Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २४ वा आठवडा

In this Article

एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाचा २४ आठवड्यांचा प्रवास यशस्वीरीत्या पार करतात. पुढे काय होणार ह्याची त्यांना कुठलीही कल्पना नसते. प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे ही भावना आणखी तीव्र होते. हे तुमचे चिंतेचे कारण असू नये. सुलभ प्रसूती होणार असल्याची खात्री तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुमच्या वाढत्या पोटाच्या आकारामुळे आणि पडणाऱ्या दाबामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ योग्य तऱ्हेने होत असल्याबाबतची ही सगळी लक्षणे आहेत. दुसऱ्या तिमाहीचा शेवट हा एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे तुमच्या आणि पोटातील बाळाच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्याला चालना मिळते.

२४ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गर्भाशयातच आपल्या बाळांच्या वाढीविषयी एक आकर्षक बाब म्हणजे प्रत्येक आठवड्यात बाळाच्या वजनात वाढ होईल. हाडांच्या संरचनेच्या विकास आणि कणखरपणासोबतच स्नायूंना देखील चांगले सामर्थ्य मिळते आणि चरबीचा थर देखील आणखी वाढतो.

बर्‍याच स्कॅनद्वारे तुम्हाला तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे चेहरे दिसतील आणि बाळे गर्भाशयात शांतपणे राहिलेली दिसतील. बरेचसे चेहरे आधीच पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असतील. बाळाच्या डोक्यावर छोटे आणि पांढरट केस तसेच बाळाच्या भुवया आणि पापण्या सुद्धा दिसू लागतील. केसांचा काळा रंग नंतरच्या टप्प्यात दिसू लागतो.

श्वसनक्रियेवर आता लक्ष केंद्रित केले जाते. श्वासोच्छवासाची प्रक्रिया जलद गतीने शिकण्याची क्रिया सुरु होते. फुप्फुसे जरी पूर्णतः विकसित झालेली नसली तरीसुद्धा त्यांचा आकार पूर्वीपेक्षा मोठा असतो. हवेतील ऑक्सिजन आत घेण्यासाठी एक प्रकारची शाखायुक्त संरचना केली जाते. ह्या संरचनेचा विकास योग्यरीत्या होणे जरुरीचे आहे जेणेकरून तुमच्या बाळाला त्याच्या पहिल्या श्वासापासून योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकेल. तोपर्यंत, सगळी बाळे गर्भजलामध्ये श्वासोच्छवास घेत असतात.

मागील महिन्यांच्या तुलनेत बाळांच्या हालचाली अत्यंत स्पष्ट असतील. काही स्त्रियांना गर्भाशयात डोळे उघडलेले बाळही दिसू शकते. ह्या कालावधीत बाळाची दृष्टी विकसित होत असते, परंतु अद्याप बाळे वस्तूंमध्ये फरक करू शकत नाही. अंधार आणि प्रकाश ह्यामधील फरक समजून त्याप्रमाणे बाळ त्यास प्रतिक्रिया देण्यास शिकते.

२४ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जर तुम्ही तुमच्या जुळ्या मुलांची वाढ होत नसल्याबद्दल काळजी करीत असाल तर गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यात त्यांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला खूप आनंद मिळेल. त्यांची लांबी ३० सेंटीमीटर असेल तर त्यांचे वजन ५५०६०० ग्रॅम्स इतके असेल. तुम्ही एक खरबूज हातात धरले आहे अशी कल्पना करा. तुमचे बाळ ह्या आठवड्यात अगदी अचूक तेव्हढ्याच आकाराचे असते.

२४ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यातील सामान्य शारीरिक बदल

गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यात शरीरात आढळणारे बदल खालील प्रमाणे

 • गरोदरपणात प्रगती होत असताना स्त्रिया त्यांच्या स्तनांचा वाढता आकार पाहण्यास  उत्सुक असतात. त्यासोबत त्यांच्या  संपूर्ण शरीरास एक वेगळा आकार प्राप्त होतो. दुग्ध ग्रंथी सुद्धा वाढतात  जरी ही कल्पकता अनेकांना स्वागतार्ह वाटत असेल परंतु काही स्त्रियांना हे मोठे स्तन  आवडत नाहीत. दुग्धनलिका रुंद होतात जेणेकरून त्यातून दुधाचा प्रवाह सुरळीत होऊ शकेल. स्तनांचा आकार वाढल्याने त्यांच्यावरचे वजन सुद्धा वाढते. त्या दुग्ध नलिकेत काही अडथळा असेल तर गाठ तयार होऊ शकते. जर तुम्ही स्तन दाबले तर तुम्हाला ब्लॉकेज स्पष्ट जाणवेल. परंतु काळजी करण्याचे काहीही कारण नाही, उबदारपणामुळे आणि स्तनांचा मसाज  केल्यास ब्लॉकेज लवकर मोकळे होऊ शकतात. मसाजला प्रतिसाद म्हणून स्तनगळतीसुद्धा होऊ शकते.
 • गर्भाशयाचा तीव्र दाब आता पोटावर आणि ओटीपोटावर पडतो. तुमच्या शरीरात बाळांची वेगाने वाढ होत असतानां बाळाच्या अनेक हालचाली तुम्हाला जाणवू लागतात. जर बाळे गर्भजलात पोहत असेल तर बाळाच्या गतिमान हालचालींमुळे तुम्हाला एकाच वेळी विचित्र आणि आनंदी वाटेल. बाळाने आतून मारलेले पाय आणि काही पंचेस मुळे तुम्हाला आतून फडफडल्यासारखे वाटेल.nजर बाळाच्या झोपेच्या वेळा तुमच्या झोपेच्या वेळांशी जुळल्या नाहीत तर त्याचा परिणाम  तुमच्या झोपेच्या नमुन्यावर होऊ शकतो. बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवून तुमची जीवनशैली त्यानुसार समायोजित केल्यास तुमच्या दोघांना त्याचा फायदा होऊ शकतो.
 • स्त्राव आणि रक्तस्त्राव ह्या आठवड्यात सुद्धा होत राहतील. योनीमार्गातून येणारा स्त्राव हा घट्ट आणि रंगहीन असेल तर ते संपूर्णतः सुरक्षित आणि नैसर्गिक आहे. दात घासताना अथवा फ्लॉस करताना हिरडीतूनरक्तस्त्राव होऊ शकतो. हळुवार ब्रश केल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते, परंतु आपल्या दातांच्या आरोग्याचा धोका पत्करू नये.

गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यात शरीरात आढळणारे बदल खालील प्रमाणे

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यातील लक्षणे 

ह्या टप्प्यावर सर्व बाळांची वेगाने वाढ होते. शरीर त्याच्या अनुकूलतेनुसार बदल घडवत असते, त्यामुळे जुळ्या बाळांसह गरोदर असण्याची लक्षणे जरा जास्त स्पष्ट दिसू लागतात.

 • आपल्या कामाच्या ठिकाणी फिरणे किंवा उभे राहणे थोडे आव्हानात्मक होऊ शकते कारण तुम्हाला पायात  पेटके आणि वेदना जाणवू लागतील. एकाधिक बाळांना पोटात घेऊन आजूबाजूला वावरणे सोपे नाही आणि त्यामुळे तुम्हाला अगदी सहज थकवा येऊ शकतो. द्रवपदार्थ कमी प्रमाणात घेतल्यास पेटके अधिक तीव्र होतात. कारण ते कमी होण्यासाठी पाण्याचे प्रमाण म्हणजेच हायड्रेशन कमी पडते.
 • पेटके येण्यासोबतच  स्त्रियांना त्रास देणारी दुसरी गोष्ट  म्हणजे पायांना येणारी  सूज, त्यामुळे  ते नेहमीपेक्षा बर्‍याचजास्त प्रमाणात  द्रवपदार्थ टिकवून ठेवतात. उच्च रक्तदाब देखील  त्रास देऊ शकतो. जेव्हा तुम्ही  बराच काळ एकाच स्थितीत रहाता तेव्हा सूज वाढत जाते. म्हणून, आपण काम करत असताना थोडा विश्रांती घेण्याची आणि  फिरण्याची आवश्यकता आहे.
 • जोपर्यंत तुमच्या बाळांचा जन्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळणार  नाही. तुमचा आकार आणि पवित्रा ह्या मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होईल कारण तुमच्या बाळांचा  आकार वाढत जाईल आणि वजनामध्ये पूर्वीपेक्षा जास्त बदल होईल. बहुतेक डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी सोप्या उपायांची शिफारस करतात, परंतु त्या व्यतिरिक्त, तुम्हाला हसून  सहन करावे लागेल.
 • शारीरिक बदलांमध्ये, जर वाढलेले स्तन तुम्हाला आनंदित करीत असतील तर, तुमच्या पोटावरील गडद रेषेमुळे तुम्हाला तसे वाटेलच असे नाही. संप्रेरकांमधील चढ उतारांमुळे शरीरात जास्त प्रमाणात रंगद्रव्ये तयार होतात आणि त्यामुळे पोटावर काळी गडद रेषा उमटते त्यास इंग्रजीमध्ये लिनिया निग्रा असे म्हणतात. ही रेषा तात्पुरती असते आणि नंतर नाहीशी होते.

२४ व्या आठवड्यात जन्मलेल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांची जगण्याची शक्यता

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी मोठी चिंता ही आहे की जर त्यांची २४ व्या आठवड्यांत अकाली प्रसूती झाली तर त्यांची जुळी बाळे जगण्याची किती शक्यता असते. जेव्हा तुम्ही एकाधिक बाळांसह गर्भवती असता, तेव्हा बहुतेक मातांचे गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरत नाहीत आणि त्यांची प्रसूती ३७ आठवड्यांपूर्वीच होते. २४ वा आठवडा हा प्रसूतीसाठी खूप लवकर होतो परंतु वैद्यकीय मदतीच्या साहाय्याने कदाचित बाळे जिवंत राहू शकतील हे दर्शवणारा हा महत्वाचा टप्पा आहे. बाळांना अतिदक्षता विभागात किमान तीन महिने राहणे जरुरीचे असते. तसेच २४व्या आठवड्यानंतर प्रत्येक आठवड्यागणिक बाळांची जिंवंत राहण्याची शक्यता अधिक वाढते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण २४ वा आठवडा पोटाचा आकार

या आठवड्यात गर्भाशय आता तुमच्या पोटाचा संपूर्ण भाग आच्छादित करेल. बास्केटबॉल इतका मोठा पोटाचा आकार असू शकेल ज्यामध्ये तुमची छोटी बाळे असतील. बाळांच्या वाढत्या वजनामुळे सडपातळ असलेल्या स्त्रियांना आधारासाठी मॅटर्निटी बेल्टची गरज भासू शकेल तसेच वेगळ्या पँटची निवड करावी लागेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण २४ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

बहुतेक डॉक्टर २४वा आठवडा पूर्ण होण्यापूर्वी अल्ट्रासाऊंड करतात, जर तुम्ही यापूर्वी अल्ट्रासाऊंड चुकविला असेल तर कदाचित तो ह्या आठवड्यात केला जाईल. इतर कोणतीही तपासणी किंवा तीव्र स्कॅन नंतर केले जातात. बाळांची वाढ तसेच नाळेची स्थिती सुद्धा तपासली जाईल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यातील आहार

स्वतःचे वजन करून त्यानुसार आपला आहार राखणे हा या टप्प्यावर जाण्याचा मार्ग आहे. आपले डॉक्टर आपले पोषण समायोजित करुन त्यातील कोणत्याही विसंगती सुधारू शकतात. बद्धकोष्ठता ह्या काळात वाढू शकते, तंतुमय पदार्थ खाऊन त्यांचा सामना करता येऊ शकतो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यातील आहार

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

साधेपणा आणि शांतता ही आपल्या शरीरातील आणि आपल्या बाळांची काळजी घेण्याची गुरुकिल्ली आहे

हे करा

 • अकाली प्रसूतीसाठी तयार रहा.
 • या आठवड्यात घरातील कोणतीही कामे शक्य तितकी पूर्ण करा.

काय टाळावे?

 • सूज कमी करण्यासाठी सोडियम समृध्द असलेल्या खाद्यपदार्थांना टाळा.
 • गरोदरपणातील मधुमेह टाळण्यासाठी गोड पदार्थांपासून दूर रहा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २४ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

स्तनांचे वाढते आकार आणि त्यांच्या गळतीसाठी तुम्ही खालील वस्तू खरेदी करू शकता

 • दोन बाळांना एकाच वेळी स्तनपान देण्यासाठी नर्सिंग उशी.
 • स्तनाग्रांना लावण्यासाठी क्रीम.
 • जास्तीचे दूध काढून ठेवण्यासाठी पंप.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा २४ वा आठवडा पार केल्यानंतर तुमची बाळे लवकरच ह्या जगात प्रवेश करणार आहेत. तुम्हाला प्रसूतीची चिंता वाटू शकेल. काही आरामदायक आणि शांत व्यायामप्रकार केल्यास तुमची चिंता कमी होऊ शकते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article