्वत: ची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

हे करा

 • आपल्या मुलांशी नियमितपणे दीर्घ संभाषणात भाग घ्या.
 • प्रसूतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करा.

काय टाळावे?

 • तळलेले पदार्थ आणि बेकरीतील पदार्थ काटेकोरपणे टाळले पाहिजे.
 • जास्त काळ उभे रहाणे टाळा कारण यामुळे आपल्या पायांची सूज आणखी वाढू शकते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यात खरेदी करण्याची आवश्यकता आहेत अशा गोष्टी

खालील काही गोष्टींमुळे तुमचा गरोदरपणाचा आठवडा सोपा जाईल

 • बेबी मॉनिटर्स किंवा डॉपलर
 • बाळाच्या पाळण्याकरिता गादी
 • शांत संगीत रेकॉर्ड

बाळाच्या विकासामुळे आईच्या वजनात वेगाने वाढ होईल तसेच शारीरिक बदल होतील. तुमचा गरोदरपणाचा प्रवास अधिक आरामदायक होण्यासाठी तुमच्या पतीसोबत प्रामाणिक संवाद साधण्यास घाबरू नका.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article