Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले गर्भाशयातील जुळ्या बाळांची हालचाल – बाळांच्या हालचालीचा अनुभव घेताना

गर्भाशयातील जुळ्या बाळांची हालचाल – बाळांच्या हालचालीचा अनुभव घेताना

गर्भाशयातील जुळ्या बाळांची हालचाल – बाळांच्या हालचालीचा अनुभव घेताना

जेव्हा तुम्हाला समजते की तुम्हाला जुळं होणार आहे तेव्हा तुम्हाला आनंदाबरोबरच थोडी भीती सुद्धा वाटते. गर्भारपण कसे पार पडेल ह्या विचाराने तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता. तुमच्या पोटात होणाऱ्या बाळांच्या हालचालीविषयी तुम्ही विचारात पडाल. तुमची जुळी बाळे पोटात जेव्हा हालचाल करू लागतात तेव्हा कसे वाटते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तर मग हा लेख वाचा. ह्या लेखामध्ये जुळ्या मुलांची गर्भधारणा झालेली असल्यास, वेगवेगळ्या टप्प्यावर बाळांची हालचाल कशी अपेक्षित आहे ह्याविषयी माहिती दिली आहे.

जुळ्या बाळांच्या हालचालीस केव्हा सुरुवात होते?

एक बाळ पोटात असताना ज्याप्रमाणे १८२० आठवड्यादरम्यान बाळाची हालचाल जाणवू लागते त्याचप्रमाणे जुळ्या बाळांची सुद्धा त्याच दरम्यान हालचालीस सुरुवात होते. जर तुमची ही पहिली गर्भधारणा नसेल किंवा तुमची शरीरयष्टी सडपातळ असेल तर हालचाल लवकर जाणवण्याची शक्यता असते. जर बाळ पायाळू असेल तर हालचालीस प्रतिबंध येतो.

जुळी बाळे आणि एक बाळ असलेल्या गर्भधारणेदरम्यान बाळाच्या हालचालींमधील फरक

जुळी बाळे असतील तर त्यांना गर्भाशयात पुरेशी जागा मिळत नाही. बाळांना हालचालीस मर्यादित जागा असल्यामुळे तुम्हाला बाळाचे पाय मारणे, हाताच्या हालचाली, हात मारणे, पोटावर बाळाने दिलेला दाब इत्यादी गोष्टी जाणवतील. तुम्हाला बाळाच्या ह्या सगळ्या हालचाली दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी जाणवतील.

जुळे असताना, दोन्ही बाळांच्या हालचाली वेगवेगळ्या जाणवणे शक्य आहे का?

दुसऱ्या तिमाहीचे सुरुवातीला, गर्भाशयात पुरेशी जागा असल्यामुळे काही मातांना जुळ्या बाळांच्या हालचाली वेगवेगळ्या जाणवतील. जर बाळे गर्भाशयाच्या वेगवेगळ्या बाजूस असतील किंवा एकावर एक असतील( sandwich position) तर ह्या हालचाली जाणवण्याची शक्यता जास्त असते. परंतु, अशीही शक्यता असते की आईला दोन्ही बाळांच्या हालचालीतील फरक जाणवणार सुद्धा नाही कारण बऱ्याच वेळेला दोन्ही बाळे दाटीवाटीने एकत्र घट्ट असतात आणि त्यांचे हातपाय (४ हात आणि ४ पाय ) एकमेकांमध्ये गुंफलेले असतात.

जुळे असताना, दोन्ही बाळांच्या हालचाली वेगवेगळ्या जाणवणे शक्य आहे का?

जुळ्या बाळांच्या पोटात होणाऱ्या हालचाली कशा मोजाल?

जेव्हा तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवू लागतील तेव्हा तुमचे स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला त्यावर लक्ष ठेवण्यास सांगू शकतील. होणाऱ्या आईसाठी हा काळ खूप रोमांचक असेल कारण तिला बाळाच्या नियमित हालचाली जाणवू लागतील. बाळाच्या हालचाली मोजण्यासाठी खालील टिप्स आहेत.

  • बाळाच्या हालचालींवर दिवसातून दोनदा लक्ष ठेवा. सकाळी आणि संध्याकाळी हालचाली तपासून पहिल्या पाहिजेत. बाळाच्या हालचाली जाणवल्यावर तुम्ही त्याची नोंद ठेवली पाहिजे जसे की पाय मारणे, लोळणे इत्यादी
  • १० हालचालींनंतर तुम्ही त्या मोजणे थांबवू शकता.
  • जर तुमच्या लक्षात आले की १० हालचालींना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत आहे तर तुम्ही चालायला जा, काहीतरी खा किंवा फळांचा रस घेऊन पुन्हा हालचाली मोजा.
  • जर तुम्हाला २तास किंवा त्या पेक्षा जास्त वेळ बाळाची हालचाल जाणवली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

जुळी बाळ असताना, हालचालीस जागा मर्यादित असते. त्यामुळे आईने बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे जास्त महत्वाचे असते. तुमची दैनंदिन कामे करताना बाळाच्याhttps://parenting.firstcry.ae/articles/19-months-old-baby-food-ideas-chart-and-recipes/?pdaspdasdasdsad हालचालींवर लक्ष ठेवा जसे की जेवण करताना. जर त्यात काही बदल आढळला तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधा.

जुळ्या बाळांच्या पोटात होणाऱ्या हालचाली कशा मोजाल?

जर जुळ्या गर्भाच्या हालचाली थांबल्या तर काळजीचे कारण आहे का?

गर्भधारणेच्या शेवटच्या काळात तुम्ही बाळांच्या हालचालींवर लक्ष ठेवून खात्री करून घेतली पाहिजे. तथापि, जेव्हा बाळे शांत असतात तेव्हा हालचाल जाणवणार नाही. त्यामुळे, लगेच काळजी करण्याचे कारण नाही. असेही असू शकते की बाळाला हालचालीसाठी मर्यादित जागा आहे. परंतु जर तुम्हाला बाळांच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट जाणवली तर तात्काळ तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधा.गर्भजल पातळी कमी होणे हे सुद्धा एक कारण असू शकते. तसेच दोन पैकी एका बाळाची वाढ जास्त होतेय का (Discordant growth) हे डॉक्टर तपासून पाहतील.परंतु काळजीचे कारण नाही कारण ते सामान्यपणे आढळते. परंतु दोन्ही बाळांच्या आकारात खूप फरक असेल तर तर मात्र काळजीचे कारण आहे. तसे होण्याची कारण खालीलप्रमाणे:

  • नाळेसंबंधित प्रश्नांमुळे पोषणमूल्यांची कमतरता
  • ट्वीन टु ट्वीन ट्रान्सफ्युजन सिंड्रोम

बाळे ठीक आहेत ना ह्याची खात्री कशी कराल?

जेव्हा तुम्हाला जुळी मुले होणार असतात तेव्हा तुम्हाला बाळांच्या आरोग्याची काळजी वाटते. जर तुम्हाला बाळांची हालचाल जाणवत नसेल तर तुमच्या बाळांचे आरोग्य ठीक आहे ना हे जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर्स तुम्हाला वेगवेगळे मार्ग सांगतील.

जर तुम्हाला जुळी मुले होणार असतील तर तुमचे डॉक्टर्स वारंवार स्कॅन करून बघतील. त्यामध्ये बाळाच्या वाढीचा अंदाज येईल. तसेच दुसरा मार्ग म्हणजे Non-Stress Test. ही अगदी साधी प्रक्रिया आहे ह्यामध्ये बाळाच्या तब्येतीचा अंदाज येण्यासाठी बाळाच्या हृदयाचे ठोके मोजले जातात.

जेव्हा तुम्ही गर्भधारणेच्या १६ व्या महिन्यात पदार्पण करता तेव्हा तुम्हाला ओटीपोटात हालचाल जाणवू लागेल. आणि तुमच्या बाळांची ही पहिली हालचाल असेल. ह्यास इंग्रजीमध्ये ‘quickening’ असे म्हणतात. जर तुम्ही पहिल्यांदाच आई होत असाल तर तुम्हाला ह्या हालचाली लवकर जाणवणार नाहीत. बाळाच्या हालचाली लवकर जाणवण्यामागे अनेक कारणे आहेत.

२४ आठवड्यापर्यंत तुमची बाळे नवजात अर्भकासारखी दिसू लागतील आणि त्यांची श्रवण क्षमता सुद्धा विकसित होईल. बाळाच्या पोटातील स्थितीनुसार, २४ व्या आठवड्यात बाळाची हालचाल एकाच बाजूने होत असल्याचे जाणवेल, परंतु ती बदलत राहील. जर बाळाची हालचाल दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ जाणवली नाही तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

स्त्रीच्या आयुष्यात गर्भारपण हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. जुळ्या बाळांची गर्भधारणा असल्यास काळजी वाटणे खूप स्वाभाविक आहे परंतु त्या काळजीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. जर काही समस्या वाटली तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमचा हा गर्भधारणेचा काळ आनंदात जाईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article