Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

जेव्हा तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला समजते तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. होय, आपण पूर्वीसारखे काहीही किंवा सगळंच खाऊ शकत नाही. गरोदरपणात तुमचे शरीर बर्‍याच बदलांना सामोरे जाईल. गरोदरपणाच्या नऊ महत्त्वपूर्ण महिन्यांत, तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून, गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, याबद्दल बरेच चांगले सल्ले मिळतील आणि त्यामुळे तुम्ही गोंधळात पडाल. जर तुम्हाला फळं, विशेषत: आंबे खायला आवडत असतील तर तुम्ही कदाचित गरोदरपणात ते खाऊ शकता की नाही ह्या विचाराने तुम्ही संभ्रमात पडाल. इतर खाद्यपदार्थाच्या बाबतीतही असेच होईल. पण आज आपण एका फळाबाबत इथे चर्चा करणार आहोत तो म्हणजे फळांचा राजा आंबा! तुम्ही गरोदरपणात आंबे खाऊ शकता की नाही हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात पिकलेले आंबे खाण्याचे त्याचे स्वतःचे फायदे आहेत, फक्त तुम्ही ते किती खात आहात ह्यावर लक्ष ठेवून तो मर्यादित प्रमाणात खा. आंबा व्हिटॅमिन ए, बी आणि सी ने समृद्ध असल्याने, गरोदरपणात स्त्रीला आवश्यक असणारे पोषक घटक आंबे पुरवतात. आंबे फॉलिक ऍसिड, पोटॅशियम आणि लोह इद्यादीनी देखील समृद्ध असतात.

असा विश्वास आहे की गरोदरपणात आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यास ‘थर्मोजेनेसिस’ म्हणून ओळखले जाते. पण हे खरं असू शकत नाही! मसालेदार पदार्थ, आले, मिरची आणि मजबूत हर्बल उत्पादनांचे पचन आणि प्रक्रिया करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते आणि ते शरीराची उष्णता वाढविण्यास जबाबदार असतात. आंबे खाल्ल्याने उष्णता वाढते किंवा बाळाला इजा होते असे कोणतेही पुरावे नाहीत.

आंबे हा उर्जा आणि अँटीऑक्सिडेंटचा एक चांगला स्त्रोत आहे जो गर्भधारणेच्या प्रयन्त सुरु असतानाच्या काळात आवश्यक असतो. परंतु, आंबे खरेदी करताना, खात्री करुन घ्या की ते रसायने वापरून पिकवले गेलेले नाहीत. आणि इतर कोणत्याही फळ किंवा भाजीपाल्याप्रमाणे आंब्याच्या हंगामात तुम्ही आंबे खावे. परंतु, असे सूचित केले जाते की तुमच्या आहारात आंब्याचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आंब्याचे पौष्टिक मूल्य

आंब्यात पोषकमूल्ये आणि जीवनसत्त्वे असतात जे गर्भवती महिलेच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतात. आंबे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहेत आणि अल्फा व बीटा कॅरोटीन आणि बीटाक्रिप्टोक्झॅथिन सारख्या फ्लॅव्होनॉइड्सने भरलेले आहेत. त्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि तांबे देखील चांगल्या प्रमाणात असतात. आंब्याच्या पौष्टिक मूल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, खालील तक्ता पहा. खाली दिलेला चार्ट १०० ग्रॅम केशर आंब्याचे पौष्टिक मूल्य सूचीबद्ध करते.

घटक पौष्टिक मूल्य
ऊर्जा 55 किलोकॅलरी
कार्बोहायड्रेट 11 ग्रॅम
प्रथिने 0.5 ग्रॅम
एकूण चरबी 0.5 ग्रॅम
कोलेस्टेरॉल 0 मिग्रॅ
आहारातील फायबर 2.02 ग्रॅम
नियासिन 0.26 मिलीग्राम
पॅन्टोथेनिक acidसिड 0.11 मिलीग्राम
पायिडॉक्सिन (व्हिटॅमिन बी -6) 0.1 मिलीग्राम
रीबोफ्लेविन 0.04 मिलीग्राम
थायमिन 0.03 मिलीग्राम
व्हिटॅमिन सी 29 मिलीग्राम
व्हिटॅमिन ए 210 एमसीजी
व्हिटॅमिन ई 0.2 मिग्रॅ
सोडियम 1.4 मिलीग्राम
पोटॅशियम 143 मिलीग्राम
कॅल्शियम 15.8 मिलीग्राम
तांबे 0.07 मिलीग्राम
लोह 0.43 मिग्रॅ
मॅग्नेशियम 12.53 मिलीग्राम
मॅंगनीज 0.02 मिलीग्राम
जस्त 0.1 मिग्रॅ

गरोदरपणात तुम्ही किती आंबे खाऊ शकता?

आंब्यांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि ते उर्जेचा उत्तम स्रोत असू शकतात. गरोदरपणात विशेषत: तिसर्‍या तिमाहीत तुम्हाला बर्‍यापैकी उर्जा आवश्यक असते. जर तुमच्या डॉक्टरांनी कॅलरीचे प्रमाण वाढवण्यास सांगितले तर तुम्ही तुमच्या आहारात आंब्यांचा समावेश करू शकता. परंतु, येथे संयम ही महत्वाची आहे म्हणून दररोज एका आंब्यापेक्षा जास्त खाऊ नका.

गरोदरपणात आंबे खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

आंब्याला एक अनोखी गोड आणि आंबट चव असल्याने ते गर्भवती स्त्रियांना ते आवडतात कारण आंबे खाल्ल्याने मळमळ होण्याची भावना बर्‍याच प्रमाणात कमी होते. त्यांच्या पौष्टिक भागांच्या आधारे, गरोदरपणात आंबे खाण्याचे आरोग्यविषयक फायदे खालीलप्रमाणे आहेत:

. गर्भवती महिलांना अशक्तपणा टाळण्यासाठी लोहाची आवश्यकता असते, जी गरोदरपणात एक सामान्य स्थिती आहे. आंबे खाल्ल्याने तुमची लोहाची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल. जरी तुम्ही दररोज १ आंबा खाल्ला तरी त्यामुळे आपल्या लाल रक्तपेशींची संख्या वाढते जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करते.

.आंब्यामध्ये फॉलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते जे गरोदरपणात गर्भाच्या विकासास मदत करते. आंबा फॉलीक ऍसिडने समृद्ध असल्याने, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत त्यांचे सेवन केल्यास गर्भाच्या मज्जासंस्थेच्या वाढीस मदत होते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास न्यूरल ट्यूब दोषांना देखील टाळता येऊ शकते.

. आंबे हा आहारातील तंतुमय पदार्थांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पचन प्रणाली चांगली रहाते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आंबे खाऊ शकता. परंतु, ते किती खाता त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस होऊन अस्वस्थता जाणवते.

. आंबे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्याने ते मानवी शरीरातील मुक्त रॅडिकल्स वाढण्यास प्रतिबंध करतात, एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. आंब्यातील व्हिटॅमिन सी अकाली प्रसूतीचा धोकाही कमी करू शकतात.

. .आंबे व्हिटॅमिन बी ५ ने समृद्ध असतात जे फॉलिक ऍसिड प्रमाणेच मज्जासंस्थेच्या विकासासाठी आदर्श आहेत.

. आंब्यात व्हिटॅमिन ए असते, जे बाळाची हाडे आणि दात ह्यांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए डोळे आणि मज्जासंस्थेचे पोषण देखील करते.

. आंबे हे मॅग्नेशियमचे समृद्ध स्त्रोत आहे, हा उच्च रक्तदाबसाठी नैसर्गिक उपचार आहे आणि प्रीक्लेम्पसिया प्रतिबंधित करते. गरोदरपणात प्रीक्लॅम्पसियामुळे फिट्स येऊ शकतात, म्हणून आहारात आंबे घेतल्यास मदत होते.

. आंब्याची गोड आणि आंबट चव मॉर्निंग सिकनेसचा आजार कमी होण्यास मदत करते, गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस होणे सामान्य असते. आंब्यातील व्हिटॅमिन बी ६ मुळे तुम्हाला सकाळी होणारा त्रास सहन होण्यास मदत होते.

. पोटॅशियम शरीरात द्रव संतुलन राखण्यास मदत करते, जे विशेषतः गरोदरपणात गंभीर असते. शरीराच्या खालच्या भागात द्रव जमा होण्यामुळे हालचालींना अडथळा येऊ शकतो आणि जास्त द्रवपदार्थ देखील धोकादायक ठरू शकतात. आंबे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे तुम्ही आहारात आंबे समाविष्ट करू शकता.

१०. आंब्यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे तुम्हाला कृत्रिम साखर खाण्याची लालसा होत नाही. कृत्रिम साखर आणि संरक्षक पदार्थ असलेले पदार्थ खाऊ नका.

गरोदरपणात आंब्याचे सेवन करण्याचे दुष्परिणाम

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा खाल्ल्यास कोणताही दुष्परिणाम होत नाही, तर कृत्रिमरित्या आंबे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड वापरले जाते त्याचे घटक म्हणजेच आर्सेनिक आणि फॉस्फरस आंब्यात उतरतात. त्याचे दुष्परिणाम आई आणि बाळावर होऊ शकतात. कृत्रिमरित्या पिकलेले आंबे खाण्याचे काही दुष्परिणाम येथे आहेत.

 • अतिसार
 • मनस्थितीतील बदल
 • चक्कर येणे
 • डोकेदुखी
 • फिट्स
 • झोप येणे
 • हातापायांना मुंग्या येणे

आंब्याचे विषाक्तता कमी करण्यासाठी टिप्स

आपण खरेदी करीत असलेले आंबे कृत्रिमरीत्या पिकवले आहेत की नाही हे सांगणे नेहमीच सोपे नसते. काही सोप्या सावधगिरीमुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. त्यासाठी खालील प्रकारे काळजी घ्या.

 • आंबे धुवा आंब्याचे सेवन करण्यापूर्वी आंबे चांगले धुवावे जेणेकरून आंबे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम घटक धुतले जातील.
 • आंब्याचे साल आंब्याचा गर खाण्यापूर्वी फळाचे साल काढा. त्यामुळे विषारी द्रव्यांचा संपर्क कमी होईल आणि त्यांच्यापासून होणारा धोका सुद्धा कमी होईल.
 • योग्य स्वच्छता ठेवा आंबे सोलल्यानंतर, चिरण्यासाठी घेतलेले चाकू, बोर्ड तुम्ही नीट स्वच्छ धुवा तसेच हात स्वच्छ धुवून घ्या.

कच्चा आंबा खरेदी करणे आणि नंतर तो पिकविणे ही आणखी एक उपयुक्त टीप आहे. आंबे कॅल्शियम कार्बाईडपासून मुक्त आहेत हे सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे

सामान्य प्रश्न

. गर्भधारणेदरम्यान कोणते आंबे खाणे सुरक्षित आहे?

कच्चा किंवा पिकलेला आंबा गरोदरपणात खाल्ला जाऊ शकतो आणि तो सुरक्षित असतो. पिकलेले आंबे भूक उत्तेजित करतात, पचन करण्यास मदत करतात आणि त्वचा सुधारण्यास मदत करतात. कच्च्या आंब्यात असणारे व्हिटॅमिन्स ऍसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस चा सामना करण्यासाठी मदत करतात. गरोदरपणात ती पूर्णपणे सुरक्षित असतात.

. गरोदरपणात शेवटच्या टप्प्यात आंबे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत आंब्याचे जास्त सेवन केल्याने मधुमेह होऊ शकतो, म्हणूनच आंबा खाणे मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

. आंबा योग्य आहे की नाही हे मला कसे कळेल?

जर तुम्हाला संपूर्ण पिकलेला आंबा खायचा असेल तर तुम्ही आंबा खाण्यापूर्वी खालील गोष्टी तपासल्या आहेत याची खात्री करा:

 • पोत: पिकलेला आंबा किंचित मऊ असतो. तुम्ही कच्चा आंबा खरेदी करूननैसर्गिकरित्या पिकण्यासाठी तसाच ठेवू शकता. परंतु लक्षात ठेवा, तो खूप जास्त पिकण्यापूर्वी खा.
 • वास: जर आंब्याला गोड वास येत असेल तर ते पिकलेले आहत आणि तुम्ही ते खरेदी करू शकता.

जर आंब्याचे सेवन मर्यादेत असेल तर तुम्ही आंबा गरोदरपणात देखील खाऊ शकता. परंतु दैनंदिन आहारामध्ये आंबा मिल्कशेक्स आणि आंब्याचे तुकडे समाविष्ट करण्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या नंतर तुमच्या गरोदरपणातील आहारात हे गोड फळ समाविष्ट करा.

आणखी वाचा: गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article