Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ११ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ११ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ११ वा आठवडा

गरोदरपणाचा सुरुवातीचा टप्पा पार करणे गर्भवती महिलेसाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. जुळी मुले किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ११ वा आठवडा पार केलेला असेल तर ह्या कठीण काळात सुद्धा तुम्ही स्थिर राहिल्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा. पुढच्या आठवड्यांमध्ये तुम्ही थोडं आरामांत राहू शकता. तुम्ही पहिल्या तिमाहीच्या जवळ आहात आणि मॉर्निंग सिकनेस व मळमळ कमी होण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. पूर्वीच्या तुलनेत तुम्हाला आता बरेच उत्साही वाटेल. ह्या टप्प्यावर बऱ्याचशा स्त्रिया डॉप्लर मशीनच्या साहाय्याने बाळाच्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू शकतील कारण लहान बाळांना सामावून घेण्यासाठी पोट जागा बनवते. तुमचे बाळ ११व्या आठवड्यात कसे विकसित होते आणि ह्या आठवड्यात बाळामध्ये तुम्ही कुठल्या बदलांची अपेक्षा करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

११ व्या आठवड्यात बाळांची वाढ

एकदा तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात पोहोचलात की तुमची जुळी किंवा एकाधिक वेगाने वाढतील. जर एका बाळासह गर्भवती असलेल्या एखाद्या महिलेच्या बाळाशी तुलना केली तर आपल्या जुळ्या बाळांचे आकार त्यांच्यापेक्षा लहान असतील. एकाधिक बाळांना सामावून घेताना गर्भाशयाच्या आतील जागेचा विचार केल्यास, ही एक पूर्णपणे सामान्य वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका कारण लवकरच तुमची बाळे इतर बाळांप्रमाणे दिसू लागतील.

मुलांचे गुप्तांग आधीच तयार झाले आहेत, परंतु अद्याप ते सांगणे शक्य होणार नाही. तथापि, त्यांचे शरीर संबंधित संप्रेरक किंवा अंतर्गत संस्था विकसित करून आधीच प्रतिसाद देत आहेत. जर बाळ मुलगा असेल तर टेस्टोस्टेरॉनची निर्मिती चांगली सुरू होते आणि मुलगी असेल तर अंडाशय तयार होऊ लागतात.

एक आठवड्यापूर्वी बाळाच्या शरीरावरील लहान केस आता वाढण्यास सुरुवात होते तसेच डोक्यावरील केस सुद्धा वाढू लागतात. नखांचा तळ सुद्धा बोटांवर दिसू लागतो आणि पायाची बोटे सुद्धा तयार होतात.

जरी ते गर्भाशयात असताना त्याचा फारसा उपयोग होत नाही तरी ह्या टप्प्यावर होणारा महत्वाचा विकास म्हणजे डायफ्रॅम तयार होतो. काही बाळांना आत असताना उचक्या येण्यास सुरुवात होते तसेच बाळाच्या अंतर्गत हालचाली सुद्धा सुरु असतात. पोटामध्ये असताना लहान बाळे फिरू लागतात आणि गर्भजलात पलटतात. तुम्हाला त्यांच्या हालचाली जाणवू शकत नाही कारण त्या जाणवण्याइतक्या तीव्र नसतात. परंतु त्यांच्या हालचाली अल्ट्रासाऊंडमध्ये नक्कीच पाहिल्या जाऊ शकतात.

११ आठवड्यांच्या बाळाचा आकार केवढा असतो?

बहुतेक बाळांचे वजन अंदाजे ३० ४५ ग्रॅमइतके असते आणि जेव्हा डोक्यापासून नितंबापर्यंत लांबी मोजली जाते तेव्हा ती सुमारे ५ सेंटीमीटर इतकी असते. या टप्प्यावर, त्यांचे डोके सर्वात मोठे आणि सहसा संपूर्ण शरीराच्या आकारापेक्षा निम्मे असते. जरी ११व्या आठवड्यात लहान बाळे अंजिराइतकी मोठी असू शकतात तरीसुद्धा गर्भाशयात एकाधिक बाळे असल्यास बाळाचा आकार लहान असू शकतो.

११ आठवड्यांच्या बाळाचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीला तिच्या शरीरातील कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल दिसतील. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात पुढील बदलांची अपेक्षा करू शकता.

 • गर्भाशयाचा आकार वाढलेला असल्यामुळे ओटीपोटाकडील भागात थोडीच जागा राहील त्यामुळे मूत्राशय आणि इतर अवयवांवर दाब पडेल. तसेच त्यामुळे ओटीपोटाच्या स्नायूंवर सुद्धा दाब येईल आणि त्यांचे योग्यरित्या नियंत्रण करणे कठीण जाईल. बऱ्याच स्त्रियांना जोरात शिंकल्यास किंवा हसल्यास पॅन्ट मध्ये लघवी होण्याचा अनुभव असेल. त्यामुळे ओशाळवाणे वाटू शकते परंतु त्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही कारण त्यामुळे तुमचे पेल्विक स्नायू मजबूत होतात. तसेच आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी परवानगी दिली असेल तर गर्भधारणा अनुकूल केगल व्यायामाद्वारे आपल्या ओटीपोटाचे स्नायू बळकट करू शकता.
 • गरोदरपणामध्ये स्त्रियांच्या शरीरात होणारा एक सामान्य बदल म्हणजे केस आणि नखे यांच्यात भरमसाट वाढ होते. तथापि, तुम्ही कदाचित ११ व्या आठवड्यातच त्याकडे लक्ष देणे सुरू कराल, आपले केस किंवा नखे ​​सामान्यत: लांब किंवा चमकदार दिसतील. हे सर्व आपल्या शरीरातील वाढलेल्या संप्रेरक पातळीचे परिणाम आहेत, जे आपण आधी अनुभवत असलेल्या केस गळतीस प्रतिकार करण्यास मदत करते.
 • रक्ताभिसरण वाढल्यामुळे तुम्हाला कुठल्याही वेळी उबदार वाटू शकते आणि काही विशिष्ट कारणास्तव तुम्हाला घाम फुटत असल्याचेही आढळू शकते. बहुतेक वेळा ही हॉट फ्लॅशेसची लक्षणे आहेत. बाळांसाठी वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे ही लक्षणे दिसतात आणि ती पूर्णतः सामान्य आहेत. जर संध्याकाळच्या विशिष्ट वेळी घाम येत असेल किंवा ताप अथवा आजारपणाची भावना असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असताना, तुम्ही गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात पुढील गोष्टींची अपेक्षा करू शकता.

 • ११ आठवड्यांत, तुम्हाला मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ जाणवते. पण खात्री बाळगा, तुम्ही लवकरच आपल्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवेश कराल आणि या त्रासदायक गरोदरपणाची लक्षणे थोड्या काळासाठी कमी होतील. तुमचे शांतीचे आणि आरामदायक क्षण लवकरच येणार आहेत
 • गरोदरपणात संप्रेरकांमध्ये होणारे बदल तुमच्यामध्ये काही चांगले बदल देखील घडवून आणतात. हार्मोन्समधील बदलांमुळे तुमच्याकडे चमकणारी त्वचा आणि चमकदार केस असतील.
 • लोकांशी सातत्याने होणारी सुसंवाद तुम्हाला चिडचिडे बनवू शकतो, म्हणूनच तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी घालवा. स्वत: ला शांत करण्यासाठी तुम्ही वाचू शकता, विश्रांती घेऊ शकता आणि ध्यान करू शकता
 • गर्भाशय जसजसे विस्तृत होत जाईल तसतसे पायांमध्ये पेटके येऊ शकतात. रात्रीचे तुमच्या पायात पेटके येऊ शकतात परंतु तुम्ही सजलीत राहून त्यावर नियंत्रण ठेऊ शकता

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील लक्षणे

 • ह्या काळात तुम्ही ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची अपेक्षा करू शकता. वायू आणि पोट फुगल्यामुळे तुम्हाला गॅसेसचा वारंवार त्रास होऊ शकतो. हे सर्व संप्रेरकांचे आणि स्नायू शिथिल झाल्याचे परिणाम आहेत जे पचन प्रक्रियेस मंद करतात. ह्यावर काही उपाय नाही, परंतु निरोगी आहाराचे पालन करणे, फायबरसमृद्ध असलेले पदार्थ खाणे आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने काही प्रमाणात मदत होऊ शकते
 • आपल्या योनीतून होणारा स्त्राव या आठवड्यात आणखी वाढू शकतो. जुनी किंवा जाडसर अंतर्वस्त्रे वापरणे या काळात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच अचानक पोटावर एक गडद रेषा दिसू लागते जी आधी कधीही तुम्हाला दिसली नसेल, परंतु घाबरून जाऊ नका!

जुळ्या बाळांसह गर्भधारणा ११ वा आठवडा पोटाचा आकार

गर्भधारणेच्या ११ व्या आठवड्यात पोट दिसू लागल्यामुळे स्त्रीला ती गर्भवती असल्यासारखे वाटते. गर्भाशय जवळजवळ ओटीपोटाचा सर्व भाग व्यापते, जेव्हा तुम्ही तुमच्या पोटास स्पर्श करता तेव्हा तुम्हाला पोटाचा घट्टपणा जाणवू शकतो.

बाळे पोटात फिरत असल्याचेही काही स्त्रियांना जाणवते आणि त्यांची लहान बाळे आत उत्साही आहेत असे त्या समजतात. परंतु, या आठवड्यात जुळी किंवा एकाधिक बाळे लाथ मारण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह दाखविण्यासाठी अद्याप खूपच लहान आहेत आणि ह्या सर्व हालचाली म्हणजे वायू असू शकतो.

जुळ्या/एकाधिक बाळांसह गरोदरपण ११ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

या टप्प्यातील बहुतेक अल्ट्रासाऊंड हे बाळे योग्य प्रकारे विकसित होत आहेत की नाही हे तपासण्यासाठी आणि त्यांच्यामधील विकार दूर करण्यासाठी आहेत. जुळ्या आणि एकाधिक बाळांच्या बाबतीत, नाळेवरून तुम्हास एकसारखे जुळे आहेत की नाही हे देखील डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. गरोदरपणातील कोणत्याही अडचणी देखील या चेकअपमध्ये सापडू शकतात.

काय खावे?

११ आठवड्यांच्या गर्भवती स्त्रीच्या आहारावर चांगले लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निरोगी जुळ्या बाळांच्या गर्भारपणासाठी तुमच्या आहारात प्रथिने, लोह, आयोडिन, कार्बोहायड्रेट्सची उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. तथापि, ह्या घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करू नये कारण यामुळे वायू आणि बद्धकोष्ठता उद्भवू शकते आणि बाळाला त्रास होऊ शकतो.

चरबीयुक्त पदार्थ अजिबात खाऊ नका. निरोगी भाज्या, चीज उत्पादने, लापशी हे पर्याय निवडा, हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त आरोग्यदायी पर्याय आहेत. नेहमीप्रमाणेच, गरोदरपणात पाणी आणि इतर रस आपले सर्वोत्तम मित्र बनवा

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

पहिल्या तिमाही पूर्ण झाल्यामुळे, येत्या काही महिन्यांत स्वत: ला सुलभ ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा काही मूलभूत टिप्स इथे दिलेल्या आहेत.

हे करा

 • आपल्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यात शक्य तितका आराम करण्याचा प्रयत्न करा. विशेषत: जर आपल्याला बर्‍याचदा मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ होत असेल तर आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे
 • आधारासाठी इतर गर्भवती मातांशी संवाद साधा. तुम्हाला काही चिंता असल्यास ते त्यांच्यासोबत शेअर करा, कदाचित त्या आपल्याला मदत करू शकतील. कोणतीही शंका असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक चांगले

काय टाळावे?

 • खूप जास्त खाऊ नका कारण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात
 • जास्त काळ व्यायाम करू नका कारण त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपण लहान बाळांच्या मॉनिटर अ‍ॅम्पलीफायरमध्ये गुंतवणूक करणे निवडू शकता ते तुम्हाला बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे, मॉर्निंग सिकनेसच्या या शेवटच्या टप्प्यातून जाण्यासाठी छान सुवासिक धूप खरेदी करा त्यामुळे तुम्हाला बरे वाटू शकेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहणे तुमच्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते, परंतु जर तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली आणि निरोगी आहाराचा अवलंब केला तर तुम्ही निरोगी बाळांना जन्म द्याल. तुम्ही गर्भारपणाचे ११ आठवडे अगदी छान पार केले आहेत. लवकरच तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश कराल आणि तुम्ही ते साजरे करण्याची गरज आहे! आपल्या पतीसह छान डिनर करा आणि बाळे आल्यानंतर तुमचे एकत्र कुटुंब कसे असेल याबद्दल स्वप्न पहा. निरोगी शरीर आणि निरोगी मन गर्भाशयात असलेल्या तुमच्या लहान बाळांना आनंदी ठेवण्यासाठी मदत करू शकते.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १० वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १२ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article