Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ५ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ५ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ५ वा आठवडा

अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात पोहोचला आहात आणि तुमचा साहसी प्रवास सुरू झाला आहे! गरोदरपणात, तुमचे शरीर बर्‍याच बदलांमधून जाईल आणि जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर हे बदल अधिक स्पष्ट होतील. जरी पाचव्या आठवड्यांत महिलांना जुळी किंवा त्याहून अधिक बाळे होणार आहेत की नाही हे माहित नसले तरी, अनेक गर्भवती स्त्रिया जुळ्या किंवा एकाधिक बाळांची अपेक्षा करतात. जर तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर तुम्ही दुहेरी गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणांबद्दल निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे. तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहात आणि आम्हाला माहिती आहे की हे आपल्यासाठी थोडे निराशजनक होऊ शकते. परंतु जेव्हा तुमच्या गर्भाशयात तुमचे लहान मूल कसे वाढते हे समजल्यानंतर तुम्हाला बरेच चांगले वाटेल.

जुळी बाळे आहेत हे कधी ओळखले जाऊ शकते?

जर तुम्हाला जुळे होणार असल्याची शंका असेल तर तुम्ही ते खरे आहे का हे शोधण्यासाठी उत्सुक असाल. परंतु जुळी मुले किंवा एकाधिक गर्भधारणा केवळ तेंव्हाच ओळखली जाते जेव्हा ती स्वतंत्र सॅकमध्ये आढळतात. या टप्प्यावर हृदयाचे ठोके शोधणे आणि ते विभक्त करणे कठीण आहे. एक पिशवी सामायिक करणारी बाळे ओळखणे कठीण असते कारण त्यांच्या हृदयाचे ठोके एकमेकांशी खूप जुळवून घेत असतात. म्हणून गर्भधारणेच्या ५ व्या आठवड्यात दुहेरी गर्भधारणा शोधणे शक्य नाही. परंतु जेव्हा आपण गर्भधारणेच्या ६ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा तुमच्या डॉक्टरांना बाळांचे हृदयाचे ठोके शोधणे सोपे होईल कारण या टप्प्यापर्यंत बाळाची स्वतःची वेगळी पिशवी (सॅक) असते आणि त्यांचे वेगवेगळे हृदयाचे ठोके लक्षात येऊ शकतात. लवकर स्कॅन करण्याचा पर्याय तेव्हाच निवडावा जेव्हा तुम्ही त्यासाठी प्रीमियम किंमत देण्यास तयार असाल.

५ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या सुमारे ५ व्या आठवड्यांत, बाळांचा आकार किंचित मोठ्या बियाण्यासारखा असतो. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये बाळाचा आकार टॅडपोल सारखा दिसतो आणि तो पुढील काही आठवड्यांमध्ये हळूहळू मानवी रूप धारण करतो. एन्डोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्मच्या थरांनी झाकलेले भ्रूण शरीराच्या विविध अवयवांमध्ये विकसित होण्यास सुरवात करतात. आपल्या बाळांचे दात, केस, जननेंद्रिया, नखे, मज्जासंस्था, रक्त, आतडे आणि इतर असंख्य भाग हळूहळू तयार होऊ लागतात. बाळांच्या न्यूरल ट्यूब बंद होण्यास सुरुवात होते आणि न्यूरल ट्यूबचा वरचा भाग डोक्याच्या कवटीचा आकार घेऊ लागतो. बाळाच्या अंड्यात असलेल्या बलकांचा वापर नाळेमध्ये विकसित होण्यास होतो . ही नाळ बाळांच्या विकासासाठी आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन प्रदान करते.

बाळांचा आकार केवढा असतो?

तुमच्या गर्भारपणाच्या सुमारे ५ व्या आठवड्यात, तुमची बाळे खूपच लहान असतील. या टप्प्यावर बहुतेक बाळे टॅडपोलच्या आकाराप्रमाणेच असतात. तुमची लहान बाळे ह्या टप्प्यावर बियाण्याच्या आकाराच्या आसपास असतात.

सामान्य शारीरिक बदल

बहुतेक स्त्रियांमध्ये, ह्या टप्प्यावर गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणे स्पष्ट दिसू लागतात. जेव्हा एखादी स्त्री जुळ्या मुलांसह गर्भवती असते, तेव्हा हे बदल अधिक गहन होतील. बरेचसे बदल हे सर्व गर्भवती स्त्रियांमध्ये सामान्य असतात.

  • कधीकधी आपल्याला मळमळ वगळता कोणत्याही इतर लक्षणांचा सामना करावा लागत नाही.
  • हार्मोनल पातळीत चढउतार होत राहिल्याने तुमचे स्तन अधिकच संवेदनशील आणि कोमल होऊ लागतील. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी शरीरात वेगाने वाढू लागेल. यामुळे स्तनांवर आणि आजूबाजूला चरबीचा थर जमा होतो तसेच स्तनांकडे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे त्यांचा आकार वाढतो आणि त्यामुळे ते अधिक मऊ होतात
  • यावेळी हार्मोनल चढउतारा मुळे एखादी महिला अधिक लाळ गाळू शकते. ह्याचे प्रमाण जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती महिलांमध्ये अधिक असू शकते. गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असलेले च्युईंग गम चघळल्यास मदत होते

जुळ्या बाळांसह गरोदरपणातील ५ व्या आठवड्यातील लक्षणे

आपण एका बाळाची किंवा जुळ्या मुलांची अपेक्षा करत असलात तरी, गर्भधारणेची चिन्हे आणि लक्षणे बहुधा समान असतील. आपण आपल्या गर्भधारणेच्या ५ आठवड्यात खालील लक्षणांची अपेक्षा करू शकता.

. थकवा

जर तुम्ही जुळ्या मुलांसह गर्भवती असाल तर तुम्हाला सतत थकवा येऊ शकेल. एकाधिक बाळांमुळे तुमच्या शरीरावर ताण येऊन तुम्हाला अत्यंत थकल्यासारखे वाटू शकते. काही सोप्या व्यायामासह योग्य विश्रांती घेतल्यास तुम्हाला बरे वाटण्यास मदत होईल

. वारंवार लघवीला जावेसे वाटणे

एकाधिक बाळांच्या उपस्थितीमुळे गर्भाशयाचा आकार थोड्या कालावधीत खूप मोठा होऊ शकतो. वाढत्या गर्भाशयाचा दाब मूत्राशयावर पडतो आणि गर्भाशयाला जागा मिळावी म्हणून ते थोडे आकुंचन पावते. परिणामी मूत्राशय कमी प्रमाणात मूत्र धारण करते. त्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागेल. जेव्हा तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा होते तेव्हा ती दाबून धरू नका अन्यथा मूत्राशयात संक्रमण होऊ शकते

. मॉर्निंग सिकनेस

दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्हाला मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहिल्यास काही स्त्रियांमध्ये परिस्थिती वाईट होते. मॉर्निंग सिकनेस हा शब्दप्रयोग चुकीचा ठरू शकतो कारण मळमळ झाल्याची भावना दिवसभर वेगवेगळ्या वेळेला येते आणि जाते. जसजसे दिवस सारतात तसे मळमळ आणखी तीव्र होऊ शकते, जी बर्‍याच जणांना निराश करू शकते. या समस्येचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी थोडे परंतु वारंवार खात रहा.

. ऍसिडिटी

जर तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळे होणार असतील तर त्यामुळे पोटावर दाब येऊ शकतो. पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेत वरच्या दिशेने ढकलले जाऊ शकते. यावेळी होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे झडपा सैल होऊ शकतात त्यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेतून बाहेर पडते. अशा प्रकारच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अँटासिड्स खूपच चांगले आहेत, जेवणानंतर हलके फिरायला गेल्यास बरीच मदत होते

ऍसिडिटी

. चोंदलेले नाक

गरोदरपणात, स्त्रीच्या शरीरात रक्ताभिसरण वाढते. हे नाकासह शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचते आणि त्यावर परिणाम करते. यामुळे नाकपुडीच्या आत श्लेष्मल त्वचेला उत्तेजन मिळते आणि बरेच चिकट पदार्थ तयार होतात

. नाकातून आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव

तुमच्या नाकातून आणि हिरड्यांमधून वेळोवेळी रक्त येऊ शकते. विशेषत: जर एखाद्या स्त्रीला एकाधिक गर्भधारणा झाल्यास हे सामान्य असेल. या काळात रक्ताच्या प्रमाणात आणि हार्मोन्समध्ये वाढ झाल्याने नाक आणि तोंडातील रक्तवाहिन्यांचे जाळे पसरते ज्यामुळे आपल्या नाकात रक्त वाहू शकते. ब्रश केल्यानंतर आपल्या हिरड्यांमधून खूप रक्त येते

. धाप लागणे आणि उच्च रक्तदाब

बऱ्याच गर्भवती स्त्रियांना दिवसाच्या बर्‍याच वेळा श्वासोच्छवासाची समस्या जाणवू शकते आणि गरोदरपणात जसजशी प्रगती होत जाईल तसतसे हि समस्या वाढतच जाईल. रक्ताचा पुरवठा वाढणे आणि रक्तदाब कमी होणे अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे हृदयाचे ठोके वेगवान होऊ शकतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपण ५ व्या आठवड्यातील पोटाचा आकार

आपले पोट पूर्वीपेक्षा जरा मोठे असेल आणि या काळात एका बाळासह गर्भवती असणाऱ्या महिलेच्या तुलनेत तुमच्या वजनातील वाढ जास्त असेल. तुमचे डॉक्टर गर्भाशयाचा आकार देखील तपासून बघू शकतात, जर तो नेहमीपेक्षा मोठा असेल तर एका पेक्षा जास्त बाळांची उपस्थिती नक्की स्पष्टपणे दर्शवेल.

जुळ्या बाळांसह गर्भारपणाचा ५ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

सहसा, एखादी स्त्री तिच्या गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात पोहोचत नाही तोपर्यंत अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जात नाही. ह्या कालावधीत केलेल्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमुळे आपल्या डॉक्टरांना प्रसूतीची अंदाजे तारीख निश्चित करण्यात मदत होते. कोणत्याही विकृती किंवा विकासात्मक समस्येची उपस्थिती नाकारण्यासाठी डॉक्टर इतर चाचण्या घेवू शकतात. गरोदरपणाचे ८ आठवडे पूर्ण करण्यापूर्वी केलेले कोणतेही स्कॅन सामान्य बाह्य पद्धतीऐवजी आंतरिकरित्या केले जाते. अशा परिस्थितीत, मॉनिटरवर बाळांच्या प्रतिमा मिळविण्यासाठी अल्ट्रासाऊंड प्रोब स्त्रीच्या योनीमध्ये घातले जाते. अशा तंत्राने गर्भाशयात असलेल्या एकाधिक बाळांच्या स्पष्ट आणि चांगल्या प्रतिमा मिळविणे सुलभ होते.

काय खावे?

जुळ्या मुलांसह गर्भवती राहिल्याने त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही निरोगी आहार घेणे जरुरीचे आहे. आपण एकाधिक बाळांची अपेक्षा करत असल्याने आपली भूक वेगाने वाढेल आणि तुम्हाला वारंवार तीव्र भूक लागेल. थोडे परंतु वारंवार निरोगी अन्न खा. वजन कमी करण्याच्या कार्यक्रमाची निवड करू नका किंवा कोणत्याही खाद्यपदार्थांवर प्रतिबंध घालू नका कारण तुमच्या बाळांना सगळ्या घटकांची अपेक्षा असते.

गरोदरपणात स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

गरोदरपणाच्या या टप्प्यात स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स लक्षात घेतल्यास तुम्हाला आगामी आठवडे आणि महिने निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होईल.

हे करा

  • आपल्या डॉक्टरांशी बोला आणि निर्धारित जन्मपूर्व जीवनसत्त्वे नियमितपणे घ्या
  • दंत तपासणीसाठी जा आणि आपल्या गर्भधारणेस गुंतागुंत करणारी कोणतीही परिस्थिती नाकारा
  • पौष्टिक आहार घ्या आणि स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी काही हलके व्यायाम सुरू करा

गरोदरपणात स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

काय टाळावे?

  • मोह टाळणे चांगले आहे, कोणत्याही प्रकारच्या कमी शिजवलेल्या आणि कच्च्या मांस उत्पादनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विकसनशील बाळांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लागण घातक ठरू शकते.
  • आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी स्वत: ला जास्त ताण देऊ नका त्याचा आपल्यावर आणि आपल्या बाळावर परिणाम होऊ शकेल. आराम करा आणि या सुंदर टप्प्याचा आनंद घ्या!

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुमच्या पोटाचा घेर वाढू लागेल. म्हणून बाहेर जाण्यासाठी आणि मॅटर्निटी कपडे विकत घेण्यासाठी आता ही चांगली वेळ असेल. तसेच, स्कर्ट किंवा इतर सैलसर कपडे घेण्यास प्रारंभ करा जे पुढील दिवसांसाठी योग्य असतील.

जुळ्या बाळांसह ५ आठवड्यांची गर्भवती असणे हे एक यश आहे. खासकरून जर तुम्ही पहिल्यांदा गर्भवती असाल तर गर्भारपणाचे सुरुवातीचे दिवस कठीण वाटू शकतात. परंतु लक्षात ठेवा की हा टप्पा लवकरच संपेल. शांत रहा आणि निकालावर लक्ष केंद्रित करा. लवकरच, तुम्ही तुमच्या बाळांना जन्म देणार आहात. दरम्यान, आनंदी रहा आणि पौष्टिक खा आणि तुमच्या निरोगी बाळांच्या स्वागतास तयार रहा.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे गरोदरपण : ४ था आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ६ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article