Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३८ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३८ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३८ वा आठवडा

तुम्ही अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहात. तुम्ही हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे. ह्या ३८ आठवड्यांच्या प्रवासात तुम्ही, गर्भधारणा झाल्याचे निदान झाल्यापासून आता एकाधिक बाळांच्या आई होण्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केलेला आहे. ह्या आठवड्यात तुम्ही अनुभवणाऱ्या भावना व्यक्त करण्याच्या पलीकडच्या असतील. तुम्ही रुग्णालयात जाण्याआधीची तुमची कुठलीही तयारी किंवा कामे राहिली असतील तर आता त्यासाठी शेवटची संधी आहे. जर तुमची सर्व तयारी झालेली असेल तर आता फक्त शांतपणे वाट पाहायची आहे आणि बाळांना त्यांचे काम करू द्यायचे आहे. जर प्रसुतीचे कुठलेही लक्षण दिसले तर तुम्हाला हॉस्पिटल बॅग घेऊन तिथे जावे लागेल परंतु ह्या आठवड्यात तुम्हाला काळजी घेतली पाहिजे.

३८ व्या आठवड्यात बाळाची वाढ

गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्याला वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण मुदतीचे गरोदरपण असे म्हटले जाते. बरीच लहान बाळे आपल्या वाढीच्या शिखरावर पोहोचली आहेत आणि लवकरच बाहेरच्या जगात जगण्यास तयार आहेत.

जर आतापर्यंत बाळाच्या शरीरावरील केस गळून गेले असतील तर ह्या टप्प्यावर बाळाच्या डोक्यावरील केस खूप दाट असतील. बाळांच्या केसांचा रंग तुमच्या केसांपेक्षा वेगळा असू शकतो परंतु बाहेरच्या जगात आल्यावर आणि नवीन केस आल्यावर केसांचा रंग सामान्य होऊ शकेल. जर बाळाच्या आई वडिलांचे केस पातळ असतील तर बाळाचे केस तसेच असण्याची शक्यता असते. बाळांच्या शरीरावर असलेले व्हर्निक्स हे आवरण आता बाळाच्या शरीरावर राहणार नाही. तसेच, काही बाळांच्या शरीरारावर जन्माच्या वेळेला व्हर्निक्स ह्या थराचा थोडा भाग असतो. आता त्याच्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही आणि त्याबाबत डॉक्टर काळजी घेतील.

बाळांची आता संपूर्ण वाढ झालेली असल्याने त्यांची वाढ अगदी चांगल्या टप्प्यावर पोहोचली आहे. तथापि, काही परिस्थितींमध्ये, बाळांचा जन्म ह्या आठवड्यात होणार नाही आणि बाळे आणखी काही दिवस आतमध्ये असतील. ह्या काळात सुद्धा बाळाची वाढ होत राहते आणि त्यांच्या शरीरावर नियमितपणे चरबीचे थर जमा होत राहतात. तसेच बाळाच्या नाळेची सुद्धा वाढ होत राहते आणि त्याद्वारे ह्या मोठ्या झालेल्या बाळांना पोषणमूल्ये पुरवली जातात. शरीराची वाढ वेगवेगळ्या स्वरूपात होते, बाळाचे फक्त केसच वाढत नाहीत तर नखांची सुद्धा वाढ होते. जेव्हा बाळांचा जन्म होतो तेव्हा बाळांची नखे खूप तीक्ष्ण असल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे बाळाला स्वतःला इजा होऊ शकते असे तुम्हाला वाटू शकते. असे जरी असले तर तुम्ही तुमच्या नवजात बाळाची नखे कापू नयेत. कारण गर्भजलात बराच कालावधी राहिल्यामुळे ही नखे खूप मऊ असतात. ही नखे घट्ट झाल्यानंतर तुम्ही ती कापू शकता.

बाळाचा आकार केवढा असतो?

स्वतःला आधार देण्यासाठी बाळाच्या त्वचेवर चरबीचे थर साठत असतात. गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्यापर्यंत जुळ्या किंवा एकाधिक बाळांचा आकार उच्च पातळीवर पोहोचलेला असतो. गर्भाशयाच्या बाहेर योग्यप्रकारे जगण्यासाठी त्यांची ही सर्वात मोठी गरज आहे.

अशा परिस्थितीत, बर्‍याच बाळांचे वजन साधारणत: .७ किलोग्रॅम ते ३ किलोग्रॅम असते. डोके ते पायापर्यंत मोजताना त्यांची उंची अंदाजे ५० सेंटीमीटर देखील असू शकते.

सामान्य शरीर बदल

गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्यात तुमच्या बाळांचा जन्म होईल आणि त्यामुळे तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होऊ लागेल आणि बाळांसाठी सर्व बाबतीत अनुकूल असेल. मागील आठवड्यांपासून कळा सुरूच राहतील आणि ह्या आठवड्यात देखील त्या होत राहतील. ब्रॅक्सटन हिक्सचे आकुंचन अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला खऱ्या प्रसूती कळा कशा हाताळाव्यात हे समजेल.

 • हे अचानक घडत असताना तुमच्या गर्भाशयाच्या मुखामध्ये काही बदल घडून येतात आणि गर्भाशयाच्या मुख उघडण्यास सुरुवात होते. गर्भाशयाचे मुख उघडत असताना त्यावरील थर पातळ होत जातात आणि त्यास झाकणारा म्युकस प्लग पूर्णपणे निघतो. त्यानंतर डायलेशन सुरु होते आणि त्यामुळे प्रसूती वेदनांना सुरुवात होते. गर्भाशयाच्या मुखामध्ये इतके बदल होत असताना योनीमार्गातून येणाऱ्या स्रावामध्ये रक्त असण्याची शक्यता असते. रक्ताचे प्रमाण हलके असते आणि ते प्रसूती सुरु होणार असल्याचे लक्षण असते. त्यानंतर प्रसूती एक दोन तासांमध्ये किंवा एक दोन दिवसांमध्येसुद्धा सुरु होऊ शकते.
 • जास्त वजन असलेल्या बाळांचा तुमच्या शरीरावर लक्षणीय भार पडेल. या आठवड्यापर्यंत गर्भाशयाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या विविध नसांवर बराच दाब निर्माण होईल. दुसरीकडे, तुमच्या शरीराला प्रसूती जवळ आली आहे हे माहिती असल्याने, गर्भाशयाच्या भागाकडे रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे द्रव धारण करण्याची क्षमता वाढल्याने तुमच्या पायाचे घोटे आणि पाऊलांवर सूज येऊ शकते. त्यामुळे काही वेळा तुम्हाला वेदना होऊ शकतात आणि चालणे तुमच्यासाठी अवघड होते. परंतु, जोपर्यंत तुम्हाला त्यामुळे खूप डोकेदुखी, अस्पष्ट दृष्टी आणि मळमळ होत नाही तोपर्यंत ते सामान्य आहे.
 • या आठवड्यात तुमच्या बाळांचा जन्म केव्हाही होऊ शकतो आणि बाळांच्या जन्मानंतर तुम्हाला काही तासातच भूक लागेल. हा टप्पा स्तनपानास सुरुवात करण्याचा संकेत आहे. म्हणून बऱ्याच स्त्रियांमध्ये स्तनांमधून ह्या काळात गळती होते आणि त्यामध्ये कोलोस्ट्रमचा समावेश असतो. तुमच्या बाळासाठी आवश्यक अशी सगळी पोषणमूल्ये त्यामध्ये असल्याने ते साठवून ठेवण्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि बाळे दूध पिण्यास तयार झाल्यावर त्यांना ते द्या.

सामान्य शरीर बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्यातील लक्षणे

गरोदरपणाचा अंतिम आठवडा फक्त तुमच्यासाठी अवघड नाही तर तुमच्या पोटात असलेल्या बाळांसाठी सुद्धा तो कठीण आहे कारण त्यांना आता गर्भाशयात जागा कमी पडते आणि वेगवेगळ्या लक्षणांद्वारे तुम्हाला ते दिसून येते.

 • ह्या आठवड्यात तुम्हाला नीट झोप येणार नाही. बाळांचा सुरक्षितपणे जन्म होण्याची चिंता तुम्हाला लागून राहील कारण ह्या आठवड्यात बाळांचा जन्म होणार हे निश्चित आहे. तसेच शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला खूप थकवा येईल आणि त्यामुळे नीट झोप लागणार नाही. तरीही थोडी झोप मिळणे आवश्यक आहे आणि तुमच्या प्रसूतीसाठी ऊर्जा वाचवणे आवश्यक आहे. शांत संगीत तुम्ही ऐकू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.
 • तुमच्या शरीरात होणारा आणखी एक बदल म्हणजे तुमच्या पोटाची त्वचा होय. शेवटच्या आठवड्यात तुमच्या पोटाचा आकार वाढेल आणि तुमच्या पोटावरील त्वचा खूप ताणली जाईल. त्वचा ताणली गेल्याने संवेदनशील होते आणि त्यामुळे त्वचेला सतत खाज सुटते. साधे मॉइश्चरायझिंग क्रीम वापरु शकता तसेच खूप पिण्याचे पाणी पिऊन तुम्ही हायड्रेशनची पातळी उच्चतम ठेवू शकता.
 • येथे, आपण स्वत: ला शांत ठेवण्यासाठी आणि प्रसूतीच्या तयारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहात. परंतु तुमच्या बाळांकडे तुमच्यासारखा संयम असणार नाही. गर्भजल कमी प्रमाणात असल्याने आणि गर्भाशय त्याच्या मर्यादेपर्यंत विस्तारल्याने बाळांच्या बऱ्याच हालचाली स्पष्ट होतील. त्यामुळे तुमच्या बरगड्यांच्या जवळ बाळाचे पाय मारणे जाणवेल तसेच तुमच्या शरीराच्या विविध भागात तुम्हाला बाळाचे पंचेस जाणवतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्यात पोटाचा आकार

जरी तुम्ही दररोज तुमच्या पोटाचे निरीक्षण करीत असलात तरीही, या आठवड्यात, ते नेहमीपेक्षा मोठे असल्याचे तुम्हाला जाणवेल. जरी हे खरे असले तरीसुद्धा, तुमच्या बाळांची जास्तीत जास्त वाढ झाल्याचे ते लक्षण आहे. बाळांची हालचाल आता मर्यादित झाली आहे आणि तुमची नाभी आता बाहेर आली आहे आणि पर्सच्या बटनासारखी ती दिसत आहे. बाळांचा जन्म झाल्यानंतर ते नॉर्मल होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

अल्ट्रासाऊंड करण्याची गरज असल्यास डॉक्टर ते करू शकतात. बर्‍याच वेळा, ही फक्त सामान्य तपासणी असते आणि बाळांची किती प्रगती झाली आहे आणि जन्मासाठी बाळे आदर्श स्थितीत आहेत का या गोष्टीवर लक्ष ठेवते. गर्भाशयाचे मुख किती उघडले आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी डॉक्टर त्वरित तपासणी करू शकतात.

काय खावे?

तुमचा आहार आधीसारखाच राहिला पाहिजे. वजन नियंत्रित करण्यासाठी काही ऍडजेस्टमेंट केल्या जाऊ शकतात. प्रसूती सुलभ होण्यासाठी काही अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे जरुरीचे आहे. तंतुमय पदार्थांचे सेवन आणि खूप जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेणे सुरु ठेवावे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

या टप्प्यावर तुमची प्रसूती सर्वात महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला मदत करतील अशा काही काळजीविषयक टिप्स खाली दिलेल्या आहेत.

हे करा

 • प्रसूतीच्या सुरवातीच्या लक्षणांविषयी स्वतःला जागरूक करा.
 • स्तनपानाविषयी मूलभूत गोष्टी आणि बाळास कसे धरावे ह्याविषयी शिकण्यासाठी स्तनपान विषयक वर्गात सामील व्हा.

काय टाळावे?

 • इजा होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही प्रकारच्या व्यायामापासून दूर रहा.
 • पोट खाजवण्याचे टाळा कारण त्यामुळे पोटावर कायमसाठी लाल खुणा राहू शकतात.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपल्या डिलिव्हरीनंतर आपल्याला आवश्यक असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी ही वेळ चांगली आहे जसे की,

 • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
 • बाळाच्या विकासाचा मागोवा घेणारी नियोजक आणि पुस्तके

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३८ आठवड्यांच्या गर्भवती असणे म्हणजे तो गरोदरपणाचा शेवटचा टप्पा आहे आणि बाळांचा जन्म आता लवकरच होईल. स्वतःचे अभिनंद करा आणि तुमच्या बाळांच्या आयुष्यभरासाठी तुम्ही नक्की एक चांगली आई व्हाल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article